Wednesday, November 2, 2022

"शिंदे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला "एवढे" हजार रुपये मिळणार निर्वाह भत्ता; परदेशातील उच्च शिक्षणासाठीही "ही" योजना सुरू करण्याचा निर्णय"...



मुंबई, दि. 02 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.




छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now



मंत्री श्री. पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबर पासून 100 मुलांचे वसतीगृह सुरु होईल यांचे कालबद्ध नियोजन करावे, तसेच याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी तसेच वसतीगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्योती, संबंधित जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करावी.




केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या योजनेअंतर्गत देशातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ/संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतक्या मर्यादेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.


या योजनेंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य याकरिता रुपये 50 हजार रुपये देण्यात येणार असून विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी ची प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व भोजन शुल्क रक्कम अदा करण्यात येणार आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थीं परदेशातील नामांकित विद्यापीठामधील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी प्रती वर्षी रुपये 30 लाख मर्यादेत आणि पीएचडी साठी रुपये 40 लाखाच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले.

Friday, October 7, 2022

"शिंदे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, एसटी संपाच्या काळातील बडतर्फ ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देश; एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात "इतक्या" इलेक्ट्रिक व सीएनजी बसगाड्यांचा समावेश होणार"...



मुंबई, दि. ७ : एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे,  त्या माध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले.




परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली.  


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांचेसह राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार या बैठकीस उपस्थित होते.




११८ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना


संपकाळात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते, त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती, या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.




इलेक्ट्रिक, सीएनजीवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार


लोकसंख्येचा भार वाढला त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असून ही संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेतली जाणार असून ५०० नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


सुमारे एक हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतरण करण्यात येत असून जून २०२३ पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिकवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील त्यातून प्रवाशांना आरामदायी, पर्यावरणपूरक प्रवासाचा आनंद घेता येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ५४ लाख ज्येष्ठांचा मोफत प्रवास


सामाजिक बांधिलकी म्हणून विविध  घटकांना एसटीच्या २१ सवलती दिल्या जातात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत देणारा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे, सरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत ५४ लाख ज्येष्ठ प्रवाशांनी लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाचे कौतुक केले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मालवाहतूक सेवेतून १०७.८० कोटींचे उत्पन्न


एसटीचे महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरु केलेल्या मालवाहतूक सेवेतून आजपर्यंत सुमारे १०७.८० कोटींचे उत्पन्न मिळाले असून या सेवेद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्न धान्याची वाहतूक करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


‘डीबीओएलटी’ तत्वावर बसपोर्टचा होणार विकास


एस.टी. महामंडळाच्या सुमारे ८१२ ठिकाणी १४२३.९० हेक्टरच्या जागा असून त्यातील ५ शहरातील १८ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा डीबीओएलटी (डिझाईन-बिल्ड- ऑपरेट-लीज-ट्रान्सफर) तत्वावर विकसित करण्यात येणार आहेत. 



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


त्यातून सुमारे ३ हजार ८०० कोटीपेक्षा अधिक महसूल मिळणार आहे. हे करताना त्या जागा केवळ व्यावसायिक वापरासाठी विकसित न करता निवासी- वाणिज्य या संमिश्र वापरासाठी करा आणि तसा आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा


महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची स्थिती, वाहतूक नियमांचे पालन आदी गोष्टींवर भर देऊन व्यापक उपाययोजना करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Wednesday, October 5, 2022

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे "ऐतिहासिक शाही दसरा" सोहळा पारंपरिक पद्धतीने,भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न; डोळ्यांची पारणे फेडणारी शाही दसरा सोहळ्याची "ही" छायाचित्रे अप्रतिम"



पुरंदर, वीर, दि.५ :  महाराष्ट्रातील महान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे डोळ्यांचे पारणे फेडणारा, ऐतिहासिक 'शाही दसरा' सोहळा पारंपारिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात मंत्रमुग्ध होऊन, बुधवारी उत्साहात संपन्न झाला.




श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक विजयादशमीनिमित्त, श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पालखी व वस्त्र परिधान केलेल्या व फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठया, छबिन्यासह निशाण, छत्री, अब्दागिरी या लवाजम्यासह सायंकाळी साडेचार वाजता भक्तिमय वातावरणात सीमोल्लंघनासाठी निघाल्या. 



या ऐतिहासिक दसरा सोहळ्यावेळी सालकरी, मानकरी, दागिनदार, वीर देवस्थानचे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ, भक्त उपस्थित होते.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now



"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर येथील शाही दसरा सोहळ्याची भक्त मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षीचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा भक्तिमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.




श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने तुकाई देवीची भेट घेऊन पारंपारिक पद्धतीने शाही दसऱ्याचे सीमोल्लंघन करून, गावाच्या वेशीवर विधिवत आपटा पूजन केले.





श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने पारंपारिक पद्धतीने गाव प्रदिक्षणा पूर्ण करून रात्री 8.30 वाजता मंदिरात आल्यानंतर, भक्तिमय वातावरणात छबीना  संपन्न झाला.




Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या ऐतिहासिक शाही दसऱ्याच्या सोहळ्यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तवर्ग खूप आतुरतेने व आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतो.



श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीला फुलांची केलेली आकर्षक सजावट तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, आनंदमय वातावरणात फटाक्यांची केलेली आतिषबाजी, सुशोभिकरण केलेला पालखी मार्ग, फुलांची उधळण व "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात संपूर्ण भक्तवर्ग आनंदमय व भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाला.




पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्र उत्सव व शाही दसरा, ऐतिहासिक वीर गावच्या भक्तिमय संस्कृतीचे दर्शन घडवतो.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



"अश्विन शु. १ ते अश्विन ९ असा नऊ दिवसाचा कालखंड म्हणजे वीर गावातील छबिना व उपवास  यांची लगबग. छबिना उतरला की एक वेळ फराळ करून नवमीला उपवास सुटल्यावर विजयादशमी दसरा सोहळा म्हणजे वीर मधील दिवाळीच होय. या दिवशी सर्व काट्या, ढोल, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांची पालखी भक्त कमळाजी यांना भेटून तुकाई टेकडीवर तुकाई देवी मंदिर येथे आल्यावर शाही शस्त्रपूजन ब्राह्मण व धुमाळ परिवार, पाटील यांचेकडून होते."


"यानंतर पुढे सर्व पालख्या भक्तभेट घेऊन दसरा टेकडी म्हणजे सरदार लखोजीराजे धुमाळ व सरदार नाथाजी धुमाळ यांची समाधी असणाऱ्या टेकडीवर येतात. दसरा टेकडीवर शिवकालीन  असणाऱ्या समाधी ठिकाणी धुमाळ परिवाराकडील शस्त्र पूजन होते. तेथे पालखी विसावा आहे. तेथे सर्व गाव, मानकरी,सालकरी,भक्त या ठिकाणी आपट्याच्या पानांचे सोने लुटून दोन्ही पालखी व समाधीचे दर्शन घेऊन फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. "



"यानंतर पालखी ग्रामप्रदक्षिणा करून पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ होते. मंदिरात नेहमी प्रमाणे विधिवत आरती होऊन पालखी विसावते नंतर सर्व दागिनदार , व भक्त यांना देवाचा प्रसाद म्हणजे पगार दिला जातो. हा सोहळा याची डोळा याची देही पाहिले शिवाय समजत नाही, मग सर्वांना आतुरता राहते ती माघ पौर्णिमाची." अशी प्रतिक्रिया वीर गावचे इतिहास अभ्यासक  बापूसाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


"प्रत्येक वर्षी सर्व भक्तगण या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याची भक्तिभावाने वाट पाहत असतो. यावर्षी पारंपारिक पद्धतीने, उत्साहाच्या वातावरणात,खुप आनंदाने शाही दसरा सोहळा पार पडला.





"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील "ऐतिहासिक शाही दसरा सोहळा" अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकत्र जोडणारा व ऐतिहासिक वीर गावच्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसऱ्याची वैभवशाली परंपरा सर्व भक्तगण अभिमानाने व भक्तिभावाने जोपासत असतात."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.



श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा प्रत्येक वर्षी भक्तांसाठी आनंदमय वातावरणात, भक्तिमय संस्कृतीने समृद्ध करणारा असतो.



Tuesday, September 27, 2022

"सवाई सर्जाचं चांगभलं" भक्तीमय जयघोषात; महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील 'ऐतिहासिक नवरात्रोत्सवातील घटस्थापना सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न"...


पुरंदर, वीर, दि.२७ :  महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान  क्षेत्र वीर येथे "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या भक्तिमय नादघोषात, पारंपरिक पद्धतीने घटस्थापना सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. 




तीर्थक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात सोमवारी आश्विन शुद्ध प्रतिपदा या मुहूर्तावर  साडे अकरा वाजता घटस्थापना करण्यात आली.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यावेळी देवस्थान ट्रस्टचे सालकरी, मानकरी, दागिनदार, गुरव, पुजारी, उपासकरी,  पुरोहित व  देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. 




कोरोनाचे संकट दूर झाल्यापासून पुणे  जिल्ह्यातील  तीर्थक्षेत्र वीर  येथे भक्तांची देव दर्शनासाठी, आणि श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी वाढत आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  नवरात्रोत्सवानिमित्त  पिण्याचे स्वच्छ पाणी व्यवस्था, मंदिर स्वच्छता, दर्शन बारी, मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई  देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आलेली  आहे. 




नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात पोलिस बंदोबस्त तसेच जादा होमगार्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मंदिरात स्वयंसेवक व कर्मचारी कार्यरत आहेत. 




यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, व सर्व विश्वस्त उपस्थित होते.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील नवरात्रोत्सव पारंपारिक पद्धतीने,भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो." असे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी सांगितले.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरामध्ये नवरात्रोत्सवात, सालाबाद प्रमाणे "श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी" पारायण  सोहळ्याचे नियोजन देवस्थान ट्रस्टतर्फे उत्तम पद्धतीने केले जाते.

Sunday, September 25, 2022

"महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर; चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री; सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूरचे "या" नेत्यांकडे पालकमंत्रीपद"...



मुंबई, दिनांक २५ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. राज्यात सरकार स्थापनेनंतर तब्बल पावणेतीन महिन्यानंतर जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले. 




उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


जिल्ह्यानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे : 


१)राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, सोलापूर


२)सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर,गोंदिया


३)चंद्रकांत दादा पाटील - पुणे


४)विजयकुमार गावित - नंदुरबार


५)गिरीश महाजन - धुळे,लातूर, नांदेड




६)गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव


७)दादा भुसे - नाशिक


८)संजय राठोड - यवतमाळ, वाशिम


९)सुरेश खाडे - सांगली


१०)संदिपान भुमरे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


११)उदय सामंत - रत्नागिरी, रायगड


१२)तानाजी सावंत - परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)


१३)रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग


१४)अब्दुल सत्तार - हिंगोली


१५)दीपक केसरकर - मुंबई शहर ,  कोल्हापूर


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



१६)अतुल सावे - जालना, बीड


१७)शंभूराज देसाई - सातारा, ठाणे


१८)मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now