Wednesday, May 31, 2023

"रायगडावर ३५० वा ऐतिहासिक शिवराज्यभिषेक वर्ष सोहळा "या" सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार; शिवकालीन शस्त्रप्रदर्शनासह, जाणता राजा महानाट्याचे "या" ठिकाणी मोफत आयोजन; महाराष्ट्रातून रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी "या" आहेत आरोग्य सुविधा, "अशी" असेल वाहनतळ व्यवस्था"


मुंबई, दि. ३१ : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून, कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. 




शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. 




मंगळवार, ६ जून रोजी देखील सकाळी ८.३० वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचाड येथे १ ते ६ जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


गेटवे ऑफ इंडिया येथे ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन


याशिवाय, १ जून ते ७ जून या काळात गेटवे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


१ जून रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य, २ जून रोजी राजस्थानी लोककला, ३ व ४ जून रोजी महाराष्ट्राची लोककला तसेच ५ ते ७ जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच १ ते ७ जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.




३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विनामूल्य सन्मानिका श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दामोदर हॉल, परळ, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, गडकरी रंगायतन, ठाणे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे, येथे उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.




शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज


छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दि.2 व 6 जून 2023 रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास येणाऱ्या शिवभक्त जनतेसाठी अत्यावश्यक सेवा, सोयीसुविधांसह त्यांच्या स्वागत आणि  तत्पर सेवेसाठी  प्रशासन सज्ज झाले आहे. 




या शिवराज्याभिषेकाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणारी शिवभक्तांची प्रचंड गर्दी पाहता रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने 33 समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शिवभक्तांच्या आरोग्यासाठी सुविधा


नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने राज सदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, नियंत्रण कक्ष, निवारा कक्ष, आराम कक्ष या ठिकाणी त्याचबरोबर एसटी वाहन चालक, पोलीस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत.




शिवभक्तांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या 4 तर बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या 16 ॲब्म्युलन्स  सज्ज ठेवल्या आहेत. पार्किंग, गड पायथा, पायरीमार्गावर प्रत्येकी 300 मीटर अंतरावर आणि गडावर आरोग्य अधिकारी, तज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पुरेसा औषधसाठा यासह एकूण 24 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून 104 डॉक्टर्स व 350 आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सज्ज ठेवण्यात आले आहेत.


सोहळ्यावर राहणार सीसीटीव्ही, ड्रोनचे लक्ष


सोहळ्याला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम, वॉकी टॉकी, हॅम रेडिओ, पोर्टेबल साऊंड, सर्च लाईट, वीज अटकाव यंत्रणा आदि साधन-साहित्यांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


यासह सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी  नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे.


अग्निशमन व्यवस्था सज्ज


पार्किंग, बस डेपो, गड पायथा, गडावरील सर्व मंडप, भोजन कक्ष अशा सर्व आवश्यक  ठिकाणी एकूण चार अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.


शिवभक्तांच्या वाहनांकरिता वाहनतळ व्यवस्था; एसटीच्या 150 बसेस तैनात 


संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मार्गांनी रायगड किल्ल्याकडे येणाऱ्या शिवभक्तांसाठी सोयीस्कर वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर महाड नातेखिंड या मार्गाने येणाऱ्या वाहनांकरिता कोंझर पार्किंग क्रमांक एक व कोंझर पार्किंग क्रमांक दोन, वालसुरे पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, पेण, कोलाड, माणगाव, धनगर फाटा, कवळीचा माळ तसेच पुणे, ताम्हाणी,निजामपूर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था ही कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. 



वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत 150 बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


रायगड जिल्हा प्रशासनातर्फे मंडप, वीजपुरवठा, गर्दी नियंत्रण, अग्निशमन, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे व वापरावयाचे पाणी, भोजन, स्नानगृह व शौचालय, स्वच्छता, कचरा, परिवहन, पार्किंग, रोप-वे, रस्ते, मोबाईल नेटवर्क, पोलीस बंदोबस्त, सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ल्याचे सौंदर्यीकरण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध बाबींचे  नियोजन करण्यात आले  आहे.

Friday, May 12, 2023

"शासन आपल्या दारी" या महत्वपूर्ण अभियानाचा "या" जिल्ह्यातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शुभारंभ; या अभियानाची "ही" आहेत खास वैशिष्टे; प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ, शासनाच्या "या" महत्त्वाच्या योजनांचा, उपक्रमांचा जनतेला मिळणार लाभ"


मुंबई, दि. १२ : सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागांशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी “शासन आपल्या दारी” या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.  




यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या (दि.१३ मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.




सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन आता थेट जनतेच्या दारी जाणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हाच आहे. हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ मिळणार आहे. याशिवाय शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीतकमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळणार आहे. पहिल्यांदाच सर्व प्रशासन “हर घर दस्तक” च्या माध्यमातून प्रत्येकाला या योजनेची माहिती देणार आहे.




“शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी हे अभियान असणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. या उपक्रमाचा शुभारंभ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे होणार आहे. 




या अभियानाच्या माध्यमातून राज्य शासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून  या अभियाना अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा देण्यात येणार आहेत.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


सर्व जिल्ह्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना शासनाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी “शासन आपल्या दारी” हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे हा या अभियानाचा उद्देश आहे. “शासन आपल्या दारी” या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभांसाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. 


नागरिकांना व विद्यार्थ्यांना विविध कामांसाठीचे लागणारे आवश्यक दाखले व सेवा एकाच छताखाली ‘शासन आपल्या दारी’ शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. या कामांसाठी त्यांना लागणारे परिश्रम व वेळ वाचणार आहे. नागरिक व विद्यार्थी यांना शैक्षणिक दाखले, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, आधिवास प्रमाणपत्र, पॅनकार्ड असे अनेक दाखले व सेवा प्राप्त करून घेण्यासाठी विविध कार्यालयांना जावे लागते व अनंत अडचणी येत असतात.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


 परंतु शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व अधिकारी उपस्थित राहणार असून त्याच ठिकाणी सर्व सेवा व सुविधा नागरिकांना मिळणार आहे. खेड्यापाड्यातील नागरिकांना माहितीच्या अभावी वारंवार विविध कार्यालयांना ये -जा करावी लागते. बऱ्याचदा आवश्यक कागदपत्र त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणाच आपल्या घरा-दारापर्यंत उपस्थित झालेली आहे.


महारोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन : -

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.


‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिर आयेाजित करण्यात आले आहे.


“शासन आपल्या दारी” अभियानाची वैशिष्टये : -


राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्येहा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.




जिल्हाधिकारी“शासन आपल्या दारी” अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहे.




स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्याचे ध्येय सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुका स्तरावर 2 दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


मंत्रालयीन स्तरावरील सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्यशासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असतात. शासकीय यंत्रणा सदर योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. 


शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. काही वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही. या अभियानातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर भर असणार आहे.

Tuesday, April 25, 2023

"लोकनेते शरद पवार यांनी 'खास सन्मानित' केलेले पुरंदरचे लोकप्रिय युवा नेते पुष्कराज जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तन सोहळ्याची पर्वणी"




पुरंदर, परिंचे, दि. २५ : "लोकनेते शरद पवार यांनी 'खास सन्मानित' केलेले पुरंदरचे लोकप्रिय युवा नेते पुष्कराज जाधव यांचा वाढदिवस सोमवारी पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे आनंददायी व उत्साहमय वातावरणात, मान्यवरांच्या उपस्थितीत व शेकडो, हजारो लोकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.




पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  पुष्कराजभैय्या जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त  महाराष्ट्रभुषण,प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा भव्य कीर्तन सोहळा सोमवारी दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी, ग्रामपंचायत कार्यालय परिंचे या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत, आध्यात्मिक वातावरणात, उत्साहात संपन्न झाला.




या कीर्तन सोहळ्यासाठी पुरंदर तालुक्यातील, ग्रामीण भागातील शेकडो, हजारो लोकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात पुष्कराज जाधव यांनी वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवून नागरिकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.




'पाणपोई' हा एक सामजिक उपक्रम व तहानलेल्यांना पाणी पाजणे हे पुण्याईचे काम म्हणून पुष्कराजभैय्या जाधव मित्र परिवार तर्फे मागील वर्षी नागरिकांसाठी परिंचे येथे पाणपोई सुरू करण्यात आलेली आहे.




