पॅरिस,दि.१ : कोल्हापूरच्या मातीत लहानाचा मोठा झालेला महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलम्पिकमध्ये एअर रायफल 50 मीटर थ्री पोझिशन्स नेमबाजी प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करून कास्यपदक पटकावून, भारतीयांची मान जगभरात अभिमानाने उंचावली.
ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळेनं पॅरिस ऑलम्पिकमध्ये एअर रायफल नेमबाजी प्रकारात कास्यपदक मिळवून देऊन, भारताला तिसरे पदक मिळवून दिले आणि एक प्रेरणादायी इतिहास रचला.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत स्वप्निलनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. एकूण ४५१.४ गुण मिळवत त्यानं कांस्य पदकाला गवसणी घातली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत तीन पदकं मिळाली आहेत. विशेष म्हणजे ही तिन्ही पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. स्वप्निल कुसाळेनं जिंकलेलं कांस्य पदक सर्वार्थानं ऐतिहासिक आहे.
ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर थ्री पोझिशन स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही नेमबाजाला पदक जिंकता आलेलं नव्हतं. पण स्वप्निलनं स्वप्नवत कामगिरी करत भारतीय नेमबाजांचा पदकांचा दुष्काळ संपवला.
अंतिम फेरीत नीलिंग आणि प्रोन सीरिज संपल्यानंतर २९ वर्षांच्या स्वप्निल कुसाळे ३१०.१ गुणांसह पाचव्या स्थानी होता. पण स्टँडिंगच्या दोन सीरिजमध्ये त्यानं दमदार कामगिरीसह पुनरामगन केलं. या सीरिजनंतर स्वप्निल तिसऱ्या क्रमांकावर आला. त्यांनी हेच स्थान कायम राखत पदकाला गवसणी घातली.
नीलिंगमध्ये नेमबाजांना गुडघ्यावर बसून लक्ष्यभेद करावा लागतो. प्रोन प्रकारात जमिनीवर झोपून निशाणा साधावा लागतो. तर स्टँडिंगमध्ये उभं राहून लक्ष्य भेदावं लागतं.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
नीलिंगच्या पहिल्या सीरिजमध्ये स्वप्निलनं ५०.८ गुणांची कमाई केली. दुसऱ्या सीरिजमध्ये त्यानं ५१.९ गुण कमावले. तर तिसऱ्या सीरिजमध्ये ५१.६ गुण मिळवले. प्रोनच्या पहिल्या सीरिजमध्ये ५२.७, दुसऱ्या सीरिजमध्ये ५२.२ आणि तिसऱ्या सीरिजमध्ये ५१.९ गुण मिळवले.
स्टँडिंगच्या पहिल्या सीरिजमध्ये स्वप्निलच्या खात्यात ५१.१, तर दुसऱ्या सीरिजमध्ये ५०.४ गुण जमा झाले. स्टँडिंगच्याच दोन सीरिजच्या जोरावर स्वप्निलनं बाजी मारली.
कोल्हापूरचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. धोनीच्या संघर्षमय प्रवासातून स्वप्नीलने प्रेरणा घेतलेली आहे. स्वप्नीलच्या या उत्कृष्ट कामगिरीवर रेल्वे प्रशासनाला देखील आनंद झाला आहे.
स्वप्निल कुसाळे यांनी इतिहास रचलेला आहे. बहात्तर वर्षानंतर एका मराठी मुलाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळालेले आहे मात्र स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजन मध्ये टीसी म्हणून काम करतोय. यामुळेच मध्य रेल्वेसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस स्वप्निल हा पॅरिसहून भारतात येईल त्यावेळेस भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली आहे.
रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीस देखील जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता स्वप्निल हा मध्य रेल्वेचा एक ऑफिसर म्हणून यापुढे काम करेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी जाहीर केले आहे.
पॅरिस ऑलम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे मध्य रेल्वेच्या क्रीडा विभागात स्वप्नीलची अधिकारी पदावरती, मुंबईतील ओएसडी स्पोर्ट सेल म्हणून पदोन्नती करण्यात आलेली आहे. असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी सांगितले.
"स्वप्नीलच्या या कामगिरीमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन" अश्या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.
महाराष्ट्राचे सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलम्पिकमध्ये एअर रायफल नेमबाजी प्रकारात कास्यपदक पटकावल्यामुळे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कोटीचे बक्षीस राज्य सरकारच्यावतीने स्वप्निल कुसाळेला प्रोत्साहन म्हणून जाहीर केले आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
कोल्हापूर जिल्ह्यातील, राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावच्या स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलम्पिकमध्ये केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्याच्या मित्रांनी व गावकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. स्वप्निलच्या मित्रांचा आनंद द्विगुणित झालेला आहे. कोल्हापूर पासून कांबळवाडी गावापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढणार असल्याचे त्याच्या मित्रांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील रांगडया वातावरणात लहानाचा मोठा झालेल्या स्वप्निल कुसाळेने जिद्दीने, चिकाटीने व प्रचंड मेहनतीने पॅरिस ऑलम्पिकमध्ये एअर रायफल 50 मीटर नेमबाजी प्रकारात भारताला कास्यपदक मिळवून देऊन,भारतीयांची मने जिंकली ही भारतातील तरुणपिढीसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे.
महाराष्ट्राचा सुपुत्र, कोल्हापूरचा शिलेदार स्वप्नील कुसाळेच्या जग जिंकणाऱ्या कामगिरीमुळे महाराष्ट्राची व संपूर्ण भारताची मान उंचावली आहे.
No comments:
Post a Comment