पुरंदर,परिंचे,दि.१५ : पुणे जिल्ह्यातील गौरवशाली इतिहासाचा वारसा असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील, परिंचे - राऊतवाडी येथील कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय,अतुलनीय कार्य करणाऱ्या, संपूर्ण पुणे जिल्ह्याला, पुरंदर तालुक्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावणाऱ्या, अवघ्या पाचशेच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या राऊतवाडीच्या आरोग्य क्षेत्रातील महिला रणरागिणींचा गौरव सोहळा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत, परिंचे - राऊतवाडीकर ग्रामस्थांच्या उत्कृष्ट नियोजनातून, राऊतवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्रात कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, अतुलनीय कामगिरी करणाऱ्या, परिंचे - राऊतवाडीच्या ४५ महिला परिचारिका, ६ महिला डॉक्टर, ६ औषध दुकानदार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी या सर्व महिला रणरागिणींनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावून जनसामान्यांची मने जिंकली आहेत.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी बजावणाऱ्या, या महिला रणरागिणींचा परिंचे - राऊतवाडी ग्रामस्थांच्यावतीने फेटा बांधून, साडी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राऊतवाडीच्या स्त्रीशक्तीच्या या गौरव सोहळ्यासाठी, पुरंदरचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शिवसेना युवा नेते समीर जाधव, परिंचे माजी उपसरपंच सोपान राऊत, परिंचे उपसरपंच दत्तात्रय राऊत, नवलेवाडी सरपंच सौ कविता वाघोले, मा. सरपंच किसन वाघोले, प्राध्यापक संभाजी नवले, उपस्थित होते.
परिंचे - राऊतवाडीकर ग्रामस्थांच्या वतीने प्रथम गावातील मुख्य रस्त्याने हलगीच्या तालावर, तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत या महिला रणरागिणींचा मिरवणूक सोहळा आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
राऊतवाडीच्या महिला रणरागिणींच्या गौरव सोहळ्यात महापुरुषांच्या मूर्तींना पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर, परिंचे उपसरपंच दत्तात्रय राऊत, किसन वाघोले, प्राध्यापक संभाजी नवले, शिवसेना युवा नेते समीर जाधव यांनी सर्व महिला रणरागिणींचे, गौरव मूर्तींचे स्वागत, अभिनंदन व कार्याचे कौतुक केले.
पुरंदरचे लोकप्रिय नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या महिला रणरागिणींच्या अतुलनीय कार्याचे, खास शैलीत, आपल्या भाषणातून कौतुक केले.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता या महिला रणरागिणींनी अतुलनीय कार्य केलेले आहे. यांचा गौरव करताना खूप आनंद होत आहे. परिंचे - राऊतवाडीच्या या छोट्याश्या वाडीतील या सावित्रीच्या लेकींचे, महिला रणरागिणींचे अतुलनीय कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मनुष्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे." अशी भावना पुरंदरचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भाषणातून व्यक्त केली.
"पुरंदर तालुक्यात आरोग्यसेवेत एवढ्या प्रचंड महिला असणारे परिंचे - राऊतवाडी हे एकमेव गाव आहे. जिजामाता,अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचा संघर्षाचा वारसा या महिला रणरागिणींनी जपलेला आहे." असे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी व्यक्त केले.
"कोरोना महामारी मध्ये संपूर्ण जगावर फार मोठे संकट होते अशा वेळेस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले गेले. कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आमच्या राऊतवाडीच्या सर्वच महिला रणरागिणींचा आम्हा सर्व ग्रामस्थांना, तालुक्याला खूप अभिमान आहे. या महिला रणरागिणींच्या शौर्याला, समर्पण प्रवृत्तीला, संवेदनशीलतेला आमच्या परिंचे - राऊतवाडीकर ग्रामस्थांचा गौरवपूर्ण सलाम." अशी प्रतिक्रिया परिंचे गावचे मा. उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते सोपान राऊत यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"गौरवशाली व प्रेरणादायी इतिहास असणाऱ्या पुरंदरच्या भूमीतील, राऊतवाडी सारख्या छोट्याशा गावातील आरोग्यसेवा क्षेत्रातील महिला रणरागिणींचे, कोरोना काळातील संपूर्ण महाराष्ट्रात केलेले प्रामाणिक, अतुलनीय कार्य खुप गौरवास्पद, कौतुकास्पद व संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गासाठी प्रेरणादायी आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
राऊतवाडीच्या महिला रणरागिणींच्या सत्कार समारंभात जे जे हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ परिचारिका वैशाली राऊत, सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत असणाऱ्या भाग्यश्री राऊत, बारामती येथे नर्सिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या कोमल राऊत यांनी त्यांचे शालेय अनुभव, कोरोना काळातील भयानक परिस्थिती या विषयी अनुभव कथन करून, सत्कार समारंभाबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी अजित नवले, गणेश वाघ, प्रवीण जाधव, अर्चना राऊत, गणेश पारखी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोपान राऊत यांनी केले. आभार शुभम राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजक समस्त राऊतवाडी ग्रामस्थ मंडळ होते.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आपल्या गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर समस्त ग्रामस्थांनी कौतुकाची थाप टाकणे हे सर्वच सत्कार मूर्तींना अजून चांगले काम करण्यासाठी बळ देऊन जाते.
No comments:
Post a Comment