Thursday, January 12, 2023

"रयतेच्या स्वातंत्र्याचा, सुख समृद्धीचा, प्रगतशील भविष्याचा प्रेरणादायी विचार देणाऱ्या राष्ट्रमाता,स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ" - राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त इतिहास संशोधिका, प्रसिद्ध लेखिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांचा विशेष लेख....

  



"रयतेच्या स्वातंत्र्याचा, सुख समृद्धीचा, प्रगतशील भविष्याचा प्रेरणादायी विचार देणाऱ्या राष्ट्रमाता,स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ"....


राजमाता जिजाऊंचा जन्म पाऊस शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी पुष्य नक्षत्रावर सूर्योदय समयी  दिनांक १२ जानेवारी १५९८ रोजी झाला.


सिंदखेडच्या राजवाड्यात लखुजीराजे आणि म्हाळसाबाई राणीसाहेब यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊसाहेबांचा जन्म मातब्बर मनसबदार अशा लखुजीराजे जाधवराव यांच्या पोटी झाला होता.




लखुजीराजे व आई म्हाळसाबाई राणीसाहेब  यांच्या सहवासात शौर्याच्या कहाण्या ऐकत जिजाऊंचे बालपण मजेत गेले होते.


लखोजीराजांचा चौसोपी वाडा, सरंजाम ,नोकरचाकर ,हत्ती-घोडे, चित्तथरारक कवायती ,संगीत शाळा, नगारखाने इत्यादी गोष्टी जिजाऊंच्या बालमनावर निश्चितच संस्कार करून गेल्या .राजवाड्यात आपले गार्हाने घेऊन येणारे लोक मुत्सद्दी व पराक्रमी लोकांची वर्दळ ,लढायांचे डावपेच विविध विषयांची चर्चा या सर्व गोष्टीला न्यायबुद्धीने उत्तर देण्याची लखुजीराजे यांची हातोटी इत्यादी गोष्टी जिजाऊंच्या बालमनावर नक्कीच चांगले संस्कार करून गेल्या.





अशा संस्कारक्षम घराण्यातील जिजाऊसाहेब, भोसले यांच्या घरात आल्या नंतर आपल्या मुलाला अतिशय चांगले संस्कार करत गेल्या. शिवाजीराजांना प्रत्येक वेळी यशच का मिळत गेले ? असा प्रश्न पुष्कळवेळा आपणापुढे उभा राहतो, याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे उत्तम असे नेतृत्व. खुद्द   शिवाजीराजांच्या अंगी धडाडी, सारासार विचार, शौर्य आणि अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे लोकांच्या गुणांची पारख करणे हा होता.




शिवाजीराजांनी केवळ या गुणावरच घोडखिंड पावन करणारे शंभूसिंह  जाधवराव ,बाजी व फुलाजी बांदल यासारखे शूर योद्धे मिळवले होते. पुरंदरला शीर तुटून खाली पडलेले असतानाही शत्रूची मुंडकी उडविणारे मुरारबाजी लाभले होते. त्याचप्रमाणे अफजलखान भेटीच्या वेळी शिवाजीराजांचे संकट ते आपले संकट म्हणून तेथे जवळच उभे राहणारे जिवाजी ही काही कमी नव्हते.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


'आधी लगीन कोंढाण्याचे ' सांगणार्‍या आणि लगेच स्वराज्यात कोंढाणा किल्ला सामील करून आत्मबलिदान करणारे तानाजी मालुसरे हे देखील कोठेही उणे नव्हते हे त्यांनीच दाखवून दिले होते. 




