Saturday, December 25, 2021

"महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची रुग्णसंख्या '100' पार, ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे "या" नवीन निर्बंधांचे राज्यात पालन करावे लागणार...



मुंबई दि. 25 : महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या शंभरी पार केल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 108 झालेली आहे. राज्यातील नाताळ सणामुळे होणारी गर्दी व वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही नवीन निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू केलेले असल्यामुळे नागरिकांना त्याचे पालन करावे लागणार आहे.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. 


या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. 





संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.




राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे  अतिरिक्त निर्बंध असतील.


1)संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.


2)लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.


3)इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 



4)उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.


5)क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.


6)वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.


7)उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.


8)याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

महाराष्ट्रात ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती सर्व नागरिकांनी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहे.




Friday, December 24, 2021

"लढवय्या - झुंझार बाप्पू" - पुरंदरचे युवालेखक, स्तंभलेखक निखील घाडगे यांचा 'माजी राज्यमंत्री' पुरंदरचे लोकप्रिय नेते विजयबापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख..



लढवय्या-झुंजार बाप्पू..!!


२००९ सालच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालादिवशी पुणे जिल्ह्याचे किंबहुना संपूर्ण राज्याचे लक्ष २०२ - पुरंदर -हवेली मतदारसंघाकडे लागले होते. पहिल्या दोन फेरींमध्ये मनसेच्या कृष्णा लोहकरेंनी आघाडी घेतली होती. परंतू तिसर्‍या फेरीनंतर शिवसेनेचे विजय शिवतारे लिडवर आले ते विजयी मिरवणूक संपेपर्यंत खाली उतरलेच नाहीत. 




२००९ चा विजय शिवतारेंचा विजय हा पुरंदरकरांसाठी काहीसा वेगळा होता. अनेक अर्थांनी वेगळा होता. ही पुणे जिल्ह्यातली पहिलीच अशी निवडणूक होती ज्यामध्ये परीवर्तनाची प्रचंड लाट होती जी फक्त आणि फक्त स्वाभिमानाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली होती. 

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


पुरंदरकरांच्या मनामनात स्वाभिमानाचे स्फुल्लींग पेटवण्याचे काम केले होते विजय शिवतारे या पुरंदरच्या ढाण्या वाघाने. परींचेसारख्या डोंगरदर्‍यांच्या खोर्‍यात, शेणामातीत खेळलेला, रुद्रगंगेचे पाणी चाखलेला, अनवाणी पायाने दगड-धोंडे, काटेकुटे तुडवलेला विजय शिवतारे पुरंदरच्या मातीच्या कामी आला. 




वर्षानुवर्षे आपल्या हक्कांपासून, अधिकारांपासून वंचित ठेवलेल्या पुरंदरला जागे करण्याचे काम बाप्पूंनी केले. मुलाच्या विवाह सोहळ्यानिमीत्त पुरंदरमध्ये शिरलेले बाप्पू कालांतराने पुरंदरचे पालक झाले. 





बाप्पूंनी पुरंदरकरांना आणि पुरंदरकरांनी बाप्पूंना भरभरुन प्रेम दिले, आधार दिला, काळजी घेतली. आणि याच प्रेमाचा प्रवास आजही असंख्य अडीअडचणींमधून सावरून संघर्षाने सुरू आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


विजय शिवतारे उर्फ बाप्पूंचा २४ डिसेंबर १९५९ साली यादववाडीत जन्म झाला. अगदी सर्वसामान्य कुटूंबातील हूशार, जिद्दी आणि होतकरू बाप्पू हरगुडेला विष्णू गुरूजी ताकवलेंकडे शिक्षण घेऊ लागले. काही परीसस्पर्श नकळत आयुष्याचे सोने करतात अगदी तशीच जडणघडण विष्णू गुरूंजींकडे बाप्पूंची झाली. 


वडील मुंबईत कामानिमीत्त होते, घरातून अंगावरच्या कपड्यांवर रागाने बाहेर पडलेले बाप्पू रेल्वेचे दोन डबे जोडणार्‍या जागेत बसून मुंबईला गेले. शिक्षण घेतले, नोकरी केली, व्यवसाय केला, संघर्ष केला, यशस्वी झाले. मुंबई कितीही स्वप्नांची नगरी असली तरीही तिथे फारकाळ मन रमले नाही. 




मातीच्या ओलाव्यातल्या सुगंधाने बाप्पूंना २००७ साली पुरंदरमध्ये खेचून आणले. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या विचारांचा पगडा बाप्पूंवर होता. बाप्पूंनी काही काळ पुरंदरच्या राष्र्टवादीच्या व्यासपीठांवर घालवला. पण पुरंदरची तत्कालीन परीस्थीती आणि त्याला जबाबदार व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. केवळ बारामती आणि फलटणच्या स्वार्थासाठी पुरंदरच्या तोंडाला पाने पुसली जात होती. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now



हा सावळा गोंधळ सहन न झाल्याने बाप्पूंनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या उपस्थीतीत "शिवसेना भवन" दादरला शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला. सातशे गाड्यांमधून सात हजारांपेक्षा जास्त तरूण कार्यकर्ते एका हाकेवर शिवसैनिक झाले. पुरंदरचे राजकारण ढवळून निघाले. 




गेली तीन दशके पवारसाहेबांच्या शब्दावर श्रद्धा ठेवणारा पुरंदर बंडाच्या पावित्र्यात निघाला होता. ज्या पुरंदरमध्ये स्टेजवरचे मान्यवर जास्त आणि पुढे बसलेले कार्यकर्ते कमी अशी अवस्था बाकीच्या पक्षांची होती तिथे बाप्पूंनी मोकळ्या स्टेजवरून हजारो कार्यकर्ते तयार केले. गावोगावी, खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर बाप्पूंना ऐकण्यासाठी लोक जमू लागले. यादववाडीचा "लक्ष्मी-सोपान" बंगला ( पूर्वीचा भूतबंगला ) कार्यकर्त्यांनी गजबजून गेला. 


सर्वात महत्वाचे म्हणजे पदरात तोंड लपवून भिंतींआडून बैठका पाहणार्‍या माता-भगिनींना बाप्पूंनी आत्मविश्वासाने समाजात बसण्यासाठी मानाचे स्थान मिळवून दिले. हा बदल पुरंदरसाठी नविन आणि आश्वासक होता. हा बदल पुरंदरकरांनी स्विकारला. हा बदल बदलाची नांदी ठरला. ज्या पुरंदरमध्ये शिवसेनेचे ६०-७० मतदान नव्हते तिथे बाप्पूंनी ६८,५०० मतांनी पुरंदरवर भगवा फडकवला..!!




पुरंदरवर भगवा फडकला या बातमीने पुणे जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. बारामती लोकसभा मतदारसंघाची गणिते विस्कळीत झाली. पवारांच्या तख्ताला मोठी धडक बसली. बाळासाहेबांनी "मातोश्रीवर" आमंत्रण दिले, आणि स्वागतालाच "माझा पुरंदरचा ढाण्या वाघ आला" म्हणत पाठीवर शाब्बासकीची थाप टाकली. 




पुरंदरच्या नसानसांत, कड्याकपार्‍यांत शहारे फुटले. स्वतः उद्धव ठाकरेंच्या समोर बाळासाहेबांनी शब्द घेतला, "जेव्हा केव्हा माझे सेनेचे सरकार येईल तेव्हा मंत्रीमंडळाच्या पहिल्या यादीत मला विजय शिवतारेचे नाव पाहीजे." बाळासाहेबांच्या माघारी उद्धवजींनी शब्द खरा केला, गेल्या युतीच्या सरकारमध्ये बाप्पूंना पहिल्या यादीत राज्यमंत्रीपदी विराजमान केले आणि पुरंदरच्या स्वाभिमानाची पोहच पावती दिली. 

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 



यापाठीमागे पुण्याई होती पुरंदरच्या हक्काच्या गुंजवणी धरणातील २.०२ टीएमसी पाण्याची. पुरंदरकरांच्या जे कपाळावर लिहले होते, ते त्यांना डोळ्यांनी वाचता येत नव्हते. बाप्पूंनी प्रत्येक पुरंदरकराचा तिसरा डोळा उघडला आणि गुंजवणी प्रकल्प मेंदूत उतरवला. सत्तेत नसताना सासवडच्या पालखीतळावर उपोषण केले. आठ दिवस अन्न-पाण्याशिवाय संघर्ष केला. 



