"पेपर टाकणारा सामान्य मुलगा ते मुख्यमंत्र्यांसमोर समाजाचे गंभीर प्रश्न मांडणारा शिलेदार ते पुण्यात जनसामान्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी आवाज उठवणारा, आक्रमक आंदोलने करणारा, सामाजिक कार्यकर्ता; आईकडून प्रेरणा मिळालेले मराठा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंदे पाटील "प्रेरणादायी शिलेदार"...
कुठल्याही समाजातील सामान्य कार्यकर्त्याचे आयुष्य अनेक अडचणींशी आणि संकटांशी संघर्ष करूनच समृद्ध होत असते. माझा जन्म 1982 चा सर्वसामान्य मराठा गरीब कुटुंबात झालेला.त्यामुळे गरिबीची झळ काय असते याची जाणीव ठेवून समाजात वावरणारा मी सामान्य कार्यकर्ता.
पूर्वीच्या काळी पुणे शहरात वाडे होते,पुण्यातील मामलेदार कचेरी समोरील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल व वाडिया हॉस्पिटलच्या मधोमध असणाऱ्या व्हाईट हाऊस मित्रमंडळामधील अशाच एका वाड्यात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत असताना माझं बालपण खय्रा अर्थाने समृद्ध झालं.बालपणापासूनच मी प्रचंड सकारात्मक वागत असल्याचं माझी आई कायम सांगत असते,स्मरणशक्तीची अमुल्य घडणावळ ईश्वराने मला दिली असल्याने बालपणातील बय्राच गोष्टि आज ही जशाच्या तशा आठवतात.
यानंतर १९८७ साला पासून माझा जीवन प्रवास शालेय जीवनातुन सुरू झाला,बालपणापासूनच अभ्यासु वृत्ती होतीच, परंतु कुठलंही ज्ञान अर्धवट न घेता त्याच्या सखोल जाऊन त्याची पूर्ण माहिती घेणे हे आजही माझ्या जीवनाचं अतुट नातं बनलं आहे.याचाच फायदा घेत शालेय जीवनात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणं असेल किंवा स्नेहसंमेलनात भाग घेणं असेल, या माध्यमातुन मैदानी खेळा बरोबरच "स्टेज डेरिंग" देखिल नसानसात भिनत गेली याचा फायदा पुढील सामाजिक जीवनात होत गेला.
शालेय जीवनापासून मित्र जपण्याचे आणि मिळवण्याचे जणू व्यसनच लागले, आणि असं ही मला कोणतंही व्यसन नाही,आणि आहे ते फक्त मैत्री जपण्याचे.यामुळेच आजमितीला शेकडो मित्रांच्या सानिध्यात रहात आहे हि फार भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल.
शालेय जीवनात वावरत असताना शाळेतील सर्व शिक्षकांबरोबर माझे खुप जमायचे, त्यामूळे शिक्षकांचे संस्कार चांगल्या रितीने मिळाले.ज्यामुळे आज २३ वर्षांनंतर शाळा सोडल्या नंतर देखिल सुद्धा शाळेतील शिक्षकांशी आजही नातं टिकून आहे.शालेय जीवन जगत असताना,घरची परीस्थिती बदलावी यासाठी मनात अगदी पक्कं केलं,आणि आईला मदत व्हावी या उद्देशाने पहाटे पेपर टाकण्याचे काम करू लागलो.तब्बल ४/५ वर्षे पुण्याच्या शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि स्वारगेटच्या पुढील मुकुंद नगर, महर्षी नगर पर्यंत पेपर टाकत होतो. त्याकाळी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रसिद्ध नव्हता पण प्रिंट मीडिया खूप जास्त प्रसिद्ध होता. त्यामूळे वृत्तपत्रांना खूप महत्त्व होते.

वेळेचा शिरस्ता काय असतो त्याची जडनघडण जणू ईश्वराने मला शिकवण्यासाठीच पेपर टाकण्याचे काम दिले. त्याचे कारण ही तसेच आहे,कारण त्याकाळी काही मोजकीच वर्तमानपत्रे असायची. ते टाकण्यासाठी घेण्याआगोदर पेपर एजन्सीचे मालक पुण्यातील बाजीराव रोडवरील प्रभात टाॅकिज चौकात मुख्य वितरक बसायचे त्यांच्याकडून ते खरेदी करण्यासाठी भल्या पहाटे म्हणजे ४ वाजताच जायचे.आणि मग मी ५:३० पर्यंत तिथे पोहचायचो.पेपर हातात पडले की तिथेच जवळ असलेल्या एका साड्यांच्या दुकानाबाहेर बसून पेपर आणि पुरवण्या जुळवण्याचे काम अवघ्या काही मिनिटांमध्ये उरकून मार्गक्रमणाप्रमाणे पेपर एकावर एक रचुन, सायकलच्या कॅरीअरला अडकवायचे आणि निघायचे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या कामात दोन गोष्टी खुप शिकायला मिळाल्या.पहिली म्हणजे वेळेनुसार कामाचं नियोजन करणे.दुसरी मार्गक्रमणाप्रमाणे कामाची आखणी करणे आणि तिसरी आणि महत्वाची म्हणजे योग्य वेळेत काम मार्गी लावणे. "योग्य वेळ" हा शब्द मी यासाठी वापरत आहे की, त्याकाळी पेपर वाचक अतिशय शिस्तिचे असायचे, आत्ता मी बघतो अगदी दुपार पर्यंत लोक पेपर टाकत असतात,वाचणारे लोक सुद्धा निवांत असतात. परंतु त्याकाळी पहाटे अंधार असे पर्यंत पेपर वाचक, ग्राहकांना हातात हवा असायचा.दिवस थोडासा उजाडू लागला कि छातीत धडधड वाढायची आणि त्यामुळे सायकलच्या पॅण्डलवर नीट न पोहोचणारे पाय अगदी पायातली चप्पल सटके पर्यंत जोरदार चालायचे.
कधी कधी तर तिच चप्पल सायकलच्या हॅण्डलमध्ये अडकवून सायकल जोरात पळवावी लागायची.जर एखादा पेपर वर माडीवर असेल तर वर चढून जावं लागायचं,कारण पेपरला सिगारेटच्या पाकिटाची तुकडे करुन ते पेपर गुंडाळून त्याच्या भोवती लावून, तो पेपर उंचावर फेकण्याएवढी माझी उंची नसायची,आणि काही ठिकाणी तर लोक "पेपर वर टाकल्यावर आवाज खुप होतो,वर येऊन टाकत जा" अशा सुचनांचे पालन देखील करावं लागायचं. त्यावेळेस मला महिन्याला रू.४०/- (चाळीस रुपये) पगार मिळायचा.आणि एजन्सिच्या मालकांना देखील एक रकमी ४० रूपये देणे शक्य होत नसायचे,म्हणुन ४० रूपयांचे दोन किंवा तीन भाग होऊन महिना अखेर पर्यंत पगार पूर्ण व्हायचा.

ही रक्कम ऐकायला जरी कमी आणि गमतीशीर वाटत असली तरी देखील, त्या काळी ही मोठीच रक्कम असायची.झालेला संपूर्ण पगार आईच्या हातात द्यायचो. आणि त्या पैशांचं काय केलं?हे मी कधीही तिला विचारलं नाही, कारण ती स्वत: घरकाम व पोळ्यांची कामं करुन आम्हां तिघा भावंडांवर यापेक्षा अधिक पटीने खर्च करीत होती.तिच्या कष्टांना आपला हातभार लागावा या उद्देशानेच मी देखील जमेल ते कष्ट करत होतो.पुढे जाऊन उपाशी पोटी सतत पेपर टाकत असल्याने मला पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि मग आईच्या सांगण्याने पेपरची लाईन बंद केली. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे,"असं कुठलंही काम करण्यापेक्षा तु चांगला अभ्यास कर आणि आपलं घर वर काढ" हेच माझ्या आईचं कायम सांगणं असायचं.पण मीच तिला मदत व्हावी म्हणुन अशी कामं करायचो.
काहीही झालं तरी आपलं घर आपण वर काढायचंच या उद्देशाने मी माझं शिक्षण सन २००० रोजी १० वी पर्यंत अर्धवट ठेवून पुढे नोकरीसाठी घराबाहेर पडलो.आणि या दरम्यान आमच्या व्हाईट हाऊस मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आमच्या वाड्यातील भाजी व कडिपत्ता पुरवण्याचा व्यवसाय करणारे कै. नंदु मांढरे उर्फ नंदु काका यांच्या बरोबर शाळेला सुट्टी असेल तेंव्हा किंवा शाळा लवकर सुटेल तेंव्हा भाजी विक्रीसाठी लागणारा कडिपत्ता तोडायला सहकार नगर, सारंग, तळजाई परीसरातील बंगल्यांमध्ये जायचो. ते मला रू.५/- प्रत्येकी दिवसाला द्यायचे.कधी फर्निचरच्या कामालाही मदत म्हणुन जायचो. त्यावेळी मला कामाच्या दिवशी रू.५०/- मिळायचे. तर काही दिवस मंडळाचे कार्यकर्ते श्री प्रमोद उर्फ आण्णा वराडकर याच्या सोबत लाईटच्या कामामध्ये मदती साठी जायचो, तो देखिल मला ५० रुपये द्यायचा.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आमच्या भागातील माजी नगरसेविका व माजी स्थायी समिती अध्यक्षा नीताताई रजपूत (परदेशी)यांनी पुणे शहरातील सदाशिव पेठेमधील टिळकरोड जवळील कपडे व स्वेटर विणायच्या मशीनचे उद्योजक आर. जी. दफ्तरदार यांच्याकडे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये काम शिकण्यासाठी पाठवलं.ज्यावेळी मे महिन्याची सुट्टी अनेक मुलं खेळण्यात घालवत होती त्यावेळी मी मात्र दररोज कामावर झालेले काळे कपडे घालून आमच्या पाठीमागे वाडिया हॉस्पिटलच्या भिंतीवरून उडी टाकून मी सदाशिव पेठ येथे कामाला जात असे व तिथूनच परत येत असे.या महिन्याभरात मला मिळालेला माझ्या आयुष्यातील पहिलाच एकरकमी पगार रू. ५००/- मिळाला. नीताताईंचे पती कै. जयंत रजपूत यांनी त्यांच्याकडचे दोनशे रुपये त्यामध्ये टाकून मला शालेय साहित्य खरेदीसाठी मदत केली ती आजही स्मरणात आहे.
माझ्या आईची आई म्हणजे आमची मामाची आई, (हिने आम्हा भावंडांच्या आनंदाला कुठलाही नाट लागू नये,म्हणून आमचे सगळे सण, उत्सव साजरे केले) तिने तिच्या ओळखीच्या "महाडिक" नावाच्या ग्रहस्थांकडे मला घेऊन गेली, त्यांचा "सक्सेस एम्प्लाॅयमेंट" नावाचा व्यवसाय होता की ज्याच्या माध्यमातुन अनेक प्रकारच्या नोकऱ्या दिल्या जायच्या आणि बदल्यात संबंधित कंपनीकडुन ठरलेल्या पगारातुन निम्मि रक्कम सलग दोन महिने सेवामूल्य (कमिशन) म्हणुन घेतली जायची. तेंव्हा महाडिक यांनी त्यांच्या मुलाकडे मला पाठवल्यावर त्यांनी मला त्यांच्याच ऑफिसमध्ये काम दिलं.
ज्या उमेदवारांना कंपनी बोलावत असेल अशा उमेदवारांचे नाव व पत्ते मला दिले जायचे, बहुतांश उमेदवार हे धनकवडी,बालाजी नगर, आंबेगांव पठार आदी परीसरात पुणे शहरातुन सायकलवर जाऊन,त्यांना शोधुन काढून संबंधित विषय सांगणे हेच माझे काम होते,त्या कामाचा मला महिन्याला रू. ८००/- पगार दिला. परंतु पुढे ते काम कमी झाल्यामुळे ते काम सोडावं लागलं.
असं करत करत आमच्या मंडळाचा कार्यकर्ता श्री प्रशांत उर्फ काका जगताप याच्या ओळखीच्या शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये आफिसबाॅय म्हणुन नोकरीसाठी आमच्याच मंडळाचे दोन कार्यकर्ते जाऊन आले, पण त्यांना ते काम पटले नाही.आणि मग प्रशांतला मी म्हणालो, "मी जाऊ का त्या ऑफिसमध्ये कामाला?"तर त्याने माझी ओळख करून दिल्या नंतर तब्बल सन २००० ते २०१३ अशी सलग १३ वर्षे अजिबात वायफळ सुट्ट्या न घेता प्रामाणिकपणे काम केलं.
यादरम्यान लहानपणापासूनच आमच्या सार्वजनिक चिंचेची तालीम गणेशोत्सव मंडळ व व्हाईट हाऊस मित्र मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये व सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदवत असताना मला अधिक सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा आमच्या मंडळातून मिळत गेली.आणि समाजसेवेची आवड बालपणापासूनच माझ्या मनात कोरली गेली.
एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये फार काळ राहू शकत नसल्यामुळे घरातील इतर मंडळींची सल्ला मसलत करून आम्ही निर्णय घेत घराच्या बाहेर पडलो.आईच्या मदतीने स्वत:ची जागा घेऊन आम्ही भावंडांनी घर बांधले आणि आमच्या बहिणीचे लग्न करून दिले.
या दरम्यान मी माझ्या शाळेतल्या बालिमित्रांशी एक भावना बोलून दाखवली, "आपल्या मराठा समाजाला आरक्षण नाही,सरकारी नोकऱ्या नाही, मराठा तरुणाईचे गंभीर प्रश्न आहेत. त्यामुळे हे असं किती दिवस चालायचं? आपण यासाठी मराठा समाजाची एखादी संघटना स्थापन करु."आणि मग सन २००० साली "मराठा युवा फाऊंडेशन" नावाची संघटना आम्ही स्थापन केली.मी सुचवलेल्या संकल्पनेला आणि संघटनेच्या नावाला सर्वांनी सहमती दिली.
कामाची सुरुवात करत असतानाच,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातुन समाजसेवा करावी असं माझ्या मनात आल्यावर, मी मराठा महासंघाचा शोध सुरू केला. आणि ऑगस्ट २००४ रोजी,आणि तत्कालिन राष्ट्रिय सरचिटणीस व आजचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. श्री राजेंद्र कोंढरे साहेबांची पुण्यातील "रायरेश्वर" येथील कार्यालयात भेट झाली. तिथे भेटलेले तत्कालिन पुणे शहर सरचिटणीस मा. श्री बाळासाहेब खैरे यांनी माझी "कसबा मतदार संघ अध्यक्ष" पदी निवड केली. पुढे मी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने केली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
प्रशासनाचे प्रतिकात्मक पुतळे जाळणे असेल,किंवा जाहिर प्रसिद्धि पत्रकाद्वारे सरकारचा निषेध करणं असेल,या प्रकारे मराठा समाजाच्या गंभीर प्रश्नांसाठी समाजकार्य सुरू केलं. या बरोबरच पुणे शहरातील अनेक नागरी समस्यांबाबत,जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी वेळोवेळी आवाज उठवत लाखो पुणेकरांच्या हितासाठी आवाज उठवला. मराठा महासंघाच्या सन २००४ ते २०१३ पर्यंतच्या काळात, कसबा मतदार संघ अध्यक्ष, पुणे शहर सरचिटणीस, पुणे शहर युवक अध्यक्ष या पदांवर काम केलं. या दरम्यान मराठा महासंघाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं सान्निध्य लाभलं.
एक प्रकारे माझ्या कुटूंबातीलच हे लोक मला वाटू लागले, आणि आज ही तशीच परीस्थिती आहे. अनेक जिवाभावाची माणसं देवासमान मला इथे भेटली यासाठी मी आणि माझा परिवार आजही ईश्वराचे आभार मानतो.मराठा महासंघ आणि मराठा युवा फाऊंडेशन बरोबर पुणे शहरातील सर्वसामान्य रिक्षाचालकांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या मराठा महासंघ प्रणित शिवनेरी रिक्षा संघटनेच्या पुणे शहर कार्याध्यक्ष पदावर देखिल मी कार्यरत असून आजवर संघटनेने रिक्षाचालकांच्या हितासाठी पुकारलेल्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
सलग १३ वर्षे मराठा महासंघाच्या विविध पदांवर काम केल्यानंतर, मी स्वतः असा निर्णय घेतला की, आपल्यानंतर आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांना देखील काम करण्याची संधी मिळायला हवी,याकरिता उदात्त हेतूने मी माझ्या पुणे शहर युवक अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.यानंतर माझे शालेय जीवनातील बालमित्र व आमच्या व्हाईट हाऊस मित्र मंडळाचे माझे बालमित्र यांनी, "आपण मराठा युवा फाऊंडेशनचे कार्य पुन्हा सुरू करू " असे मत बोलून दाखवले,आणि मग पुन्हा सन २०१३ पासून मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने पुन्हा कार्य सुरू केले. यादरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसह,पुणे शहरातील अनेक नागरी समस्यांच्या विषयांवर,जनतेच्या गंभीर प्रश्नांवर आवाज उठवायला पुन्हा सुरुवात केली.

त्यावेळी,आपण समाजामध्ये जन्माला आल्या नंतर अनेक प्रकारचा संघर्ष करत जीवन जगत असतो,आणि आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो, अशाच प्रकारे कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर, शुन्यातुन स्वत:चं अस्तित्व निर्माण करणाय्रा मराठा समाजातील कर्तृत्ववान बांधवांना कधीही कोणतेही व्यासपीठ सहजपणे उपलब्ध होत नाही, हिच बाब अग्रस्थानी धरुन,मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने "मराठा समाज भुषण" पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं.यामध्ये सुरुवातीलाच १२ समाज बांधवांचा मराठा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव केला.

या सोहळ्याला कोणाकडूनही आर्थिक मदत न घेता आम्ही मित्र परिवारानी त्याचा खर्च उचलला, यामध्ये प्रामुख्याने माझे मित्र हेमंत इंगवले पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.महत्वाचा उद्देश म्हणजे, समाजातील काही लोक हे फक्त अशांना पुरस्कार देतात ज्यांना आगोदरच वलय प्राप्त झालेलं असतं, किंवा ज्यांनी कोणत्याही संघर्षाशिवाय यश प्राप्त केलेलं असतं, परंतु असे अनेक लोक असतात ज्यांनी कोणत्याही आधाराशिवाय संघर्षाशी दोन हात केलेले असतात, आणि खरतर प्रवासाअंती यश प्राप्त केलेलं असतं अशा घटकांना शोधून त्यांना समाजाच्या व्यासपीठावर बोलावून सन्मानित केल्याने त्यांचे मनोबल वाढून ते समाजातील इतर घटकांसाठी मदत करुन अजून चांगले कार्य करतात.
याबरोबरच सामाजिक कार्य करत असताना, आम्ही सभोवताली घडणाऱ्या अनेक जनसामान्यांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवरती आवाज उठवले, अनेक वेळा तर आंदोलनांच्या माध्यमातुन सरकार व प्रशासनाला जाब विचारण्याचे धाडस दाखवले.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
काही वर्षांपूर्वी पुणे शहरात कॅशलेस मेडिक्लेम सेवा बंद पडल्याने हजारो पुणेकरांचे हाल सुरू झाले होते,आणि काही हाॅस्पिटल्स् या सेवा नाकारत होते.असेच एक व्यथित झालेले वृद्ध ग्रहस्थ माझा शोध घेत आमच्या व्हाईट हाऊस मित्र मंडळ या ठिकाणी असलेल्या हेअर सलून दुकानातील रोहन सुर्यवंशी यांच्याकडे माझ्याबाबत माहिती विचारली, माझा संपर्क क्रमांक घेऊन त्यांनी माझी भेट घेतली.आणि हा गंभीर प्रकार सांगितला. मी दुसऱ्याच दिवशी लागलीच या विषयांसबंधी माहिती घेऊ लागलो! आणि हे वास्तव मला समजले. मग मी यावर आवाज उठवण्याचे ठरविले,आणि इंडियन मेडिकल असोशिएशन ( I M A ) चे पुण्यातील टिळक रोड येथील कार्यालय गाठले, आणि या विषयावरचे सविस्तर निवेदन तत्कालीन अध्यक्ष श्री अरुण हळबे यांचेकडे सादर केले.

त्यांच्याशी चर्चा करताना मी असे सांगितले की, " सर्वसामान्य नागरीक कायम असं म्हणत असतात की शहाण्याने सुद्धा कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये, आणि दवाखान्याबाबतचा विषय असल्याने आम्ही आपल्याला निवेदन देत आहे, सर्वसामान्य नागरिक हे अतिशय तुटपूंज्या पगारात आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्याच पैशातून कुटुंबातील सदस्यांच्या मुखातील घास काढून, पैसे राखून अशा आरोग्य विम्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असतो.जर एखादी घटना घडली तर जवळ पैसे नसले तरीही ही योजना कामाला येईल असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो.आणि ज्या वेळेला असा वाईट प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये येतो आणि हॉस्पिटलला गेल्यावर अशा प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम सेवांना काही हॉस्पिटल कडून पायबंद घातला जातो, मग अशा अचानक आलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना त्यांना मोठ्या अग्नीपरीक्षा द्याव्या लागतात.

ज्यादा व्याजाने सावकाराकडून त्यांना पैसे काढावे लागतात,कारण या पॉलिसींच्या अगेन्स कोणीही लोन द्यायला तयार नसते.मग नागरिक अशा आरोग्य विम्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून काही चूक करतात का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याकरिता आपण या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती त्या अधिकाऱ्यांना केली. यावर सन्माननीय अध्यक्षांनी माझी गोष्ट गांभीर्याने घेत त्यांच्या स्वीय सहाय्यकाला बोलावून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद बोलावून आपली भूमिका मांडण्यासाठी तयारी करण्याचे सांगितलं.दोनच दिवसांनी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या झळकल्या, आणि कॅशलेस सेवा नाकारणाऱ्या हॉस्पिटलला तंबी दिल्याचे वाचनामध्ये आले.
हे मी मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फार मोठे यश होते.यामुळे हजारो रुग्णांना फायदा झाला व भविष्यातील अडचण कायमची दूर झाली.
काही वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासनाने बहिस्त मुलांवर बंदी घातली असल्याकारणाने त्या विरोधात मी मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने सर्वप्रथम आवाज उठवला. यासंबंधी विद्यापीठाचे कुलगुरू श्री वासुदेव गाडे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं, सदरच्या निवेदनात सांगितले की "ग्रामीण भागातून येणाऱ्या मुख्यतः सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील, स्वकष्टाने शिक्षण घेवू पाहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, कारण यातील बरेचसे विद्यार्थी हे उपजीविकेचे साधन म्हणून नोकरी, कामधंदा व शेती व्यवसाय सांभाळत असतात आणि आपले शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात त्यामुळे ते बहिस्थ पद्धतीची शिक्षण पद्धती अवलंबतात,परंतु विद्यापीठ प्रशासनाने जर त्यांच्यावर बंदीचा निर्णय घेतला तर त्यांचं कधीही भरून न येणारे असं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. या बंदीमध्ये तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला असल्यामुळे, तीन वर्षानंतर जर शिक्षण पूर्ण झालं तर पुढील सरकारी सेवांमध्ये वयोमर्यादेचे बंधन लागू पडून त्यांची स्वप्न धुळीस मिळू शकतात.

त्यामुळे अशा स्वकष्टाने व स्वावलंबाने शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आम्ही कधीही सहन करू शकत नाही व अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.भलेही वेळप्रसंगी मोठी आंदोलन करण्याची वेळ आली तरीही आम्ही मागे हटणार नाही, याकरिता विद्यापीठ प्रशासनाने सदरचा निर्णय मागे घेऊन सर्वसामान्य बहिस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा." असे सांगितले. यानंतर अनेक वर्तमानपत्रांमध्ये या संदर्भात ठळक घडामोडींमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि विद्यापीठ प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला,यामुळे शेकडो, हजारो बहिस्थ पद्धतीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न झाला याचे खूप मोठे समाधान वाटत आहे.
मा. श्री. नारायणराव राणे साहेब मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना,तत्कालीन राज्य सरकारने राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली, त्या समितीचे राज्यभर अभ्यास दौरे सुरू झाले, ही समिती पुणे शहरात आल्यानंतर मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने राणे समितीची प्रत्यक्ष भेट घेऊन पुणे शहर व जिल्ह्यासह, राज्यातील मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक झालेली पिछेहाट याचे गंभीर वास्तव आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मांडले.
यात प्रामुख्याने पुणे शहरातील मराठा समाजातील महिला उच्चवर्णीय कुटुंबांमध्ये घरकाम करणे व इतर मोलमजुरी करणे अशा प्रकारची कामे करत असून अनेक तरुण आरक्षणाच्या अभावामुळे शिक्षण घेऊ न शकल्याने गुन्हेगारीकडे वळल्याची अनेक उदाहरणे आहेत प्रसंगी अनेक तरुण व्यसनाधीन होऊन देशोधडीला लागल्याची देखील उदाहरणे सदरच्या निवेदनात दर्शवली होती.याप्रसंगी एक विशेष बाब म्हणजे श्री राणेसाहेबांनी आमच्याशी सदरच्या निवेदनासंबंधी सविस्तर चर्चा केली.