चारी पादशाहींनी हाय खाऊन कित्येक वेळा ज्याच्या हातून माती खाल्ली व प्रतिशिवाजी म्हणवून घेतले ते  नेताजी पालकर म्हणजे तर साक्षात विजांचा कडकडाट होते.  याशिवाय प्रतापराव गुजर,अण्णाजी दत्तो, रघुनाथराव ,मोरोपंत पिंगळे असी अनेक माणसे शिवाजीराजांनी वेचून काढली होती. फक्त निवडली असे नव्हे तर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्यावर कामगिरी शिवाजीराजांनी सोपवली होती.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

      

शतकांच्या मर्यादांना खिंडार पाडून स्वकर्तृत्वाने जिजाऊंनी शिवाजीराजांना घडविले. महाराष्ट्राला मुस्लीम राज्यकर्त्यांच्या जोखडातून स्वतंत्र करावयाचे विचार त्यांच्यात जागृत केले. जागतिक पातळीवर शौर्याची तुलना व्हावी असा ध्यास या माऊलीने जोपासला व अतुलनीय धैर्याचा परिचय देऊन कार्य सिद्धीला पोहोचविले. अफजलखान नावाचे भयंकर संकट आले तरी जिजाऊमातेने मोलाची सल्लामसलत करून आशीर्वाद दिला .' यश देईल भवानी, तुम्ही कामगिरीला सिध्द व्हा.'' वाघाएवढे काळीज लागते ,पोटच्या गोळ्याला मृत्यूसमोर उभं करायला पण धाडस लागते. जिजाऊंना ध्यास लागला होता तो स्वराज्य स्थापनेचा. 


        

इ.स.१६६६ ला घात करणारे संकट ओढवले.औरंगजेब बादशहाला आग्र्याला जाऊन भेटायचे होते. पण याहीवेळी मातेने पुत्राला हिंम्मत दिली. युक्तीचा सल्ला दिला व आशीर्वादही दिला. ही कामगिरीही पार पडेल, आई भवानी राहील तुमच्या पाठीशी.



मार्च ते सप्टेंबर असा सहा महिने जिजामातेने चोखपणे राज्याचा कारभार पाहिला .शत्रूच्या हाती एकही किल्ला दिला नाही ; उलट शत्रूच्या ताब्यातील ' रांगणा किल्ला ' स्वराज्यात सामील करायचे राजकारण केले. स्वतंत्र विचारसरणी व कर्तृत्वाची जाण जिजाऊ मातेमध्ये सक्षम होती. 




त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याच्या कारभारामध्ये अधिकाधिक लक्ष घातले.छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल जिजाऊंना अत्यंत प्रेम आणि जिव्हाळा वाटत असला तरी त्या कधी पुत्रप्रेमाने आंधळ्या होऊन राजांना कधी कोणत्या सवलती देत नसत. उलट त्यांची करडी नजर सर्वांच्यावर होती.


गुणांची पारख कशी करावी, लोकसंग्रह कसा करावा, केलेला लोकसंग्रह कसा टिकवावा हे जिजाऊंनी शिवाजीराजांना शिकवले होते. शिवाजीराजांनी मुस्लीम लोकांचाही  विश्वास संपादन केला होता. राजांच्या सैन्यात कितीतरी पठाण मुसलमान होते. त्यांना नोकरीवर  ठेवून योग्य मोबदला दिला होता.




शिवाजीराजे म्हटले की , मोगली आणि आदिलशाही दोन्ही तख्ते रागाने दात-ओठ खात .प्रत्येक जण आपापल्या परीने शिवाजीराजांना पकडून देऊ पाहत होते. पण ते त्यांना जमले नाही .मरणासारखी संकटे समोर उभी होती, तरीदेखील तम्ही शरण जावा आणि आपली सुटका करून घ्या असे जिजाऊ त्यांना कधीच सांगत नसत.



जिजाऊंनी आपले स्वतःचेच मन इतके घट्ट केले होते की कोणत्याही संकटप्रसंगी मोठ्या धीराने त्या मार्गदर्शन करीत.माँसाहेबांमुळेच शिवाजीराजे हे पन्हाळ्यावर स्वराज्याच्या दृष्टीने निर्धास्त होते. कारण राजगडावरून स्वतः जिजाऊ जातीने सर्व पाहत होत्या. कोंढाणा किल्ला घ्यायला लावणाऱ्या जिजाऊ साहेब अत्यंत विचारी व दुरदर्शी होत्या. जिजाऊंचे व्यवहारचातुर्य एवढे आघात होते की केवळ त्यांच्याच प्रेरणेने , शिकवणीमुळे तसेच शहाजी राजे युद्ध मोहिमांमध्ये व्यस्त असताना देखील प्रत्येक गोष्टी त्यांनी शिवाजीराजांकरवी करून घेतल्या ,यातच त्यांची मुत्सद्देगिरी पारखण्यासारखी होती.


