Thursday, March 31, 2022

"2 एप्रिल, गुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय; मास्कमुक्ती ऐच्छिक; 2 वर्षानंतर कोरोना निर्बंध मुक्तीमुळे जनतेला मिळणार मोठा दिलासा"...



मुंबई, दि.31 : कोरोना महामारीमुळे जगभरात, भारतात, तसेच महाराष्ट्रात कोरोनाचे कडक निर्बंध लोकांना पाळावे लागले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत कोरोनाचे निर्बंध हटविण्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 



गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून "आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. 



यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले.




या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना निर्बंध हटविण्याच्या निर्णयाविषयी  माहिती दिली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच मास्क परिधान करणेदेखील ऐच्छिक असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.




आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले की, "२ एप्रिलपासून राज्यात संसर्गजन्य आजाराच्या कायद्याअंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, याचा अर्थ आता एकदम बिनधास्तपणे वावरावे असा होत नाही. त्यामुळे लोकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी मास्क घालावा. मास्क वापरणे ऐच्छिक असेल."

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षापासून असलेले निर्बंध हटविण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय जनतेला नक्कीच दिलासा देणारा आहे.


Thursday, March 24, 2022

"महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी असणाऱ्या 'शक्ती कायद्याला' बळकटी देणाऱ्या "या" महत्वपूर्ण विधेयकाला महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंजुरी; विधेयकातील "या" आहेत विशेष तरतुदी"...


मुंबई, दि. 24 : महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने  शक्ती विधेयक नुकतेच मंजूर केले होते. आता या शक्ती विधेयकाला बळकटी आणण्यासाठी विधानपरिषद तसेच विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सन 2020 चे विधेयक क्र. 52 "महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020" मांडले. 



या विधेयकास विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. या विधेयकातील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येईल, तसेच महिला अत्याचार प्रकरणातील अपराधाचे गांभीर्य ओळखून त्याचा तपास विशेष पथकाकडे देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.



हे विधेयक मांडत असताना गृहमंत्री श्री.पाटील म्हणाले की,  राज्यातील महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्य सरकारने विधेयक क्र. 21 - शक्ती विधेयक याआधीच मंजूर केले होते. परंतु त्या विधेयकाला आवश्यक असणाऱ्या इतर सुविधा देण्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करायला हवी होती. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


त्या व्यवस्थेसाठी  2020 चे विधेयक क्र. 52 आणण्यात आले आहे. याआधी 14 डिसेंबर 2020 रोजी हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले होते. दोन्ही बाजूच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक चर्चेसाठी पाठविले असता समितीने एकमताने केलेला अहवाल संमत केला. सदर विधेयकाद्वारे महिला व बालकांच्या विनिर्दिष्ट गुन्ह्यांबाबत अनन्य विशेष न्यायालय स्थापित करण्यात येतील किंवा अस्तित्वात असलेल्या न्यायालयांना विनिर्दिष्ट करता येईल.


आता या विधेयकाद्वारे विशेष न्यायालय स्थापन होणार आहे. तथापि प्रसंगानुसार उपलब्ध न्यायालयांना देखील हा दर्जा देऊन त्यांनाही निर्देशित करणे शक्य होणार आहे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात गुन्हेगारांना योग्य शिक्षा करणे अत्यंत आवश्यक असल्याने विशेष सरकारी अभिवक्ता बदलण्याची व त्याऐवजी विशेष सरकारी अभिवक्ता नेमण्याची खंड 7 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


तर खंड 8 मध्ये विनिर्दिष्ट अपराधांची अन्वेषण करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष पोलिस पथक गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक, पोलिस अधिकारी यांना अपराधाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर अपराधाचे अन्वेषण विशेष पथकाकडे सोपविण्याचे अधिकार असतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.


राज्य सरकारने मंजूर केलेल्या शक्ती विधेयकाला अधिक बळकट करण्याच्यादृष्टीने हे नवे विधेयक आणले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून प्रकरणाचा निकाल लवकर लागून आरोपीला लवकर शिक्षा होण्यास मदत होईल.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


 हे विधेयक संयुक्त समितीने एकमताने सादर केलेले आहे, असे सांगून गृहमंत्री श्री.वळसे पाटील यांनी विधेयक सभागृहात मांडले. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधेयक मतास टाकल्यानंतर सभागृहाने एकमताने विधेयक मंजूर केले. त्यानंतर हे विधेयक विधान परिषदेत उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनीही ते एकमताने मंजूर झाल्याचे घोषित केले.





Tuesday, March 15, 2022

पुरंदर तालुक्यातील 'अवघ्या ५००च्या' आसपास लोकसंख्या असलेल्या "राऊतवाडीतील", कोरोना काळात महाराष्ट्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या, अभिमानास्पद कामगिरी बजावणाऱ्या "या" ४५ महिला परिचारिका,६ महिला डॉक्टर, ६ महिला औषध दुकानदार; या महिला रणरागिणींचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न"....

 


पुरंदर,परिंचे,दि.१५ :  पुणे जिल्ह्यातील गौरवशाली इतिहासाचा वारसा असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील, परिंचे - राऊतवाडी येथील कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय,अतुलनीय कार्य करणाऱ्या, संपूर्ण पुणे जिल्ह्याला, पुरंदर तालुक्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावणाऱ्या, अवघ्या पाचशेच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या राऊतवाडीच्या आरोग्य क्षेत्रातील महिला रणरागिणींचा गौरव सोहळा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत, परिंचे - राऊतवाडीकर ग्रामस्थांच्या उत्कृष्ट नियोजनातून, राऊतवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.





महाराष्ट्रात कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, अतुलनीय कामगिरी करणाऱ्या, परिंचे - राऊतवाडीच्या ४५ महिला परिचारिका, ६ महिला डॉक्टर, ६ औषध दुकानदार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी या सर्व महिला रणरागिणींनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावून  जनसामान्यांची मने जिंकली आहेत.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी बजावणाऱ्या, या महिला रणरागिणींचा परिंचे - राऊतवाडी ग्रामस्थांच्यावतीने फेटा बांधून, साडी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राऊतवाडीच्या स्त्रीशक्तीच्या या गौरव सोहळ्यासाठी, पुरंदरचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री विजय  शिवतारे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शिवसेना युवा नेते समीर जाधव, परिंचे माजी उपसरपंच सोपान राऊत, परिंचे उपसरपंच दत्तात्रय राऊत, नवलेवाडी सरपंच सौ कविता वाघोले, मा. सरपंच किसन वाघोले, प्राध्यापक संभाजी नवले, उपस्थित होते.





परिंचे - राऊतवाडीकर ग्रामस्थांच्या वतीने प्रथम गावातील मुख्य रस्त्याने हलगीच्या तालावर, तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत या महिला रणरागिणींचा मिरवणूक सोहळा आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात पार पडला.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


राऊतवाडीच्या महिला रणरागिणींच्या गौरव सोहळ्यात महापुरुषांच्या मूर्तींना पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर, परिंचे उपसरपंच दत्तात्रय राऊत, किसन वाघोले, प्राध्यापक संभाजी नवले, शिवसेना युवा नेते समीर जाधव यांनी सर्व महिला रणरागिणींचे, गौरव मूर्तींचे स्वागत, अभिनंदन व कार्याचे कौतुक केले.




पुरंदरचे लोकप्रिय नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या महिला रणरागिणींच्या अतुलनीय कार्याचे, खास शैलीत, आपल्या भाषणातून कौतुक केले.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


"कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता या महिला रणरागिणींनी  अतुलनीय कार्य केलेले आहे. यांचा गौरव करताना खूप आनंद होत आहे. परिंचे - राऊतवाडीच्या या छोट्याश्या वाडीतील या सावित्रीच्या लेकींचे, महिला रणरागिणींचे अतुलनीय कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मनुष्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे." अशी भावना पुरंदरचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी  भाषणातून व्यक्त केली.