आजच्या काळात 'पाणपोई' लुप्त होऊ लागल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातुन येणाऱ्या नागरिकांची विकतची पाणी पिण्याची जास्त मानसिकता नसते.त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॅाटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात.वास्तविक तहान कमी झालेली नाही.परंतु समाजातला सेवाभाव संपत चालल्याने पाणपोईची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


उन्हाची तीव्रता जास्त जाणवत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थी ,अबालवृध्द महिला व वयस्कर व्यक्तींना तहान लागल्यास हॅाटेल व चहाच्या टपरीचा आधार घ्यावा लागतो.त्यामुळे आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो या सामजिक बांधिलकीतुन ,नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतुने पुरंदर तालुक्यातील परिंचे या ठिकाणी रयत शिक्षण संस्था शाळा , ग्रामपंचायत समोर बाजार पेठ येथे व श्रीनाथ मंदिर परिसर या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री पुष्कराज भैय्या जाधव मित्र परिवाराच्या वतीने 'पाणपोई' सुरू करण्यात आलेली आहे. या सामाजिक उपक्रमाचे लोकांकडून कौतुक करण्यात आलेले आहे.




पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धा आयोजित करून पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक  अध्यक्ष पुष्कराज जाधव हे तरुणांमध्ये लोकप्रिय झालेले आहेत.



पुष्कराज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण सहकाऱ्यांची व तरुण मित्रांची उपस्थिती लक्षणीय होती.




पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पुष्कराज भैय्या जाधव यांचा वाढदिवस परिंचे येथे मोठ्या उत्साहात, आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष अभिष्टचिंतन कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध समाज प्रबोधनकार, कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांच्या कीर्तन सोहळ्याची पर्वणी शेकडो, हजारो लोकांना अनुभवता आली.




सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, औद्योगिक, राजकीय,  क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पुष्कराज जाधव यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, ज्येष्ठ नेते सुदामराव इंगळे, पुरंदरचे नेते बबूसाहेब माहूरकर, श्यामकांत  भिंताडे ,सतीश शिंदे, शरद जगताप, श्री विजय जगताप (कात्रज डेअरी) व तसेच श्री प्रभाकर कदम ,( बाबा) जगताप , तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्कराज जाधव यांना शुभेच्छा दिल्या.


पुष्कराज जाधव यांनी पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, लोकनेते शरद पवार यांनी मार्गदर्शन केलेला "शेतकरी संवाद" हा कार्यक्रम आयोजित करून तसेच वेगवेगळी आंदोलने करून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे.


Friday, April 14, 2023

३०० वर्षांपेक्षा जास्त ऐतिहासिक परंपरा असलेली, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील "जिंती गावची ऐतिहासिक बगाड यात्रा" उत्साहात, भक्तिमय वातावरणात संपन्न'; महाराष्ट्रातील,सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जिंती गावचा "असा" असतो ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळा,वाचा सविस्तर"...



फलटण, जिंती, दि.१४ : सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील जिंती गावची ३०० पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेली श्री जितोबा देवाची ऐतिहासिक बगाड यात्रा गुलाल - खोबऱ्यांची उधळण करीत, "जितोबाच्या नावानं चांगभलं" च्या गजरात, भक्तीमय वातावरणात पार पडली. 




ही ऐतिहासिक परंपरा सुमारे ३०० पेक्षा जास्त वर्षांपासून ग्रामस्थांनी भक्तिभावाने जोपासली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन, पुणे,सांगली, सातारा जिल्ह्यातुन हजारो भाविक भक्त उपस्थित होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळ्याचे जिंती ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या माध्यमातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.




"महाराष्ट्रातील,सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जिंती गावचा "असा" असतो ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळा : - 



सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील जिंती गावचा जितोबा देवाचा ऐतिहासिक बगाड यात्रेचा सोहळा पाच दिवस चालू असतो. 




या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यात पहिल्या दिवशी श्री जितोबा देवाचा व जोगेश्वरी देवीचा हळदी समारंभ संपन्न होतो. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


यानंतर दुसऱ्या दिवशी श्री जितोबा देवाचा व जोगेश्वरी देवीचा लग्न समारंभ पारंपरिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न होतो.




या यात्रा सोहळ्यातील तिसरा दिवस यात्रेचा महत्त्वाचा दिवस श्री जितोबा देवाचे बगाड. या ऐतिहासिक बगाड सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक भक्त उपस्थित राहतात.




यात्रेच्या चौथ्या दिवशी श्री जितोबा देवाचा पहाटे चार वाजता छबिना भक्तिमय वातावरणात संपन्न होतो. त्या दिवशी चार वाजता कुस्तीचा आखाडा रंगतो. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पाचव्या दिवशी पाकाळणी होऊन अशा प्रकारे प्रसिद्ध जिंती गावची श्री जितोबा देवाची ऐतिहासिक बगाड यात्रा पार पडते.




