"टेम्पो चालवणारा, रिक्षा चालवणारा, पाणी सोडणारा सामान्य तरुण ते करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या "ऑस्करवाडी मिसळ" उद्योग समूहाचा संस्थापक, संचालक ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गुजरात, हैदराबाद व देशभरात यशस्वीपणे मराठी माणसाच्या हॉटेलचा ब्रँड पोहचवणाऱ्या दाजी आणि मेव्हण्याची यशोगाथा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक, प्रेरणादायी शिलेदार विशाल उर्फ सोनूदादा जाचक"...
महाराष्ट्रातील तरुणपिढी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवून यशाची नवं नवीन शिखरे पादंक्रांत करताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व देशभरात यशस्वी विस्तार करणाऱ्या ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाचे संस्थापक,संचालक विशाल उर्फ सोनूदादा जाचक यांचा जन्म पुणे शहरातील धनकवडी येथे झाला. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या विशाल जाचक यांचे प्राथमिक शिक्षण धनकवडी येथील सरकारी शाळेत झाले व माध्यमिक शिक्षण प्रियदर्शनी विद्या मंदिर या मराठी माध्यमाच्या प्रशालेत झाले.
शालेय जीवनामध्ये विशाल जाचक अभ्यासात हुशार होतेच पण त्याहीपेक्षा शाळेत खेळकर,खोडखर व वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन, खेळामध्ये विशेष प्राविण्य दाखवून, मित्रांबरोबर मस्ती, मौजमजा करण्यातही कमी नव्हते.
शाळेतील शिक्षकांचा मार खाण्यापासून ते वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होऊन मित्रांबरोबर शालेय जीवनाचा आनंद घेण्यापासून ते मनापासून अभ्यास करून आयुष्यात काहीतरी मोठं काम करण्याची इच्छा शालेय जीवनातील जडणघडणीमुळेच मिळाल्याचे विशाल जाचक सांगतात.
"आमच्या प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला धनकवडी या शाळेतील आमच्या सर्वांच्या आवडत्या दिघे मॅडम यांनी त्या काळात केलेले संस्कार आणि शिक्षणाचा दिलेला विचार आम्हाला आमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप उपयोगी पडल्याचे." विशाल जाचक सांगतात. "दिघे मॅडम खूप कडक शिस्तीच्या होत्या त्यांचा आम्ही अनेक वेळा मार देखील खाल्लेला आहे. परंतु त्यांनी शालेय जीवनामध्ये केलेले मार्गदर्शन,संस्कार,शिकवण यामुळे आमची पिढी चांगल्या पद्धतीने घडली." असे विशाल जाचक सांगतात.
दहावीला प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेतून विशाल जाचक चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील अकरावी व बारावीचे शिक्षण पुण्यातील प्रसिद्ध नूतन मराठी विद्यालय या ठिकाणी घेतले. नूतन मराठी विद्यालयात आम्हाला चांगले शिक्षण मिळाले तसेच पुढील आयुष्यासाठी एक चांगली दिशा मिळाल्याचे विशाल जाचक सांगतात.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
नूतन मराठी विद्यालयात बारावीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्यानंतर विशाल जाचक यांनी पुण्यात आर्किटेक्चर डिप्लोमा या कोर्ससाठी प्रवेश घेतला.
तीन वर्षाचा हा आर्किटेक्चर डिप्लोमा विशाल जाचक यांनी यशस्वी पूर्ण करून पुण्यातील त्या काळातली प्रसिद्ध बारस्कर आर्किटेक्चरल फर्म येथे काही महिने नोकरी केली. विशाल जाचक यांना त्याकाळी आर्किटेक्चर क्षेत्रात आवड असल्यामुळे त्यांनी खूप मन लावून व मेहनतीने या आर्किटेक्चर फर्ममध्ये काम केले.
सामान्य माणसाचे आयुष्य अनेक अडचणी व संकटांनी भरलेले असते. आयुष्यात कधी कुठल्या टप्प्यावरती कोणते संकट येईल हे कोणीच सांगू शकत नाही.
विशाल जाचक यांचे आर्किटेक्चर क्षेत्रातील काम यशस्वीपणे चालू असताना त्याकाळी त्यांच्या वडिलांना गंभीर आजार झाल्यामुळे त्यांची मानसिकता खचून जायला लागली. वडिलांच्या आजारपणाच्या संकटामुळे विशाल जाचक यांना आर्किटेक्चर क्षेत्रातील ती नोकरी सोडावी लागली. यानंतरचा चार-पाच वर्षांचा काळ त्यांच्यासाठी खूप खडतर होता.
"वडिलांच्या गंभीर आजारपणामुळे आम्ही त्यावेळी खूप तणावात होतो, मानसिकता खूप खचली होती. अशा अवस्थेत माझा दिशाहीन प्रवास चालू होता. पुढे काय करायचे समजत नव्हते. परंतु तुमच्याकडे चांगले विचार आणि तुमच्यावर चांगले संस्कार असतील तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडता." असे विशाल जाचक सांगतात.
विशाल जाचक यांचा दिशाहीन प्रवास चालू होता त्याकाळी कधी त्यांनी रिक्षा चालवुन उदरनिर्वाह केला तर कधी टेम्पो चालवुन घराला आधार देण्याचा प्रयत्न केला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
काही काळ काम न करता मित्रांबरोबर दिवस घालवण्यातही समाधान शोधण्याचा प्रयत्न करत, आपल्या आयुष्याची दिशा चुकतेय, आपण भरकटतोय याची जाणीव झाल्यानंतर विशाल जाचक यांनी पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पाणी सोडणारा एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करायला सुरुवात केली.
"आयुष्यात माणूस कितीही भरकटला, कितीही चुकीच्या दिशेने प्रवास झाला तरी तुमच्याकडे चांगला विचार असेल, तुमच्या आई-वडिलांनी व तुमच्या शिक्षकांनी केलेले संस्कार व मार्गदर्शन तुमच्या पाठीशी असेल तर माणूस या चक्रव्यूहातुन बाहेर पडून, पुन्हा चांगल्या दिशेने यशस्वी प्रवास चालू करतो." असे विशाल जाचक सांगतात.
आर्किटेक्चर क्षेत्रातील डिप्लोमा होऊन देखील पाणीपुरवठा विभागात कंत्राटी सामान्य कर्मचारी म्हणून काम करत असताना विशाल जाचक यांनी कधीही कामाची लाज न बाळगता प्रामाणिकपणे आणि निष्ठेने लोकांसाठी पाणी सोडण्याचे काम केले.
यानंतर काही वर्षांनी विशाल जाचक यांचा अर्चना कटके या शेतकरी कुटुंबातील मुलीशी विवाह झाला. विशाल जाचक यांच्या प्रेमळ व माणुसकीबाज स्वभावामुळे त्यांना खूप चांगला मित्रपरिवार लाभला.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक बांधकाम क्षेत्रात कामगार म्हणून सुरुवातीला काम करत होते त्यानंतर ठेकेदार म्हणूनही यशस्वीपणे काम करत होते. बांधकाम क्षेत्रात काम करण्यापूर्वी विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक त्याकाळी 1995 ला हॉटेल व्यवसायातही उतरले होते. मारुती जाचक यांनी त्याकाळी पुण्यात आठ - नऊ वर्ष हॉटेल यशस्वीपणे चालवले होते. त्यांच्या हॉटेलचा "सॅम्पल पाव" त्याकाळी पुण्यात प्रसिद्ध होता. कालांतराने मारुती जाचक यांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे हॉटेल क्षेत्रातील काम थांबवुन बांधकाम क्षेत्रातच पुढे ते कार्यरत राहिले.
विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक यांना गंभीर आजाराने ग्रासल्यानंतरचा त्यांच्या कुटुंबातील काळ खूपच खडतर आणि वेदनादायी होता. कोरोना काळात घरातील सर्वजण एकत्र आल्यानंतर विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक यांनी त्यांच्या काळात त्यांनी हॉटेल व्यवसाय कशा पद्धतीने केला? तो व्यवसाय कसा वाढवला? या सर्व आठवणी कुटुंबातील सदस्यांना त्यावेळी सांगितल्या. आपल्या वडिलांचा बंद पडलेला हॉटेल व्यवसाय आपण पुढे चालू करू शकतो हा विचार त्यावेळी विशाल जाचक यांच्या मनात आला.
"वडिलांकडून हॉटेल व्यवसायाची प्रेरणा मिळाल्यामुळेच विशाल जाचक यांनी एक छोटेसे हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशाल जाचक यांचे मेव्हणे अक्षय कटके यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोघांनी मिळून एकत्र एक चांगले हॉटेल चालू करण्याचे नियोजन केले. अक्षय कटके हे ऑस्करवाडी या प्रसिद्ध वेबसरीजमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते. दाजी आणि मेव्हणे यांनी एकमेकांना प्रामाणिकपणे साथ देऊन नवीन व्यवसाय सुरू करण्याची वाटचाल चालू केली."
अक्षय कटके यांची पुणे शहराजवळील भिवरी येथे मेन रोड लगतच जागा असल्यामुळे त्या ठिकाणी मिसळचे हॉटेल चालू करण्याचे विशाल जाचक व अक्षय कटके यांनी ठरवले.
विशाल जाचक यांची पत्नी अर्चना जाचक यांनी मिसळीसाठी वेगवेगळे मसाले संशोधन करायला व तयार करायला त्याकाळी खूप मेहनत घेतली. विशाल जाचक त्यांच्या पत्नीने घरी बनवलेली मिसळ खाण्यासाठी विशाल जाचक आपल्या मित्रांना घरी बोलवत व त्यांना त्या मिसळची चव कशी वाटली? याबाबत प्रतिक्रिया घेऊन त्यामध्ये सुधारणा करत.
"ऑस्करवाडी मिसळच्या उत्कृष्ट चवीसाठी अर्चना जाचक यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य व माझा मेव्हणा अक्षय कटके यांच्या कष्ट व मेहनतीमुळे आमच्या हॉटेल व्यवसायाची सुरुवात खूप चांगली झाली." असे विशाल जाचक सांगतात.
हॉटेल व्यवसायात पदार्पण करत असताना विशाल जाचक यांना त्यांच्या मित्रपरिवाराने व कुटुंबाने खूप साथ दिली. सुरुवातीच्या काळात काही मित्रांनी हॉटेल सुरू करण्यापेक्षा नोकरीच कर असा सल्ला दिला. टेम्पो चालवत होता, रिक्षा चालवत होता, पाणी सोडत होता आता कशाला हॉटेलच्या धंद्यात पडतोय. असे टोमणेही काही जणांनी मारले. काही लोकांनी मिसळ हाऊस चालू करतोय त्याबद्दल विशाल जाचक यांची खिल्लीही उडवली.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
त्याकाळी विशाल जाचक यांना त्यांची पत्नी अर्चना जाचक यांनी दिलेली साथ तसेच त्यांचे मेव्हणे अक्षय कटके यांनी दिलेली प्रामाणिक साथ,संपूर्ण कुटुंबाची साथ यामुळे आपण हॉटेल व्यवसायात नक्कीच यशस्वी होऊ हा आत्मविश्वास त्याकाळी विशाल जाचक यांना होता. हॉटेल सुरू करण्यापूर्वी विशाल जाचक यांनी पुण्यात एका हॉटेलमध्ये चार महिने काम करून अनुभव घेतला. हॉटेलमध्ये कांदा चिरण्यापासून ते भांडी घासण्यापासून ते ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते ग्राहकांना सेवा देण्यापर्यंत सर्व कामांचा विशाल जाचक यांनी त्यावेळी अनुभव घेतला.

नवीन हॉटेल सुरू करण्या अगोदर विशाल जाचक व अक्षय कटके यांनी सहा महिने हॉटेल व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास करून, मार्केटचा सर्व्हे करून, मिसळीसाठी संशोधन करून मेहनत व कष्ट घेतले. सुरुवातीला छोटेसे स्नॅक्स सेंटर, छोटेसे हॉटेल चालू करू या विचाराने हॉटेलच्या कामाला विशाल जाचक व अक्षय कटके यांनी सुरुवात केली. विशाल जाचक व अक्षय खटके यांनी भिवरी येथील ऑस्करवाडी मिसळ या हॉटेलसाठी 15 ते 16 लाख रुपये खर्च केले. त्याकाळी मिसळ हाऊस साठी सासवड - भिवरी - पुणे रोडवरती मिसळ हाऊससाठी एवढा मोठा खर्च करणारे ते पहिलेच हॉटेल होते.
भारतात प्रसिद्ध असलेल्या येवले चहा उद्योग समूहाचे मालक, संचालक नवनाथ येवले यांनीही ऑस्करवाडी मिसळच्या प्रवासामध्ये खूप चांगले मार्गदर्शन केल्याचे विशाल जाचक सांगतात. अक्षय कटके यांची ऑस्करवाडी वेब सिरीज महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे विशाल जाचक व अक्षय कटके यांच्या नवीन हॉटेल साठी "ऑस्करवाडी मिसळ" हे नाव देण्याचे नवनाथ येवले यांनीच सुचवले.
"एक यशस्वी मराठी उद्योजक मराठी तरुणांना नवीन व्यवसायासाठी मार्गदर्शन करतो, सल्ला देतो व सहकार्य करतो हे येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी या "ऑस्करवाडी मिसळ" उद्योग समूहाला मार्गदर्शन केल्याच्या उदाहरणावरून दाखवून दिलेले आहे."
"ऑस्करवाडी मिसळ" चालू करण्याचा सुरुवातीचा काळ विशाल जाचक व अक्षय कटके यांच्यासाठी खूप खडतर तसेच कठीण होता. ऑस्करवाडी मिसळ हॉटेलच्या उद्घाटनाच्या अगोदरच विशाल जाचक यांचे वडील खूप आजारी असल्यामुळे उद्घाटन सोहळा खूप साध्या पद्धतीने झाला.
"ऑस्करवाडी मिसळचा सुरुवातीचा काळ आमच्यासाठी खूपच खडतर आणि संकटांचा सामना करणारा होता. आई व पत्नीचे दागिने गहाण ठेवून ऑस्करवाडी मिसळसाठी भांडवल उभे केलेले आहे. हॉटेलच्या उद्घाटना अगोदर वडील खूप आजारी होते हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये होते त्यावेळेस आम्ही खूपच तणावाखाली होतो. त्या कठीण परिस्थितीमध्ये सावरून आम्ही ऑस्करवाडी मिसळचे उद्घाटन खूप साध्या पद्धतीने केले." असे विशाल जाचक सांगतात.
"कुठल्याही व्यावसायिकाला व्यवसाय सुरू करताना विविध अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागतोच परंतु प्रचंड कष्टाने, मेहनतीने ऑस्करवाडी मिसळ व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदरच वडिलांच्या गंभीर आजाराच्या संकटांचा सामना करून, त्या वेदनादायी परिस्थितीतून मार्ग काढून व्यवसाय चालू करून तो पुढे यशस्वीपणे चालवण्याचे खूपच आव्हानात्मक काम विशाल जाचक यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिलेले आहे."
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे "ऑस्करवाडी मिसळ" या मुख्य शाखेची 6 जुलै 2021 रोजी सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 200 ग्राहकांनी ऑस्करवाडी मिसळचा आस्वाद घेतल्याचे विशाल जाचक सांगतात.
"आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी, आमच्या ऑस्करवाडी मिसळ टीमच्या सर्व लोकांनी घेतलेले कष्ट व मेहनत याचं चीज झाल्याचं समाधान पहिल्या दिवशी आम्हाला सर्वांना वाटले. पहिल्याच दिवशी आमच्या ऑस्करवाडी मिसळला ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद व पसंती मिळाली. आम्ही ऑस्करवाडी मिसळ हॉटेल चालू केल्यानंतर पहिल्याच आठवड्यातील रविवारी 1000 ग्राहकांनी आमच्या ऑस्करवाडी मिसळचा आस्वाद घेतला. ही गोष्ट आम्हाला खूप प्रेरणा देणारी, ऊर्जा देणारी ठरली." असे विशाल जाचक सांगतात.
सासवड - भिवरी - पुणे रोड वरती अनेक हॉटेल्स आहेत, खूप मिसळ हाऊस आहेत पण विशाल जाचक व त्यांची पत्नी अर्चना जाचक आणि विशाल जाचक यांचे कुटुंबातील सदस्य व अक्षय कटके आणि ऑस्करवाडी मिसळ टीमच्या सर्व सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, कष्टामुळे, ग्राहकांना दिलेल्या उत्तम सेवेमुळे अल्पावधीतच ऑस्करवाडी मिसळ पुणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरली.
ऑस्करवाडी मिसळ मुख्य शाखेची पुणे शहराजवळील भिवरी येथे सुरुवात झाल्यानंतर, सुरुवातीच्या काळात ग्राहकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे हॉटेलमध्ये खूप गर्दी असायची. ऑस्करवाडी मिसळचा दहा लोकांचा कर्मचारी वर्ग असताना देखील विशाल जाचक यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य येणाऱ्या ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा देत असायचे. ऑस्करवाडी मिसळ खाण्यासाठी ग्राहकांची एवढी गर्दी व्हायची की विशाल जाचक यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य कांदा चिरण्यापासून ते ग्राहकांना सेवा देण्याच्या सर्व गोष्टींमध्ये त्यावेळी व्यस्त असायचे. विशाल जाचक यांची पाच वर्ष वयाची लहान मुलगी देखील कांदा चिरायला बसायची. कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिलेल्या प्रामाणिक योगदानामुळेच "ऑस्करवाडी मिसळला" पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी सुरुवातीच्या काळात डोक्यावरती घेतले. असे विशाल जाचक सांगतात.

"ऑस्करवाडी मिसळ मुख्य शाखा सुरू करण्यापूर्वीचा काळ विशाल जाचक यांच्यासाठी खूपच खडतर होता. त्यांचे वडील गंभीर आजाराशी संघर्ष करत असल्यामुळे हॉटेलचे उद्घाटन फक्त हॉटेलच्या बोर्डला हार घालून, खूप साध्या पद्धतीने झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढून विशाल जाचक यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान दिल्यामुळेच ऑस्करवाडी मिसळला सुरुवातीच्या काळात ग्राहकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला."
"ऑस्करवाडी मिसळ मुख्य शाखेसाठी पुणे शहराजवळील भिवरी येथील निवडलेली योग्य जागा, ऑस्करवाडी मिसळच्या उत्कृष्ट चवीसाठी विशाल जाचक यांच्या पत्नी अर्चना जाचक यांनी घेतलेली मेहनत, संशोधन व कष्ट तसेच विशाल जाचक यांचे मेहुणे अक्षय कटके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले उत्तम मार्केटिंग, अक्षय कटके यांनी व्यवसायासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान व विशाल जाचक यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी मनापासून केलेले प्रयत्न यामुळेच "ऑस्करवाडी मिसळ" हा हॉटेल क्षेत्रातील ब्रँड निर्माण होऊन सुरुवातीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हजारो ग्राहकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचला."
कुठलाही व्यवसाय मोठा झालेला आपल्याला दिसतो परंतु त्यामागे त्या उद्योजकांना प्रचंड कष्ट व मेहनत घ्यावी लागते अनेक अडचणींचा व संकटांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये एकदा ऑस्करवाडी मिसळ मुख्य शाखेतील भांडी घासायला येणारी महिला कामगार सुट्टीवरती गेल्यामुळे अडचण निर्माण झाली.

ऑस्करवाडी मिसळ खाण्यासाठी त्या दिवशी भरपूर गर्दी झालेली होती. भांडी घासणार्या महिलेने अचानक सुट्टी घेतल्यामुळे त्या हॉटेलमधील दुसऱ्या कामगाराला विशाल जाचक यांनी ते काम करण्यासाठी विनंती केली परंतु थंडी असल्यामुळे त्या कामगाराने नकार दिला. त्यावेळी स्वतः ऑस्करवाडी मिसळचे संस्थापक, मालक विशाल जाचक त्या हॉटेलच्या किचनमध्ये भांडी घासण्याच्या ठिकाणी जाऊन शर्ट काढून भांडी घासण्यासाठी बसले हे पाहून तो कामगार देखील विशाल जाचक यांना ती भांडी घासण्यासाठी मदत करण्यासाठी आला. गरम पाणी असल्यामुळे भांडी घासण्यासाठी विशेष त्रास झाला नाही परंतु अशा गर्दीच्या वेळी व अडचणीच्या वेळी भांडी घासणार्या महिला कामगारांनी अचानक सुट्टी घेतली तरीही स्वतः मालक ही अडचण दूर होण्यासाठी कुठल्याही कामाची लाज न बाळगता, भांडी घासण्यासाठी स्वतः बसतात व हॉटेलमधील कामगारांना प्रेरणा देतात ही गोष्ट खरोखर नवीन हॉटेल व्यावसायिकांनी शिकण्यासारखी व प्रेरणा देणारी आहे.

ऑस्करवाडी मिसळ हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीपणे पसरलेला आहे तसेच संपूर्ण देशभरातही यशस्वी विस्तार करत आहे असे असले तरी हा ब्रँड यशस्वी घडण्यामागे ऑस्करवाडी मिसळचे संस्थापक व संचालक विशाल जाचक यांनी केलेले कष्ट, मेहनत व त्याग खूप महत्त्वाचा आहे.
"व्यवसायाचे मोठे व्हिजन असणारे अक्षय कटके यांनीही ऑस्करवाडी मिसळच्या सुरुवातीच्या काळात घेतलेले कष्ट, मेहनत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले उत्कृष्ट मार्केटिंग व इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून ऑस्करवाडी मिसळ हजारो, लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत व कौशल्य, आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे महत्त्वपूर्ण योगदान यामुळे आमचा ऑस्करवाडी मिसळ ब्रँड महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ग्राहकांच्या पसंतीस पडला आहे." असे विशाल जाचक सांगतात.
ऑस्करवाडी मिसळ सुरुवातीच्या काळातच हजारो ग्राहकांना आवडल्यामुळे ऑस्करवाडी मिसळ हॉटेल चालू झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यापासूनच व्यावसायिक लोकांनी ऑस्करवाडी मिसळ या ब्रँडची शाखा, फ्रेंचाईजी मागण्यास सुरुवात केली. परंतु ऑस्करवाडी मिसळचे संस्थापक, संचालक विशाल जाचक व अक्षय कटके यांनी सहा महिने ऑस्करवाडी मिसळच्या फ्रॅंचायजी मॉडेल वरती प्रामाणिकपणे काम केले आणि त्यानंतरच ऑस्करवाडी मिसळ या ब्रँडची शाखा चांगल्या व्यावसायिक लोकांना देण्यासाठी सुरुवात केली.
" 50 आठवडे, 100 आठवडे चित्रपट हाउसफुल हे आपण ऐकले आहे परंतु ऑस्करवाडी मिसळ मुख्य शाखा चालू झाल्यापासून सलग 160 आठवडे ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे प्रत्येक रविवारी,अशी 160 आठवडे हाउसफुल आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात एवढे मोठे घवघवीत यश मिळवणारा ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूह हा हॉटेल क्षेत्रातील सर्व नवीन मराठी उद्योजकांसाठी प्रेरणा देणारा असा आहे.
ऑस्करवाडी मिसळची शाखा घेण्यासाठी, फ्रांचायजी घेण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो बेरोजगार तरुणांचा संपर्क विशाल जाचक यांना होत असतो. फोरचुनर, मर्सिडीज बेंज, व बीएमडब्ल्यूमधून येऊन काही श्रीमंत व्यावसायिकही ऑस्करवाडी मिसळची शाखा घेण्यासाठी विशाल जाचक यांच्याशी संपर्क करत असतात. ऑस्करवाडी मिसळ या ब्रँडची शाखा, फ्रॅंचाईजी कुठल्याही व्यावसायिकाला, तरुण उद्योजकाला देताना ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाची व्यवस्थापन टीम खूप काळजीपूर्वक निर्णय घेत असते.
ज्या ठिकाणी ऑस्करवाडी मिसळची शाखा सुरू करायची आहे ती जागा पाहिली जाते, ज्यांना ती शाखा हवी आहे त्या व्यावसायिकाची मुलाखत घेतली जाते. त्या तरुण उद्योजकाची जिद्द, चिकाटी, व्हिजन पाहिले जाते. फ्रॅंचाईजी देताना ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाची टीम संपूर्णपणे अभ्यास करते. ऑस्करवाडी मिसळची ती शाखा सुरू झाल्यानंतर ती यशस्वीपणे चालली पाहिजे यासाठी ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूह सर्व प्रकारे मदत करतो. असे विशाल जाचक सांगतात.
