सासवड, दि.१५ : महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुरंदरच्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा ३७६ वा शौर्यदिन हा वीर बाजी पासलकर यांच्या समाधी स्थळी अभिवादन करून व महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून शनिवारी ३७६ वा शौर्यदिन उत्साहात साजरा केला.
युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी अनेक शिलेदारांनी, पराक्रमी सरदारांनी, मावळ्यांनी गौरवशाली कामगिरी करून प्रामाणिकपणे व निष्ठावंतपणे साथ दिली.
पुरंदर किल्ल्यावरील १० ऑगस्ट १६४८ रोजी झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईत महापराक्रमी सरदार वीर गोदाजीराजे जगताप यांनी अतुलनीय पराक्रम दाखवून आदिलशहाचा सरदार फत्तेखानाच्या फौजेचा पराभव करून फत्तेखानाच्या फौजेतील प्रमुख सरदार मुसेखानाला ठार केले.
स्वराज्याच्या या पहिल्या लढाईत वीर सेनापती बाजी पासलकर, सरदार सुभानराव शिळीमकर, वीर यलजी गोते यांनी मोठा पराक्रम दाखवून स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"१० ऑगस्ट १६४८ रोजी पुरंदर किल्ल्यावर झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईत महापराक्रमी गोदाजीराजे जगताप यांनी आदिलशहाचा बलाढ्य सरदार मुसेखान याच्या खांद्यावर तलवारीचा घाव घालून मुसेखानाच्या शरीराच्या दोन फाकळ्या केल्या. मुसेखान पडल्यामुळे आदिलशाही सैन्य पळत सुटले. त्यांचा प्रचंड मोठा पराभव झाला.
आदिलशाही सेनेचा पाठलाग करत असताना सासवड जवळ झालेल्या झटापटीत बाजी पासलकर यांना वीरगती प्राप्त झाली. याप्रसंगी छत्रपती शिवरायांचे वय १८ वर्षांचे होते बाजीकाका पासलकर सोडले तर इतर सहकारीही याच वयाचे होते.
अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत शिवरायांनी हा महत्वपूर्ण ऐतिहासिक विजय मिळवला म्हणून या लढाईला खूप महत्व आहे.
महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष श्री दिपक आप्पा जगताप, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री बाजीराव जगताप, श्री शामराव जगताप, श्री वैभवबापू जगताप,श्री बाळासाहेब जगताप, इतिहास अभ्यासक श्री अजयकुमार जगताप, तसेच
श्री चंद्रकांत जगताप, शिवभक्त श्री प्रशांत जगताप, श्री विकास जगताप, श्री वैभव बापू जगताप, श्री अजय जगताप,श्री मंगेश जगताप,श्री नंदूबापू जगताप,श्री सागर जगताप, श्री मारुती जगताप,श्री रविंद्र जाधव, श्री प्रश्नांत इंगळे, श्री राजेंद्र बर्गे यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सासवड येथील सरदार गोदाजीराजे जगताप स्मारक येथे यंदाचा ३७६ वा शौर्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वीर बाजी पासलकर स्मारक स्थळी वीर बाजी पासलकर यांना अभिवादन करण्यात आले. वीर बाजी पासलकर यांच्या महान पराक्रमाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"१० ऑगस्ट १६४८ रोजी पुरंदर किल्ल्यावर स्वराज्याची पहिली लढाई लढली गेली. या स्वराज्याच्या लढाईत मराठा सरदारांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले. फतेखानाच्या नेतृत्वाखाली आदिलशाही सेना स्वराज्यावर चालून आली होती.
या लढाईत महापराक्रमी गोदाजीराजे जगताप यांनी आदिलशहाचा बलाढ्य सरदार मुसेखान याच्या खांद्यावर तलवारीचा घाव घालून मुसेखानाच्या शरीराच्या दोन फाकळ्या केल्या. गोदाजीराजे जगताप यांचा या लढाईतील पराक्रम स्वराज्यातील शिलेदारांसाठी प्रेरणादायी होता.
