बार्बाडोस,दि.२ : करोडो भारतीयांना आनंद देणारा व जगभरातील करोडो क्रिकेट प्रेमींना आनंद देणारा महोत्सव म्हणजे क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा. शनिवारी झालेल्या आयसीसी 20-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, अटितटीच्या, रोमांचक लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. तेरा वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकून करोडो भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले.
भारताने दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून करोडो भारतीयांची मने जिंकली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा करता आल्या.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
एकवेळ दक्षिण आफ्रिकेने १५ षटकांत ४ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या. येथून त्यांचा विजय निश्चित वाटत होता, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.
विराट कोहलीच्या ७६ धावा आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने २० षटकात ७ विकेट गमावत १७६ धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात पकडलेल्या डेव्हिड मिलरच्या झेलच्या जोरावर भारताने टी 20 कप जिंकला. मिलर हा भारताच्या विजयातील मोठा अडसर होता. पण हार्दिकच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि भारताच्या बाजूने सामना झुकला.
भारताने यावेळी १३ वर्षांच्या दुष्काळ संपवला. कारण भारताने यापूर्वी वर्ल्ड कप २०११ साली जिंकला होता. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १७६ धावांपर्यंत मजल मारली होती.
भारताने गोलंदाजीची दमदार सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेची २ बाद १२ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पण अखेरच्या षटकात जेव्हा मिलर बाद झाला त्यानंतर भारताने ७ धावांनी हा सामना जिंकला.
बुमराहची कामगिरी या सामन्यात खूप महत्त्वाची ठरली.बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिले. बुमराहने यावेळी सलामीवीरी रीझा हेनड्रीक्सला चार धावांवर बाद केले. त्यानंतर अर्शदीप सिंग यावेळी भारताच्या मदतीला धावून आला आणि त्याने भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. कारण अर्शदीपने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमला चार धावांवर बाद केले.
त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेची २ बाद १२ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारताला दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलता आले असते, पण तसे घडले नाही.दक्षिण आफ्रिकेच्या संघाला यावेळी सावरले ते क्विंटन डीकॉकने.
कारण डीकॉकने यावेळी स्ट्रीस्टन स्टब्सच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली.
पण त्या वेळी अक्षर पटेलने ही जोडी फोडली. अक्षरने स्टब्सला बाद केले, त्याला २१ चेंडूंत ३१ धावा करता आल्या.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
त्यानंतर डीकॉक यावेळी भारताच्या विजयाच्या मार्गात अडसर बनत होता. पण पुन्हा एकदा अर्शदीप भारताच्या मदतीला आला. कारण अर्शदीपने डीकॉकला आपल्या जाळ्यात फसवले. डीकॉकने यावेळी ३१ चेंडूंत ३९ धावांची खेळी साकारली.
विराट कोहलीची दमदार फलंदाजी या अंतिम सामन्यात खूप महत्त्वपूर्ण ठरली. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा करता आल्या. कोहलीने यावेळी ५९ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची खेळी साकारली. भारताच्या या धावसंख्येमध्ये मोलाचा वाटा होता तो अक्षर पटेलचा. अक्षरने १ चौकार आणि चार षटाकारांच्या जोरावर ३१ चेंडूंत ४७ धावांची खेळी साकारली.
या विश्वचषक स्पर्धेत दोन अपराजित संघामध्ये झालेल्या अंतिम लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चित्तथरारक विजय मिळवत जगभरातली क्रिकेट प्रेमींना सुखद धक्का दिला.
"मुंबईमधील बोरिवलीमध्ये क्रिकेटचे धडे घेणाऱ्या रोहित शर्माने फक्त बोरिवलीचेच नाही तर मुंबई, महाराष्ट्र व भारताचे नाव जगभरात उंचावले आहे. बोरिवलीचा मुलगा रोहित शर्माच्या हातात विश्वचषक पाहिल्यानंतर त्याला घडविणारे गुरु दिनेश लाड यांचा आनंद गगनात मावेना. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मिळालेले विश्वविजेतेपद संपूर्ण भारतातील खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना प्रेरणा देणारे आहे."
"रोहितच्या कामगिरीने बोरिवलीचे नाव जगात गाजले याचा आम्हाला अभिमान आहे. रोहितला लहानाचा मोठा होताना मी पाहिलेय, त्याची क्रिकेटसाठीची मेहनत पाहिलीय. त्याच्या हाती विश्वचषक पाहणे यासारखा आनंद नाही. क्रिकेटमधील त्याचे नेतृत्व गुण तो शाळेत असतानाच आम्हाला दिसत होते. त्याचा विजय विशेष आनंद देणारा असून, हीच मला सर्वात मोठी गुरुदक्षिणा मिळाली." असे भारताचे कर्णधार रोहित शर्मा याला घडवणारे त्याचे शालेय प्रशिक्षक व द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त क्रीडा प्रशिक्षक दिनेश लाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, आतिफ अत्तरवाला यासारखे अनेक खेळाडू क्रिकेट विश्वातल्या त्यांच्या उमेदीच्या काळात दिनेश लाड यांच्या घरी राहिलेले आहेत. यावेळी दिनेश लाड यांच्या पत्नी दिपाली लाड यांनी या सर्व खेळाडूंची खडतर काळात काळजी घेतलेली आहे. दिपाली लाड या खेळाडूंसाठी त्या काळात "अन्नपूर्णा" ठरल्या असे दिनेश लाड सांगतात.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
भारतीय क्रिकेट संघाच्या उत्कृष्ट कामगिरीवरती संपूर्ण भारत तसेच जगभरातील क्रिकेट रसिक खुष झालेले आहेत. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने विश्वविजेत्या भारतीय संघाला 125 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलेले आहे. शनिवारी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केलेले आहे ही घटना क्रीडाप्रेमींना मनाला चटका लावणारी आहे.
भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ सोमवारी सकाळपर्यंत मायदेशी परतणे अपेक्षित होते परंतु बार्बाडोसमधील "बेरील" नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने भारतीय संघ तिथेच अडकलेला आहे.
कॅरिबियन बेटाच्या दक्षिण - पूर्व किनाऱ्यावर हे बेरिल नावाच्या चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे, खराब वातावरण आणि सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हवाई वाहतूक बंद करण्यात आलेली होती.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
बार्बाडोसमध्ये भारतीय संघासोबतच अनेक पत्रकारही अडकलेले आहेत. विश्वविजेता भारतीय संघ लवकरच बार्बाडोस येथून प्रस्थान करून नवी दिल्लीमध्ये दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी भारतीय संघ नवी दिल्ली येथे पोहोचेल असे सांगण्यात येत आहे.
करोडो भारतीयांची मने जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने भविष्यातील विश्वचषक स्पर्धांमधील विश्वविजेतेपद जिंकून आपले विश्वविजेतेपद कायम ठेवावे. अशा भावना भारतीय क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment