भूम,दि.२८ : मराठवाड्याच्या मातीने महाराष्ट्राला वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान हिरे दिलेले आहेत. मराठवाड्यातील शेतकरीराजा गरीबीशी, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून, जिद्दीने, चिकाटीने संकटाशी सामना करून कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील, भूम तालुक्यातील पाठसांगवी गावचे सुपुत्र गोपीनाथ हातमोडे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून, जिद्दीने, चिकाटीने मेहनतीने सीए परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या शेतकरी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावातील एक सर्वसामान्य शेतकरी रामदास हातमोडे यांचे सुपुत्र गोपीनाथ हातमोडे यांनी सीए बनून वडिलांच्या कष्टाचे, मेहनतीचे चीज केले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
आपल्या देशातील कठीण परीक्षा म्हणून सीएच्या परीक्षेकडे पाहिले जाते. सीए सेवा क्षेत्र हे समाजातील खूप प्रतिष्ठित क्षेत्र आहे. आपल्या शेतकरी वडिलांची प्रतिकूल व हलाकीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून, गोपीनाथ हातमोडे यांनी प्रचंड मेहनत करून, जिद्दीने चिकाटीने सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन हे देदीप्यमान यश मिळवले. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा सीए झाल्यामुळे गावकऱ्यांनी गोपीनाथ हातमोडे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार केला.
गोपीनाथ यांचे प्राथमिक शिक्षण पाटसांगवी जिल्हा परिषद शाळेत झाले आहे.
गोपीनाथ यांचे जुनियर कॉलेजचे शिक्षण बार्शी येथील बी.पी. सुलाखे या महाविद्यालयात झाले.बारावीनंतर त्यांचे पुढील शिक्षण पुणे येथील जेधे महाविद्यालयात झाले.
पुणे शहरात बीकॉम या पदवीचे शिक्षण घेत असतानाच पहिल्या वर्षापासूनच गोपीनाथ यांनी सीए परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. सीए परीक्षेच्या संघर्षमय काळात त्यांना त्यांचे नातेवाईक प्रसिद्ध आर्थिक सल्लागार नागेश शिंदे व गोपीनाथ यांचे मित्रपरिवार व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.
गोपीनाथ यांचे कुटुंब उच्चशिक्षित नसल्यामुळे त्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या नवनवीन संधी तसेच सीए बद्दलची माहिती नव्हती, पण त्यांचे नातेवाईक असलेले दाजी नागेश शिंदे यांनी त्यांना सीए करण्याबद्दल मार्गदर्शन केले व ते त्यांनी पुढे सार्थ ठरविले. त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती की माझा मुलगा खूप मोठ्या पदावर असावा, आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याठी गोपीनाथने रात्रीचा दिवस करून, खूप अभ्यास केला आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केले.
बी.कॉम. करत असतानाच गोपीनाथ यांनी सीए परिक्षांची तयारी सुरू केली. सीए करत असताना, त्यांनी आर्टिकलशिप ( प्रशिक्षण) KPCA & Co या नामांकित सीए फर्ममध्ये केली आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या सीए आर्टिकलशीप नंतर पुढील परीक्षा देत असताना सुद्धा ते या नामांकित सीए फर्ममध्ये काम करत होते. पुढील एम.कॉम.चे शिक्षण व सीए फायनलचे शिक्षणही सीएच्या फर्ममध्ये काम करत असतानाच पूर्ण केले. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी हे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला.
"मराठवाड्यातील धाराशिव आणि धाराशिव शेजारील शहरांमधील व्यापार, उद्योग, व्यावसायिक यांना मार्गदर्शन करुन,प्रामाणिक सेवा देऊन आपल्या शहराचे नाव मोठे करायचे आहे."असे गोपीनाथ यांचे स्वप्न आहे हे त्यांचे स्वप्न ते लवकरच पूर्ण करतील असा त्यांना विश्वास आहे.
"मराठवाड्यातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात येऊन पदवीचे शिक्षण घेत असतानाच सीए परीक्षेचा अभ्यास करणे व त्यामध्ये यश मिळवणे हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते परंतु माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद, मार्गदर्शन तसेच माझे दाजी नागेश शिंदे यांचे अनमोल मार्गदर्शन यामुळेच मला यशाचा हा टप्पा गाठता आला. माझ्या शेतकरी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या मराठवाड्याच्या मातीने दिलेली ऊर्जा व बळ यामुळे मला सीए बनून यशाला गवसणी घालता आली." अशी प्रतिक्रिया मराठवाड्यातील सीए गोपीनाथ हातमोडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"मराठवाड्याच्या मातीतील शेतकरी पुत्र गोपीनाथ हातमोडे विद्येची नगरी पुणे शहरात येऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करत असतानाच, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून देशातील कठीण परीक्षा असलेल्या सीए परीक्षेचा अभ्यास करून, जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने सीए बनून वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो आणि सीए बनल्यावर आपल्या मराठवाड्यातील उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील लोकांची सेवा करण्याचा निश्चय करतो. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे."
गोपीनाथ सीए झाल्याबद्दल धाराशिव जिल्ह्यातील त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ग्रामीण भागातील शेतकरी पुत्राने सीए बनून घेतलेली ही यशस्वी भरारी मराठवाड्यातील तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
पाटसांगवी ग्रामपंचायत व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले व कौतुक केले. त्यावेळेस त्यांनी युवकांना शिक्षणाबद्दल प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment