Monday, August 12, 2024

"हाताला सलाईनची पट्टी, कमरेला पट्टा, शरीरात अशक्तपणा असतानाही मराठा संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील लढतायेत; मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी पुण्यात उसळला लाखो मराठ्यांचा जनसागर; सगेसोयरेची अंमलबजावणी करा नाहीतर सरकार पाडु, मराठा आरक्षण मिळणारच, विधानसभेत मराठ्यांची ताकद दिसेल - मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल"


पुणे,दि.१२ : मराठा समाजाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या पुणे येथील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी पुणे जिल्ह्यातील लाखो मराठा बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नासाठी लाखो मराठा तरुणाईचा जनसागर पुणे शहरात रविवारी उसळला होता.

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या पूर्ण होण्यासाठी मराठा समाजाची ताकद दाखविण्यासाठी २९ ऑगस्टला आंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मराठा समाजाने निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे, याबाबत निर्णय घेणार आहे. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"कुणबी ही मराठा समाजाची पोटजात म्हणून जाहीर करण्यासह सर्व मागण्या मान्य करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. आम्हाला हक्काचे आरक्षण द्या, अन्यथा राज्यात तुमची एकही जागा निवडून येऊ देणार नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सरकारला दिला.

मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न तसेच मराठा समाजाच्या न्याय व हक्कांसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव पुणे शहरात रस्त्यावरती या शांतता रॅलीत सहभागी होताना दिसला. "एक मराठा लाख मराठा" "हम सब जरांगे" अशा आशयाच्या भगव्या टोप्या आणि झेंडे रविवारी सकाळपासूनच पुण्यात सर्वत्र मराठा समाजाच्या जनजागृती रॅलीमध्ये दिसू लागले आणि दुपारपर्यंत पुणे शहरात हे लाखो मराठ्यांचे भगवे वादळ दाखल झाले.

मराठा समाजाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा बांधव लाखोंच्या संख्येने आले आणि संपूर्ण पुणे मराठामय झाले. तब्बल नऊ ते दहा तास ही रॅली चालली होती. पुण्यातील सारसबाग येथे  मराठा बांधव तब्बल सहा तास मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीची वाट पाहत होते. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर रात्री दहाच्या सुमारास या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचा समारोप झाला.

मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी पुणे शहरात चौका चौकात, संघटना, संस्था व मंडळाच्यावतीने तसेच  मराठा बांधवांच्यावतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जेसीबी व क्रेनच्या साह्याने फुलांची उधळण करत, पंधरा ते वीस फुटांचे हार घालून, धुमधडाक्यात स्वागत केले.

पुणे जिल्ह्यातील अखंड मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सारसबागेपासून थोरले बाजीराव पेशवे रस्ता, जंगली महाराज रस्त्यामार्गे खंडूजीबाबा चौकापर्यंत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जरांगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. 

या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला; तसेच राज्य सरकारला निर्वाणीचा इशाराही दिला.

"पुण्यातील मराठा समाजबांधवांची गर्दी पाहून निम्म्या मंत्रिमंडळाची झोप उडाली असून, मराठा समाज कधीच एक होऊ शकत नाही, हा गैरसमज दूर झाला आहे,’ असे नमूद करून, मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मराठ्यांना ताकद दाखविण्याचे आवाहन केले. 

"येत्या २९ तारखेला आंदोलनाची वर्षापूर्ती असून, त्या वेळी उमेदवार उभे करायचे की विरोधकांना पाडायचे याचा निर्णय घेऊ. मराठा समाजाला त्रास देणाऱ्याला निवडून येऊ देणार नाही. समाजाच्या शक्तीपुढे कोणतीही सत्ता टिकणार नाही. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्यास शंभर टक्के आरक्षण मिळेल. त्यासाठी पुण्याप्रमाणेच आता मुंबईलाही फेरफटका मारून समाजाची एकजूट दाखवून द्या." 


"मुख्यमंत्र्यांनी मराठा व कुणबी एकच असल्याचा कायदा मंजूर करावा, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ‘ईडब्लूएस’चे आरक्षण पुन्हा लागू करावे; तसेच ‘एसईबीसी’चा आणि कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्याला ओबीसीतून आरक्षणाचा पर्यायही ठेवावा. विद्यार्थ्यांचे वाटोळे झाल्यास सरकार पाडल्याशिवाय सोडणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर सडकून टीका केली. "देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत. फडणवीस यांनी सापळा रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली. भुजबळ यांच्या माध्यमातून समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी कट रचण्याचा प्रयत्न केला."

"भुजबळ हे बोगस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, ओबीसींप्रमाणेच मराठ्यांचे आरक्षण खात आहेत,’ अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. ‘मागील दरवाजाने आमदार झालेल्या महिला माझ्याविरोधात बोलत आहेत,’ अशा शब्दांत पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

"समाजामुळेच मोठे झालेला कोकणातील एक नेता समाजाच्या विरोधात बोलत आहे. त्यांनी फडणवीस यांच्या नादी लागू नये, अन्यथा समाज तुम्हाला सोडणार नाही" असा इशाराही मनोज जरांगे यांनी नारायण राणेंना नामोल्लेख न करता दिला.

"मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हाताला सलाईनची पट्टी आणि कमरेला पट्टा लावूनच व्यासपीठावर आले. ‘माझे शरीर साथ देत नसले, तरी समाज महत्त्वाचा असून, शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजाशी गद्दारी करणार नाही. त्यामुळे मला गोळ्या घालणे हा एकमेव पर्याय माझ्या विरोधकांकडे आहे. परंतु, जो गोळ्या घालेल, त्याला महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही,’ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या या सभेला लाखो मराठा बांधव उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होता. पुण्यातील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला लाखो मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली पाहायला मिळाली.

"आपल्या मराठ्यांत माझ्या सकट 150 उमेदवार आहेत. जर 29 तारखेला उभ करायचं ठरलं तर तुम्हाला जातीसाठी काम करायचं. एक जण उभं करायचं आणि त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचे. "

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं आहे. 3 महिने काम करा, 5 वर्ष मराठ्यांचे कल्याण होईल. मतदान झाल्याशिवाय तीर्थ क्षेत्राला जायचं नाही. बोगस मतदान बाहेर काढायचं, मतदान केल्याशिवाय शेताकडे जायचं नाही. गिरीश महाजन तुमच्या मतदारसंघात 1 लाख 36 हजार मतदार मराठा आहेत, येवल्यामध्ये सुद्धा 1 लाख 16हजार मतदार मराठा आहेत", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुण्यातील सभेत म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी जेवढं रक्त आमच्या आई बहिनेचे सांडायचे तेवढे सांडले. आता फक्त सगे सोयरेचे अंबलजावणी राहिली आहे. सगे सोयरे आरक्षणासाठी सरकार पाडायचे. 75  वर्ष आम्ही तुम्हाला दिले, 5 वर्ष आमच्यासोबत राहा. काहीही करा तुम्ही एकजूट दाखवा. मुंबईला चक्कर हानायची का? काही काही जणांना मस्ती आली आहे. जात हवी तर मराठा सारखी पाहिजे. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा मधले सगळे सीट पडणार आहे." 


"मुंबईत गेलेले महाराष्ट्रातील मराठा बांधव आहेत तिथेही ताकद आहे. पक्षाला आणि नेत्याला बाप मानने बंद करा, मरेपर्यंत तुमच्याशी गद्दरी करणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरकारने हा कायदा पारित केला आहे. शिंदे आणि फडणवीस यांना सांगतो  आमच्या मागण्या पूर्ण करा, असा इशाराही मनोज जरागेंनी दिला. 

"मी लढायला तयार आहे. मला चारही बाजूने घेरले आहे,आता फक्त उघडे पडू नका फक्त एकजूट राहा. फडणवीस, भुजबळ यांना दंगली घडवायची आहेत." मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जाऊ नका आणि त्यांनी पण मराठ्यांच्या अंगावर जाऊ नका राज्य शांत ठेवा. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या न्याय व हक्कांचा विचार करून, मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न गांभीर्याने घेऊन, न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे मराठा आरक्षण लवकर दिले पाहिजे. अशा भावना या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीतील मराठा तरुणांनी व्यक्त केल्या.

मराठा आंदोलक  मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीला संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment