पुरंदर, वीर,30 : महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरंदर तालुका हा शूरवीर, पराक्रमी, कर्तुत्ववान महान लोकांच्या महान कामगिरीने पावन झालेला ऐतिहासिक तालुका आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील वीर गावचा तरुण शिवदास शितोळे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करून, प्रामाणिकपणे काम करून पत्रकारिता क्षेत्रात जनतेचे गंभीर प्रश्न मांडून,सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे प्रयत्न करून समाजाची सेवा करतो.हा संघर्षमय प्रवास तरूणाईसाठी प्रेरणादायी आहे.
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर गावचा अभिमान, दैनिक पुढारीचे निर्भीड, वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांच्या निर्भीड, प्रामाणिक पत्रकारितेचा व समाजसेवेचा सन्मान स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी पुरंदर तालुक्यातील वीर गावच्या ग्रामस्थांच्या वतीने व वीर ग्रामपंचायत व वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा धुमाळ यांच्या हस्ते दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांना "वीरगाव भूषण" व "आदर्श पत्रकार" पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर या गावचे भूषण, सुपुत्र, शिवव्याख्याते, लेखक, पत्रकार शिवदास शितोळे यांच्या प्रभावशाली लेखणीचा, समाजहितवादी पत्रकारितेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने वीर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी वीर गावच्या सरपंच मंजुषा धुमाळ, उपसरपंच मोहन चवरे,वीर देवस्थान ट्रस्टचे मा. चेअरमन संतोष धुमाळ, पंचायत समिती मा. सदस्य दिलीप धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर पाहुणे व ग्रामसेवक प्रसाद सोले व वीर गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवदास शितोळे हे शिवव्याख्याते, लेखक, पत्रकार म्हणून अनेक वर्षांपासून काम करत असून, समाजातील सामान्य लोकांना चहुबाजूने त्रास देणाऱ्या कुचकामी व्यवस्थेवरती, चुकीच्या गोष्टींवरती आपल्या लेखणीच्या, पत्रकारितेच्या माध्यमातून प्रहार करण्याचे काम निष्पक्ष आणि निर्भीडपणे पत्रकार शिवदास शितोळे करत आहेत.
"गगनभरारी न्यूज तसेच महाराष्ट्र माझा न्युज या युट्युब चॅनेलच्या माध्यमातूनही त्यांनी प्रामाणिकपणे पत्रकारिता केलेली आहे."
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
शिवदास शितोळे हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ महाराष्ट्र राज्याचेही सदस्य असून नाट्य, चित्रपट, कला क्षेत्राशी ही ते निगडित आहेत.
सामाजिक, राजकीय, भौगोलिक, कला, विज्ञान या विविध विषयांवरती अभ्यास करण्यासाठी प्रवास दौरा करायला पत्रकार शिवदास शितोळे यांना खूप आवडतो.
"लवकरच ते युवा पिढीसाठी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक बल संपादन करून आपल्या ध्येयापर्यंत कमीत कमी वेळेत कसे पोहोचावे हे शिवविचाराच्या माध्यमातून सांगणारे शिवचरित्रातून काय शिकावे? हे पुस्तक प्रकाशन करणार आहे तसेच या पुस्तकाचे प्रकाशन पूर्व दहा हजार प्रतींचे ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे." अशी माहिती पत्रकार शिवदास शितोळे यांनी दिली.
"भले तरीही देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी मारू काठी." या उक्तीप्रमाणे आपल्या विविधअंगी लेखनातून, दैनिक पुढारीच्या बातमीदारीच्या माध्यमातून शिवदास शितोळे यांनी समाजातील विविध चुकीच्या चालीरीती, अंधश्रद्धा तसेच अवैध व्यवसाय, समाजामध्ये चाललेले बेकायदेशीर व्यवसाय यांच्या विरोधात आपल्या जीवाची कोणतीही तमा न बाळगता अभ्यासपूर्ण, निष्पक्ष, निर्भीड आणि कडक शब्दात प्रहार करून प्रशासनाला धारेवर धरून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
"मराठी माणसाचे मराठी स्वभाव" या एकपात्री विनोदी नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण शिवदास शितोळे यांनी केलेले आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते या एकपात्री विनोदी नाटकाचे उद्घाटन पुण्यातील प्रसिद्ध नाट्यगृह बालगंधर्व येथे झालेले होते.
शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या तसेच उद्योजकांच्या यशोगाथाही त्यांनी त्यांच्या शब्दात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासमोर मांडल्या आहेत.
पत्रकार हा समाज व्यवस्थेचा कणा असतो त्यामुळेच ग्रामीण भागातील आरोग्य, वीज,पाणी,शिक्षण, प्रशासकीय व्यवस्थेतील गैरकारभार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेकायदेशीर धंदे यासारख्या वेगवेगळ्या विषयावरती पत्रकार शिवदास शितोळे यांनी दैनिक पुढारी वृत्तपत्रात खास बातम्या प्रसिद्ध करून समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सामान्य माणसाचे गंभीर प्रश्न त्यांनी आपल्या सडेतोड लेखणीतून मांडले आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटक पत्रकार शिवदास शितोळे यांच्याकडे आशेने बघत असून जनतेच्या बाजूने कोणीतरी बोलणारा आपला हक्काचे माणूस आहे. ही भावना सर्वसामान्यांच्या मध्ये निर्माण झाली आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यातील कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी पुरंदर तालुक्यातील निर्भीड व कर्तृत्ववान पत्रकार शिवदास शितोळे यांचा आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार देऊन या सोहळ्यामध्ये सन्मान करण्यात आला होता.
"वीर ग्रामपंचायत नेहमीच वेगवेगळे चांगले सामाजिक उपक्रम राबवत असते. वीर गावातील कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा केलेला सन्मान नक्कीच प्रेरणादायी आहे. समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या पाठीवरती ही दिलेली कौतुकाची थाप असते. पत्रकार शिवदास शितोळे यांच्या पत्रकारितेतील प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे मा. आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या वीर गावच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला अभिमान आहे. दैनिक पुढारी वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांनी निर्भीड व प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून लोकहिताचे विषय मांडलेले आहेत. लेखक,पत्रकार व समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी वीर गावासाठी व जनसामान्यांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून उत्तम कामगिरी केली आहे.वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांना वीर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने "वीरगाव भूषण व आदर्श पत्रकार" पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होत आहे." अशी प्रतिक्रिया वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा धुमाळ यांनी दिली.
"80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर गाव चावडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी मला श्रीक्षेत्र वीर गावच्या प्रथम नागरिक, पहिल्या महिला लोकायुक्त सरपंच सौ मंजुषाताई संतोषबापू धुमाळ यांच्या हस्ते "वीरगाव भूषण" व "आदर्श पत्रकार" पुरस्कार देण्यात आला याचा मला खरोखर मनस्वी आनंद झाला आहे. मला या अगोदर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील पत्रकारिता क्षेत्रासाठी विविध पुरस्कार मिळाले आहे. परंतु आपल्या माणसांनी केलेला सन्मान हा सर्वोच्च असतो. मी आजपर्यंत दैनिक पुढारीच्या माध्यमातून वीर आणि परिसरातील विविध समस्या सोडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. वेळप्रसंगी प्रशासनालाही धारेवर धरले तर अनेक समस्या सोडवत असताना अनेकांशी वैर सुद्धा पत्करले.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. आणि पत्रकारिता म्हणजे दुधारी तलवार असते. त्यामुळे लोक हिताची कामे करत असताना अनेक हितसंबंधही दुखावले गेले परंतु मी त्याची कधीही पर्वा केली नाही.आणि इथून पुढेही कधी करणार नाही.हा मला "वीर भूषण" व आदर्श पत्रकार मिळालेला पुरस्कार मी आत्तापर्यंत केलेल्या कामाची पोच पावतीच समजतो. माझ्या पत्रकारितेवरती प्रेम करणाऱ्या सर्वांचाच मी मनापासून आभारी आहे." अशी प्रतिक्रिया दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज बोलताना दिली.
"महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक तरुण, अभ्यासू पत्रकार समाजातल्या सर्व घटकांचे प्रश्न निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, पोट तिडकेने मांडून प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून, समाजाची सेवा करतो हे पत्रकार शिवदास शितोळे यांनी त्यांच्या कर्तुत्वातून सिद्ध केलेले आहे. समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीची बदनामी करणारा, चारित्र्यहनन करणारा एक वर्ग असतो याची तमा न बाळगता निर्भीड पत्रकार शिवदास शितोळे यांनी प्रामाणिकपणे जनतेच्या समस्यांवरती दैनिक पुढारीच्या माध्यमातून खास बातमीदारी करून लोकांची मने जिंकलेली आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे गंभीर प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण भागातील बेकायदेशीर धंद्यांमुळे सर्वसामान्य लोकांना, तरुणांना, शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास त्यांनी बातमीदाराच्या माध्यमातून मांडलेला आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी असेच प्रामाणिकपणे कार्यरत राहावे. अशी जनभावना आहे. वीर ग्रामपंचायतीने पत्रकार शिवदास शितोळे यांचा केलेला हा सन्मान अभ्यासू, वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांच्या प्रामाणिक व समाजहितवादी पत्रकारितेचा सन्मान आहे. सामान्य माणसाचे शोषण, पिळवणूक करणाऱ्या समाजातील भ्रष्ट व कुचकामी व्यवस्थेविरुद्ध निर्भीडपणे लढण्यासाठी पत्रकार शिवदास शितोळे यांना मनापासून शुभेच्छा" अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
"समाजात चांगलं काम करणाऱ्या लोकांचा नेहमीच गावाकडून गौरव केला जातो. पत्रकार शिवदास शितोळे हे निर्भीड पत्रकार आहेत. त्यांचे कार्य खूप चांगले व समाजासाठी दिशादर्शक आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवत असतात. पत्रकार शिवदास शितोळे यांना वीर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या वीरगाव भूषण व आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे आम्हाला खूप आनंद झाला. त्यांना प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा" अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, वीर देवस्थान ट्रस्टचे मा. चेअरमन बाळासाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
'दैनिक पुढारीचे निर्भीड पत्रकार शिवदास शितोळे हे एका सर्वसामान्य कुटुंबातुन असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या, काय असतात, कोणकोणत्या परीस्थितीला सामोरे जावे लागते याची सर्वस्वी जाणीव असलेले व्यक्तीमत्व असुन, गोरगरिबांच्या न्याय व हक्कासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिवव्याख्याते म्हणून तसेच पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करत आहेत.शिवदास शितोळे यांनी सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, पर्यावरण,जनजागृती, तसेच विविध ऐतिहासिक, समकालीन, विषयांवर सातत्याने निष्पक्ष, आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून लेखन केले आहे.. वेळोवेळी बेरोजगारी, भ्रष्टाचार, अवैध धंदे, सावकारी, मटका जुगार, यांसारख्या सर्वसामान्य वर्गांला भेडसावणाऱ्या समस्यांवर, न डगमगता बातमीदारी केली असून समाजपरीवर्तनाची भुमिका जपत त्यांनी पत्रकारितेतुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. व्याख्यानाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार नवतरुणांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी शिवव्याख्यानातुन केलेले असून आजच्या नवीन पिढीला एक नवीन आदर्श देण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केलेले आहे. त्यामुळे या वीरगाव भूषण व आदर्श पत्रकार पुरस्कारास ते पाईक असुन, योग्य व्यक्तीस योग्य पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद आहे" अशी प्रतिक्रिया वीर गावचे सामाजिक कार्यकर्ते, लोकशासन आंदोलन पार्टी तालुका अध्यक्ष दिनेश जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पत्रकारितेचे आणि प्रामाणिक पत्रकारांचे योगदान खूप मोठे आहे. प्रस्थापित व्यवस्थेत विरोधात लढण्याचं धैर्य व बळ निर्भीड पत्रकारांमध्ये असते. समाजाने त्यांना साथ व पाठिंबा देणे गरजेचे आहे.
पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे गंभीर प्रश्न, जनतेच्या मुख्य समस्या पत्रकार शिवदास शितोळे पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत असल्यामुळे, त्यांना विविध संस्थांकडून आदर्श पत्रकारितेचे पुरस्कार मिळालेले आहेत.
























No comments:
Post a Comment