ऑस्करवाडी मिसळची मुख्य शाखा चालू झाल्यानंतर आठव्या महिन्यापासूनच ऑस्करवाडी मिसळ या ब्रँडची शाखा होतकरू तरुण व्यावसायिकांना देण्यास विशाल जाचक यांच्या व्यवस्थापन टीमने सुरुवात केली.
"महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऑस्करवाडी मिसळ हा ब्रँड अवघ्या तीन वर्षातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, अनेक जिल्ह्यांमध्ये पोहचला. ऑस्करवाडी मिसळ या ब्रँडच्या 72 शाखा संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरातील हजारो, लाखो ग्राहकांना उत्तम सेवा देत आहेत. तसेच देशभरातील गुजरात, हैदराबाद या ठिकाणच्या व्यावसायिकांनीही ऑस्करवाडी मिसळची शाखा सुरू करून संपूर्ण भारतात आता ऑस्करवाडी मिसळ हा ब्रँड यशस्वीपणे भरारी घेत आहे."
हॉटेल व्यवसाय क्षेत्रात फक्त मार्केटिंग करून, हॉटेलचे इंटिरियर,डिझायनिंग साठी खूप मोठा खर्च करून चालत नाही तर हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना तुम्ही उत्कृष्ट सेवा देऊन, उत्कृष्ट चव देऊन ग्राहकांना समाधान मिळले तर नक्कीच तुम्हाला चांगले यश मिळते. असे विशाल जाचक सांगतात.
"व्यवसाय तुम्हाला काय देतो यापेक्षा तुम्ही व्यवसायासाठी काय देता? हे खूप महत्त्वाचे आहे. व्यवसाय तुम्हाला रडवतो देखील आणि व्यवसाय तुम्हाला हसवतो देखील. ऑस्करवाडी मिसळच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा व आमच्या ऑस्करवाडी मिसळची ग्राहकांना आवडलेली उत्कृष्ट चव यामुळे आमच्या ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाला अल्पावधीतच खूप चांगले यश मिळाले." असे विशाल जाचक सांगतात.
"ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील अडीच हजार ते तीन हजार बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला तसेच अनेक होतकरू तरुण व्यावसायिक ऑस्करवाडी मिसळची शाखा घेऊन यशस्वीपणे व्यवसाय करून, लाखो रुपये कमवत आहेत. स्वतःचा बंगला बांधत आहेत. ऑस्करवाडी मिसळची शाखा यशस्वीपणे चालवुन, व्यवसायाच्या प्रगतशील मार्गावर काम करतच स्वतःची आरामदायी कार घेत आहे. अनेकांची लग्न झाली. होतकरू तरुण व्यावसायिक समाजामध्ये चांगले नाव कमवून, प्रतिष्ठित आयुष्य जगत आहे. ही गोष्ट आम्हाला खूप समाधान देते." असे विशाल जाचक सांगतात.
आज आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण खूप आहे. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंटमधून उच्च शिक्षण घेणारे तरुण नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगार आहेत, निराशमय आयुष्य जगत आहेत. अनेक अडचणींचा सामना करत आहेत. खूप तणावपूर्ण परिस्थितीचा, संघर्षमय परिस्थितीचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये व्यवसायाची आवड असणारे होतकरू तरुण ऑस्करवाडी मिसळ या ब्रँडची शाखा घेऊन तो व्यवसाय यशस्वीपणे चालवून, लाखो रुपये कमवत आहे ही गोष्ट महाराष्ट्रातील व भारतातील तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाच्या यशस्वी प्रवासामध्ये विशाल जाचक यांच्या मित्र परिवाराचेही महत्त्वाचे योगदान आहे असे विशाल जाचक सांगतात. "ऑस्करवाडी मिसळ हॉटेल चालू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात आम्हाला कुठलीही मदत लागली तरी आमच्या मित्रांनी सहकार्य केले. हॉटेलचे कुठले साहित्य आणायचे असतील, हॉटेलच्या कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी फोर व्हीलर लागणार असेल तर पंधरा - पंधरा दिवस आमचे मित्र आम्हाला फोर व्हीलर देऊन जायचे. आमचा मित्र परिवारामध्ये संपर्क चांगला असल्यामुळे ऑस्करवाडी मिसळ चालू केल्यानंतर आमच्या मित्रपरिवारांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला. कुठलीही अडचण असली तरी पाठीशी उभे असणारे तुमचे मित्र असतील तर तुमचा व्यावसायिक प्रवास चांगला होतो." असे विशाल जाचक सांगतात.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक विशाल जाचक यांनी 2022 साली 24 लाखाची स्वतःची पहिली नवीन कार एमजी हेक्टर ही लक्झरीयस कार विकत घेतली. कुठल्याही व्यक्तीचे आयुष्यातली पहिली कार खरेदी करण्याचे स्वप्न असते. तो क्षण खूप आनंददायी व हृदयस्पर्शी असतो. विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक यांनी विशाल जाचक यांच्या ऑस्करवाडी मिसळ उद्योगसमूहाचा यशस्वी प्रवास पाहिला परंतु वडिलांना आपल्या लक्झरीयस कारमध्ये बसवून फिरायला घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याची खंत विशाल जाचक सांगतात.

