Monday, July 15, 2024

"दोन भावांच्या जिद्दीची, चिकाटीची, एकजुटीची; करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या; हैदराबाद, दिल्ली व इटलीच्या नामांकित कंपनीला उत्तम सेवा देणाऱ्या कंपनीच्या उद्योजकांची यशोगाथा ते गुजराती उद्योजकाची कंपनी विकत घेणारे बारामतीचे मराठी उद्योजक शरद पांडुरंग पवार ते "सेव्हन स्टार" मैत्रीतून माणुसकीची गर्दी फुलवणारे प्रेरणादायी शिलेदार शरद पांडुरंग पवार"....


"दोन भावांच्या जिद्दीची, चिकाटीची, एकजुटीची; करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या; हैदराबाद, दिल्ली व इटलीच्या नामांकित कंपनीला  उत्तम सेवा देणाऱ्या कंपनीच्या उद्योजकांची यशोगाथा ते गुजराती उद्योजकाची कंपनी विकत घेणारे बारामतीचे मराठी उद्योजक शरद पांडुरंग पवार ते "सेव्हन स्टार" मैत्रीतून माणुसकीची गर्दी फुलवणारे प्रेरणादायी शिलेदार शरद पांडुरंग पवार"....


महाराष्ट्रात सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन, वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी तरुण पिढी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गुजराती उद्योजकाची कंपनी विकत घेणारे उद्योजक शरद पांडुरंग पवार यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात बारामती येथे झाला. बारामतीचे प्रसिद्ध उद्योजक शरद पांडुरंग पवार यांचे वडील पांडुरंग पवार शिक्षक म्हणून पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत होते. 


उद्योजक शरद पवार यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंगपुर येथे मराठी माध्यमात झाले. पांडुरंग पवार हे शिक्षक असल्यामुळे पवार कुटुंबामध्ये कडक शिस्त आणि उत्तम संस्कार सर्व मुलांवरती झाले. उद्योजक शरद पवार यांचे बंधू रुपेश पवार हे देखील प्रसिद्ध उद्योजक आहेत तसेच त्यांची बहीण सुनीता गायकवाड या कलाशिक्षिका आहेत. पांडुरंग पवार यांची बदली पुन्हा बारामतीला झाल्यानंतर शरद पांडुरंग पवार यांचे पाचवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाहू हायस्कूल येथे झाले. 


उद्योजक शरद पवार बालपणापासूनच शालेय जीवनामध्ये अभ्यासात हुशार होते त्याबरोबरच मित्रांसोबत वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये व वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी व्हायला त्यांना आवडायचे. शरद पवार यांचे आजोबा त्या काळी तलाठी होते. तसेच त्यांचे चुलते सरकारी विभागात चांगल्या पदावरती कार्यरत होते.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

उद्योजक शरद पवार यांचे पुण्यातील चुलते गोविंद पवार यांनी  नववी, दहावीच्या शिक्षणासाठी शरद पवार यांना पुण्यातील चंदननगर येथे बोलावले. गोविंद पवार त्याकाळी गणितामध्ये टॉपर होते तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात टाऊन प्लॅनिंग विभागात चांगल्या पदावर कार्यरत असल्यामुळे  त्यांच्या मार्गदर्शनाखाली जडणघडण व्हावी या उद्देशाने शरद पांडुरंग पवार यांचा पुण्यातील शैक्षणिक प्रवास चालू झाला. 


वाघोली येथील प्रसिद्ध सातव हायस्कूलमध्ये उद्योजक शरद पवार यांनी नववी व दहावीचे शिक्षण घेतले. या काळात चंदननगर येथून बसने त्यांचे सहा मित्र वाघोली येथील सातव हायस्कूलला एकत्र जात होते यामुळे या सात मित्रांची मैत्री खूप घट्ट झाली. आजही हे सातही मित्र "सेवन स्टार" या नावाने प्रसिद्ध आहेत व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. उद्योजक शरद पवार यांना व्यवसायाचे बाळकडू पुण्याच्या भूमीतच मिळाल्याचे ते सांगतात.


उद्योजक शरद पवार दहावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी पुन्हा बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या टेक्निकल हायस्कूल येथे घेतले. त्यानंतर पुढील बीकॉम पदवीचे शिक्षण बारामतीतील प्रसिद्ध टी.सी. कॉलेज येथे घेतले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

उद्योजक शरद पवार यांचे वडील पांडुरंग पवार शिक्षक असल्यामुळे त्यांना त्याकाळी असे वाटत होते की शरद पवार यांनीही डीएड करून शिक्षक व्हावे  यासाठी त्या काळात उद्योजक शरद पवार यांना पुणे येथील अध्यापक विद्यालय तसेच बारामती येथील अध्यापक विद्यालयात डीएडसाठी प्रवेश मिळत होता. परंतु उद्योजक शरद पवार यांना शिक्षकापेक्षा व्यावसायिक क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी टी.सी. कॉलेज येथे बीकॉम ही पदवी पूर्ण केली.


उद्योजक शरद पवार यांचे भाऊ रुपेश पवार बारावीनंतर कृषी क्षेत्रातील पदवीसाठी फलटण येथे शिक्षण घेत होते परंतु रुपेश पवार यांना व्यावसायिकतेची आवड असल्यामुळे तसेच यांच्या मित्रांनी त्याकाळी ती पदवी मधूनच सोडली तसेच रुपेश पवार यांनाही कृषी क्षेत्रातल्या पदवीपेक्षा व्यवसायात आवड असल्यामुळे त्यांनी फलटण येथील कृषी क्षेत्रातील पदवीचे शिक्षण सोडून पुन्हा ते बारामती येथे आले. रुपेश पवार यांनाही पारंपारिक शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याची आवड असल्यामुळेच त्यादृष्टीने त्यांनी पावले टाकायला त्याकाळी सुरुवात केली. 

उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनाही व्यवसायात आवड असल्यामुळे त्यांनीही त्याकाळी भावाला साथ द्यायचं ठरवले आणि 26 जानेवारी 1993 ला "शरद इलेक्ट्रोप्लेटिंग अँड पेंटिंग" ही छोटीशी कंपनी(फर्म) शरद पांडुरंग पवार व रुपेश पांडुरंग पवार यांनी बारामती येथे चालू केली. या फर्मच्या माध्यमातून जुन्या गाड्यांना कलरिंग करून क्रोमियम प्लेटिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग, करून या आकर्षक गाड्यांची विक्री करणे हा उद्देश होता.


90 च्या दशकामध्ये एका सर्वसामान्य शिक्षकाच्या कुटुंबातील दोन भावंडांनी कुठल्याही व्यवसायाचा अनुभव नसताना एक नवीन व्यवसाय बारामती येथे चालू करणे हे त्याकाळी खरंच खूप आव्हानात्मक होते. वडील शिक्षक असल्यामुळे त्यांचा व्यवसायाला विरोध होता तरी देखील शरद पांडुरंग पवार व रुपेश पांडुरंग पवार यांनी घरच्यांना समजून सांगून त्या काळात अनेक अडचणींना तोंड देत दुचाकी कलरिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग या क्षेत्रातील व्यवसायाला सुरुवात केली. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी या नवीन व्यवसायासाठी बारामती सहकारी बँकेचे दोन लाख रुपयाचे कर्ज घेतले. "शरद इलेक्ट्रोप्लेटिंग अँड पेंटिंग या फर्मच्या माध्यमातून आम्ही चार जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, नगर, सोलापूर मध्ये शेकडो ग्राहकांना त्याकाळी यामाहा, बुलेट, सुझुकी, कावसाकी या दुचाकी गाड्यांचे कलरिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग करून त्या गाडया आकर्षक बनवून आम्ही त्या गाड्यांची विक्री केली. स्प्रेपेंटिंग,भट्टी पेंटिंग या क्षेत्रात आमच्या दोन्ही भावांचा खूप हातखंडा होता." असे उद्योजक शरद पवार सांगतात.


त्या काळात जुन्या गाड्या विकत घेऊन यामाहा, बुलेट, जावा, सुझुकी कावासकी यांना कलरिंग व क्रोमियमप्लेटिंग करून आकर्षक बनविणे व या आकर्षक दुचाकींची विक्री करणे यासाठी उद्योजक शरद पवार यांनी जिद्दीने चिकाटीने प्रचंड मेहनत केली तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे भाऊ रुपेश पवार हे देखील मेहनत करून या व्यवसायात चांगली प्रगती केली. 


त्या काळात बारामती तालुक्यातील दुचाकी सेवेतील अत्यंत हुशार व कार्यक्षम फिटर यांची निवड उद्योजक शरद पवार यांनी केल्यामुळे  या व्यवसायात एक चांगली उंची गाठता आली. त्या काळात तरुणांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या यामाहा व बुलेट या गाड्या आकर्षक बनवून चार जिल्ह्यांमधील शेकडो ग्राहकांना दर्जेदार सेवा देऊन त्यांनी विक्री केल्या.


दुचाकी भट्टी पेंटिंग ही खूप अवघड आणि कठीण प्रक्रिया आहे. 180 डिग्री सेल्सिअस तापमानांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्या पेंटिंग रूममध्ये हवा पण येत नाही. पेंटिंगच्या या प्रक्रियेदरम्यान तोंडात कलर ही जातो. अशा वेळेस जीव धोक्यात घालून उद्योजक शरद पांडुरंग पवार व त्यांचे बंधू रुपेश पवार यांनी या पेंटिंगच्या प्रक्रियेमध्ये स्वतः काम करून, प्रचंड मेहनत केलेली आहे. त्यावेळेस त्यांना झोपायला ही पुरेसा वेळ मिळत नसे. त्याकाळी कामाचा एवढा व्याप वाढलेला होता की कंपनीचे दहा कामगार असताना देखील भट्टी पेंटिंगच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उद्योजक शरद पवार व त्यांचे बंधू रुपेश पवार यांनी या क्षेत्रात झोकुन देऊन काम केल्यामुळेच त्यांना पुढील काळामध्ये चांगले यश मिळाले.


शरद इलेक्ट्रोप्लेटिंग अँड पेंटिंग या फर्मच्या माध्यमातून ग्राहकांना प्रामाणिक व उत्तम सेवा दिल्यामुळे 90 च्या दशकामध्ये उद्योजक शरद पांडुरंग पवार यांचे नाव महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये पोहोचले. दिवाळीमध्ये ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी शरद पवार यांनी 22 तास,  23 तास काम केलेले आहे. कुठल्याही व्यवसायात, उद्योगात स्वतःला झोकून देऊन कष्ट, मेहनत करावी लागते त्यानंतरच एक चांगला उद्योजक घडतो. हे उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी त्यांच्या त्या काळातील जिद्दीने, चिकाटीने आणि मेहनतीने ग्राहकांना दिलेल्या उत्तम सेवेतून तसेच त्यांच्या प्रामाणिक कामातून दिसून येते.


कुठलाही व्यवसाय, उद्योग करायचा म्हटलं तर अडचणी, संकटे येतच असतात. काही कालावधीनंतर दुचाकी पेंटिंग व इलेक्ट्रोप्लेटिंग या क्षेत्रात मंदी आल्यामुळे तसेच या क्षेत्रातील कामे कमी झाल्यामुळे उद्योजक शरद पवार यांना त्यावेळी प्रचंड अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागला. या व्यवसायासाठी बारामती सहकारी बँकेचे घेतलेले  कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले नव्हते. त्यावेळेस त्यांनी कर्ज फेडण्यासाठी वेगवेगळ्या चांगल्या मार्गाने प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. 

प्रत्येक व्यावसायिक, उद्योजकाला अशा कठीण परिस्थितीतून जावेच लागते. अखेर उद्योजक शरद पवार यांनी त्या अत्यंत खडतर काळात, नाईलाजाने  शरद  इलेक्ट्रिकप्लेटिंग अँड पेंटिंगचा प्लांट विकून बारामती सहकारी बँकेचे कर्ज फेडले. त्या रात्री दोघेही भाऊ खूप रडले. त्यांना खूप दुःख झाले. पण याच दुःखातून, संकटातून सावरून पुन्हा एकदा त्यांनी आपल्या दुचाकी पेंटिंग क्षेत्रातील कामाला सुरुवात केली.


