Monday, December 22, 2025

"सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत मा.आमदार संजय जगताप धुरंधर; पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या रंगतदार,चुरशीच्या निवडणुकीत सासवडमध्ये कमळ फुलले, सासवडच्या नगराध्यक्षपदी आनंदीकाकी जगताप; सासवडच्या राजकारणातील "जगताप ब्रॅंडने" लोकसेवेच्या माध्यमातून जिंकली हजारो सासवडकरांची मने"....

सासवड,दि.२२ : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक भूमी असलेल्या सासवड नगरपरिषदेच्या चुरशीच्या सार्वजनिक निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपला मोठा विजय मिळवून देऊन, सासवड नगरपरिषदेचा गड जिंकला. 

सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यासह, विरोधी पक्ष एकवटलेले असतानादेखील, सासवडकर जनतेने मा. आमदार संजय जगताप यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला पुन्हा संधी देऊन, नगराध्यक्ष पदासह भाजपचे 13 नगरसेवक  बहुमताने निवडून आले. सासवड नगरपरिषदेच्या  प्रतिष्ठित लढाईतील या विजयामुळे सासवडच्या राजकारणात माजी आमदार संजय जगताप धुरंधर ठरले.

सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा अत्यंत मजबूत होती. माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपरिषदेचे मा. नगरसेवकांनी केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरल्याचे दिसून आले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

पुरंदर - हवेलीचे शिवसेनेचे आमदार,मा. मंत्री विजय शिवतारे यांनी सासवड नगरपरिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावले होती परंतु शिवसेनेचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले. राज्याच्या सत्तेतील, महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेले शिवसेना शिंदेगटाचे आमदार विजय शिवतारे यांना पुरंदर हवेली मतदारसंघातील सासवड नगरपरिषद, जेजुरी, फुरसुंगी - देवाची उरुळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ता काबीज करता न आल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

फुरसुंगी - देवाची उरुळी नगरपरिषदेची स्थापना विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले असताना देखील तेथील जनतेने त्यांना नाकारल्याचे नगरपरिषदेच्या निकालावरून दिसून येते. पुरंदर - हवेली तालुक्यातील या नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या निकालाचा प्रभाव येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती पडू शकतो.

पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पार्टीने  जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या आनंदीकाकी चंदूकाका जगताप यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सचिन सुरेश भोंगळे यांचा १,०९१ मतांच्या फरकाने पराभव केला.

आनंदीकाकी जगताप यांना ११,३६२ मते मिळाली, तर सचिन भोंगळे यांना १०,२७१ मते पडली. इतर उमेदवारांनी लढा देण्याचा प्रयत्न केला त्यात अभिजीत जगताप (उद्धव ठाकरे गट) यांना ६८२ मते मिळाली आणि निकिता धोत्रे (अपक्ष) यांना ९८ मते मिळाली. 

सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३३,६५६ मतदारांपैकी २२,५५७ (६७.०२ टक्के) मतदारांनी मतदान केले. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होऊन शांततेत संपन्न झाली.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"हा निकाल भाजपसाठी मोठा विजय असून, माजी काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतरची पहिली निवडणूक होती. संजय जगताप यांच्या आई असलेल्या आनंदीकाकी जगताप यांनी तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान होऊन जगताप कुटुंबीयांचा वारसा कायम राखला. सहकारमहर्षी कै. चंदूकाका जगताप यांच्या महान कार्याचा वारसा, सासवडच्या सर्वांगीण विकासाचे धोरण जगताप कुटुंबियांनी पुढे घेऊन गेल्याचे दिसून येत आहे. सासवडच्या या जगताप परिवाराने समाजकारण, राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रात हजारो सासवडकरांची प्रामाणिकपणे सेवा करून मने जिंकलेले आहेत."

सासवड नगरअध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आनंदीकाकी जगताप म्हणाल्या, "जनतेच्या प्रेमाने हा विजय मिळाला आहे. सासवडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तत्पर राहू. सासवडकर जनतेने विकास कामाला, जनसेवेला दिलेला हा विजयी कौल आहे." 

"सासवडकर जनतेने विकासकामाला दिलेला हा मतदानरुपी आशीर्वादाचा कौल याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.कै. सहकारमहर्षी चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली सासवडच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल आम्हाला सासवडकर जनतेच्या सेवेच्या माध्यमातून पुढे घेऊन जाता आली याचे समाधान आहे. सासवडकर जनतेने दिलेल्या संधीमुळेच स्वच्छ व सुंदर शहर, स्वच्छ सर्वेक्षण विभागात आम्हाला देशातील नंबर एकची सासवड नगरपरिषद करता आली. सासवडकर जनतेचा विश्वास व भारतीय जनता पार्टीचे संघटन यामुळे आम्हाला यश मिळाले. सासवड शहरासाठी पाण्याची योजना, सांडपाणी व्यवस्था या सर्व मूलभूत सुविधा देऊन, सर्वांग सुंदर,विकसित शहर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली सासवड शहराचा  सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील." अशी प्रतिक्रिया मा. आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्युजशी बोलताना दिली.

नगरसेवकांच्या २२ जागांपैकी भाजपने १३ जागा पटकावल्या यात ७ पुरुष नगरसेवक व ६ महिला नगरसेविका निवडून आल्या तर शिवसेनेने ९ जागा जिंकल्या त्यात ४ पुरुष नगरसेवक व ५ महिला नगरसेविका जिंकल्या. 

"पुरंदरचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी कै.मा.आमदार चंदूकाका जगताप यांच्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर सासवड शहर आनंदीकाकी जगताप यांनी त्यांच्या कारकिर्दीत तीन वेळा देशात सासवड नगरपालिकेचा प्रथम क्रमांक मिळवून दिला आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा त्या नगराध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आल्या आहेत.आता संपूर्ण जगात सासवड शहराचं नावलौकिक वाढवण्याचे काम त्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्यासोबत, माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी जोमाने करणार आहेत.मागील 4 वर्षाच्या प्रशासकीय काळात जाणून बुजून रखडवलेला सासवड शहराचा विकास आता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीससाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  होणार आहे. शिवसेना शिंदेगटाचे आमदार विजय शिवतारे यांच्याकडून निवडणुकीत जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु सासवडकर जनतेने जातीयवाद व दहशतीच्या वातावरणाला पूर्णपणे नाकारले.  शिवसेनेसह राष्ट्रवादी, इतर सर्व विरोधीपक्ष मिळून भाजपच्या विरोधात ही निवडणूक लढली गेली आहे. सर्वपक्षीय संपूर्ण ताकद पणाला लावूनही शिवतारे यांना अपयश आले आहे. येणाऱ्या पाच वर्षात सासवड शहराचा चेहरा मोहरा बदलून आपल्या सासवड शहराची ओळख संपूर्ण जगात होणार आहे. सासवडकर जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." अशी प्रतिक्रिया सासवड नगरपरिषदेचे लोकप्रिय नगरसेवक अजित ऊर्फ हापुकाका जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित ऊर्फ हापुकाका जगताप यांच्या विक्रमी मताधिक्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सासवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये अजित ऊर्फ हापूकाका जगताप  सर्वांत मोठया 1080 विक्रमी मताधिक्याने निवडून आले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

सासवड नगरपरिषदेचे प्रभागनिहाय  विजयी झालेले नगरसेवक : -

1) प्रभाग १ अ मध्ये शिवसेनेच्या माधुरी तेजस राऊत - (१,२०९ मते), १ ब मध्ये भाजपचे जगताप मनोहर ज्ञानोबा -(१११२ मते)

2) प्रभाग २ अ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वढणे लीना सौरभ - (७५४ मते), २ ब मध्ये शिवसेनेचे बाळासो बापूराव भिंताडे (७५५ मते)

3) प्रभाग ३ अ मध्ये भाजपच्या शितल प्रवीण भोंडे (१,०१३ मते), ३ ब मध्ये भाजपचे ज्ञानेश्वर (माऊलीकाका) गुलाब जगताप (१,०६९ मते), 

4)  प्रभाग ४ अ मध्ये भाजपच्या रणपिसे सोपान एकनाथ (१,४४४ मते), ४ ब मध्ये भाजपच्या स्मिता सुहास जगताप (बिनविरोध).

5) प्रभाग ५ अ मध्ये शिवसेनेच्या रत्ना अमोल म्हेत्रे (१,५२१ मते), ५ ब मध्ये शिवसेनेचे गिरमे मंदार विजय (१,६२७ मते)

6) प्रभाग ६ अ मध्ये भाजपच्या अर्चना चंद्रशेखर जगताप (१,४५५ मते), ६ ब मध्ये भाजपचे जगताप राजनभैय्या चंद्रशेखर (१,४९० मते)

7) प्रभाग ७ अ मध्ये भाजपच्या जगताप स्मिता उमेश (१,४५९ मते), ७ ब मध्ये शिवसेनेचे टकले वैभव बबनराव (१,२७१ मते)

8) प्रभाग ८ अ मध्ये शिवसेनेचे म्हेत्रे प्रितम सुधाकर (९७२ मते), ८ ब मध्ये शिवसेनेच्या जगताप दिपाली अक्षराज (९३४ मते).

9) प्रभाग ९ अ मध्ये भाजपचे प्रदीप (बंडू काका) काशिनाथ राऊत (६८४ मते), ९ ब मध्ये भाजपच्या जगताप प्रियंका साकेत (९३८ मते)

10) प्रभाग १० अ मध्ये भाजपचे गिरमे ज्ञानेश्वर साधू (९३६ मते), १० ब मध्ये शिवसेनेच्या जगताप शिल्पा संदीप (९५४ मते)

11) प्रभाग ११ अ मध्ये शिवसेनेच्या इनामके हेमलता मिलिंद (बिनविरोध) आणि ११ ब मध्ये भाजपचे अजित (हापू काका) काळूराम जगताप (१,६६६ मते).

या निवडणुकीची पार्श्वभूमी चुरशीची होती. शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत युती केली, पण राष्ट्रवादीने उमेदवारी मागे घेतल्याने थेट भाजप-शिवसेना लढत झाली. पुरंदर-हवेलीचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली, पण संजय जगतापांच्या नेतृत्वाला सासवडकर जनतेने विजयाचा कौल दिल्यामुळे भाजपला फायदा झाला. शिवसेनेला २ जागांवरून ९ जागांपर्यंत वाढ झाली, ज्यामुळे भविष्यातील  निवडणुकांसाठी आत्मविश्वास वाढला. मात्र, विजय शिवतारे यांना मोठा धक्का बसला.

सासवड नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निरीक्षक आरती भोसले, सहाय्यक डॉ. कैलास चव्हाण आणि निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांच्या देखरेखीत प्रक्रिया पार पडली. उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंग गौर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली यावेळी कडक बंदोबस्त होता.

हा निकाल महायुतीच्या राज्यस्तरीय वर्चस्वाचा पुरावा आहे, ज्यात भाजपने राज्यभरात सर्वाधिक जागा जिंकल्या. नवनिर्वाचित नगरपरिषद रखडलेली पाणीपुरवठा, रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. सासवडच्या राजकारणात जगताप कुटुंबीयांचे वर्चस्व कायम राहिले असून, भविष्यातील विकासासाठी हा विजय माइलस्टोन ठरणार आहे.

No comments:

Post a Comment