विशाल जाचक यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली लक्झीरियस कार बुक केल्यानंतर चार महिन्यांनी त्या कारची त्यांना डिलिव्हरी मिळाली परंतु दुर्दैवाने कारची डिलिव्हरी मिळण्याच्या अगोदरच विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक यांचे 2022 ला दुर्धर आजाराने निधन झाल्यामुळे, वडिलांना आपल्या कार मध्ये बसवुन फिरवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत आहे. असे विशाल जाचक सांगतात. "आम्ही आमची पहिली कार लवकरात लवकर मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. आमच्या कुटुंबातील पहिल्या लक्झिरियस कारमध्ये वडिलांना बसवून फिरवायचे होते. परंतु गंभीर आजारामुळे त्यांचे निधन झाल्यामुळे, दुर्दैवाने ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही ही खंत मनामध्ये राहिली. वडिलांनी पंधरा वर्ष आजारपणाशी संघर्ष केला. आमच्यासाठी तो काळ खूप कठीण व वेदनादायी होता." असे विशाल जाचक सांगतात.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाचे संस्थापक, संचालक विशाल जाचक यांच्या यशस्वी जीवन प्रवासामध्ये त्यांचे वडील मारुती जाचक यांची प्रेरणा व मार्गदर्शन यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक बांधकाम क्षेत्रात काम करत असताना त्यांनी त्यांचा मुलगा विशाल जाचक यांच्यावर खूप चांगले संस्कार केले व त्यांची चांगली जडणघडण होण्यासाठी खूप चांगली शिकवणूक दिली. बांधकाम साइट वरती विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक काम करत असतानाच त्यांनी त्यावेळी विशाल जाचक यांना देखील त्या बांधकाम साईटवरती इमारतीचे कॉलम भरायला लावून सिमेंट मधलं सामान्य कामगाराचा आयुष्य कसे असते? याचे धडे त्यावेळेस त्यांनी दिले. "कुठलेही काम करत असताना कशाचीही लाज न बाळगता, कशाचीही भीती न बाळगता ते काम तुम्ही प्रामाणिकपणे व निष्ठेने केले पाहिजे ही शिकवण विशाल जाचक यांचे वडील मारुती जाचक यांनी विशाल जाचक यांना दिली.

"महाराष्ट्राभर तसेच देशभरात आम्ही व्यावसायाच्या निमित्ताने फिरत असतो. आम्हीही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये नाष्ट्याचा व जेवणाचा आस्वाद घेत असतो. मुंबईवरून सहा मित्र त्यांच्या फॅमिलीला घेऊन खास आमच्या भिवरी येथील ऑस्करवाडी मिसळ मुख्य शाखेमध्ये मिसळ खाण्यासाठीच येतात ही गोष्ट आम्हाला खूप समाधान देणारी व ऊर्जा देणारी आहे. मुंबईच्या ग्राहकांचा हा प्रसंग आमच्यासाठी खूप हृदयस्पर्शी आहे. मुंबईचे हे ग्राहक कामानिमित्त प्रवास करत असताना एकदा आमची ऑस्करवाडी मिसळ खाण्यासाठी आले त्यांना ती एवढी आवडली की ते म्हणाले आम्ही खास मिसळ खाण्यासाठी येऊ. त्यानंतर खरोखरच एका रविवारी खास मिसळ खाण्यासाठी हे मुंबईचे मित्र त्यांच्या फॅमिलीला घेऊन आले आणि आमच्या ऑस्करवाडी मिसळचा आस्वाद घेतला ही गोष्ट आमच्या मनाला खूप उभारी देणारी व समाधान देणारी आहे. असे विशाल जाचक सांगतात.
"दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून खास ऑस्करवाडी मिसळ खाण्यासाठी मुंबईवरून भिवरी येथे मिसळ खाण्यासाठी कुटुंबाला घेऊन येणे ही गोष्ट खरंच कुठल्याही हॉटेल व्यावसायिकाला प्रेरणा देणारी व ऊर्जा देणारी आहे."
"ऑस्करवाडी मिसळची उत्कृष्ट चव गुजराती व्यावसायिकांना आवडल्यामुळे ऑस्करवाडी मिसळची शाखा गुजरात मधील अहमदाबाद या शहरात सुरू झालेली आहे. पुणे शहरातील मार्केटयार्डमधील गुजराती व्यावसायिकाला ऑस्करवाडी मिसळची उत्कृष्ट चव आवडल्यामुळे त्यांनी ही मिसळ गुजरातला त्यांच्या नातेवाईकांना खाण्यासाठी पार्सल घेऊन गेले. गुजरातमधील हॉटेल व्यावसायिकाला ऑस्करवाडी मिसळची चव आवडल्यामुळे त्यांनी पुन्हा पुण्यात येऊन ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाचा यशस्वी प्रवास समजून घेऊन, व्यावसायिक संधी लक्षात घेऊन ऑस्करवाडी मिसळची शाखा गुजरात मधील अहमदाबाद येथे सुरू केली."
"गुजराती हॉटेल उद्योजकाने मराठी माणसाचा "ऑस्करवाडी मिसळ" या ब्रँडची शाखा गुजरात मधील प्रसिद्ध शहर अहमदाबाद येथे सुरू करून, व्यावसायाची प्रगतशील वाटचाल करणे ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे."
"हैदराबादच्या व्यावसायिकालाही ऑस्करवाडी मिसळची उत्कृष्ट चव आवडल्यामुळे त्यांनी पुण्यात येऊन ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाचा पूर्ण अभ्यास करून, माहिती घेऊन, सर्व्हे करून, व्यावसायिक प्रगतीची संधी दिसल्यामुळे त्यांनी हैदराबादमध्ये "ऑस्करवाडी मिसळची" शाखा सुरू केली ही आमच्यासाठी खूप अभिमानाची व समाधान देणारी गोष्ट आहे." असे विशाल जाचक सांगतात.
"ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल एक करोडपेक्षा जास्त आहे. ऑस्करवाडी उद्योग समूहाच्या संपूर्ण महाराष्ट्र व देशभरात 73 शाखा आहेत. पुढील पाच वर्षात आम्हाला ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाचा वार्षिक टर्नओव्हर 5 करोड ते 10 करोडपर्यंत घेऊन जायचा आहे. पुढील पाच वर्षात आम्हाला एक मोठे थ्री स्टार हॉटेल चालू करायचे आहे. तसेच ऑस्करवाडी मिसळ आम्हाला संपूर्ण भारतभर व दुबई, अमेरिका व संपूर्ण जगभरात पोहोचवायची ध्येय असल्याचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक विशाल जाचक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले."
