पुरंदर, दि.८ : कोरोना काळात हजारो रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणारे कोरोना योद्धे म्हणजेच आरोग्य क्षेत्रातील औषध विक्रेते शिलेदार. पुरंदर तालुका औषध विक्रेता संघटना व पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटनेच्या (CAPD)वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील व श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील शेकडो वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप करून, आरोग्य क्षेत्रातील औषध विक्रेते शिलेदारांनी वारकऱ्यांची मने जिंकली.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्या निमित्त अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे सर्वेसर्वा ,केमिस्ट हृदय सम्राट ,मा. आमदार जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या प्रेरणेने CAPD अध्यक्ष संदीप पारेख आणि सचिव अनिल बेलकर यांच्या सहकार्याने बुधवार दि. ३ जुलै रोजी शिवतीर्थ चौक सासवड येथे पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शेकडो वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली.
यावेळी औषधे वाटप करण्यासाठी पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य (EC Member) धैर्यशील शिंदे, महिला जिल्हा कार्यकारिणी सदस्य (EC Memebr) शुभांगी जगताप , भूषणजी ताकवले, उपाध्यक्ष नंदूबापू जगताप, सचिव संतोष जगदाळे , दीपक काळे, सासवड शहर सचिव विराज सस्ते, अजित शेंडकर, श्रीकांत आंग्रे , सुमित जगताप तसेच पुरंदर तालुक्यातील सर्व सभासद,सासवड शहरातील सर्व सन्माननीय सभासद, सर्व झोनल अधिकारी व सर्व आजी - माजी पदाधिकारी उपस्थित होते .
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पुरंदर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील परिंचे येथे श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनच्यावतीने करण्यात आले.
यावेळी मा. आमदार जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या प्रेरणेने CAPD अध्यक्ष संदीप पारेख आणि सचिव अनिलजी बेलकर यांच्या सहकार्याने गुरुवार दि. ४ जुलै रोजी परिंचे येथे पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शेकडो वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. या सामाजिक उपक्रमासाठी जिल्हा कार्यकारिणी सदस्य धैर्यशील शिंदे, शुभांगी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वीर परिंचे झोनल अधिकारी सुवर्णा रणनवरे, सुवर्णा गाडेकर, रुपेश धुमाळ, अविनाश नवले, अपर्णा अविनाश नवले, गोकुळ गाढवे, प्रसाद जाधव, दिग्विजय धुमाळ, माधुरी शिंदे, सोनाली चव्हाण, गौरव यादव, सर्व परिंचे वीर झोन मधील कार्यक्षम सभासद ,सर्व झोनल अधिकारी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य क्षेत्रातील औषध विक्रेत्या शिलेदारांच्या या सामाजिक उपक्रमाचे पुरंदर तालुक्यातील वारकरी संप्रदायाने कौतुक केले.
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जेजुरी येथे पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शेकडो वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोफत औषधे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासन व स्वयंसेवक यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पुरंदर तालुक्याचे EC Member धैर्यशील शिंदे, पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुकुमार नाझीरकर, जेजुरी शहर अध्यक्ष नितीन नाझीरकर, जेजुरीचे झोनल अधिकारी विक्रम खामकर, विलास बलकवडे, शरद कापरे तसेच
गणेश कामठे,अवधूत रणनवरे, ओंकार कदम, ऋषिकेश रणनवरे ,मदन खोमणे, अशोक शिर्के उपस्थित होते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीचा पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम वाल्हे येथे असतो. पहिल्यांदाच पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने वाल्हे येथे मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना औषधे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नीरा शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या वतीने अध्यक्ष रामदास कदम, उपाध्यक्ष योगेश जठार, माजी अध्यक्ष नरेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अवधूत रणनवरे आणि सुमित शहा तसेच ग्रामीण भागातील सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वारीतील वारकऱ्यांना औषधे वाटप केली.
"पुरंदर तालुक्यात पहिल्यांदाच संपूर्ण तालुक्यात सासवड, जेजुरी, परिंचे, वाल्हे येथे औषधांचे आणि मास्कचे मोफत वाटप करण्यात आले."
पुणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पारेख यांनी स्वतःच्या वतीने फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, समन्वयक, पोलीस प्रशासन यांना मोफत मास्कवाटप करण्यात आले. संदीप पारेख यांचे पुरंदर तालुक्याच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
"औषध विक्रेत्यांचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान मा. आमदार जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या प्रेरणेने व पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप करून, त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली याचे फार मोठे समाधान आहे. वारकऱ्यांच्या सेवेतून मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा जगण्याला बळ देते." अशी प्रतिक्रिया केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे कार्यकारिणी सदस्य धैर्यशील शिंदे यांनी दिली.
कोरोना काळात हजारो रुग्णांना प्रामाणिक सेवा देणाऱ्या व शेकडो रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या या औषध विक्रेत्या शिलेदारांच्या वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या या सामाजिक उपक्रमाने पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील नागरिकांचीही मने जिंकली.
No comments:
Post a Comment