चार जिल्ह्यांमधील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्य तसेच उद्योजक शरद पवार यांची जिद्द, चिकाटी, मेहनत यामुळे उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी अल्पावधीतच 1997 ला मुंबईमधील  मालाड येथील इलेक्ट्रोप्लेटिंगचा दुसरा प्लांट विकत घेतला. यानंतर उद्योजक शरद पवार यांनी दुचाकी पेंटिंग व क्रोमियमप्लेटिंग या क्षेत्रात कामाचा धडाका मोठ्या प्रमाणावर चालू ठेवला. उद्योजक शरद पवार यांनी त्याकाळी बारामती एमआयडीसी मधील सहा गुंठ्यांचा प्लॉट कंपनीसाठी विकत घेतला. कुठल्याही छोट्या, मोठ्या व्यवसायात अडचणी, संकटे येत असतात. परंतु त्यावेळेस निराश न होता, खचून न जाता, त्यावर जिद्दीन, चिकाटीने कशी मात करता येते व तिथून पुढे व्यवसायात कशी मोठी झेप घेता येते हे उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी त्यांच्या कर्तुत्वातून दाखवून दिलेले आहे.


दुचाकी पेंटिंग क्षेत्रातील कामगारांमध्ये व्यसनाचे प्रमाण खूप असते परंतु कंपनीचे मालक असून देखील स्वतः प्लांटवरती कामगाराप्रमाणे काम करून तसेच कंपनीचे व्यवस्थापन उत्कृष्टपणे सांभाळून उद्योजक शरद पवार व त्यांचे बंधू रुपेश पवार यांनी त्या काळात निर्व्यसनी राहून, ग्राहकांना उत्तम व गुणवत्तापूर्ण सेवा दिल्या. आजच्या काळातल्या तरुण पिढीला व्यवसाय, उद्योगात काम करत असताना त्या क्षेत्रात जमिनीवरती राहून कठीण, अवघड काम करायचं म्हटलं की काही तरुणांना लाज वाटते, आवडत नाही गैरसोयीचे वाटतं. परंतु उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी कुठल्याही कामाची लाज न बाळगता, जिद्दीने चिकाटीने, मेहनतीने ग्राहकांना उत्तम व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापन त्यांना उत्तमरित्या करता आले.


उद्योजक शरद पवार यांनी 2000 ला बारामती येथे पाच एकर शेतीचे क्षेत्र विकत घेतले. दुचाकी कलरिंग व इलेक्ट्रोप्लेटिंग या क्षेत्रात यशस्वी वाटचाल चालू असतानाच त्याकाळी पावडर कोटिंग या नवीन क्षेत्राने उद्योजक शरद पवार यांना  खुणावले त्यामुळेच 2003 ला मुंबईतील रेड लाईन कंपनीचा पावडर कोटींग प्लांट त्यांनी विकत घेतला व श्रीनाथ पावडर कोटिंग या नावाने नवीन कंपनी(फर्म) चालू केली.


"आमच्या कंपन्यांच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये माझे बंधू उद्योजक रुपेश पवार यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे तसेच आमच्या कंपन्यांमधील कामगारांचाही मोलाचा वाटा आहे. सलग आठ वर्ष आमच्या कंपनीचे तीन शिफ्ट मध्ये काम चालू होते. पेंटिंगच्या कामाने आम्हाला शेठ बनवले तर आमच्या कंपनीच्या कामाने आम्हाला उद्योजक बनवले." असे उद्योजक शरद पांडुरंग पवार सांगतात.


उद्योजक शरद पांडुरंग पवार व त्यांचे बंधू रुपेश पवार यांनी श्रीनाथ पावडर कोटिंग या कंपनीच्या माध्यमातून 2003 ला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात कामगारांना जास्त कामे नसल्यामुळे पहिले काही महिने कंपनीचे विशेष उत्पन्न नसताना देखील त्यांना पगार द्यावा लागला. काही महिन्यांनी पावडर कोटिंग क्षेत्रातील छोटी - छोटी कामे मिळायला सुरुवात झाली.


उद्योजक शरद पवार यांना एका वर्षानंतर त्यांच्या श्रीनाथ पावडरकोटिंग या कंपनीसाठी इटलीच्या पियाजो या कंपनीचे खूप मोठे काम मिळाले. पियाजु या कंपनीचे मोठे काम मिळण्यासाठी उद्योजक शरद पांडुरंग पवार व त्यांचे बंधू रुपेश पवार यांनी त्याकाळी खूप कष्ट व मेहनत घेतली. हे काम मिळण्यासाठी दोघेही भाऊ त्याकाळी दुचाकीवरून बारामती वरून सातारला जायचे. स्पार्क इंजिनिअर या कंपनीच्या व्यवस्थापकांना, मालकाला भेटायचे. पावसाळ्याचे दिवस असायचे काही वेळा त्या कंपनीचे मालक, व्यवस्थापक भेटायचे. 


काही वेळा भेटत नसायचे. पुन्हा ते माघारी येत परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही.  या दोन्ही भावंडांचे कष्ट, मेहनत, जिद्द व त्यांच्या व्यवसायातील त्यांची उत्तम सेवा यामुळे श्रीनाथ पावडरकोटिंग या कंपनीला पियाजो या जगातल्या मोठ्या कंपनीचे, ब्रँडचे काम मिळाले. काही कालावधीनंतर उद्योजक शरद पवार यांच्या कंपनीला पियाजो या कंपनीचे थेट मोठे काम मिळाले. तसेच पियाजो रिक्षाच्या विविध छोट्या भागांच्या उत्पादनाचेही काम मिळाले.

यानंतर उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी या व्यवसायात कधीच मागे वळून पाहिले नाही. आणि पुढील नऊ वर्ष पावडर कोटिंग या क्षेत्रात श्रीनाथ पावडरकोटिंग या कंपनीने खूप मोठी झेप घेतली. सुयश ऑटो, प्रशांत ऑटोचे मोठे काम, विविध गाड्यांचे पावडरकोटिंगचे काम तसेच हॉस्पिटलचे बेड, कपाट, सेफ्टी डोअर, सर्जिकल साधने यांचे पावडर कोटिंगचे काम तसेच पियाजो रिक्षाचे हुड, सॉफ्टटॉप फ्रेम, मीटर ब्रॅकेट तसेच या रिक्षाचे छोटे छोटे भाग यांना पावडर कोटिंग करून देण्यासाठी त्याकाळी श्रीनाथ पावडरकोटिंग या कंपनीने खूप चांगले काम केले. त्याकाळी श्रीनाथ पावडरकोटिंग या कंपनीचा तीन ते चार कोटींची वार्षिक उलाढाल होती. सलग दहा वर्ष आमच्या कंपनीतील कामगारांची मेहनत तसेच आम्हा दोघा भावंडांचे कष्ट, मेहनत व प्रामाणिकपणा याचे हे फळ होते. असे उद्योजक शरद पवार सांगतात.


"देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, कुठल्याही राज्यात आम्ही फिरत असताना आमच्याकडचे पैसे संपले तर आम्ही कुठल्याही पेंटिंग क्षेत्रातल्या प्लांटवरती जाऊन कुठलीही दुचाकी उत्तम प्रकारे पेंटिंग करून आणि क्रोमियमप्लेटिंग करून ती दुचाकी आकर्षक बनवून देऊ शकतो व त्या कष्टाचे, मेहनतीचे पैसे घेऊन आम्ही पुन्हा स्वगृही बारामतीला येऊ शकतो. आम्ही आज कंपनीचे मालक झालो असलो तरी आम्हाला कुठलेही चांगले काम करायला लाज वाटत नाही. दुचाकी पेंटिंग करून आकर्षक बनवणे ही आमची आवड आहे." असे उद्योजक शरद पवार सांगतात.


आपल्या आवडीच्या क्षेत्रात कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा देऊन करोडो रुपयांची वार्षिक  उलाढाल करणाऱ्या उद्योजक शरद पांडुरंग पवार व उद्योजक रुपेश पवार यांचे पाय आजही जमिनीवरती आहेत. दोन भावंडांच्या कष्टाने, मेहनतीने, जिद्दीने एक चांगली कंपनी कशी उभी राहते  हे उदाहरण तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.


"उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी 2006 ला  गुजराती उद्योजकाची Adhesive ॲडेसिव्ह (चिकट पदार्थ उत्पादन) क्षेत्रातील नामांकित कंपनी "ओमश्री पॉलीऍक्रेलिक अँड ॲडेसिव्ह" विकत घेतली. भारतात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायांमध्ये, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुजराती उद्योजकांचे खूप मोठे प्राबल्य आहे. परंतु त्या काळात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेणारे मराठी उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी गुजराती उद्योजकाची कंपनी विकत घेऊन ती यशस्वीपणे चालवणे ही खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे."


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी 2006 ला गुजराती उद्योजक हरीश मणियार यांची "ओमश्री पॉलीऍक्रेलिक अँड ॲडेसिव्ह" ही कंपनी 15 लाखांमध्ये विकत घेऊन  "ॲशूअर पॉलीॲक्रेलिक अँड ॲडेसिव्ह" या कंपनीची स्थापना केली. या कंपनीची स्थापना करत असताना उद्योजक शरद पवार यांचे मित्र संग्राम तांबे व अभिजीत बोरावके यांनी भागीदार म्हणून मदत केली. उद्योजक शरद पांडुरंग पवार यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील खूप चांगला मित्रपरिवार लाभलेला आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

उद्योजक शरद पांडुरंग पवार बांधकाम उद्योग क्षेत्रात तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील विविध प्रकल्पावर त्याकाळी प्रामाणिकपणे काम करत होते.

गुजराती उद्योजक हरीश मणियार कामानिमित्त पुण्याला गेले होते त्यावेळेस एक दुर्दैवी घटना घडली होती. पुण्यात उद्योजक हरीश मणियार रिक्षातून जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्या रिक्षाच्या ड्रायव्हरने उद्योजक हरीश मणियार यांच्या मोबाईल मधील शेवटी डायल केलेला नंबर पाहिला तर तो उद्योजक शरद पांडुरंग पवार यांचा होता. त्यामुळे त्यांना  रिक्षा ड्रायव्हरने फोन करून या घटनेविषयी माहिती दिली. उद्योजक शरद पवार यांनी त्या रिक्षा ड्रायव्हरला उद्योजक हरीश मणियार यांना पुण्यातील डेक्कन येथील पुना हॉस्पिटलला ऍडमिट करायला सांगितले आणि आम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचून हॉस्पिटलचे बिल भरतो तुम्ही काळजी करू नका. असे सांगितले. 


यानंतर उद्योजक शरद पवार तातडीने पुण्याला पोहोचले व तिथे आयसीयू मध्ये असलेल्या हरीश मणियार यांची भेट घेऊन त्यांना आधार दिला व तेथील हॉस्पिटलचे बिलही त्यांनी भरले. यानंतर उद्योजक हरीश मणियार यांची पत्नी व मुलाला उद्योजक शरद पवार यांनी संपर्क करून तिथे पुना हॉस्पिटलला बोलावले. संकटात असणाऱ्या गुजराती उद्योजक हरीश मणियार यांचा जीव वाचवण्यासाठी उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी मोलाची कामगिरी बजावली. व्यवसाय व उद्योग करत असताना फक्त व्यावसायिक प्रगतीकडे लक्ष न देता माणुसकीही जपली पाहिजे. माणसे जोडली पाहिजेत. ही शिकवण या प्रसंगातून सर्व तरुण उद्योजकांनी घेतली पाहिजे.


गुजराती उद्योजक हरीश मणियार यांना त्यांची ॲडेसिव्ह क्षेत्रातील "ओमश्री पॉलीऍक्रेलिक अँड अडहेंसिव्ह" कंपनी विकायची होती त्यावेळेस अनेक गुजराती उद्योजक ती नामांकित कंपनी विकत घेण्यासाठी तयार होते. बारामतीतील प्रसिद्ध उद्योजक मोता हे देखील ही कंपनी घ्यायला तयार होते परंतु उद्योजक हरीश मणियार यांनी त्यांची कंपनी विकण्याचा प्रस्ताव तरुण उद्योजक शरद पांडुरंग पवार यांच्या पुढे ठेवला. त्यावेळेस उद्योजक शरद पवार यांच्याकडे ती कंपनी विकत घेण्याएवढी मोठी रक्कम नसताना देखील त्यांनी ते धाडस केले व त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले व त्या काळातील Adhesive  अडेसिव्ह क्षेत्रातील गुजराती उद्योजकाची नामांकित कंपनी "ओमश्री पॉलीऍक्रेलिक अँड ॲडेसिव्ह"उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी विकत घेतली.


उद्योजक शरद पवार यांनी 2006 ला सुरू केलेल्या "ॲशूअर पॉलीॲक्रेलिक अँड ॲडेसिव्ह" या कंपनीच्या माध्यमातून ॲडेसिव्ह Adhesive क्षेत्रात बॉब टेप बनवणाऱ्या कंपन्यांना, मारुती इंडस्ट्री पुणे, शरद इंडस्ट्री कोल्हापूर, स्टिकवेल बारामती तसेच अनेक नामांकित कंपन्यांना उत्तम सेवा देऊन तीन - चार वर्ष महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात  खूप चांगली कामे केली.

या कंपनीची प्रगतशील वाटचाल चालू असतानाच एक दुर्दैवी व हादरवणारी घटना घडली. या कंपनीतील एका कामगाराच्या मोठ्या चुकीमुळे (चिकट पदार्थाच्या निर्मितीतील) ॲडसिव्ह प्रक्रियेतील, केमिकल रिएक्शनची प्रक्रिया असणारी बॅच उडाल्यामुळे या कंपनीची संपूर्ण साधनसामुग्री खराब झाली व यामुळे या कंपनीचे खूप मोठे नुकसान झाले. यानंतर या कंपनीचे संस्थापक उद्योजक शरद पवार व त्यांचे भागीदार मित्र यांनी ही कंपनी विकण्याचे ठरवले. उद्योजक शरद पवार यांच्या मित्रांनाही साधनसामुग्रीचे नुकसान झालेली कंपनी पुढे चालू ठेवण्यात रस राहिलेला नव्हता. ही कंपनी विकत घेण्यासाठी त्याकाळी अनेक उद्योजक तयार होते. असे उद्योजक शरद पवार सांगतात.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी त्यांच्या "ॲशूअर पॉलीॲक्रेलिक अँड ॲडेसिव्ह" या कंपनीतील भागीदार संग्राम तांबे व अभिजीत बोरावके यांना त्याकाळी 17 - 17 लाख रुपये देऊन त्यांना या कंपनीतील भागीदारीतून मुक्त करून, कंपनीवरील सर्व कर्ज फेडून, शंभर टक्के मालकी स्वतःच्या नावावरती करून घेतली. असे उद्योजक शरद पवार सांगतात. उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी ही कंपनी दुसऱ्या उद्योजकाला विकण्यापेक्षा आपल्या भागीदार मित्रांना एक चांगला व्यावसायिक प्रस्ताव देऊन, शंभर टक्के मालकी स्वतःच्या नावावरती करण्यास ते यशस्वी ठरले. उद्योग करत असताना विविध अडचणींना सामोरे जात असताना त्या त्या परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घ्यावे लागतात. असे उद्योजक शरद पवार सांगतात.

उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी त्यांच्या बारामती एमआयडीसी येथील "ॲशूअर पॉलीॲक्रेलिक अँड ॲडेसिव्ह" या कंपनीच्या साधनसामुग्रीमध्ये बदल करून तसेच तेथील बांधकामांमध्ये काही बदल करून त्या ठिकाणीच "श्रीनाथ इंजिनिअरिंग" या नावाने इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक नवीन कंपनी(फर्म) त्याकाळी सुरू केली. पुण्यातील देवकर इंडस्ट्री यांचा बंद पडलेला इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक मोठा प्लांट उद्योजक शरद पांडुरंग पवार व त्यांचे बंधू रुपेश पवार यांच्या श्रीनाथ इंजिनिअरिंग कंपनीने त्याकाळी 36 लाखांमध्ये विकत घेतला.यात ऑटोप्रेसच्या मशनरी,वेल्डिंग, ग्राइंडर डाई मेकर मशनरी,लॅब अशा एक ते सव्वा कोट रुपये मूल्यांकन असलेला प्लांट त्यांनी खरेदी केला.


उद्योजक शरद पवार व त्यांचे बंधू रुपेश पवार यांनी श्रीनाथ इंजिनिअरिंग या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात तीन ते चार जिल्ह्यांमध्ये विविध नामांकित कंपन्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रातील दर्जेदार सेवा दिली. श्रीनाथ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून इंजिनिअरिंग क्षेत्रातील रिक्षाचे हूड, सीट ब्रॅकेट, नंबरप्लेट तसेच विविध छोटे-मोठे जॉब यानंतर नामांकित कंपनी कॉटन किंगच्या रॅकचे मोठे काम मिळाले. या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी 25 लाखाचे सीएनसी बेंडिंग मशीन श्रीनाथ इंजिनिअरिंग कंपनीने विकत घेतले.


श्रीनाथ इंजिनिअरिंग कंपनीने अल्पावधीतच कॉटन किंग कंपनीसाठी रॅक, आईस्क्रीम क्षेत्रातील नामांकित कंपन्यायांचे रॅक बनवून तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादित केला. इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध कंपन्यांना टेबल, खुर्च्या, बँचेस, हूड,रॅक यासारखी उत्पादने देखील चांगल्या दर्जाची बनवून दिली.

श्रीनाथ इंजिनिअरिंग या कंपनीचे "फ्रेंच डोअर" हे उत्पादन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये खूप गाजले. श्रीनाथ इंजिनिअरिंगची कामातील गुणवत्ता, प्रामाणिक व दर्जेदार सेवा तसेच ग्राहकांचे हित यामुळे "फ्रेंच डोअर" हे उत्पादन अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले. उद्योजक शरद पांडुरंग पवार व उद्योजक रुपेश पवार यांच्या जिद्दीने, मेहनतीने श्रीनाथ इंजिनिअरिंगच्या दर्जेदार सेवेचा ठसा संपूर्ण देशभरात देखील उमटला. श्रीनाथ इंजिनिअरिंग या कंपनीच्या माध्यमातून दिल्लीतील नामांकित कंपनी कॉन्टिनेंटला इंजिनिअरिंग क्षेत्रातील, वाहन क्षेत्रातील "हूड" बनवून दिले जाते. हैदराबादच्या नामांकित कंपनीला देखील इंजिनिअरिंग क्षेत्रातील दर्जेदार सेवा दिली जात आहे.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांच्या संघर्षमय प्रवासात त्यांच्या लग्ना अगोदरचा काळ देखील खूप खडतर होता. 1996 ला उद्योजक शरद पवार यांचे जिंतीचे बागायतदार शेतकरी तुकाराम रणवरे यांची मुलगी माधवी रणवरे यांच्याशी विवाह झाला. हे लग्न ठरण्याच्या वेळेस उद्योजक शरद पवार यांची दुचाकी पेंटिंग क्षेत्रात नव्यानेच कारकीर्द चालू झाली होती. नवीन व्यवसाय चालू झाल्यामुळे अनेक अडचणींचा, संकटांचा त्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. 

नवरदेवाच्या पोशाखावरून "कोटवरून" त्यावेळी लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीने "पेंटरला कशाला लागतोय लग्नासाठी कोट" अशी अवहेलना करणारी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळेस उद्योजक शरद पवार यांच्या लग्नासाठी पवार कुटुंबियांनी पतसंस्थेचे घेतलेले पंधरा हजाराचे कर्ज व दागिने खरेदीसाठी मित्रांनी केलेली मदत यामुळे विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला. पेंटर ते करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक, उद्योजक या प्रवासात अशा अनेक अडथळ्यांची शर्यत उद्योजक शरद पवार यांना पार करावी लागली.


उद्योजक शरद पवार यांच्या लग्नानंतर काही वर्षांनी शरद पवार यांनी रुपेश पवार या आपल्या लहान भावाचं लग्न बारामती येथे मोठया विवाह कार्यालयात, मोठ्या धुमधडाक्यात व थाटामाटात केले. माझ्या लग्नाची हौसमौज प्रतिकूल परिस्थितीमुळे मला करता आली नाही ती माझ्या भावाच्या लग्नात सगळी हौसमौज केली. असे उद्योजक शरद पांडुरंग पवार सांगतात.

उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा  2006 ला फियाट कंपनीची प्रीमियर पद्मिनी ही कार विकत घेतली. 2009 ला त्यांनी फियाट कंपनीची लिनिया ही लक्झरीयस कार साताऱ्यातील हेम्स मोटर येथून विकत घेतली. यानंतर पवार कुटुंबीयांनी टोयाटो इनोव्हा ही लक्झरीयस कार विकत घेतली.


"आज आम्ही कितीही आरामदायी चारचाकी वाहनातून प्रवास करत असलो तरी आमच्या खडतर काळातील आमची दुचाकी तसेच पहिले चारचाकी वाहन घेण्याचा अनुभव आम्ही कधीही विसरू शकत नाही. आम्ही जोडलेली माणसं आणि त्यांच्या बरोबरचा आनंद हा सर्वात मोठा आहे." असे उद्योजक शरद पांडुरंग पवार सांगतात.


महाराष्ट्रातील,पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर हे पवार कुटुंबियांचे प्रेरणास्थान आहे. मागील 40 वर्षांपासून पवार कुटुंबीय श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथे दर्शनासाठी व देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. "श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या आशीर्वादामुळे आमच्या पवार कुटुंबियांची प्रगतशील वाटचाल चालू आहे. आमची श्री क्षेत्र वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबा देवावरती खूप श्रद्धा आहे." असे उद्योजक शरद पांडुरंग पवार सांगतात.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी 2007 ला बारामती शहरालगत पाच एकर जमीन खरेदी केली. यानंतर त्यांनी काही कालावधीनंतर बारामती तालुक्यातील निरगुड येथे सात एकर शेतीची जमीन खरेदी केली त्या ठिकाणी डाळिंबाची लागवड करून चांगले उत्पन्न घेतले. पवार कुटुंबीयांना व्यावसायिक क्षेत्राबरोबरच शेतीची आवड असल्यामुळे विविध ठिकाणी शेतीची जमिनी खरेदी करून फळबाग लागवड करणे तसेच आधुनिक पद्धतीने शेती करणे याला त्यांनी प्राधान्य दिले. 2016 ला पवार कुटुंबियांनी शेटफळ येथे पाच एकर क्षेत्र विकत घेऊन त्या ठिकाणी आंबा, डाळिंब याची लागवड केली तसेच तरकारी पिकांची, भाजीपाल्यांची लागवड करून चांगले उत्पन्न घेतले.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात ही नशीब आजमावण्यासाठी सुरवातीला एक टेम्पो घेतला होता. सुरुवातीचा काही काळ या टेम्पोच्या माध्यमातून चांगला व्यवसाय झाला. परंतु एका मोठ्या अपघातात या टेम्पोचा चक्काचूर झाला. या अपघातावेळी टेम्पोमध्ये पुढे बसलेल्या दोन महिला व ड्रायव्हर वाचले व मागे बसलेल्या काही महिला देखील सुदैवाने वाचल्या. 

"आमच्या त्या टेम्पोचा अपघात एवढा भीषण होता की टेम्पोच्या पुढील काचा फुटून टेम्पोत पुढे बसलेल्या दोन महिला काचेतून बाहेर पडून सुदैवाने वाळूच्या ढिगार्‍यावर पडल्या त्यामुळे त्या वाचल्या. ड्रायव्हरच्या पायाला मोठी दुखापत झाली व टेम्पोत मागे बसलेल्या महिला देखील सुदैवाने वाचल्या. त्या टेम्पोचा एवढा भीषण अपघात होऊन देखील, टेम्पोच्या काचा संपूर्ण फुटलेल्या असून देखील टेम्पोच्या पुढे असलेला आमचे आराध्य दैवत श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा फोटो तसाच शाबूत राहिला होता हे विशेष आणि खूप आश्चर्यकारक आहे." असे उद्योजक शरद पवार सांगतात.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांचे वडील पांडुरंग पवार हे आदर्श शिक्षक होते तसेच ते खूप शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे होते. त्यांचा स्वभाव कडक असला तरी कुटुंबातील सदस्यांबद्दल माया, प्रेम खूप होते. पांडुरंग पवार हे शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांवरती खूप चांगले संस्कार करून एक आदर्श कुटुंब घडवले."तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा परंतु त्यात प्रामाणिकपणा, एकजूटपणा व तुमची निष्ठा खूप महत्त्वाची असते."अशी शिकवण पांडुरंग पवार यांनी त्यांच्या मुलांना दिलेली होती. आई-वडिलांचे संस्कार, प्रेम व मार्गदर्शन यामुळेच पवार कुटुंबातील उद्योजक शरद पवार तसेच उद्योजक रुपेश पवार तसेच शिक्षिका सुनीता गायकवाड यांनी त्यांच्या आयुष्यात प्रगतशील वाटचाल केली.