मुसेखान पडल्यामुळे आदिलशाही सैन्य पळत सुटले. त्यांचा प्रचंड मोठा पराभव झाला.आदिलशाही सेनेचा पाठलाग करत असताना सासवड जवळ झालेल्या झटापटीत बाजी पासलकर यांना वीरगती प्राप्त झाली.
या रणसंग्रामावेळी शिवरायांचे वय १८ वर्षांचे होते बाजी काका पासलकर सोडले तर इतर सहकारीही याच वयाचे होते.
अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत शिवरायांनी हा महत्वपूर्ण ऐतिहासिक विजय मिळवला म्हणून या लढाईला खूप महत्व आहे. वीर बाजी पासलकर यांचे या स्वराज्याच्या पहिल्या लढाईतील शौर्य, पराक्रम मावळ्यांच्या हृदयात मोठे स्थान निर्माण करणारे ठरले.
या ऐतिहासिक विजयाचे स्मरण म्हणून महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे १० ऑगस्ट रोजी गोदाजीराजे जगताप स्मारक सासवड येथे शौर्यदिन साजरा करण्यात येतो." अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक अजयकुमार जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"स्वराज्याच्या या पहिल्या ऐतिहासिक लढाईतील विजयाने दूरगामी परिणाम झाले. स्वराज्यातील रयतेचा व सैन्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवाजीराजेंना स्वराज्य स्थापनेसाठी पाठिंबा वाढला व स्वराज्यस्थापनेची वाट सुकर झाली. आजच्या तरुणपिढीने या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजासाठी चांगले कार्य केले पाहिजे." अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक अजयकुमार जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
युगपुरुष शिवाजीराजे यांचे महान स्वराज्य कार्य, गौरवशाली महान इतिहास व स्वराज्याच्या शिलेदारांचा महान इतिहास महाराष्ट्रासाठी तसेच भारत देशासाठीही खूप प्रेरणादायी आहे.
पुरंदर किल्ल्यावरील स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा इतिहास व महापराक्रमी गोदाजीराजे जगतापांचा अतुलनीय पराक्रम! : —
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मितीचे प्रेरणास्रोत शहाजीराजे होते. स्वकियांचे स्वतंत्र राज्य असावे हे शहाजीराजांचे स्वप्न होते. भीमा व नीरा या दोन नद्यांमध्ये असलेला पुणे व सुपे प्रांत ही शहाजीराजेंची जहागिरी होती. प्रजाहित दक्ष कारभारामुळे जहागिरीतील देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी या वतनदारांशी शहाजीराजांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डोंगरदर्यांनी व्यापलेल्या या बारामावळ मुलखाचा व तेथील निष्ठावान लोकांचा उपयोग स्वराज्य निर्मितीसाठी होईल हे शहाजीराजेंनी जाणले होते.
स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंनी बालशिवबा व जिजाऊसाहेबांना स्वराज्य निर्मितीच्या हेतूने बंगळूरहून पुणे येथे रवाना केले. सोबत भरपूर खजिना, युध्द साहित्य, हत्ती, घोडे तसेच विश्वासू सहकारी दिले. याशिवाय शहाजीराजेंनी शिवबांना स्वतंत्र ध्वज व राजमुद्राही दिली. शिवरायांच्या नावे पुण्यातून जहागिरीचा कारभार सुरू झाला. रयत सुखावली. लोकांना शिवरायांबद्दल विश्वास वाटू लागला.
तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, गोदाजीराजे जगताप, बाजी जेधे या आपल्या सवंगड्यांसह शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली.
वीर बाजी पासलकरांच्या नेतृत्वात स्वराज्याच्या झेंड्याखाली पुणे प्रांतातील पासलकर, जेधे, बांदल, जगताप, काकडे, शितोळे, कोंडे, शिळीमकर, मारणे, निगडे, ढमाले, पायगुडे, धुमाळ, मरळ, खोपडे,ढमढेरे वगैरे देशमुख वतनदार आपल्या मावळी सेनेसह एकत्र आले.
शिवराय व त्यांच्या सवंगड्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा व कोंढाणा किल्ले ताब्यात घेतले आणि राजगड किल्ल्याचे बांधकाम चालू केले या बातम्या विजापूरला आदिलशहाच्या कानी गेल्या. याच सुमारास शहाजीराजे कर्नाटकातील मोहिमेवर होते. तेथील छोटी - छोटी स्वतंत्र राज्ये टिकून रहावीत असे शहाजीराजेंना वाटत असे. शक्यतो तह व कराराने ही राज्ये टिकवण्याचा शहाजीराजेंचा प्रयत्न असे. यामुळे या सर्व राजे लोकांना शहाजीराजेंबद्दल आपुलकी व आदर वाटू लागला. शहाजीराजांचे वाढते महत्व त्यांच्या विरोधकांना खटकू लागले. त्यांनी बादशहाकडे कागाळ्या केल्या.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात कपटाने कैद करविले व इकडे पुण्याला शिवरायांना पकडण्यासाठी विजापूरहून फत्तेखानाला पाच हजार फौजेनिशी रवाना केले. शहाजीराजांना कैद केल्यामुळे शिवराय मोठ्या पेचात सापडले. स्वराज्याचा हट्ट धरावा तर वडीलांच्या जिवाला धोका व वडीलांना सोडवायला जावे तर स्वराज्यावर पाणी सोडावे लागणार. अखेर सर्व सवंगड्यांशी सल्लामसलत केल्यावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते ही पुरंदर किल्ल्यावरून लढण्याचा. परंतु पुरंदर किल्ला यावेळेस आदिलशहाच्या ताब्यात होता. गडाचे किल्लेदार होते महादजी सरनाईक. शहाजीराजेंचे व महादजींचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महादजींनी शिवरायांसाठी गडाचे दरवाजे उघडले व गड शिवरायांच्या ताब्यात दिला.
शिवाजीराजे सर्व फौजेनिशी पुरंदरावर आले. शिवाजीराजांचे हे सैन्य जेमतेम एक हजार ते बाराशे असावे. पुरंदरवरच्या मावळ्यांनी कंबर आवळली. गोदाजीराजे जगताप, बाजी जेधे, संभाजी काटे, बाळाजी शिळीमकर, शिवाजी इंगळे वगैरे वीर सज्ज झाले. सर्वांच्या पुढे होते वीर बाजीकाका पासलकर. फत्तेखानाचा मुक्काम पुरंदर जवळ बेलसरला होता. शिवाजीराजांच्या फौजेच्या एका तुकडीने एके दिवशी रात्री फत्तेखानाच्या छावणीवर अचानक हल्ला केला व ती तुकडी पुरंदरवर पसार झाली. या हल्ल्यामुळे फत्तेखान चिडून सर्व फौजेनिशी पुरंदरवर चालून आला.
पुरंदरवर शिवाजीराजे स्वतः व बाजीकाका पासलकर, गोदाजीराजे जगताप आणि राजांची सेना सज्ज होती. गोदाजीराजे जगताप तर केवळ रणचंडिकेचा अवतार होते. फत्तेखानासोबत भरपूर सैन्य, मुबलक युध्द साहित्य व अनुभवी सरदार होते. इकडे गडावर सगळे तरुण शिलेदार होते. शिवाजीराजांचे वय यावेळी होते फक्त अठरा वर्षे व बाजीकाका पासलकर सोडले तर बाकी सर्व साथीदारही याच वयाचे होते. फत्तेखानाचे सैन्य पुरंदर किल्ल्यावर चढू लागले.एका विशिष्ट टप्प्यावर गनीम आल्यावर शिवाजीराजांनी इशारत केली आणि मावळे शत्रूवर तुटून पडले.
गडावर युध्द साहित्याची कमतरता होती. मावळ्यांनी गोफणीतून दगडांचा वर्षाव सुरू केला व गडावरून मोठ्या आकाराचे धोंडे खाली ढकलण्यास सुरवात केली. त्यामुळे बरेच शत्रु सैन्य गारद झाले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राजांचे सैन्य गडाचा दरवाजा उघडून शत्रूवर चालून आले. घनघोर लढाई सुरू झाली! खानाच्या सैन्यात आघाडीला प्रमुख सरदार मुसेखान होता. त्याच्या सोबत मताजी घाटगे, रतनशेख व मिनादशेख हे सरदार होते. त्यांच्या मागे खासा फत्तेखान होता.