 

वास्तविक शिवाजीराजांच्या जीवनात शहाजीराजांचा संपर्क किंवा सानिध्य  कमी होता ; परंतु आऊसाहेबांनी आईची जागा भरून काढलीच परंतु त्याशिवाय वडिलांची भूमिका सुद्धा कित्येक वेळा त्यांना करावी लागली. कारण शहाजीराजांच्या आयुष्यातील बहुतेक वेळ स्वारीवर व दगदगीत दक्षिणेकडे गेल्यामुळे प्रत्यक्ष शिवाजीराजांकडे लक्ष  देण्यासाठी वेळ कमी मिळायचा.


 

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


शहाजीराजे जरी फार काळ शिवाजीराजांजवळ नव्हते तरी आपल्या पित्या बद्दल त्यांना खूपच आदर होता.कारण जिजाऊंनी आपल्या वडिलांबद्दल कसे वागावे याचे खुप चांगले संस्कार केले होते. 




महाभारतामध्ये पांडवांना निरनिराळ्या संकटकाळी भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले, तर शिवशाहीमध्ये तसेच मार्गदर्शन जिजाऊंनी केले .


स्वराज्यस्थापनेच्या काळी  जिजाऊंनी सर्वतोपरी कंबर कसली होती. त्यामुळेच शहाजीराजांच्या मृत्युने सती जाण्यास जेंव्हा  जिजाऊ निघाल्या तेव्हा शिवाजीराजे पूर्णपणे हादरून गेले होते. कारण त्यांना माहीत होते की  जिजाऊ या स्वराज्याची देवता आहेत. शिवाजीराजांचे जिजाऊंशी वागणे हे अत्यंत आदरणीय व विनम्रतेचे होते. शिवाजीराजे आईसाहेबांच्या इच्छेविरुद्ध काहीही करत नसत. उलट राजे कोणतेही काम करताना आईना विचारून ,त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा करूनच निर्णय घेत. कारण शिवाजीराजांच्या पहिल्या सल्लागार म्हणजे जिजाऊसाहेब होत्या.




शिवाजी राजांच्या गैरहजेरीत जिजाऊ जातीने राज्याचा डोलारा सांभाळीत.शिवाजीराजे स्वारीवर गेले की जनतेचा न्याय निवाडा जिजाऊ साहेबच करत असत.


लांबून लांबून लोक जिजाऊंना पाहण्यास, भेटण्यास ,नमस्कार करण्यास येत असत .प्रत्येकाची योग्य ती  विचारपूस करून, प्रत्येकाच्या तक्रारीकडे त्या लक्ष देत.क्षात्रतेजाला अपरिहार्य असणारे युद्धकौशल्य त्यांनी शिवबांना शिकवले होते. लढाईचे प्रकार माहीत करून दिले होते. शत्रूशी दोन हात कधी करावेत व प्रसंग बिकट असेल तर गनिमी कावा वापरून शत्रूला नामोहरम कसे करावे याचे शिक्षण त्यांनी शिवरायांना दिले होते.शक्‍तीची, बळाची लढाई केव्हा व बुद्धिचातुर्याची  लढाई केव्हा करावी, याचे शिक्षणही जिजाऊ यांनी शिवबाला दिले होते. 



          

क्षात्रतेजाने इतिहास निर्माण केलेल्या सातवाहन ,राष्ट्रकूट ,चालुक्य, वाकाटक व यादव घराण्यातील श्रेष्ठ आदर्श पुरुषांच्या पराक्रमाच्या व कर्तृत्वाच्या गोष्टी त्यांनी नेहमीच शिवबाला सांगितल्या. या थोर युगपुरुषांप्रमाणेच  शिवाजीराजांनी आलौकिक कर्तुत्व करावे ,असे जिजाऊंना मनोमन वाटत होते. शिवाजीराजांना विरक्ती, वैराग्य व त्याग इत्यादींची शिकवण दिली.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


लोकांच्या सामर्थ्यावर मिळवलेले राज्य लोकांच्या कल्याणासाठीच चालविले पाहिजे,अशी जिजाऊंची धारणा होती. लोकांचे दुःख ओळखून प्रजा व राजा यांच्यात भावनिक ,वैचारिक, प्रेमाचे नाते असेल तर जीव्हाळा टिकून राज्यात सुव्यवस्था नांदते, असे जिजाऊंचे ठाम मत होते. रयतेचे रोजचे प्रश्न, समस्या त्यांच्या कुटुंबाची अवस्था, मुलाबाळांचे प्रश्न यावर राजाचे लक्ष असायला हवे ,असा जिजाऊंचा दंडक होता. शिवाजीराजांच्या लहान वयातच त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकण्यास जिजाऊनी सुरुवात केली होती .त्यांना आपल्या मांडीवर बसवूनच राजकारण  लोकसंघटन, संरक्षण, प्रशासन ,नीतिमूल्ये आदींचे डोळस ज्ञान दिले. यातूनच खर्‍या अर्थाने शिवाजीराजांची जडणघडण झाली होती .




जिजाऊ म्हणत, " शिवबा ! तुमचे आजोबा मालोजीराजे ,लखुजीराजे अत्यंत पराक्रमी होते .वडील शहाजीराजे तर आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीवरती दरारा असणारे पराक्रमी सिंहच ! अशा सिंहाचा तुम्ही  पुत्र आहात. शिवबा तुम्हाला  स्वराज्य निर्माण करायचे आहे. दैववाद, कर्मकांड ,अनिष्ट रूढी परंपरा यांच्यामुळेच आदिलशाही, निजामशाही ,मुघलशाहीचे फावले आहे .सैन्यबळ ,दुर्गबळ, द्रव्यबळाचा मुकुटमणी म्हणजे शहाजीमहाराज ! भोसले - जाधव घराण्याचा  पराक्रमाचा वारसा तुम्हाला लाभलेला आहे .तुम्हाला रयतेचे स्वराज्य निर्माण करायचे आहे.शिवबा,मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे ऊभी आहे, अशी प्रेरणा जिजाऊंनी शिवरायांना दिली.



इतिहास बदलणे जिजाऊंच्या हाती नव्हते ; परंतु नवा इतिहास घडविणे जिजाऊंना शक्य वाटले. स्वराज्य स्थापनेचे कार्य एकटे शिवबा करू शकणार नाहीत .त्यासाठी त्यांनी शिवबासोबत त्यांच्या इतर सहकारी मावळ्यांना ही घडविले .




जातीधर्माच्या पलीकडे जाऊन रयतेच्या स्वातंत्र्याचा ,सुख - समृद्धीचा आणि भविष्याचा विचार जिजाऊंच्या स्वराज्य कल्पनेत होता. जिजाऊ या शिवाजीराजांची माताच नव्हत्या तर सर्वांची त्या प्रेरक शक्ती होत्या. जिजाऊंनी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिल्याने शिवरायांची मजबूत जडणघडण झाली होती


अशा या थोर व शोर्यशाली राजमाता ,राष्ट्रमाता  जिजाऊसाहेब यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन. 



          

लेखिका : - इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधिका, वेगवेगळ्या ऐतिहासिक विषयांवर लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर.


        

Sunday, January 1, 2023

"२३ वर्षांनंतर राज्य सरकारच्या पुढाकाराने 'महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा' पुण्यात रंगणार; ३९ क्रीडाप्रकारात "इतके" हजार खेळाडू सहभागी होणार"


पुणे, दि.१ : पुणे येथे नव्या वर्षाच्या सुरूवातीस २ ते १२ जानेवारी दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होत आहेत. तब्बल २३ वर्षांनंतर शासनाच्या पुढाकाराने या स्पर्धांचे आयोजन होत असल्याने या स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. ३९ क्रीडा प्रकारात राज्यातील पुरुष व महिलांचे सर्वोत्तम ८ संघ यात सहभागी होणार असल्याने त्यांचा खेळ पाहण्याची संधी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत करण्यात आला आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात देशातील महत्त्वाचे राज्य आहे. गेल्या ५ वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवत नेत्रदीपक यश मिळविले आहे. १९९४ मध्ये बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनप्रसंगी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ‘कदम कदम पे नक्श है, विजय हमारा लक्ष है..’ हे स्वर जणू राज्याच्या क्रीडा क्षेत्राची वाटचाल दर्शविणारे होते. त्याच क्रीडा नगरीने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. ती परंपरा पुढे नेण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वाची आहे.



खो-खो, कबड्डी, कुस्ती सारख्या देशी खेळात आपला पूर्वीपासून दबदबा आहे. मात्र शासनाने क्रीडा सुविधांचा विकास आणि प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिल्याने इतर खेळातही आपले खेळाडू आंतररराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करताना दिसत आहेत. राज्याच्या क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी तसेच खेळ व खेळाडूंना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी २००१ मध्ये राज्याचे क्रीडा धोरण आखण्यात आले. असे धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


राज्याच्या क्रीडा लौकीकात भर घालण्यासाठी आणि या क्षेत्रातील आपली कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘ऑलिम्पिक व्हिजन’ तयार करण्यात आले आहे. राज्याच्या प्रत्येक भागात उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य केले जात आहे. त्यासोबतच शालेय आणि स्थानिक स्पर्धांनाही आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठीदेखील शासनाने १९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.




नुकतेच बालेवाडी येथे खेलो इंडिया स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतरची ही दुसरी मोठी स्पर्धा असेल. अशा स्पर्धांच्या माध्यमातून राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासोबत क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध घेता येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्याची क्षमता असलेले गुणवंत खेळाडू अशा स्पर्धांमधून पुढे येतात. त्यांना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळावी आणि त्यासोबत नव्या दमाच्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी अशा स्पर्धांना महत्त्व आहे.


बालेवाडी-म्हाळुंगे येथील १५३ एकराच्या परिसरात उभारण्यात आलेली श्री शिवछत्रपती क्रीडानगरी हे देशाचे क्रीडावैभव आहे. सर्व प्रकारचे ऑलिम्पिक खेळ असणारे हे देशातील पहिले क्रीडासंकुल आहे. इथल्या अत्याधुनिक सुविधा लक्षात घेता या क्रीडानगरीत येऊन खेळ दाखविण्याचे स्वप्न राज्यातील प्रत्येक खेळाडूच्या मनात असते. राज्यभरातील ३ हजार ८५७ पुरुष व ३ हजार ५८७ महिला खेळाडू असे एकूण ७ हजार ४४४  खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे. स्पर्धेत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी  यांच्यासह एकूण १० हजार ४५६ जणांचा सहभाग असणार आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेची पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात असा क्रीडा विभागाचा प्रयत्न आहे. ऑलिम्पिक असोसिएशनदेखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.


राज्यातील आठ विभागीय मुख्यालयातून क्रीडा ज्योत स्पर्धास्थळी आणली जाणार असल्याने राज्यभरात क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. मुख्य क्रीडा ज्योत रायगडावर प्रज्वलित करण्यात येऊन ५ जानेवारीला मिरवणूकीने ती क्रीडानगरीत येणार आहे. क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याची संधी आहे, प्रतिष्ठा आहे हा संदेश यानिमित्ताने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत जावा आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी हाच यामागचा उद्देश आहे.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. खेळाडूंना उत्तम संधी आणि योग्य मैदान मिळाले तर त्यांच्यातील प्रतिभा उंचावते, अशी संधी देणारी ही स्पर्धा आहे. यातून पुढे येणारे खेळाडू देशाचे नेतृत्व करतील आणि येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येदेखील यश मिळवतील अशी अपेक्षा करीत त्यांना शुभेच्छा देऊया!