"आजच्या तरुण पिढीने गुन्हेगारीच्या व व्यसनाच्या आहारी जाऊ नये. वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात मराठी तरुणांना खूप संधी आहे. प्रामाणिकपणे, कष्ट व मेहनत करून चांगले व्यावसायिक बना. येणाऱ्या काळात आम्हाला ऑस्करवाडी उद्योग समूहाच्या माध्यमातून शेकडो मराठी उद्योजक घडवायचे आहेत." असे विशाल जाचक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
ऑस्करवाडी मिसळला महाराष्ट्रातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाने ऑस्करवाडी 97 हे रेस्टॉरंट भिवरी येथे सुरू केले. ऑस्करवाडी 97 या रेस्टॉरंटमधील चिकन थाळी, मटन थाळी व व्हेज थाळी प्रसिद्ध आहे. जे. जे. चायनीज पॉईंट हे रेस्टॉरंट देखील पुणे शहरात चालू केले. या दोन्ही रेस्टॉरंटला पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरातील ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे विशाल जाचक सांगतात.
"ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाच्या प्रगतशील वाटचालीत विशाल जाचक यांच्या पत्नी अर्चना जाचक यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. ऑस्करवाडी मिसळच्या उत्कृष्ट चवीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट, मेहनत, संशोधन व प्रयत्नांची पराकाष्ठा खूप महत्त्वाची आहे. कुठल्याही यशस्वी उद्योजकाच्या पाठीशी पत्नीची खंबीर साथ असणे खूप आवश्यक असते. ऑस्करवाडी मिसळ हॉटेल सुरू करण्यासाठी अर्चना जाचक यांनी दिलेला पाठिंबा,ताकद व साथ तसेच त्यांनी ऑस्करवाडी मिसळच्या उत्कृष्ट चवीसाठी,रेसिपीसाठी घेतलेले कष्ट व मेहनत आमच्या हॉटेल व्यवसायाच्या प्रगतशील वाटचालीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. असे विशाल जाचक सांगतात."

"ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाचे संस्थापक संचालक विशाल जाचक व संस्थापक, संचालक अक्षय कटके यांची दाजी व मेव्हण्याची जोडी प्रसिद्ध उद्योजक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. विशाल जाचक यांचा लोकसंग्रह, मित्रपरिवार, व्यवस्थापन कौशल्य, जिद्द व चिकाटी आणि अक्षय कटके यांची मेहनत,प्रामाणिकपणा,कलात्मक दृष्टी, मार्केटिंग कौशल्य तसेच दाजी आणि मेहुण्याच्या एकजुटीमुळे, दूरदृष्टीमुळे, ग्राहकांना दिलेल्या उत्तम सेवेमुळे ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाने महाराष्ट्रातील हजारो - लाखो ग्राहकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवलेले आहे."
ऑस्करवाडी मिसळ उद्योगसमूहाचा संपूर्ण भारतात यशस्वी विस्तार व्हावा यासाठी विशाल जाचक व अक्षय कटके दोघेही एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून जिद्दीने, चिकाटीने, एकजुटीने प्रयत्न करत असून, प्रसिद्धीसाठी कुठलेही हेवेदावे न ठेवता, एकमेकांना सहकार्य करून, समजून घेऊन, योग्य मार्गदर्शन घेऊन ऑस्करवाडी मिसळ उद्योगसमूह भारतात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसा पोहोचेल आणि संपूर्ण भारतभरातील ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, ग्राहकांची मने जिंकण्याचा हे दोघेही उद्योजक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
"ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाचे संस्थापक, संचालक विशाल जाचक यांचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासातून व त्यांच्या उत्तम व्यवस्थापनातून मी खूप प्रेरणा घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राज्य कारभार, उत्तम व्यवस्थापन, साडेतीनशे पेक्षा जास्त किल्ल्यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन यातून मला माझ्या व्यावसायिक प्रगतीसाठी खूप प्रेरणा मिळते. ऑस्करवाडी मिसळ हा ब्रँड जगभरात यशस्वी पोचल्यानंतर हेच खरे छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्याकडून अभिवादन असेल." असे विशाल जाचक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.
भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे विशाल जाचक यांचे आवडते उद्योजक आहेत. ऑस्करवाडी मिसळच्या संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शाखा विस्तारत असताना, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंत्री, कलाकार,अधिकारी, उद्योजक व क्रीडा, समाजकारण क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाच्या यशस्वी भरारी बद्दल विशाल जाचक यांचे मनापासून,भरभरून कौतुक करत आहेत.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
सातारा जिल्ह्यातील, वेळ येथील ऑस्करवाडी मिसळच्या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाल जाचक यांच्या व्यावसायिक प्रगतीचे, ध्येयवादी वाटचालीचे भरभरून कौतुक करून, भावी प्रगतशील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी, अनेक आमदार, खासदार, मंत्री,सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, कलाकार, उद्योजक आमच्या ऑस्करवाडी मिसळच्या प्रगतशील वाटचालीबद्दल मनापासून कौतुक करून, सर्वजण मार्गदर्शन करतात. त्यावेळेस खूप समाधान वाटते. असे विशाल जाचक सांगतात.
बारामती ॲग्रो कंपनीचे संस्थापक,अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी देखील विशाल जाचक यांना व्यावसायिक वाटचालीसाठी बहुमोल असे मार्गदर्शन केलेले आहे. व्यवसाय करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? तुमचा ब्रँड देशभरात पोहोचवण्यासाठी कसा व्यवसाय केला पाहिजे? कोणती ध्येयधोरणे राबवली पाहिजेत? याविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन बारामतीतील प्रेरणादायी व्यक्तिमत्व राजेंद्र पवार यांनी आम्हाला केल्याचे विशाल जाचक सांगतात.

"बारामती तालुक्यातील प्रसिद्ध माळेगाव येथे ऑस्करवाडी मिसळच्या शाखेचा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी विशाल जाचक यांनी त्यांची आई बाईडाबाई व कुटुंबातील सदस्यांना घेऊन गेले असता, ऑस्करवाडी मिसळ या ब्रँड असलेल्या उद्योगसमूहाच्या शाखेचा उद्घाटन सोहळा हा किती भव्य दिव्य आणि सुंदर असतो हे विशाल जाचक यांच्या आईला व कुटुंबातील सदस्यांना त्यावेळी पाहायला मिळाले. त्या उद्घाटन सोहळ्यात विशाल जाचक यांचा झालेला सत्कार, भाषण पाहून विशाल जाचक यांच्या आईचे ऊर अभिमानाने भरून आले. आपला लेक किती मोठा उद्योजक झाला हा अनुभव त्यांना आनंदाने भारावून टाकणारा होता. विशाल जाचक यांच्या आईचा त्या उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात आला. आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू व आईने पाहिलेले लेकाचे हे मोठे यश हे सर्वांसाठीच खूप हृदयस्पर्शी होते. आईने आमच्यावरती केलेले संस्कार व जडणघडण यामुळेच आम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकलो. आईच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान ही आमच्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे."असे विशाल जाचक सांगतात.

पुण्यातील अहिरे गावचे असणाऱ्या विशाल जाचक यांच्या बद्दल अहिरे गावातील गावकऱ्यांना खूप अभिमान वाटतो. आपल्या गावचा सुपुत्र विशाल जाचक यांनी ऑस्करवाडी मिसळ उद्योगसमूह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यशस्वीपणे पोहोचवला याचा गावकऱ्यांना व मित्रपरिवाराला खूप अभिमान वाटतो.
ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाचे संस्थापक, संचालक विशाल जाचक यांना 2022 मध्ये पुणे येथे "यशस्वी उद्योजक" हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातील नामांकित सामाजिक संस्थांकडून दिला जाणाऱ्या आदर्श उद्योजक पुरस्कारामुळे कुठल्याही उद्योजकाला भविष्यातील प्रगतशील वाटचालीसाठी नक्कीच एक चांगले बळ मिळते.
"प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. अनेक संकटे व अडचणी येत असतात परंतु संयम ठेवून निराश न होता, जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न केले तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. तरुण पिढीने आई-वडिलांचे संस्कार विसरू नयेत. आई - वडील आपल्या आयुष्यातला बालेकिल्ला असतो. चांगली पुस्तके वाचावीत. चांगल्या मित्रांच्या,चांगल्या लोकांच्या संगतीत असताल आणि प्रामाणिकपणे मेहनत केली तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात चांगले यश मिळवू शकता. मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे. कष्ट, मेहनत करून व्यवसायात मोठी भरारी घेतली पाहिजे. मराठी कम्युनिटी आता बिजनेस कम्युनिटी झाली पाहिजे" असे विशाल जाचक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.

"ऑस्करवाडी मिसळ या ब्रँडची शाखा महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी चालू करून त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात खूप चांगले यश मिळवले. सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक तरुण अनेक वर्ष वेटर म्हणून हॉटेलमध्ये काम करत होता. त्या तरुणाने साहस दाखवत, ऑस्करवाडी मिसळची शाखा सांगली जिल्ह्यात सुरू केली आणि काही महिन्यातच त्यानं हॉटेल व्यवसायात खूप मोठी झेप घेतली. ऑस्करवाडी मिसळ हॉटेलमुळे त्या तरुणाचे आयुष्यच बदलले. ऑस्करवाडी मिसळ या हॉटेलच्या माध्यमातून त्या तरुणाने ग्राहकांना उत्तम सेवा देऊन व्यावसायात एक यशस्वी झेप घेतली. ऑस्करवाडी मिसळ हॉटेलच्या माध्यमातून त्या तरुणाने लाखो रुपये कमावले व त्याच्या आवडीची लक्झरीयस कार देखील खरेदी केली. महाराष्ट्रातील तरुणवर्ग ऑस्करवाडी मिसळची शाखा घेऊन, प्रामाणिकपणे व्यवसाय करून, त्यांच्या आयुष्यात खूप चांगली प्रगती करून, एक चांगला उद्योजक म्हणून त्यांचा प्रगतशील प्रवास ते अभिमानाने करत आहेत. ही गोष्ट आम्हाला खूप समाधान व ऊर्जा देणारी आहे." असे विशाल जाचक सांगतात.

"अनेक वर्ष वेटर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाच्या माध्यमातून व्यवसायाची एक चांगली संधी मिळते आणि तो तरुण जिद्दीने, चिकाटीने मेहनतीने ऑस्करवाडी मिसळची शाखा यशस्वीपणे चालवतो. त्याच्या प्रामाणिक मेहनतीने त्याचे स्वप्न तो पूर्ण करतो. ही गोष्ट महाराष्ट्रातील सर्व तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे. ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाने महाराष्ट्रातील अनेक तरुणांना व्यावसायाची संधी देऊन, अनेक चांगले तरुण उद्योजक घडवले. ही कामगिरी मराठी उद्योग क्षेत्रासाठी खूप ऊर्जा देणारी आहे."
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"महाराष्ट्रातील तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायांमध्ये उतरले पाहिजे.आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम केले पाहिजे. तुमच्या व्यवसायावरती तुम्ही संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून, जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न केले तर नक्कीच तुम्ही त्या क्षेत्रात उत्तुंग असे यश मिळवुन त्या क्षेत्राचे तुम्ही बापमाणूस बनताल." असे विशाल जाचक सांगतात.

"एका सर्वसामान्य, गरीब कुटुंबात जन्म घेतलेला तरुण प्रतिकूल परिस्थितीशी, गरीब परिस्थितीशी संघर्ष करून, टेम्पो चालवतो, रिक्षा चालवतो, पाणी सोडणारा सामान्य कामगार म्हणून प्रामाणिकपणे 9 वर्ष काम करतो. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आयुष्यातील फार मोठा धोका पत्करून, आईचे व बायकोचे दागिने मोडून, अनेक अडचणींचा सामना करून, ध्येयवादी असणाऱ्या मेव्हणा अक्षय कटके यांच्या साथीने ऑस्करवाडी मिसळ हॉटेल सुरू करतो आणि जिद्दीने, चिकाटीने व प्रचंड मेहनत करून अल्पावधीतच ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऑस्करवाडी मिसळ हा ब्रँड पोहचवतो.गुजरात, हैदराबादचे व्यावसायिकही ऑस्करवाडी मिसळ उद्योगसमूहाची शाखा गुजरातमध्ये, हैदराबादमध्ये अभिमानाने सुरू करतात. संपूर्ण भारतभर ऑस्करवाडी मिसळ उद्योग समूहाची शाखा यशस्वीपणे पोहोचवणारे प्रेरणादायी शिलेदार विशाल जाचक यांचा संघर्षमय व असामान्य प्रवास महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे."

प्रेरणादायी शिलेदार विशाल उर्फ सोनुदादा जाचक यांच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...
लेखक : अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.