शिवाजी महाराजांचे सैन्य मोठ्या इर्षेने लढत होते. गोदाजीराजे जगताप, बाजी जेधे, संभाजी काटे, शिवाजी इंगळे व बाजीकाका पासलकर स्वराज्य प्रेरणेने लढत होते!
"गोदाजीराजे जगतापांनी आघाडीवर असलेल्या खुद्द मुसेखानालाच गाठले! घोर रणसंग्राम सुरू झाला. एकमेकांवर तलवारीचे जबरदस्त घाव पडू लागले. जणू काही आभाळातून विजा कडाडत आहेत असा भास निर्माण होऊ लागला! लढता लढता गोदाजीराजेंनी मुसेखानाच्या छाताडात खचकन भाला खुपसला! पण तो मुसेखानही असा जबर बहाद्दर होता की त्याने दोन्ही हातांनी आपल्या छातीत घुसलेला भाला उपसला! आणि संतापाने त्या भाल्याचे दोन तुकडे करून टाकले! त्याने तलवारीने गोदाजीराजे जगताप यांच्याशी युध्द सुरू केले. कुर्हाडीच्या घावासारखे एकमेकांच्या ढालीवर घाव पडू लागले! दोघेही पराक्रमाची शर्थ करीत होते."
"एवढ्यात महापराक्रमी गोदाजीराजे जगतापांनी मुसेखानाच्या खांद्यावर इतका जबरदस्त घाव घातला की खांद्यापासून पोटापर्यंत खानाच्या शरीराची फाकळी उडाली. मुसेखान पडला! आणि फत्तेखानाच्या फौजेचा धीरच सुटला. खुद्द फत्तेखान व त्याचे सरदार सैन्यासह पळत सुटले! महापराक्रमी गोदाजीराजे जगताप व त्यांच्या सहकार्यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने बलाढ्य फत्तेखानाचा पराभव केला आणि स्वराज्याच्या पहिल्या लढाईत विजय मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील या स्वराज्याच्या पहिल्या लढाईतील हा विजय स्वराज्य कार्य जनतेच्या मनामध्ये रुजवण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
१० ऑगस्ट १६४८ रोजी झालेल्या या ऐतिहासिक लढाईचे नेतृत्व स्वतः छत्रपती शिवरायांनी केले होते. आदिलशहा व शिवरायांचे बळ यामधे सैन्याची संख्या, युध्द साहित्य, अनुभव या सर्वच बाबतीत असमानता होती. पुरंदर किल्ल्यावर झालेल्या या स्वराज्याच्या पहिल्याच लढाईत शिवराय व त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवला.
या लढाईतील विजयाचे दूरगामी परिणाम झाले. स्वराज्यातील रयतेचा व सैन्याचा आत्मविश्वास वाढला. शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी मिळणारा पाठिंबा वाढला. स्वराज्य स्थापनेची वाटचाल सुकर झाली. एवढेच नाही तर या विजयाने स्वराज्याचा पायाच रचला गेला.
मात्र या विजयाला एक गालबोट लागले शत्रु सैन्याचा पाठलाग करताना सासवड जवळ झालेल्या चकमकीत वीर बाजी पासलकरांना वीरगती प्राप्त झाली.
थोर सेनानी वीर बाजी पासलकरांना विनम्र अभिवादन! आणि महापराक्रमी गोदाजीराजे जगताप व त्यांच्या सर्व शिलेदारांना विनम्र अभिवादन !
(ऐतिहासिक माहिती सौजन्य - इतिहास अभ्यासक अजयकुमार जगताप व जगताप परिवार)
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासातून तरुण पिढीने प्रेरणा घेऊन देशासाठी व समाजासाठी चांगले कार्य केले पाहिजे.
No comments:
Post a Comment