स्पर्धांची ठिकाणे : -


१. पुणे - ॲथलेटिक्स, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग, स्क्वॅश, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, रोलर स्केटींग, गोल्फ, सॉफ्ट टेनिस


२. नागपूर -  बॅडमिंटन, नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा


३. जळगांव - खो-खो, सॉफ्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल


४. नाशिक - रोईंग, योगासन


५. मुंबई - याटींग, बास्केटबॉल


६. बारामती - कबड्डी


७. अमरावती - आर्चरी,


८. औरंगाबाद - तलवारबाजी


९. सांगली - कनाईंग-कयाकिंग अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत.  


स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

Tuesday, December 20, 2022

"फलटण तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांच्या प्रसिद्ध गिरवी गावच्या सरपंच पदी सह्याद्रीभय्या कदम गटाच्या वैशाली कदम यांची निवड; "विजयाचे श्रेय जनतेलाच, निवडणुकीत युवा पिढीचा सक्रिय सहभाग" - सह्याद्रीभय्या कदम



फलटण, दि.२० : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांच्या गिरवी गावच्या सरपंच पदी सह्याद्रीभय्या कदम गटाच्या वैशाली कदम यांचा विजय झाला.



फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी फलटण येथील शासकीय गोदाम या ठिकाणी पार पडली. फलटणचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी मतमोजणी झाल्यानंतर फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर केला.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


गिरवी ग्रामपंचायतीच्या या पंचवार्षिक निवडणुकीत सह्याद्रीभय्या कदम गटाच्या जय तुळजाभवानी पॅनेलने सरपंच पदासह ९ जागांवर विजय मिळवून गिरवी ग्रामपंचायतीत सत्ता काबीज केली. 




फलटण तालुक्यातील युवा नेते सह्याद्रीभय्या कदम वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"गिरवी ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे संपूर्ण श्रेय जनतेलाच जाते. निवडणुकीत तरुण पिढीचा सक्रिय सहभाग होता. आमच्या जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन व तरुण पिढीची साथ अत्यंत मोलाची ठरली.   रस्ते, पाणी हे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विशेष लक्ष देऊन, गिरवी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया गिरवी गावचे युवा नेते सह्याद्रीभय्या कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




फलटण तालुक्यातील गिरवी ग्रामपंचायत निवडणुकीत  विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे : -

१) ताई जाधव  २)संतोष मदने

३)सोनाली कदम  ४)दत्ताजी कदम


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now



५)नवनाथ जाधव  ६)विद्या कदम

७)अमित फाळके   ८)पूनम कदम





९)अमित निकाळजे  १०)आश्विनी निकाळजे

११)श्रीकृष्ण कदम  १२)आश्विनी नितीन निकाळजे

१३)रंजना मदने





"गिरवी गावचे युवा नेते, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ सह्याद्रीभय्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व विजयी सदस्य एकजुटीने काम करू." अशी प्रतिक्रिया गिरवी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सदस्य दत्ताजी कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांच्यासारख्या अभ्यासू व दूरदृष्टी असणाऱ्या लोकनेत्याचा वारसा गिरवी गावाला लाभलेला आहे.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


Monday, December 19, 2022

"राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी दमदार गौरवास्पद कामगिरी करून, महाराष्ट्राच्या संघात पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला व प्राईड इंग्लिश स्कुलच्या "या" तीन खेळाडूंची निवड; महाराष्ट्र संघाच्या संघ व्यवस्थापकपदी प्रियदर्शनी विद्यामंदिरचे क्रीडाशिक्षक संदीप भोसले यांची निवड"...


पुणे, दि. १९ : पुणे शहरातील धनकवडी येथील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असते.



टेनिस हॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेत रणवीर भोसले, श्रेया ढवान, प्रांजल सूर्यवंशी यांची दमदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघात निवड झाली. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


ओडिसा येथे 23 ते 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये प्रियदर्शनी विद्यामंदिरचे 2 खेळाडू व प्राईड इंग्लिश स्कूलचा 1 खेळाडू  अश्या तीन खेळाडूंची निवड झाली.


  
टेनिस हॉलीबॉल महाराष्ट्र संघाचे संघव्यवस्थापक म्हणून प्रियदर्शनी विद्यामंदिर धनकवडीचे क्रीडाशिक्षक संदीप भोसले यांची निवड झाली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


जालना येथील 1 ते 3 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल युथ व मिनी  मुले, मुली स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करत मिनी मुली व मिनी मिश्र डबल टेनिस हॉलीबॉल स्पर्धेत राज्यांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.




