खंडाळा,दि.८ : महाराष्ट्रातील शेतकरीराजा जनतेची भूक भागवण्यासाठी शेतात कष्ट, मेहनत करून राबत असतो. शेतातून उत्तम दर्जाचे अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी शेतकरीराजा जीव ओतून काम करत असतो. शेतकऱ्यांची मुले देखील आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करून वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवताना दिसत आहेत. जिद्द, चिकाटी,मेहनत व सातत्याच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत देदीप्यमान यश मिळवत सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील कान्हवडी गावचे शेतकरी संजय चव्हाण यांची मुलगी स्नेहा चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आणि तिने मोठ्या यशाला गवसणी घातली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये स्नेहाला मिळालेले हे देदीप्यमान यश ग्रामीण भागातील मुलींसाठी खूप प्रेरणादायी आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
आपल्या गावातील मुलगी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे कान्हवडी गावच्या ग्रामस्थांनी स्नेहाची भोर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते कान्हवडी गावापर्यंत जंगी मिरवणूक काढली.
या जंगी मिरवणुकीत कान्हवडी गावचे ग्रामस्थ तसेच तालुक्यातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांनी स्नेहा चव्हाण हिचा सत्कार करून तिच्या या देदीप्यमान यशाबद्दल भरभरून कौतुक केले.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त खंडाळा तालुक्यातील कान्हवडी गावामध्ये स्नेहाचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला.
स्नेहाचे वडील संजय हनुमंत चव्हाण प्रयोगशील शेतकरी म्हणून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत संसाराचा गाडा हाकत आहेत तर आई कुसुम गृहिणी असून मुलांवरती चांगले संस्कार करून मुलीच्या शिक्षणाला हात भार लावत आहे.त्यांना एक मुलगा व दोन मुली. त्यापैकी स्नेहा ही सर्वात मोठी मुलगी.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
स्नेहाने आई-वडिलांचे कष्ट व मेहनत यांची जाणीव ठेवून अभ्यासात नेहमीच प्रगती दाखवलेली आहे. स्नेहा ही लहानपणापासून हुशार, जिद्दी, मेहनती आणि जिज्ञासू वृत्तीची मुलगी असून गावात प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान तिने मिळवला आहे. गावकऱ्यांनी तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव केलेला आहे.
स्नेहाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण खानापूर येथील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालयात झाले.
स्नेहाचे महाविद्यालयीन शिक्षण भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्नेहा वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असायची.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षकांनी स्नेहाच्या या देदीप्यमान यशाचे कौतुक केलेले आहे. शालेय जीवनातील व महाविद्यालयीन जीवनातील मित्र-मैत्रिणींनी स्नेहाच्या या देदीप्यमान यशाचे कौतुक केलेले आहे.
स्नेहाने कुठलाही खाजगी क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास तिने स्वयं अध्ययन पध्दतीने करत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करुन उत्तीर्ण झाल्याबद्दल कान्हवडी ग्रामस्थांसह, खंडाळा तालुका व भोर तालुक्यातील नागरिकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
"आई-वडिलांचे आशीर्वाद त्यांनी दाखविलेला विश्वास, शिक्षकांसह नातेवाईकांनी केलेले मार्गदर्शन आणि मित्र मैत्रिणींची साथ यामुळे मी हे यश संपादन करू शकले. पुढे परीक्षा देत अजून मोठी अधिकारी बनून समाजाची सेवा करायची आहे." अशी प्रतिक्रिया नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक स्नेहा चव्हाण यांनी दिली.
"लहानपणापासून स्नेहा हुशार आहे.मेहनती आहे. तिला शिक्षणाची आवड होती. ती पोलीस उपनिरीक्षक बनेल याचा तिला विश्वास होता आणि तिने करून दाखविले. खूप आनंद होत आहे आणि खूप अभिमान वाटतोय. आमच्या कष्टाचे तिने चीज केले." अशी प्रतिक्रिया स्नेहाचे वडील संजय चव्हाण यांनी दिली.
"महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुली वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवताना दिसत आहेत. स्नेहाने कुठलाही खाजगी क्लास न लावता जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने पोलीस उपनिरीक्षक बनून एका मोठ्या यशाला गवसणी घातलेली आहे. तिच्या स्वप्नांचा तिने ध्यास घेऊन केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. स्नेहाच्या भावी यशस्वी कारकिर्दीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया पोलीस शिलेदार विनोद मरगजे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून जिद्दीने, चिकाटीने मोठे यश मिळवता येते हे पोलीस उपनिरीक्षक बनलेल्या स्नेहा चव्हाण हिने तिच्या कर्तृत्वातून दाखवून दिलेले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलींसाठी स्नेहाचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.
No comments:
Post a Comment