"पुरंदर तालुक्यात आरोग्यसेवेत एवढ्या प्रचंड महिला असणारे परिंचे - राऊतवाडी हे एकमेव गाव आहे. जिजामाता,अहिल्यादेवी, सावित्रीबाई  फुले यांचा संघर्षाचा वारसा या महिला रणरागिणींनी जपलेला आहे." असे मत  पुणे जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी व्यक्त केले.




"कोरोना महामारी मध्ये संपूर्ण जगावर फार मोठे संकट होते अशा वेळेस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच  कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले गेले. कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आमच्या राऊतवाडीच्या सर्वच महिला रणरागिणींचा आम्हा सर्व ग्रामस्थांना, तालुक्याला खूप अभिमान आहे. या महिला रणरागिणींच्या शौर्याला, समर्पण प्रवृत्तीला, संवेदनशीलतेला आमच्या परिंचे - राऊतवाडीकर  ग्रामस्थांचा गौरवपूर्ण सलाम." अशी प्रतिक्रिया परिंचे गावचे मा. उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते सोपान राऊत यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"गौरवशाली व प्रेरणादायी इतिहास असणाऱ्या पुरंदरच्या भूमीतील, राऊतवाडी सारख्या छोट्याशा गावातील आरोग्यसेवा क्षेत्रातील महिला रणरागिणींचे, कोरोना काळातील संपूर्ण महाराष्ट्रात केलेले प्रामाणिक, अतुलनीय कार्य खुप गौरवास्पद, कौतुकास्पद व संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गासाठी प्रेरणादायी आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




राऊतवाडीच्या महिला रणरागिणींच्या  सत्कार समारंभात जे जे हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ परिचारिका वैशाली राऊत, सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत असणाऱ्या भाग्यश्री राऊत, बारामती येथे नर्सिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या कोमल राऊत यांनी त्यांचे शालेय अनुभव, कोरोना काळातील भयानक परिस्थिती या विषयी अनुभव कथन करून, सत्कार समारंभाबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.




या कार्यक्रमासाठी अजित नवले, गणेश वाघ, प्रवीण जाधव, अर्चना राऊत, गणेश पारखी  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोपान राऊत यांनी केले. आभार  शुभम राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजक समस्त राऊतवाडी ग्रामस्थ मंडळ होते.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


आपल्या गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर समस्त ग्रामस्थांनी कौतुकाची थाप टाकणे हे सर्वच सत्कार मूर्तींना अजून चांगले काम करण्यासाठी बळ देऊन जाते.





Saturday, March 12, 2022

"१ लाख कोटी डॉलरचे ध्येय ठेवणाऱ्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पुढील ३ वर्षांत विकासाच्या "या" पंचसूत्रीसाठी "एवढे" लाख कोटी खर्च करण्यात येणार;२४ हजार ३५३ कोटी महसुली तुटीच्या या अर्थसंकल्पात पुण्यातील विकास कामांसाठी केल्या "या" करोडो रुपयांच्या निधीच्या महत्वपूर्ण घोषणा"...


मुंबई दि. १२:
  कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा,१ लाख कोटी डॉलरचे ध्येय ठेवणारा अर्थसंकल्प  राज्य विधिमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या  विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 



त्यांनी अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाला बूस्टर डोस मिळाल्याचे सांगताना हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या, समाजातील दुर्बल घटकांच्या हिताची जोपासना करत असल्याचेही  म्हटले आहे.


महाराष्ट्राच्या जनतेला आशादायी वाटणार्‍या, विकासाचे नवीन स्वप्न देणाऱ्या, कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्री वरती भर देणाऱ्या अर्थसंकल्पात २०२२ -२३ या आर्थिक वर्षाचा 24 हजार 353 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व  अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या या पंचसूत्री वर पुढील तीन वर्षात चार लाख कोटी खर्च करण्यात येणार आहेत.