"अशास्त्रीय गतिरोधक पुणेकरांची डोकेदुखी..."
संपूर्ण पुणे शहरामध्ये मुख्य रस्त्यांवर तसेच गल्लीबोळांमध्ये चुकीच्या पद्धतीचे रबरी गतिरोधक बसवण्यात आले होते जे की पुढे जाऊन निखळून पडल्यामुळे त्याचे खिळे रस्त्याच्या मधोमध धोकादायक पद्धतीने होते.
त्यामुळे अनेक वाहनाचे अपघात होत होते तसेच अनेक वाहनांचे नुकसान देखील होत होते,आणि या गतिरोधकांना कुठलीही शासकीय पद्धत नसल्यामुळे अनेक वाहने याच्यावर आदळत होती ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक व रुग्णा यांचे आतोनात हाल होत होते.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या विषयावर आम्ही अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला,आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवत पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तीव्र आंदोलन केले या आंदोलनात अखिल भारतीय मराठा महासंघ प्रणित शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक भाऊ साळेकर व संस्थापक आबा बाबर यांच्यासह शेकडो रिक्षा चालकांनी सहभाग नोंदवला.हे आंदोलन इतके तीव्र झाले की अनेक वर्तमानपत्रांनी मुख्य पानांवर ठळक घडामोडींमध्ये या आंदोलनाला प्रसिद्धी दिली. आणि याचा परिणाम होऊन संपूर्ण पुणे शहरातले अशास्त्रीय पद्धतीचे सर्व गतिरोधक काढण्यात आले.

मराठा युवा फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने मराठा समाज भूषण पुरस्कार देण्यामागचा मुख्य हेतू हा होता की, मराठा समाजातील असे लोक ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कोणतेही पाठबळ नसताना, कोणतीही पार्श्वभूमी नसताना, शून्यातून आपले विश्व निर्माण केले. कर्तुत्वान कामगिरी केली. आम्हाला अशा समाज बांधवांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांचा यथोचीत सन्मानित करून, समाजासमोर आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अशा यशस्वी,कर्तृत्ववान समाज बांधवांमुळे समाजातील इतर घटकांना देखील आदर्श निर्माण व्हावा तसेच त्यांचे मार्गदर्शन लाभावे याकरिता हा उपक्रम घेण्याचा संकल्प केला.
मराठा समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बारा मराठा कर्तृत्ववान शिलेदारांना, तसेच नंतरच्या काळात चार समाज बांधवांना,"मराठा समाज भूषण पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचं झाल्यास, पहिल्या बारा कर्तृत्वान मराठा बांधवांमध्ये
1)श्रीमती वनमालाताई शिंदे : - सामाजिक कार्यकर्त्या -
पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता कमिटीच्या सदस्या म्हणून वनमालाताई कार्यरत असताना,दर शनिवारी खडक पोलीस स्टेशन येथे समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून, अनेक प्रकारचे कौटुंबिक व इतर होणाऱ्या कलहांमध्ये, सत्यता पडताळून,वादी - प्रतिवादीं मध्ये समझोता करून वाद मिटवणे, आणि कोर्टाची पायरी चढण्या अगोदर त्यांना थांबवणे.तसेच कौटुंबिक कलहांमध्ये समझोता घडवून आणून, तुटलेले अनेक संसार पुन्हा जोडणे, व तुटायच्या मार्गावर असलेल्या संसारांना सावरण्यासाठीच मोलाचं कार्य पार पाडणे यासाठी वनमालाताईंनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
2)मा. श्री. श्रीकांतभाऊ लिपाने : -संस्थापक अध्यक्ष ऍक्टिव्ह फाउंडेशन -
जांभुळवाडी रोड आंबेगाव परिसरातील अनेक नागरी समस्यांवर आवाज उठवणारे, वेळप्रसंगी उपाय योजना अमलात आणणारे,स्वतःच्या वाढदिवसा दिवशी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विधायक कार्य करणारे, जांभुळवाडी तलाव या ठिकाणी गणेश विसर्जन प्रसंगी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहेत.
दुसऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये,
3)कर्तव्यदक्ष ATS पोलीस अधिकारी मा. श्री भानुप्रतापजी बर्गे साहेब यांना मराठा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला.
मुंबईतील प्रसिद्ध एन्काऊंटर "शूटआउट लोखंडवाला" या मोहिमेत बर्गे साहेबांचा सहभाग.दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या पुणे शहरातील युवतीला वेळीच रोखून तिचं समुपदेशन करून, तिला दहशतवादापासून परावृत्त होण्यासाठी साहेबांनी यशस्वी प्रयत्न केले.पुणे शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी बर्गे साहेबांनी अनेक यशस्वी प्रयत्न केले.पुणे शहरातील अनेक सामाजिक संस्थांसोबत असलेली जवळीक व त्या माध्यमातून समाज उपयोगी अनेक उपक्रमात त्यांनी सहभाग नोंदविला.तसेच तरुणांना गुन्हेगारी पासून दूर ठेवण्यापासून ते त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बर्गे साहेबांनी अनेक मार्गदर्शनपर व्याख्याने दिली.पुणे शहरातील असंख्य गणेश मंडळांच्या संपर्कात राहून सामाजिक सलोखा राखण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.
4)पुणे शहराचे तत्कालीन महापौर, मा श्री प्रशांतदादा जगताप : -
आपल्या नगरसेवक पदाच्या माध्यमातून पुणे शहरात संबंधित प्रभागांमध्ये प्रशांत दादांनी अनेक नागरी समस्यांचे निराकरण केले तसेच अनेक विकास कामे केली. आरोग्य सेवांबाबत विशेष लक्ष दिले.याबरोबरच महापौर पदाच्या काळात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस पायाला भिंगरी लावून फिरणारे महापौर म्हणून प्रशांत दादा प्रसिद्ध होते. बदलत्या पुणे शहराच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये प्रशासनाला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे,पुणे शहरातील गणेशोत्सव सारख्या उत्सवांना महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रयत्न करणारे तसेच मराठा युवा फाऊंडेशनने उचललेल्या अनेक नागरिकांच्या समस्यांच्या विरोधातील आवाजाच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब त्यासंबंधी प्रशासनाला योग्य ते आदेश देऊन नागरिकांना सहकार्य करणारे प्रशांत दादा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहेत.नागरिकांमध्ये मिसळणारे तसेच "नागरिकांच्या मनातील आपला महापौर" या वाक्याला साजेशी भूमिका पुणे शहराचे लाडके महापौर म्हणून प्रशांत दादा जगताप यांनी बजावली.
5)मा श्री रणजीतदादा बाबर : - प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र युवा परिषद. व पोलीस परिवार अध्यक्ष -
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर भरवणारे तसेच योग्य ती मदत करणारे रणजित दादा यांनी संबंध महाराष्ट्रभर युवकांचं जाळं निर्माण करून,असंख्य युवकांच्या व्यवसाय, धंदा व रोजगारासंबंधी शासन दरबारी पाठपुरावा करून मदत केली. आपल्या कार्याची छाप समाजमनावर पाडल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.मराठा युवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास रणजित दादा नेहमीच सहकार्य करतात.
6)प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू मा श्री अजित थोपटे : - Mr India, Mr universe, Mr World, Mr Dubai, Mr Maharashtra, Mr Pune.
स्वकष्टाने निर्माण केलेल्या श्री विष्णू जिमच्या माध्यमातून विविध पदक प्राप्त केल्यानंतर श्री अजित थोपटे यांनी शेकडो युवकांना शरीरसौष्ठवपटू बनवून जागतिक स्तरावर पोहोचवले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
7)मा श्री मेघराजभैया राजेभोसले : - अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ -
चित्रपट क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या अनेक कलाकारांना, तसेच चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता आजमावू पाहणाऱ्यांना मेघराज भैय्यांनी चांगले सहकार्य केले.मराठी चित्रपट अनुदानासाठी प्रयत्न करणे असो की स्टेजवर तसेच स्टेजच्या पाठीमागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करणे यासाठी ते आघाडीवर होते.मराठी चित्रपट कलाकारांच्या विविध प्रश्नांना शासन दरबारी पोहोचवून त्यासंबंधी मेघराजभैया यांनी सदैव लढा दिला तसेच नाट्य कलावंतांसाठी देखील सदैव कार्यरत असतात.
अशाप्रकारे समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने ज्या कर्तुत्वान व्यक्तींना मराठा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला त्या व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती सांगावी म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केल्या.

या पुरस्कार सोहळ्याला आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आमच्या कार्याचे कौतुक केले आहे.यामध्ये मा श्री बुधाजीराव मुळीक सर (अध्यक्ष भूमाता व ज्येष्ठ कृषी तज्ञ आणि अभ्यासक) मा श्री शिरीषभाऊ मोहिते, (अध्यक्ष सेवा मित्र मंडळ पुणे) मा श्री बाळासाहेब अमराळे (संचालक अमराळे ज्वेलर्स), मा श्री मदन कोठुळे सर (केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव),मा श्री राजेंद्रनाना शिंदे (उपशहर प्रमुख शिवसेना उ.बा.ठा), मा श्री शंकररावतात्या बेलदरे (माजी नगरसेवक दत्तनगर आंबेगाव), मा श्री अमरआबा चिंधे पाटील (आदर्श सरपंच पुरस्कार विजेते), मा श्री अशोकभाऊ साळेकर (अध्यक्ष शिवनेरी रिक्षा संघटना), मा श्री प्र. दी. उर्फ आबासाहेब शिंदे (अध्यक्ष राजर्षी शाहू बँक) इत्यादी मान्यवर लाभले, यापैकी कै. आबासाहेब शिंदे यांचे नुकतेच निधन झाले,त्यांनी केलेलं अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांच्या सदैवं स्मरनात राहील. कै आबासाहेब शिंदे यांना मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती नेहमीच समाजाला प्रेरणा देत असतात.
"प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेला "शिक्षणाच्या आईचा घो" या चित्रपटाच्या शीर्षकाला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला."
यासंबंधी संबंध राज्यभर मराठा महासंघाच्या वतीने प्रतिक्रिया उमटत असताना सुद्धा देखील पुणे शहरातील एका नामांकित शाळेमध्ये महेश मांजरेकर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असल्याची माहिती,मराठा महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व आमचे मार्गदर्शक श्री सुनील हारपुडे साहेब त्यांच्या मुलीला आणण्यासाठी गेले असताना, त्यांना शाळेत मांजरेकर आले असल्याचे समजले,आणि मग त्यांनी मला संपर्क साधला,आणि मग मी मराठा महासंघाचे तत्कालीन हवेली तालुका युवक अध्यक्ष निलेशदादा काळभोर, बाळासाहेब दोरगे,आदींसह पुणे शहरातील आम्ही सर्व पदाधिकारी त्या शाळेत गेलो,आणि महेश मांजरेकरांना संबंधित चित्रपटाच्या शीर्षकाच्या बदलीसाठी निषेध म्हणून घेराव घातला.

त्यावेळेस महेश मांजरेकर यांनी आम्हाला ग्वाही दिली,आमच्या सर्व टीम सोबत बोलून एक चांगला मार्ग काढून समाजाची भावना जपण्याचा प्रयत्न करतो.आणि मग महेश मांजरेकर यांनी मुंबई येथे "शिक्षणाच्या आईचा घो" या चित्रपटाच्या एका विशेष शोचे आयोजन करत संबंधित चित्रपट आम्हा पदाधिकाऱ्यांना दाखवला, यावेळी मी आणि पदाधिकारी प्रमोद नागवडे देखील उपस्थित होतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये महेश मांजरेकर यांच्या सोबत चर्चा केली, महेश मांजरेकर यांनी चुक कबूल करत दिलगिरी व्यक्त केली.याचा परिणाम म्हणजे या चित्रपटाच्या सुरुवातीलाच महेश मांजरेकर यांनी समाजाची भावना दुखावली गेली असल्यास दिलगिरी व्यक्त करत माफीनामा प्रसिद्ध केला आहे.
"पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या नवले पूल महामार्गावर होणारे भीषण अपघात रोखणे संदर्भात केलेल्या उपाय योजना"
२०१९ मध्ये पुणे शहरातील कात्रज नवले पुलावर होणारे गंभीर अपघात रोखण्याकरता अभ्यास सुरू केला, आणि अभ्यासाअंती अपघात रोखण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या पुणे कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांना निवेदन सादर दिले.आणि याचा सातत्याने पाठपुरावा करत यातील अनेक उपाय अमलात आणण्यास संबंधित प्रशासनाला भाग पाडले. आणि या महामार्गावर होणारे अपघात काही प्रमाणात कमी झाले. यातील दोन मागण्या अतिशय प्रभावशाली होत्या, त्या म्हणजे,संपूर्ण महामार्गावर कुठल्याही प्रकारची विजेची प्रकाश व्यवस्थाच नव्हती,तिचा सातत्याने पाठपुरावा करून विजेच्या खांबांची निर्मिती करून घेतली,आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड लिमिटची मागणी आग्रहीपणे केली होती, ती देखील आता अंमलात आणली गेली आहे.

मागणी केल्याप्रमाणे वेग मर्यादा ताशी ४० कि.मी. करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व वाहने वेगमर्यादेत धावत असतात.ठळक सूचना फलकांची मागणी करण्यात आली होती काही प्रमाणात ती देखील पूर्ण करण्यात आलेली आहे.तसेच अति तीव्र उतारावर रंबलर्सची निर्मिती करण्याची मागणी केली होती ती देखील पूर्णत्वास जात आहे. यामुळे पूर्वीपेक्षा अपघातांची मालिका खुप कमी झाली आहे.अजूनही थोड्याफार प्रमाणात अपघात होत आहेत त्यासंबंधीचा पाठपुरावा संबंधित प्रशासनाकडे सुरू आहे येणाऱ्या पुढील काळात तो विषय देखील पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हे मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने मी व माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याचे फार मोठे यश आहे.
"मेट्रो प्रकल्प राबवताना पुणेकरांच्या हिताचा विचार व्हावा"
पुणे शहरात बी.आर.टीचा बोजवारा उडाला असताना,त्यात मेट्रोची भर पडल्याने स्थानिक वास्तव्यास असणाऱ्या सर्वासामान्य पुणेकरांना त्याचा फायदा कितपत होणार? या करीता "पुणे शहरात मेट्रो प्रकल्प राबवताना पुणेकरांच्या हिताचा विचार करावा" अशी भुमिका मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने घेऊन, मेंट्रो ऐवजी पुणे शहरात "उड्डानपूलांची" गरज महत्वाची असल्याची भुमिका घेतली.
कारण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पेठांचा परिसर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तसेच परिसरात ऐतिहासिक वारसा स्थळे असल्यामुळे या ठिकाणी मेट्रो प्रकल्पाच्या निर्मितीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो ही बाब प्रशासनासमोर आणली. बी.आर.टी सबशेल फेल झाल्यानंतर मेट्रो प्रकल्प त्याच मार्गाने जाऊ नये अशी भावना व्यक्त करत ऐतिहासिक पुण्याचे मूळ स्वरूप अबाधित राहावे अशी मागणी त्यावेळी केली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"तरुणाईला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले"...
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त मराठा युवा फाउंडेशन च्या वतीने गुटखाजन्य पदार्थांची होळी शेकडो युवकांच्या उपस्थितीत करण्याचा उपक्रम सर्वप्रथम हाती घेतला. शाळा महाविद्यालयातील अनेक तरुणांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांना समजावेत यासाठी त्यांच्यामध्ये जागृती व्हावी याकरिता हा उपक्रम वर्दळीच्या रस्त्यावर घेण्यात येत असतो.
या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेक तरुणांनी व्यसनांपासून कोसो दूर राहण्याचा संकल्प केला असून, काही व्यसनाधीनाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी व्यसनं कायमची सोडून दिली आहेत,आणि ते स्वतः याबद्दल आमच्याकडे समाधान व्यक्त करीत आहेत.या उपक्रमातून अनेक तरुणांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचे बोलून दाखवले आहे.
"लाखो पुणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार"...
काही वर्षांपूर्वी पुणे शहरात डेंगू मलेरियाच्या साथीने थैमान माजवले होते,अनेक रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत होती,सरकारी रुग्णालयांमध्ये चांगली सेवा न मिळता उद्धटपणाची वागणूक मिळत होती, तर खाजगी रुग्णालये आ वासून संबंधित रुग्णांकडून आवाच्या सव्वा बिलं रुग्णांकडून वसूल करत होती. अतिशय विदारक परिस्थिती पुणे शहरात असताना लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प होते.आणि मग आम्ही माहिती अधिकाराचा वापर करत आरोग्य विभागाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर मांडला.
या विषयाला अनेक पत्रकारांनी व वर्तमानपत्रांनी अत्यंत मोलाची साथ देऊन पुणेकरांची व्यथा प्रशासनासमोर आणण्यासाठी मदत केली. लोकसंख्येच्या प्रमाणात लाखो पुणेकरांना अशा गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी मोजकी सुरक्षा व्यवस्था अतिशय तोकडी असल्याचं सर्वप्रथम आम्ही निदर्शनास आणलं. आणि पुणे मनपाच्या आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी तसेच पुणेकरांना चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी मागणी केली, आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत निदान व उपचार सुरू करण्याची आग्रही मागणी केली.

याचा परिणाम म्हणून पुणे महानगरपालिकेच्या आगामी बजेटमध्ये संबंधित वैद्यकीय यंत्र सामग्री वाढवण्यासाठी विशेष बजेटची तरतूद करण्यात आली. तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये तत्परतेने व योग्य औषधोपचार देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. आणि त्यासंबंधी सदरचा आजार काही प्रमाणामध्ये आटोक्यात आला, व आजही संबंधित यंत्र सामग्री पुरेशा प्रमाणात पुणेकरांच्या उपयोगास पडत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने लाखो पुणेकरांच्या आरोग्यासाठी केलेली धडपड फळास आली याचे खूप समाधान लाभले आहे.
२०१० साली मी शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये काम करत असताना, रात्रीच्या वेळी काहीतरी व्यवसाय करायच्या उद्देशाने बाजीराव रस्त्यावरील बंद असलेल्या त्रिमूर्ती बँकेच्या बाहेर सँडविच स्टॉल लावला, पुढे कामाच्या वेळेअभावी तो चालवणे शक्य झाले नाही. वर्षभराच्या आत मध्ये तो बंद करावा लागला, यावेळी मला पुणे शहरातील प्रसिद्ध हॉटेल जंजिराचे संचालक मा. श्री विलासशेठ चोरघे,यांनी सहकार्य केलं आणि अगोदरच सँडविच व्यवसायिक असलेले माझे बाल मित्र प्रदीप व संदीप डाळवाले (राणा) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तेव्हापासून ते आज पर्यंत मला नोकरी देण्यापासून ते सध्याच्या दूध व्यवसायात मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांचे आभार मानणे हे अत्यंत महत्वाचे आहे असे मला वाटते...
यामध्ये प्रामुख्याने मा श्री सचिन पाटील साहेब,मा श्री उदयभाऊ जगताप,मा श्री शिरीषभाऊ मोहिते,मा श्री शशांक (आप्पा) माने साहेब,मा श्री बाळासाहेब जगताप,मा श्री सुनीलजी खाटपे साहेब,मा श्री रणजीतदादा बाबर,मा श्री नितीनजी साळुंखे पाटील,मा श्री बाळासाहेब दोरगे,मा श्री अशोकभाऊ साळेकर, मा श्री अर्जुननाना भिलारे व त्यांचे चिरंजीव रोहित आणि रोशन,मा श्री उमेशभाऊ शिंदे आदींसह अनेक लोकांनी मला मार्गदर्शन व सहकार्य केलं आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
आपल्या भारत देशातील तरुणांकडे प्रचंड ऊर्जा आहे. चांगले शिक्षण आहे. चांगली कौशल्य आहेत. त्या प्रत्येकाने जर समाजाच्या सेवेसाठी त्याचा वापर केला तर समाजाला खूप मोठा फायदा होऊ शकतो असे मला मनापासून वाटते. परिस्थितीचे कोणतेही कारण पुढे करून समाजाची सेवा होत नसते, याकरिता प्रचंड इच्छाशक्ती मनामध्ये असेल तर काहीही अवघड नाही.
मी देखील सामाजिक कार्य करीत असताना हा सगळा प्रवास दिसतो एवढा सोपा कधीच नव्हता,या प्रवासात जितके सहकार्य करणारे सोबती व मार्गदर्शक लाभले, या उलट काही हितशत्रू देखील मिळाले, नानाविध प्रकारे मला थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले, माझे विविध सामाजिक उपक्रम बंद पाडण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले. त्या प्रसंगी एकट्याने संबंधित लढा सुरू ठेवला. परंतु अशा हितशत्रूंसमोर कधीही गुडघे टेकले नाहीत.कारण मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतो.त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणा व ऊर्जेमुळे मी कधीही सामाजिक कार्याच्या चळवळीमध्ये मागे वळून बघितलंच नाही. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत अशी महापराक्रमी दैवतं घडल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, अशा अडवणुक करणाऱ्या अनेक शक्तींना धूळ चारण्यासाठी काफी होती.

पुणेकरांच्या गंभीर प्रश्नांसाठी केलेली वेगवेगळी आंदोलने तसेच प्रशासकीय कामाचा अनुभव,पुणे शहराच्या शैक्षणिक , कला , क्रीडा आणि आरोग्य तसेच वाढत्या शहरीकरणा बरोबरच इतर मुलभुत प्रश्नांवर वेळोवेळी उठवलेल्या आवाजाच्या पार्श्वभुमिवर आमच्या परिचित अनेक नागरीकांच्या मागणीमुळे, तमाम पुणेकरांच्या मूलभूत गरजांसाठी, जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी आवाज उठवण्यासाठी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा सन २०१४ रोजी प्रयत्न केला.परंतु काही तांत्रीक अडचणींमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. जर संधी मिळाली असती तर संधीचे नक्किच सोने करून दाखविले असते. परंतु ती संधी गेली तरी देखील पुणेकर नागरीकांच्या हिताच्या दृष्टिने मराठा युवा फाऊंडेशनच्या माध्यमातुन आजही विविध सामाजिक विषयांवर काम सुरू आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते अखंडपणे सुरू राहील अशी ग्वाही मी तमाम पुणेकरांना देत आहे.
आज आम्ही महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गंभीर प्रश्नांसाठी तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठीच्या लढ्यासाठी सज्ज आहे. कारण माझ्या मराठा बांधवांच्या न्याय व हक्कांसाठीच्या समाजसेवेची सुरुवात मुळातच माथाडी कामगार नेते व अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेल्या पहिल्या बलिदानाच्या प्रसंगाला वाचून त्यामुळे प्रेरित होऊन झाली आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून "मराठा आरक्षण" या ज्वलंत विषयावर आरक्षणासाठी वेळोवेळी आवाज उठवत, राज्य सरकारच्या विरोधात पुतळे जाळले तसेच अनेक पत्रव्यवहार आणि निषेध आंदोलने केली.
शासनाशी पत्रव्यवहार करत अनेक मागण्या केल्या.त्याच पार्श्वभूमीवर, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जालना अंतरवाली सराटी येथून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जी पुन्हा सुरुवात झाली, त्यासाठी मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देत या लढ्यामध्ये पुन्हा सहभाग नोंदवला आहे.
"माझे सामाजिक चळवळींचे आयुष्य सगळं ज्या व्यक्तीमुळे घडू शकलं ती व्यक्ती म्हणजे माझी आई.जिने माझ्या या कार्याला कायम पाठिंबा दिला. ज्या दिवशी आंदोलन असेल किंवा एखादी मिटींग असेल त्या दिवशी मला सकाळी लवकर उठवून,वेळेवर चहा नाश्ता देऊन, माझा पांढरा शर्ट धुवून इस्त्री करून तयार असायचा. माझ्या आईने माझ्या सामाजिक कार्याला कायमच पाठिंबा दिला."
त्याकाळी अनेक लोकांनी तिला मला या समाजकारण, राजकारणापासून लांब राहण्यासाठी शिकवण देण्यासाठी सांगितले,परंतु तिने कोणाचेही न ऐकता, "तो समाजासाठीच चांगले काम करतोय काही वाईट करत नाही" असं म्हणून माझी पाठराखण केली ती माझी आई. तिचे देखील मनापासून आभार आणि तिचे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही. मराठा युवा फाउंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठीचा लढा तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा कायम चालू राहील.
लेखक : - सचिन शिंदे पाटील, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष - मराठा युवा फाउंडेशन.