या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा कडून मिनी बॉईज रणवीर भोसले (संघनायक) राजवीर भोसले, वेदांत म्हमाने, लोकेश वायबसे, कुशल राठोड, समर्थ नांगरे. मिनी गर्ल्स कडून श्रेया ढवाण (संघनायक)प्रांजल सूर्यवंशी, रुद्रानी उत्तेकर, समृद्धी सपकाळ, दिया झगडे, मयुरी तोडकर.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मिक्स डबल  टेनिस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये-  शिवम कदम व सोनाक्षी कदम.  युथ मुले टेनिस हॉलीबॉल  स्पर्धेमध्ये  हर्ष खोत, पार्थ राजने, सिधन देबर्मा, संग्राम थोरात, वेदांत सोनवणे, वरद नाईक हे 20 खेळाडू खेळले.या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील तीन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. 



रणवीर भोसले (प्राईड इंग्लिश स्कूल पुणे).श्रेया ढवान व प्रांजल सूर्यवंशी (प्रियदर्शनी विद्यामंदिर धनकवडी पुणे)या सर्व खेळाडूंचे व व्यवस्थापकांचे दोन्ही शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक  आप्पासाहेब रेणुसे व स्वीकृत नगरसेवक युवराज रेणुसे (अध्यक्ष टेनिस हॉलीबॉल असोसिएशन पुणे शहर), डॉक्टर संतोष पवार (सचिव टेनिस हॉलीबॉल असोसिएशन पुणे शहर), प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजश्री दिघे, रूपाली मालुसरे, शर्मिला पांडे यांनी अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Wednesday, December 14, 2022

"महाराष्ट्रात ७० हजार कोटींच्या "या" प्रकल्पांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता; पुण्यात १० हजार कोटींचा "या" नामांकित कंपनीचा देशातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प सुरू होणार"


मुंबई, दि. १४ : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उद्योगवाढीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.




अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची विशेष गरज लक्षात घेता त्यापद्धतीने औद्योगिक तंत्रज्ञान उद्यान विकसीत करण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मंत्रालयात उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक  झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, औद्योगीक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.




राज्यातील उद्योग घटकांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने यापूर्वी केलेल्या शिफारशींचा विचार करुन या उद्योग घटकांना प्रोत्साहन अनुदान तसेच अन्य मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत राज्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित तसेच अविकसित असलेल्या भागांमध्येही मोठ्या उद्योगांना चालना मिळावी व त्याबरोबरच या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रिमंडळ उप समितीने मोठे निर्णय  घेतले आहेत.




विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३ मोठे प्रकल्प उभारण्याकरिता मंत्रिमंडळ उप समितीने मान्यता दिलेली आहे. यात २० हजार कोटी गुंतवणूकीचा हरित तंत्रज्ञानावर आधारीत मे. न्युईरा क्लिनटेक सोल्युशन्स प्रा. लि. या घटकाचा चंद्रपूर येथे कोल गॅसिफिकेशन प्रकल्प (हरित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया व युरिया इ.) चा समावेश आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन उद्योग उभारणीस मदत होणार आहे. या भागाचा रोजगार निर्मितीबरोबरच सामाजिक व आर्थिक विकासास हातभार लागणार आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


देशाच्या व राज्याच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीनुसार देशातील इलेक्ट्रीक व्हेईकल निर्मितीच्या क्षेत्रातील दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रीक व्हेईकल ऑटोमोबाईल्स पहिला प्रकल्प पुणे येथे सुरू होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत घटकामध्ये विदेशी गुंतवणूक होणार असून, व्होक्सवॅगन यांच्याबरोबर तंत्रज्ञान विषयक तसेच पुणे या ठिकाणी तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाईप बनविण्यात येणार आहे. 


