Wednesday, February 12, 2025

महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांना भक्तीचे वेड लावणारा, माघ पौर्णिमेच्या चांदण्या रात्री रंगला श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मातेचा पारंपरिक विवाह सोहळा; श्री क्षेत्र वीर येथे सवाई सर्जाचं चांगभलं च्या जयघोषात मंत्रमुग्ध झाला लाखो भाविक - भक्तांचा जनसागर".

पुरंदर, वीर, दि.१२ :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा मंगळवारी मानकरी, सालकरी, पाटील, पुरोहित  यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, माघ पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात, ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहात, पारंपारिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला भक्तीची ऊर्जा देणारा महाउत्सव असतो.

क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या पारंपरिक विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेला लाखो भाविक भक्तांचा जनसमुदाय "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात, भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन गेला.

मंगळवारी पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा  खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध  श्री क्षेत्र कोडीतची मानाची काठी - पालखी घेऊन  मानकरी, सालकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी आठ वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर, देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, सर्व विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांची सन्मानाने भेटाभेट होऊन, वाजत गाजत स्वागत करण्यात आले. 

यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले. यानंतर मानाची काठी, देवाची पालखी पालखी स्थळावर स्थानापन्न झाली. रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे मानाच्या काठीच्या भेटाभेटीच्या पारंपरिक सोहळ्यासाठी  आल्या.

यावेळी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण या मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटाभेट होऊन,भक्तिमय वातावरणात सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.

एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन मध्यरात्री पावणे तीन वाजता श्रीनाथ म्हस्कोबा  व जोगेश्वरी माता  यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. 

रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, २ वाजून ५५ मिनिटांनी पारंपरिक शाही लग्न सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित दिपक थिटे, संतोष थिटे यांनी पौराहित्य केले. यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.

वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांचा शाही, पारंपरिक विवाह सोहळा महाराष्ट्रातील हजारो भाविकांना ऑनलाईन यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता आला.

श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत  या पारंपरिक लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र धुमाळ, व्हाईस चेअरमन अमोल धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी वीर देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व व्यवस्था पाहून, उत्तम नियोजन केले.

पुरंदर पंचायत समिती, पुरंदर आरोग्य विभाग, पुरंदर तहसीलदार कार्यालय, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन व वीर ग्रामपंचायत यांच्याकडूनही या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते.

"श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी देवीचा पारंपरिक विवाह सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत,पारंपारिक पद्धतीने, आनंदमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविक - भक्तांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते हे आमचे खूप मोठे भाग्य आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा अठरापगड जातीतील लोकांना एकत्र आणून, भक्तीच्या धाग्यात जोडून, माणुसकी समृद्ध करणारा हा उत्सव आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ऊर्जा, प्रेरणा देणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची, प्रत्येक वर्षी क्षेत्र वीर येथील या ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची लाखो भाविक भक्तांना ओढ असते." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा लाखो भाविक भक्तांना भक्ती - शक्तीची, ऊर्जा देणारा महान सोहळा असतो. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना यात्रा काळात श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मिळणारा भक्तीचा आनंद हा अनमोल असतो.

Wednesday, January 29, 2025

"ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष,भारतातील केमिस्ट शिलेदारांचे आधारस्तंभ जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विश्वविक्रमी रक्तदान; एका दिवसात देशभरातून ७५ हजारांवर बाटल्यांचे संकलन, केमिस्ट शिलेदारांचा प्रेरणादायी महासंकल्प, पुरंदरच्या केमिस्ट शिलेदारांनी आयोजित महारक्तदान शिबिरातही उत्स्फूर्तपणे रक्तदान"....

पुरंदर, सासवड,दि.२९ : रक्तदान हे श्रेष्ठदान या उक्तीचा खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश देशभरातील केमिस्ट शिलेदारांनी एका दिवसात 75000 रक्ताच्या बाटल्या संकलित करून, भारतीय समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. भारतीय आरोग्य व्यवस्थेसमोर रक्ताची कमतरता ही खूप मोठी गंभीर समस्या आहे. आजही आपल्या भारतात रुग्णांना उपचाराप्रसंगी रक्त मिळत नाही यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. समाजातील सर्व घटकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान करणे ही काळाची गरज आहे.

ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, केमिस्ट बांधवांचे आधारस्तंभ,मा. आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी देशभरातील केमिस्ट बांधवांच्या कल्याणासाठी मागील 40 वर्ष सातत्याने केलेल्या प्रामाणिक कार्यामुळे त्यांच्या कार्याला एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी देशभरातील हजारो केमिस्ट बांधवांनी महारक्तदान शिबिर आयोजित करून 75000 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करून देशभरात एक मोठा विश्वविक्रम करून, समाजाला दिशा देणारा प्रेरणादायी उपक्रम राबवलेला आहे.

एक आपत्कालीन, सामाजिक, नैतीक गरज डोळ्यासमोर ठेवून हा भव्य - दिव्य उपक्रम संघटनेने हाती घेतला. भविष्यात देशामध्ये अचानक आपत्कालीन परिस्थिती उद्धभवली आणि मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासल्यास देशातले सर्व केमिस्ट मोफत रक्तदान करून ही परिस्थिती योग्य प्रकारे पूर्ण करतील यासाठीच हा महासंकल्प हाती घेतला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

संपूर्ण देशात दिनांक 24 तारखेला एकाच वेळी रक्तदान करण्याचा उपक्रम हाती घेऊन केमिस्ट बांधवांनी समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे.  पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट संघटनेच्या वतीने या महारक्तदान शिबिराचे सासवड, जेजुरी, निरा येथील सर्व केमिस्ट बंधू, भगिनींनी आयोजन केले. 

या शिबिरात पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, तरुण शिलेदार, सामाजिक कार्यकर्ते,महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.याप्रसंगी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, श्री राम कारंडे आणि सर्व आरोग्य अधिकारी यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. 

जेजुरी शहरात डॉ कैलास सुपेकर पुरंदर तालुक्याचे जिल्हा कार्यकारी सदस्य धैर्यशील शिंदे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.तसेच निरा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास कदम आणि डॉ अजय निगडे यांनी या शिबिरात मोलाचे सहकार्य करून जास्तीत जास्त रक्तदान करून घेतले.

संघटनेचे उपाध्यक्ष योगेश जठार, दत्तात्रय कर्णावर, राजेंद्र भोईटे, निखिल काकडे, नरेंद्र जैन यांनी जनजागृती करून  मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. 

पुरंदर मेडिकल असोसिएशन वतीने अध्यक्ष डॉ प्रविण जगताप, डॉ सचिन निरगुडे, डॉ वृषाली जगताप, डॉ अश्विनी जगताप यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.सध्या आपल्या देशात रक्त पुरवठा खुप कमी झाला आहे त्याअनुषंगाने संपूर्ण पुरंदर तालुक्यात सर्व केमिस्ट बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.

पुरंदर तालुका  केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा प्रतिनिधी श्री धैर्यशील शिंदे, श्री बाळासाहेब भिंताडे, सौ शुभांगी जगताप(महिला जिल्हा कार्यकारी सदस्या),ज्येष्ठ सभासद श्री कृष्णा शेट्टी, तालुका अध्यक्ष श्री सुकुमार नाझीरकर,मा नगरसेवक श्री नंदकुमार जगताप, सौ उर्मिला जगताप, श्री भूषण ताकवले , श्री निलेश डाकले, श्री संतोष ढमाळ तसेच

श्री विराज सस्ते, श्री सुमित जगताप, श्री अजित शेंडकर, श्री सागर सस्ते, श्री संदिप घारे, श्री मनोज जगदाळे, बाबुराव जगदाळे, अवधुत जगताप,सौ सुवर्णा रनणवरे,सौ ललिता जगताप,सौ तनुजा पाटील,माया शहा, सौ तृप्ती बोराडे,सौ तृप्ती संदेश गायकवाड,श्री विक्रम खामकर तसेच

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

श्री नितीन नाझीरकर, श्री रामदास कदम, श्री निखिल काकडे, श्री मनोहर क्षीरसागर , श्री मायदेव, श्री चेतन डाकले यांनी या रक्तदान महाशिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. पुरंदर तालुक्यात सामाजिक वारसा जपत वज्र पुरंदर ग्रूपने सर्वात जास्त सहभाग नोंदवला. अध्यक्ष मा नगरसेवक संदिप राऊत, उपाध्यक्ष योगेश आबा जगताप, नाना कुंभारकर, जितेंद्र कामथे, विजय काळे, अतुल निगडे, गणेश चौरे, बाबासाहेब पिलाने, बाबू कुंभार, चकित जगताप, योगेश कोलते यांनी रक्तदान करून सहकार्य केलं.

"महारक्तदान शिबिरामध्ये सर्व केमिस्ट, फार्मासिस्ट व सहकाऱ्यांनी एकजुटीने मेहनत घेत, हे रक्तदान शिबिर यशस्वी केले.या रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने तळागाळातील बांधवांकडून रक्तदान चळवळ राबवली तसेच सर्व ग्रामीण व शहरी भागातील सर्व सभासदांनी आप्पासाहेब व संघटनेवर दाखवलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व शतशः आभारी आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा रक्तदानाचा उच्चांकी आकडा गाठून विश्वविक्रम करत आमचे मार्गदर्शक,आधारस्तंभ जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वर प्रचंड प्रेम दाखवत देशाप्रति निष्ठा जपली आहे. प्रतिकूल परिस्थिती व संघर्षातून देशव्यापी सर्व समावेशक नेतृत्व अप्पासाहेबांच्या रूपाने आपल्याला लाभले. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, केमिस्ट, फार्मासिस्ट ,सभासद, सहकारी, मित्रपरिवार यांनी कठोर परिश्रम घेतल्याबद्दल त्या सर्वांना लाख लाख धन्यवाद व सर्वांचे मनापासून आभार." अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी धैर्यशील शिंदे यांनी दिली.

"पुरंदर तालुक्यातील महारक्तदान शिबिरात  आमच्या संघटनेचा प्रत्येक सभासद मनापासून रक्तदान करण्यासाठी प्रयत्न करत होता. ग्राहक हा आपला अन्नदाता आहे ही भावना मनात ठेवून आपल्या अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी आलेली ही संधी साधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता. प्रत्येक सभासद आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ जगन्नाथ आप्पा शिंदे यांचा देशात गौरव वाढवण्याचा अंतःकरणा पासुन झटत होता. या महारक्तदान शिबिरात 90 % रक्तदान हे केमिस्ट व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी केले आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान.रक्तदान केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानणे म्हणजे ती खुप छोटी गोष्ट ठरेल. पुरंदर तालुक्याच्या वतीने सर्व  रक्तदात्यांना समाजसेवेचा लाल सलाम" अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुका ड्रॅगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष, माजी नगरसेवक नंदकुमार विठ्ठलराव जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशन समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते.

रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या केमिस्ट बांधवांनी महारक्तदान शिबिर आयोजित करून समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे.

Thursday, January 23, 2025

"महाराष्ट्राच्या विकासासाठी १५.७० लाख कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार; टाटा समूह ३०००० कोटींची गुंतवणूक करणार, रिलायन्स व ॲमेझॉन उद्योगसमूह महाराष्ट्रात करणार 'इतक्या' लाख कोटींची गुंतवणूक; लार्सन अँड टुब्रो कंपनीची 'इतक्या' हजार कोटींची गुंतवणूक"...

दावोस, दि. 23 :  दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने  दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.


बुधवारी झालेल्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान  दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार झालेले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या जागतिक आर्थिक परिषदेत भेट घेतली. टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. याबरोबरच रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांचीही त्यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५,००० मेवॉ पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच श्री. शर्मा यांनी केले.


मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.


टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.


सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे : -

1) कल्याणी समूह

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : गडचिरोली


2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी


3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200


4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर


5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली


7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर


8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड


9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे


10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर


12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर


13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर


14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर


15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

16) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : 17,500 कोटी

रोजगार : 23,000


17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : 3500 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : पुणे


18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 8000 कोटी

रोजगार : 2000


19) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : 1700 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर


20) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : 8500 कोटी

रोजगार : 17,300


21) सिएट

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : नागपूर


22) व्हीआयटी सेमिकॉन्स

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 24,437 कोटी

रोजगार : 33,600

कोणत्या भागात : रत्नागिरी


23) टाटा समूह

क्षेत्र : बहुविध क्षेत्रात

गुंतवणूक : 30,000 कोटी


24) रुरल एन्हान्सर्स

क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक

गुंतवणूक : 10,000 कोटी


25) पॉवरिन ऊर्जा

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 15,299 कोटी

रोजगार : 4000


 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 15,000 कोटी

रोजगार : 1000


27) युनायटेड फॉस्परस लि.

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 6500 कोटी

रोजगार : 1300


28) ईरुलर्निंग सोल्युशन्स

क्षेत्र : शिक्षण

गुंतवणूक: 20,000 कोटी

रोजगार : 20,000


29) ऑलेक्ट्रा ईव्ही

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक: 3000 कोटी

रोजगार : 1000


30) फ्युएल

क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय

राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण.


दि. 21 जानेवारीपर्यंत एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी

एकूण रोजगार : 1,53,635.


दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार : -

31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट

गुंतवणूक: 3,05,000 कोटी

रोजगार : 3,00,000


32) ग्रिटा एनर्जी

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 10,319 कोटी

रोजगार : 3200

कोणत्या भागात : चंद्रपूर


33) वर्धान लिथियम

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)

गुंतवणूक : 42,535 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : नागपूर


34) इंडोरामा

क्षेत्र : वस्त्रोद्योग

गुंतवणूक : 21,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : रायगड


35) इंडोरामा

क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स

गुंतवणूक: 10,200 कोटी

रोजगार : 3000

कोणत्या भागात : रायगड

 

36) सॉटेफिन भारत

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक: 8641 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


37) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


38) सिलॉन बिव्हरेज

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 1039 कोटी

रोजगार : 450

कोणत्या भागात : अहिल्यानगर


39) लासर्न अँड टुब्रो लि.

क्षेत्र : संरक्षण उत्पादन

गुंतवणूक : 10,000 कोटी

रोजगार : 2500


कोणत्या भागात : तळेगाव

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.

क्षेत्र : आयटी

गुंतवणूक: 450 कोटी

रोजगार : 1100

कोणत्या भागात : एमएमआर

 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.

क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण

गुंतवणूक : 12,780 कोटी

रोजगार : 2325

कोणत्या भागात : नागपूर


42) एमएसएन होल्डिंग्ज लि.

क्षेत्र : सौर

गुंतवणूक : 14,652 कोटी

रोजगार : 8760

कोणत्या भागात : नागपूर


43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.

क्षेत्र : ड्रोननिर्मिती

गुंतवणूक : 300 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : जालना


44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 5000 कोटी

रोजगार : 1300

कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र


45) हॅझेरो इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : बुटीबोरी

46) टॉरल इंडिया

क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 1200

कोणत्या भागात : अहिल्यानगर


47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


48) हिरानंदानी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 51,600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


49) एव्हरस्टोन समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 8600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


50) अ‍ॅमेझॉन

क्षेत्र : डेटा सेंटर

गुंतवणूक : 71,795 कोटी

रोजगार : 83,100

कोणत्या भागात : एमएमआर


 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर


52) एमटीसी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

कोणत्या भागात : एमएमआर


53) क्रॉसरेल इंटरनॅशनल

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर


दि. 22 जानेवारीपर्यंत एकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटी. एकूण रोजगार : 15.75 लाख.


महाराष्ट्रातील तरुण पिढी हुशार, मेहनती व वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करणारी आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी चांगली रोजगार निर्मिती होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

बेरोजगारी हा भारतातील तरुण पिढीसमोर खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. जगभरातील औद्योगिक क्षेत्रातील मोठ - मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली तर निश्चितच महाराष्ट्रातील तरुण पिढीला त्याचा फायदा मिळेल.