2016 ला उद्योजक शरद पवार यांचे वडील आदर्श शिक्षक पांडुरंग पवार यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. हा पवार कुटुंबियांसाठी खूप मोठा धक्का होता. त्यांच्या अंत्ययात्रेत दीड किलोमीटरचे मोठी रांग होती आणि हजारो जनसमुदाय उपस्थित होता. पवार कुटुंबीयांना पांडुरंग पवार यांचा 75 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करायचा होता परंतु अचानक झालेल्या निधनामुळे 75 वी होऊ शकली नाही. या दुःखातून सावरल्यानंतर पवार कुटुंबीयांनी आदर्श शिक्षक पांडुरंग पवार यांचे  विचार व वारसा यशस्वीपणे पुढे घेऊन जाण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केला.

आदर्श शिक्षक पांडुरंग पवार यांना त्यांच्या दोन्ही मुलांचा व्यवसायातील, यशस्वी उद्योजकांचा प्रगतशील प्रवास पाहता आला ही समाधान देणारी गोष्ट आहे. मुलांची त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील प्रगती हीच कुठल्याही आई-वडिलांसाठी खूप आनंद देणारी व सुख देणारी गोष्ट असते.


उद्योजक शरद पांडुरंग पवार हे लोकांच्यात रमणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे तसेच लोकांना अडीअडचणीत मदत करणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे संपूर्ण बारामती तालुका तसेच बारामती शहरामध्ये लोकप्रिय सामाजिक व्यक्तिमत्व आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात त्यांचा दांडका जनसंपर्क आहे. बारामतीमध्ये शिवजयंती महोत्सव, गणेशउत्सव तसेच दहीहंडी उत्सव तसेच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग असतो.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी मागील काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात ग्राहकांना प्रामाणिक व उत्तम सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आहे. उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी "श्रीनाथ डेव्हलपर्स" या फर्मच्या  माध्यमातून बारामतीमध्ये ग्राहकांच्या पसंतीस पडणारे व त्यांचा विश्वास संपादन करणारे विविध प्रकल्प केलेले आहेत. श्रीनाथ डेव्हलपर्स व राज डेव्हलपर्स या फर्मच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा देत असताना, चांगले प्रकल्प उभारत असताना उद्योजक शरद पांडुरंग पवार यांच्या मित्रांनी ही खूप मोलाचे साथ दिलेली आहे. असे उद्योजक शरद पवार सांगतात.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांच्या श्रीनाथ डेव्हलपर्स या फर्मच्या माध्यमातून जोगेश्वरी पार्क एन. ए. बंगलो प्लॉट प्रकल्प तसेच श्रीनाथ मॅजिक रो हाऊस प्रकल्प बारामतीमध्ये खूप गाजला.


उद्योजक शरद पांडुरंग पवार व्यावसायिक क्षेत्रात तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असताना अनेक वाईट अनुभुवांचाही त्यांना सामना करावा लागला. उद्योजक शरद पवार यांचे व्यावसायिक क्षेत्रात चांगले नाव असल्यामुळे तसेच त्यांची आर्थिक उलाढाल चांगली असल्यामुळे, त्यांचे सिबिल चांगले असल्यामुळे त्यांच्या एका मित्राने त्यांच्या नावावरती 25 लाखाचे रो हाऊससाठी कर्ज काढले. त्यानंतर तो मित्र पळून गेला. शेवटी नाईलाजास्तव उद्योजक शरद पवार यांनी काही वर्षानंतर 50 लाख रुपये भरून ते कर्ज फेडावे लागले. असे उद्योजक शरद पवार सांगतात. उद्योजक शरद पांडुरंग पवार रिअल इस्टेट क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत असताना काही लोकांनी त्यांची एक ते सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. तरीही पुन्हा एकदा जिद्दीने, चिकाटीने, पेटून उठून, प्रामाणिक काम करून त्यांनी या मोठ्या संकटावरती मात केली. असे उद्योजक शरद पवार सांगतात.


कुठलाही व्यवसाय व उद्योग करत असताना उद्योजकांना कर्ज घ्यावे लागते. बऱ्याच वेळा त्यांना ते कर्ज फेडता येत नाही.  अनेक अडचणी, संकटे उभे झाल्यानंतर काही उद्योजक आत्महत्यासारखा चुकीचा मार्ग अवलंबतात. परंतु व्यवसाय करत असताना कितीही मोठी अडचण आली, कितीही मोठे संकट आले तरी तुम्ही प्रामाणिकपणे, जिद्दीने व चिकाटीने काम केले तर तुम्ही कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडून, यशस्वी व्यवसाय करू शकता. हे उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीतून दाखवून दिलेले आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

उद्योजक शरद पांडुरंग पवार यांचे पुण्यातील सात मित्र महेश करपे, मल्हारी चांधेरे, बाळासाहेब चांधेरे, संतोष जाधव, दादासाहेब वाघमारे,संजय सावंत व भाऊसाहेब आव्हाळे या सातही मित्रांची सेवन स्टार मैत्री अजूनही घट्ट व प्रसिद्ध आहे. या सेवन स्टार मैत्रीच्या ग्रुपमधील प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले कर्तुत्व गाजवताना दिसत आहे. बांधकाम व्यवसायिक, साखर कारखाना संचालक, कृषिनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, झिनथ बायोटेक, सप्तर्षी डेव्हलपर्स या कंपन्यांच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. 