यामुळे राज्यात ईलेक्ट्रीक व्हेईकल निर्मिती संदर्भात IP (Intellectual property) (बौद्धिक संपदा) तयार होत असून, त्याची व्याप्ती "मेड इन महाराष्ट्र" अशी होईल. या प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सहयोगी उद्योगांची निर्मिती होईल.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


गडचिरोली जिल्ह्यात मे. लॉयड मेटल्स एनर्जी लि. या घटकाचे खनिज उत्खनन व प्रक्रिया याद्वारे स्टील निर्मितीचा प्रकल्प उभारण्यास व एकूण २० हजार कोटी गुंतवणूक करण्यास मंत्रिमंडळ उप समितीने मान्यता दिली. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होण्यास व त्या संदर्भातील आवश्यक उद्योग वाढीसोबतच रोजगार निर्मितीवर होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात मे. वरद फेरो अलॉय ही कंपनीच्या १५२० कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पाला देखील मान्यता देण्यात आली. 


गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग स्थापित होण्यास बळ मिळणार असून या भागात औद्योगिक क्षेत्रामध्ये नवनवीन उद्योगांची वाढ होण्यास मदत होणार आहे. अमरावती व नागपूर विभागात वस्त्रोद्योग वाढीस चालना मिळावी यासाठी इंडोरामा कंपनीच्या उपकंपन्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करता यावी, यासाठी त्यांच्या २५०० कोटीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. ज्यामुळे, अमरावती व नागपूर हे वस्त्रोद्योग उद्योगामध्ये मोठी क्षेत्रे म्हणून उदयास येतील.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या निप्रो फार्मा पॅकेजींग इंडीया प्रा. लि. ही कंपनी पुणे जिल्ह्यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारीत Pharmaceutical Glass Tubing Production या अंतर्गत घटक Clear Glass Tubing. Dark Amber Glass Tubing, Syringe & Cartridge Tubing या उत्पादन निर्मितीकरीता दोन फेजमध्ये रु. १६५० कोटीची गुंतवणूक करणार आहे. 


प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार निर्मिती उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत ही उत्पादने आयात केली जातात, अशा प्रकारचा उद्योग महाराष्ट्रात प्रथमच सुरू होणार आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


रिलायन्स लाईफ सायन्स नाशिक कंपनीच्या ४२०६ कोटी प्रस्तावित गुंतवणूकीस मान्यता देण्यात आली आहे. ही कंपनी प्लाझा प्रोटीन, व्हॅक्सीन आणि जीन थेरपी इ. जीवरक्षक औषधांची निर्मिती करणार असून हा प्रकल्प  आयात पर्यायी प्रकल्प असणार आहे. या मुख्य प्रकल्पांसोबतच इतर अन्य प्रकल्पांसह राज्यात ७०,००० कोटींची गुंतवणूक व सुमारे ५५००० एवढी रोजगार निर्मिती होणार आहे.


Thursday, December 8, 2022

महाराष्ट्रात "इतके" हजार तलाठी भरती व "इतके" मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरू होणार - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील; तलाठी पदभरती व मंडळ अधिकारी पदोन्नतीचा "हा" महत्वपूर्ण शासन निर्णय वाचा सविस्तर"


मुंबई, दि. 8 : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.


गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. मंत्री श्री. विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते.तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.




तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या 3 हजार 110 साझे आणि 518 महसुली मंडळ कार्यालयासाठी 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुणे महसुली विभागाअंतर्गत एकूण 602 तलाठी साझे आणि 100 महसुली मंडळे आहेत. अमरावती महसुली विभागाअंतर्गत एकूण 106 तलाठी साझे आणि 18 महसुली मंडळे आहेत. 


शासन निर्णय वाचण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा : - 





नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण 478 तलाठी साझे आणि 80 महसुली मंडळे आहेत. औरंगाबाद महसुली विभागाअंतर्गत एकूण 685 तलाठी साझे आणि 114 महसुली मंडळे आहेत. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


नाशिक महसुली विभागाअंतर्गत एकूण 689 तलाठी साझे आणि 115 महसुली मंडळे आहेत. कोकण महसुली विभागाअंतर्गत एकूण 550 तलाठी साझे आणि 91 महसुली मंडळे आहेत.


शासन निर्णय वाचण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा  : - 




Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now