येत्या  आर्थिक वर्षात चार लाख ३ हजार ४२७ कोटी रुपयांची महसुली जमा व ४ लाख २७ हजार ७८० कोटी रुपयांचा महसूल खर्च अपेक्षित असून दीड लाख कोटी रुपयांची वार्षिक योजना खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


या महत्वकांक्षी अर्थसंकल्पात कृषी व संलग्न क्षेत्रासाठी २३ हजार ८८८ कोटी रुपये, आरोग्यासाठी ५ हजार २४४ कोटी, मनुष्यबळ विकासासाठी ४६ हजार ६६७ कोटी रुपये, दळणवळणासाठी २८ हजार ६०५ कोटी रुपये तर उद्योग व उर्जा यांच्यासाठी १० हजार १११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 
विकासाची पंचसूत्री : -


कोरोनाचे संकट, निसर्गाचा लहरीपणा यामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झालेली असतांनाही राज्य विकासाची घोडदौड कायम असल्याचे  अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की,विकासाच्या पंचसूत्रीसाठी तीन वर्षात ४ लाख कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राला या अर्थसंकल्पाने मोठा दिलासा दिला आहे.  राज्यातील सिंचन क्षमता वाढवणे, ६० हजार कृषी पंपाना वीज जोडणे देणे, राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे, यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. निर्यातक्षम २१ शेतमालाचे क्लस्टर तयार केल्याने शेतमालाला चांगला भाव मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

 
आरोग्य सुविधांचे बळकटीकरण


कोरोनाने जेव्हा आपल्या आरोग्यासमोर मोठे संकट निर्माण केले तेंव्हा राज्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधांचे निर्माण केले. हीच व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे, आरोग्य सेवांचा दर्जात्मक विस्तार करण्याचे नियोजनही अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. १६ जिल्ह्यात १०० खाटांची स्त्री रुग्णालये उभी करण्यात येणार आहेत.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



मुंबई बाहेरील प्रमुख शहरांमध्ये ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण विभागातील रुग्णालयामध्ये किडनी स्टोन काढण्याची उपचार पद्धती, सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयाची स्थापना अशा विविध महत्त्वाच्या योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या. वैद्यकीय शिक्षणाचाही गुणात्मक आणि दर्जात्मक विकास करण्यावर यात भर आहे. पुणे शहराजवळ देशातील पहिली वैद्यकीय वसाहत  उभारण्यात येणार आहे.

 
पुणे शहर व जिल्ह्यासाठी अर्थसंकल्पातील महत्वपूर्ण घोषणा : -


१) पुणे रिंग रोड साठी १५०० कोटी रुपयांची तरतूद.

२) पुणे शहराजवळ तीनशे एकर जागेमध्ये अत्याधुनिक "इंद्रायणी मेडिसिटी" वैद्यकीय वसाहत उभारणार.

३) पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी 80 टक्के खर्च केला जाणार.

४) पुण्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या मेट्रो मार्गांचा विस्तार.

५) छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारकासाठी २५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.

६) पुणे वनविभागात ९० हेक्टर वनक्षेत्रात बिबट्या सफारी क्षेत्र प्रस्तावित, ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित.

७) राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटींची तरतूद.

८) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) या संस्थेसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद.

९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) २५० कोटींच्या निधीची तरतूद.

१०) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी (महाज्योती) २५० कोटी रुपये निधीची तरतूद.

११) महाराणी सईबाई स्मृतिस्थान विकासासाठी निधी देण्यात येणार.

१२) कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसरात विकास कामे हाती घेणार.





रोजगारसंधीचा विकास


रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी इनोव्हेशन हब स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. नवीन स्टार्टअप्सची राज्यात निर्मिती होऊन त्या माध्यमातून रोजगार संधीत वाढ करण्यासाठी स्टार्टअप फंडासाठी १०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.

 
सामाजिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद


हा अर्थसंकल्प महिला व बालकांच्या व दुर्बल घटकांच्या हिताच्या रक्षणासाठी, त्यांच्या विकासासाठी आपली कटिबद्धता दाखवतो.  अंगणवाडी मदतनिसांना मोबाईल सेवा देणारी ई शक्ती आपण प्रदान करत आहोत. बालसंगोपन अनुदानात भरीव वाढ करण्यात आली आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात अमृतमहोत्सवी महिला व बाल भवनाची उभारणी करण्याचे अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आले आहे.  नागरी भागातील कुपोषण दूर करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, इमाव व आदिवासी विभागाच्या योजनांना अर्थसंकल्पात खूप मोठी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे वर्ष  महिला  शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे होणारे असून महिला शेतकऱ्यांची कृषी योजनेतील ३० टक्क्यांची तरतूद वाढवून ५० टक्के केल्याने महिला शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटी रुपयांचा निधी, थोर समाज सुधारक व महनीय व्यक्तींच्या नावे अध्यासन केंद्रे सुरु करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी, ऐतिहासिक व महत्वाच्या शाळांचा विकास, मराठी भाषा भवनासाठी  निधी देतांना तंत्रचलित नाला सफाईची निश्चिती या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

 
ई वाहन धोरणाच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन

 
इलेक्ट्रिक वाहन धोरणास प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग सुविधा वाढविणे, मोठ्या शहरांत सार्वजनिक वाहतुकीचा 25 टक्के हिस्सा इलेक्ट्रिक वाहनांचा असण्यासाठी टाकलेली पाऊले महत्त्वाची आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.


 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिक्षित करणे, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करणे, नद्यांचे संवर्धन यामुळे पर्यावरण सजगता  निर्माण होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 
पायाभूत सुविधांचा विकास


रस्ते, मेट्रो, बंदरविकास, विमानतळ विकास अशा विविध दळणवळणाच्या साधनांचा दर्जात्मक विकास, गृहनिर्माण क्षेत्रातील उदि्दष्टपूर्ती  करण्याला या अर्थसंकल्पाने प्राधान्य दिले आहे.

एसटी महामंडळाला ३ हजार नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी तसेच १०३ बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी भांडवली अर्थसहाय्य करण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. मुंबई महानगरप्रदेशातील वाहतूक ताण कमी करण्यासाठी नवीन जलमार्गांची निश्चिती करण्यात आली आहे.
 
नव्या योजना


पिक विमा योजनेत केंद्र सरकारने सुधारणा केली नाही तर शेतकऱ्यांच्या पिक  नुकसानीकरिता अन्य पर्यायांचा विचार करण्याचे सुतोवाच या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. वसमत येथे मा. बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार आहे.  सोयाबीन व कापूस पिकासाठी विशेष कृती कार्यक्रम आखल्याने विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. मिशन महाग्रामच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा करण्यात आलेला प्रयत्न,  पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजनेची अंमलबजावणी, मुंबई-पुणे, नागपूर येथे स्वातंत्र्य लढ्याशी संबेधित स्थळांचा हेरिटेज वॉक, जिल्हानिहाय महावारसा सोसायट्याची स्थापना, विविध धार्मिक स्थळे आणि परिसर विकासासाठी निधी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती अशा काही नवीन योजना आणि उपक्रमांची आखणीही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.



अर्थसंकल्पातील विकासकामांच्या पंचसूत्रीवरील तरतुदी : - 


कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. विकासाची पंचसूत्री, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळ, संस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्यासाठी योजना ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.


नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सादर केला.




सन 2022-23 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 13,340 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. वार्षिक योजनेसाठी 1,50,000 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 12,230 कोटी, अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी 11,199 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.


महसूली जमा 4,03,427 कोटी प्रस्तावित असून महसुली खर्च 4,27,780 कोटी रूपये आहे. महसुली तूट 24,353 कोटी रूपये अपेक्षित आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.




कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रूपयांची तरतूद


कोवीड-19 च्या कालावधीत कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. या क्षेत्राला आणखी बळकट करण्यासाठी 23 हजार 888 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी, आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदीकरीता 6,952 कोटी रूपयांची तरतूद आणि येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.  


मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करून ती 75 हजार करण्यात आली आहे.वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देणार कृषी संलग्न क्षेत्राला बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. 