सामाजिक कार्यकर्ते तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात एक यशस्वी व्यावसायिक म्हणून सर्वांची कारकीर्द यशस्वी झालेली पाहायला मिळते. "आमच्या सातही मित्रांची सेवन स्टार मैत्री आजही तेवढीच प्रामाणिक,प्रेमळ व एकमेकांना आम्ही आमच्या व्यावसायिक क्षेत्रात सहकार्य करण्याची भावना ठेवत असतो. आपल्या मित्रांची व्यावसायिक क्षेत्रातील प्रगती हा खूप मोठा आमच्यासाठी आनंद असतो." असे उद्योजक शरद पवार सांगतात.

उद्योजक शरद पांडुरंग पवार हे आजच्या तरुण पिढीला नोकरीच्या मागे न धावता, नवनवीन व्यवसायात उतरले पाहिजे. नवनवीन आव्हाने तरुणांनी पेलली पाहिजे असा सल्ला देतात. उद्योजक शरद पवार यांच्या कुटुंबियांनी व्यावसायिक प्रगतीतून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा,बारामती या ठिकाणी व्यावसायिक जमिनीमध्ये देखील गुंतवणूक केलेली आहे. महाबळेश्वर येथील घेतलेल्या जागेमध्ये नवीन रिसॉर्ट चालू करण्याचा त्यांचा मानस आहे.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांना भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये गांडूळ खत प्रकल्प तसेच लिक्विड स्वरूपातील खतांचे प्रकल्प यासाठी खूप मोठे काम करायचे आहे. श्रीनाथ इंजिनिअरिंग या कंपनीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात बदलत्या जगानुसार इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रीफॅब्रिकेशन, कंटेनर ऑफिसेस व फ्रेंच डोअर या सेवा संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरातील ग्राहकांना उत्तमरीत्या, नाविन्यपूर्ण पद्धतीने व गुणवत्तापूर्ण द्यायच्या आहेत. रो हाऊसेसचे वुडन फ्लोअर, ए फ्रेम रिसॉर्ट तसेच हॉटेल इंडस्ट्रीचे वेगवेगळे आकर्षक स्ट्रक्चर्स, इंजिनिअरिंग क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उत्पादने यावरती त्यांचा विशेष भर असणार आहे.

उद्योजक शरद पांडुरंग पवार यांच्या यशस्वी जीवन प्रवासात त्यांची आई रुक्मिणी पवार व वडील पांडुरंग पवार यांचे खूप मोठे योगदान आहे.तसेच कुटुंबातील सदस्यांचेही योगदान दिसते."आमच्या आई-वडिलांचे संस्कार व मार्गदर्शन तसेच आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य, मित्र परिवाराची साथ यामुळेच व्यवसायात एक चांगली मोठी झेप घेता आली. आमच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये माझे बंधू उद्योजक रुपेश पवार यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. माझी आई, पत्नी, वहिनी तसेच कुटुंबातील सर्व सदस्य यांचा हातभार या प्रगतशील वाटचालीमध्ये नक्कीच आहे. घरातील व्यवस्थापनामध्ये आमच्या कुटुंबातील सर्वच महिला सदस्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. कुठल्याही प्रगतशील वाटचालीसाठी कुटुंबाची एकजूटता खूप महत्त्वाची आहे." असे उद्योजक शरद पांडुरंग पवार सांगतात.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांची दोन्ही मुले उच्च विद्या विभूषित आहेत. शिवराज पवार हा श्रीनाथ इंजिनिअरिंग कंपनीच्या महत्वकांक्षी प्रकल्पामध्ये वडील शरद पांडुरंग पवार व चुलते रुपेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकतेचे धडे घेत आहे. प्रिती पवार यांनी विज्ञान शाखेतून मास्टर डिग्री घेतलेली आहे. उद्योजक रुपेश पवार यांची दोन्ही मुले इंजिनिअरिंग व कायद्याचे उच्च शिक्षण घेत आहेत.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांनी माणुसकीने, प्रेमाने तसेच मायाळू स्वभावाने असंख्य माणसे जोडलेली आहेत. आपल्या मित्र परिवारांना, नातेवाईकांना संकटात, अडचणीत असताना मदत करणे या त्यांच्या स्वभावामुळे सर्वांनाच ते "आपल्या हक्काचा माणूस" वाटतात. राजकारणातील नगरसेवक पदापासून ते वेगवेगळ्या चांगल्या राजकीय पदांची संधी आलेली असताना देखील त्यांनी व्यावसायिक प्रगतीचा व माणुसकीची गर्दी जमवण्याचा मार्ग स्वीकारला. माणसे जोडणे व लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन माणुसकी समृद्ध करणे या त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळेच त्यांनी हजारो माणसे जोडली.


उद्योजक शरद पांडुरंग पवार यांना भविष्यात कृषी क्षेत्रात सेंद्रिय शेतीवर जास्त भर देऊन, शेतकरी हिताचे विविध प्रकल्प राबवून,  ग्राहकांना स्वस्त, स्वच्छ व उत्तम दर्जाचा भाजीपाला पुरवण्याचा त्यांचा मानस आहे. व्यावसायिक क्षेत्रातील त्यांची यशस्वी भरारी ही त्यांच्या माणुसकीच्या गर्दीने अजून फुलून दिसते.


"शरद पांडुरंग पवार एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन गरीबीशी, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पारंपारिक शिक्षण घेतलेले असताना देखील नोकरीच्या मागे न धावता नवीन व्यवसायात उतरून अनेक अडचणींचा, संकटांचा सामना करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात मोठी यशस्वी भरारी घेऊन, एका गुजराती उद्योजकाची कंपनी विकत घेऊन ती यशस्वीपणे चालवणे तसेच व्यवसाय करत असताना कितीही मोठे कर्ज झाले तरी जिद्दीने, चिकाटीने,मेहनत करून त्या संकटावरती मात करून पुढे प्रगतशील वाटचाल करायची आणि व्यावसायिक प्रगतीबरोबरच माणुसकीची गर्दी जमवून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणे. हा सामान्य माणसाचा असामान्य प्रवास महाराष्ट्रातील सर्व तरुण पिढीसाठी तसेच सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे."

प्रेरणादायी शिलेदार उद्योजक शरद पांडुरंग पवार यांच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...


लेखक : अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.


No comments:

Post a Comment