ही ऐतिहासिक यात्रा पार  पडत असताना श्री जितोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे ऐतिहासिक बगाड हे बगाड सोमवार, बुधवार ,आणि शनिवार या वारी होत नाही. 



श्री जितोबा देवाची यात्रा चैत्र शुद्ध कालाष्टमीला सुरू होते. श्री जितोबा देवाच्या बगाडाच्या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे श्री जितोबा देवाच्या यात्रेत समाजातील सर्व घटकांना, अठरापगड जातीतील लोकांना मान असतो .




या ऐतिहासिक बगाड सोहळ्याची सुरुवात हराळी वैष्णव मठापासून म्हणजे हराळी समाजातील मठ म्हणजेच या लोकांचा एकत्रित देव्हारा होय. या देव्हाऱ्यासमोर श्री जितोबा देवाचे मानकरी, बगाडी यांना पोशाख परिधान करण्यात येतो. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


या पोशाखाचा मान "वाकी या गावातील भक्ताचा" असतो. यावेळेस जिंती गावातील सर्व लोक उपस्थित असतात. 




श्री जितोबा देवाचे मानाचे बगाडी यांना पोशाख झाल्यावर गोसावी समाजाचे लोक नातपंथाचे पद म्हणतात. यानंतर बगाडी पालात ढोल - ताशांच्या गजरामध्ये श्री जितोबा देवाच्या मंदिराकडे मार्गस्थ होतात.




यावेळेस गुलालाची उधळण होते.हजारो भाविक भक्त हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. यावेळी श्री जितोबा देवाचे मानाचे बगाडी श्री जितोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ होतात. श्री जितोबा देवाचे दर्शन झाल्यानंतर श्री जितोबा मंदिरा मधील दीपमाळेचे दर्शन घेऊन श्री जितोबा देवाचे बगाडी बगाडाकडे प्रस्थान करतात.




हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्त उपस्थित असतात. श्री जितोबा देवाचे बगाडी बगाडावर गेल्यावर श्री जितोबा मंदिराकडे तोंड असते या वेळेस श्री जितोबा देवाचे ऐतिहासिक, पारंपरिक बगाड   सुरू झालेले असते. हा बगाड सोहळा 15 ते 20 मिनिटं सुरू असतो.




या ऐतिहासिक बगाड सोहळ्यात  सनई, चौघड्याचा निनाद तसेच ढोल -  ताश्या, बँड, आणि "जितोबाच्या नावानं चांगभलं" हा गजर सर्वत्र चालू असतो.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या सोहळ्यात फटाक्यांची अतिषबाजी होते. या 15 ते 20 मिनिटांमध्ये श्री जितोबा देवाची भाकणूक यामध्ये ठरत असते. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात.




हे ऐतिहासिक बगाड झाल्यानंतर बगाडी बगाडावरून आपले अंग पूर्णपणे मागे टाकून देतात. यानंतर सर्व भक्त या बगाड्याला झेलतात यानंतर  त्यांच्या पायावर पाणी टाकले जाते. यानंतर बगाड्याच्या कानामध्ये सनई वाजवून जागं केलं जातं. जागे झाल्यावर बगाडी ढोल, सनई चौघड्याच्या ताशामध्ये भक्तिमय वातावरणात खेळतात .खेळताना त्यांना स्नान घातले जाते .यानंतर श्री जितोबा देवाचा वर्षभराचा पारंपरिक भाकणूक सोहळा संपन्न होतो.




ही पारंपरिक भाकणूक झाल्यावर किरणाच्या जागेचा रस्ता मोकळा करण्यात येतो. किरण म्हणजे श्री जितोबा मंदिरासमोर बगाडी मानकऱ्याकडून गोल उडी मारली जाते. यानंतर बगाडी  पारंपरिक मठाकडे प्रस्थान करतात. अशा प्रकारे हा जिंती गावचा  ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होतो.




"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या आमच्या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रेला ३०० पेक्षा जास्त वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक - भक्त आमच्या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रेसाठी उपस्थित राहतात.  जिंती ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या माध्यमातून या ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळ्याचे चांगले नियोजन केले जाते." अशी प्रतिक्रिया जिंती गावचे ग्रामस्थ, भक्त दिपक रणवरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारी ही जिंती गावची ऐतिहासिक बगाड यात्रा भक्तीचा वारसा समृद्ध करते.