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


यासाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणासाठी 950 कोटी, मृद आणि जलसंधारणासाठी 4,774 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे.


रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, अव्हॅकॅडो, द्राक्षे फळांचा तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा समावेश करून फळशेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. पशुधन विकासासाठी देशी गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी राज्यात तीन मोबाईल प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.


सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी 5,244 कोटींची तरतूद


महाराष्ट्राने कोवीड-19 महामारीचा खंबीरपणे सामना केला. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशिल आहे. यासाठी 5,244 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रथम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट उभारले जाणार आहेत. 




200 खाटांच्या सर्व रूग्णालयात येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचारपद्धती सुरू केली जाणार आहे. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत 16 जिल्ह्यात 100  खाटांची खास महिलांसाठी रूग्णालये उभारली जाणार आहेत. जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारण्यासाठी 60 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले आहे.


मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटींची तरतूद


विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीरित्या होण्यासाठी मनुष्यबळ विकासावर भर देण्यात आला आहे. रोजगारक्षम मनुष्यबळ विकासासाठी इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी रूपये तर स्टार्टअप फंडासाठी 100 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.




अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना ई-शक्ती योजनेतून मोबाईल सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अमृत महोत्सवी महिला व बाल भवन आणि नागरी बाल विकास  केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शासकीय वसतीगृहातील मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिसपेन्सींग मशिन दिले जाणार आहे.


दळणवळण सेवेचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण


राज्यातील दळणवळण सेवांचा विकास, बळकटीकरण आणि विस्तार करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. यासाठी 28,605 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून 10,000 कि.मी. च्या रस्त्यांसाठी साडेसात हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.


त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ केला जाणार असून यातून 6,550 कि.मी.चे रस्ते विकास करण्याचे नियोजन आहे. राज्य परिवहन महामंडळासाठी 3,000 नवीन बसगाड्या घेण्यासाठी तसेच राज्यातील 103 बस स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भांडवली अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोलीपर्यंत केला जाणार आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील मेट्रो मार्ग क्रमांक 3- कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गिकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगर पर्यंत केला जाणार आहे. पुण्यातील मेट्रो सेवा अधिक व्यापक करण्यावर भर आहे. त्यासाठी स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट या मार्गावरील प्रकल्प अहवालाचे काम सुरू करण्यात आले आहे. 

शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर येथील विमानतळांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद तर गडचिरोलीसाठी नवीन विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.


उद्योग विकासासाठी 10,111 कोटी रूपयांची तरतूद


राज्याला अधिकाधिक उद्योगस्नेही करण्यासाठी 10,111 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0, ई-वाहन धोरण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील कौडगाव, शिंदाळा, धुळे जिल्ह्यातील साक्री, चंद्रपूर जिल्ह्यातील वाशिम आणि यवतमाळ येथील सौर उर्जा प्रकल्पा उभारण्यात येणार आहेत. 

मुंबईतील पारेषण प्रणालीच्या क्षमेत वाढ करण्यासाठी पाच प्रकल्प उभारले जाणार आहेत, असे उपमुख्यंत्री श्री. पवार यांनी सांगितले.




पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. कोयना, जायकवाडी, गोसीखुर्द धरणांच्या जलाशयात जलपर्यटन प्रस्तावित आहे. पुरातत्व स्मारकाच्या जतन, संवर्धन, दुरूस्तीसाठी जिल्हानिहाय महावारसा सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी तर पुणे वन विभागात बिबट्या सफारी प्रस्तावित करण्यात आली आहे.


नवीन उपक्रमांची घोषणा


स्थानिक संस्थांतील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांना प्रत्येकी 250 कोटी रूपये तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी 250 कोटींची तरतूद वाढविण्यात आली आहे. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगित महाविद्यालय व संग्राहालय स्थापन करण्यासाठी 100 कोटी रूपये निधी राखीव ठेवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी उपलब्ध करणार असून छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करणार आहे.


महापुरूषांशी संबंधित 10 शाळांकरीता 10 कोटींचा निधी राखीव ठेवणार असून स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत मुंबई, पुणे व नागपूर येथील स्थळांचा हेरिटेज वॉक विकसित केला जाणार आहे.


नैसर्गिक वायूवरील कर, मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क थकबाकी तडजोड 2022 अभय योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेमुळे वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध करांवरील सवलती संदर्भात विचार केला जाईल. 

ही योजना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी असेल. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक वायुवरील मूल्यवर्धीत कर 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणला जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित करण्यात आल्या असून जल वाहतुकीवरील करात पुढील तीन वर्ष सवलत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

 
करमाफी

विविध करांवरील सवलतीसाठी अभय योजना, नैसर्गिक वायूवरील कर सवलत, मुद्रांक शुल्कात कर सवलत, जलवाहतूकीस चालना देण्यासाठी कर माफी अशा विविध महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्याने या क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


महाराष्ट्रातील या महत्वकांक्षी अर्थसंकल्पातील सर्व विकास कामांच्या घोषणांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन, जनतेतील शेवटच्या घटकांपर्यंत सर्व विकास योजना पोहोचणे आवश्यक आहे.



Sunday, March 6, 2022

"पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुतळ्याचे अनावरण,पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न;पुण्यात पहिल्याच दिवशी मेट्रोने "एवढ्या" हजार लोकांनी केला प्रवास, "एवढे" लाख रुपये मिळाले उत्पन्न"...



पुणे, दि.६ : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ९.५ फूट उंचीच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेत ११ वाजता, उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. आज एक दिवसाच्या पुणे  दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनाज ते गरवारे कॉलेज (पुणे) आणि पिंपरी ते फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड)  या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन झाले. 



पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन  उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून त्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार,  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे आदी उपस्थित होते.




प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतुकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल.



नागरिकांनी मेट्रोने प्रवास करावा


देशात वेगाने शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतुकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.


आज देशातील दोन डझनापेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मेट्रो प्रवासामुळे शहराला मदत होईल, असेही ते म्हणाले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


हजारो पुणेकरांनी मेट्रोच्या प्रवासाचा आनंद लुटला


पुण्यातील बहुप्रतीक्षित मेट्रोचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची उत्सुकता होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुपारी 3 वाजता दोन्ही शहरांमधील मेट्रो व्यावसायिक तत्वावर सुरू करण्यात आल्या. मेट्रोच्या आजच्या एका दिवसातील फक्त पाच तासांचे उत्पन्न चार लाख ६६ हजार ४६० रुपये झाले. वनाज ते गरवारे व पिंपरी ते फुगेवाडी या दोन मार्गांवर मिळून १८ हजार ६६५ लोकांनी प्रवास केला. रात्री आठ वाजता फेऱ्या बंद झाल्या.


 या पाच तासात वनाज ते गरवारे या मार्गावर दोन्ही बाजूने १४ हजार २५१ लोकांनी प्रवास केला. पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर ४ हजार ४१४ जणांनी मेट्रोच्या प्रवासाचा आनंद लुटला. रविवारी रात्री ९ पर्यंत मेट्रोच्या दोन्ही मार्गावरील झालेल्या दोन्ही बाजूंच्या २४ फेऱ्यांमधून एकूण २२ हजार  ४३७ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. महामेट्रो प्रशासनाला तिकीट विक्रीतून रविवारी एकूण पाच लाख ५३ हजार उत्पन्न प्राप्त झाले.





शहराला आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर बनवावे लागेल


एकविसाव्या शतकात शहरांना अधिक आधुनिक बनवावे लागेल आणि नव्या सुविधांचे निर्माणही करावे  लागेल. भविष्यातील शहरांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकार काम करीत आहे. प्रत्येक शहरात पर्यावरण अनुकूल वाहतुकीला आणि त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


सर्व सुविधांना आधुनिक बनविणारे एकात्मिक नियंत्रण केंद्र असावे. शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धत आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजचे आहे. जलस्त्रोतांच्या आणि ऊर्जेच्या पूर्ण कार्यक्षम उपयोगावर भर देणेही आवश्यक आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.


पर्यावरणपूरक इंधनाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख


शहरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी  प्रयत्न होत आहे. पुण्याची ओळख ‘ग्रीन फ्युएल सेंटर’ म्हणून होत आहे. प्रदूषणपासून मुक्ती, कच्च्या इंधनाच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी  इथेनॉल आणि जैविक इंधनावर भर देण्यात येत आहे. पुण्यात इथेनॉल ब्रँडीगशी निगडीत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.




वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करा


पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. पूर नियंत्रणासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील. मुळा-मुठा नदीची स्वच्छता आणि  सुशोभिकरणासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. नद्या पुनरुज्जिवीत झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. शहरातील नागरिकांनी वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा. नदीच्या प्रती श्रद्धा, पर्यावरण विषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांनी नद्यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.


पुणे महानगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न - उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होणारी विकासकामे इथल्या पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्या आणि शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या आहेत. पुण्याच्या विकासासाठी  एकजुटीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.



ते म्हणाले, पुणे ही रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांची भूमी आहे.  जिजाऊ मासाहेबांनी सोन्याचा नांगर चालवून पुण्याच्या पुनर्निर्माणाचा शुभारंभ केला होता. राष्ट्रनिर्मितीचा आणि जनसेवेचा हा वारसा पुढे नेण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे.


 पुणे मेट्रोसाठी जनतेला धन्यवाद


पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पुण्याच्या जनतेने अडचणी सहन केल्या आहेत. १२ किलोमीटर मार्गावर ही मेट्रो रेल्वे धावणार आहे.  पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट विस्तारीकरणाबरोबरच पिंपरी-चिंचवड ते निगडी कॅरीडोर, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोड मार्गिकेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा काम चालू आहे. या प्रकल्पांसाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर टप्पा २ च्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.




विकासासाठी पर्यावरणाचा विचार करावा लागेल


मुळा-मुठा नदी सुशोभिकरण आणि जायका प्रकल्प शहरासाठी महत्वाचे आहेत. पुण्यात साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर मुळा-मुठा नदी सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे. नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत आणि  जैवविविधतेला धक्का न लावता ही कामे करावी लागतील. पूर नियंत्रण रेषेचा विचारही होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येईल.


इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती कमी करण्याचा विचार व्हावा


शासनाने पर्यावरण रक्षणासाठी ई-वाहन धोरण स्विकारले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण रक्षणाला मदत होईल. सायकलचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या वाहनांच्या किंमती कमी करण्याबाबत विचार व्हावा, असे मतही श्री.पवार यांनी व्यक्त केले.


यावेळी श्री. फडणवीस यांनी देखील विचार व्यक्त केले. श्री.मोहोळ यांनी स्वागतपर भाषणात पुणे शहरातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती देऊन प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे स्वागत केले. उषा लक्ष्मण यांनी आर.के.लक्ष्मण यांची पुस्तके प्रधानमंत्री श्री.मोदी यांना भेट दिली.


पुण्यातील वाहतूक गतिमान करणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या १२ किमी मार्गिकेचे उदघाटन


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किलोमीटर मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी गरवारे मेट्रो स्थानक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रदर्शनाचेही उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री  सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत संयुक्तपणे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी होत असून पहिल्या टप्यात पुणे येथील गरवारे ते वनाज आणि पिंपरी चिंचवड येथील पीसीएमसी ते फुगेवाडी असा एकूण १२ किलोमीटर मार्ग सुरू करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके आहेत.




विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी,  १४० ई-बस आणि बाणेर येथील ई-बस डेपोचेही लोकार्पण आणि  मुळा-मुठा नदी  पुनरुज्जीवन आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मुळा-मुठा नदीच्या ९ किलोमीटरच्या पट्ट्यात नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.  यामध्ये नदीकाठचे  संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे  प्रदूषण कमी करणाऱ्या प्रकल्पांतर्गत एकूण ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४०० एमएलडी असेल.