शरीराचे नुकसान झाले, एक किडणी निकामी झाली. बाप्पूंना व्याधींनी कवटाळले. २०१३ साली कावीळ पोटात उतरली होती. कालांतराने बायपास, डायलेसीस आणि आजारपणांनी शारीरीक मर्यादा निर्माण झाल्या. बाप्पू ऐन आजारपणात मंत्रीपदावर होते. अफाट प्रवास केलाय या माणसाने, दर महिण्याला नविन ड्रायव्हर लागत होता पण बाप्पु थांबायचे नाव घेत नव्हते. शरीराची हेळसांड झाली आणि शेवटी मृत्युशी झूंज देत कणखरपणे पुन्हा बाप्पू पुरंदरच्या मातीत खेळू लागलेत.





बाप्पूंनी आयुष्यात खूप संघर्ष केला. जन्मापासून, शिक्षणापासून, व्यवसायापासून, राजकारणापासून, जगण्या-मरण्यापासून ते कुटूंबापर्यंत हा संघर्ष अजूनही सुरू आहे. हा माणूस हाडामांसापेक्षा वेगळ्या काहीतरी रसायनांनी बनला आहे. त्यांची आत्मशक्ती प्रचंड मोठी आहे, सकारात्मक आहे. 


आंगची बुद्धी आणि अभ्यासूपणा आहे. माणसांचा अनुभव आहे आणि उत्तम संघटनकौशल्य आहे. मदतीची भावना नैसर्गीक आहे. लढवय्या बाणा आहे त्यामुळे एकाही कार्यकर्त्याला वैयक्तीक जिवनातसुद्धा खचू दिले नाही. गोरगरीबांप्रती ममत्व भाव आहे, बाप्पूंच्या दारातून मोकळ्या हातांनी कोणीही माघारी गेला नाही. 




बाप्पू कालही पुरंदरच्या मातीत होते, आजही पुरंदरच्याच मातीत आहेत आणि उद्याही पुरंदरच्याच मातीत राहतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पुरंदरच्या मातीला, पुरंदरच्या मनाला बाप्पूंची नितांत गरज आहे. काळ वाईट असला तरीही पुरंदरकरांच्या हक्कासाठी बाप्पू स्वस्थ बसणार नाहीत. पुरंदरकरांच्या या ढाण्या वाघाला सदृढ, निरोगी, दिर्घायुष्य लाभो हीच खंडेरायाचरणी प्रार्थना करतो..!!

वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा बाप्पू..!! 💐💐

लेखक : - पुरंदरचे युवा लेखक, स्तंभलेखक निखीलआण्णा घाडगे.





"हा शिवतारे बापू पुरंदरचा पुढचा 100% आमदार असणारय; आपल्याला ह्यांच्या बरोबरच जायचं आहे; 2007 ला कोपऱ्यात बसणारी माझ्यासारखी साधी शेकडो पोरं विजयबापू नावाच्या दैवतामुळं राजकारणात सन्मानाने वाटचाल करतायत" - पुरंदरचे निष्ठावंत शिवसैनिक सोपान राऊत यांचा 'माजी राज्यमंत्री' पुरंदरचे लोकप्रिय नेते विजयबापू शिवतारे यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष लेख...

 


"हा शिवतारे बापू पुरंदरचा पुढचा 100% आमदार असणारय; आपल्याला ह्यांच्या बरोबरच जायचं आहे; 2007 ला कोपऱ्यात बसणारी माझ्यासारखी साधी शेकडो पोरं विजयबापू नावाच्या दैवतामुळं राजकारणात सन्मानाने वाटचाल करतायत"



साधारण साल २००८ मधील ऑगस्ट महिना चालु होता. श्रावणातील उन्ह पावसाचा खेळ चालु  असल्याने  वातावरण छान अलाहादायक  होते. त्या महिन्यात एका माघे एक येत असलेल्या सणांमुळे सर्व आनंदी आनंद होता. हयातच पवित्र " गोकुळ जन्माअष्टमीचा दिवस उजाडला. त्याच्या  दुसऱ्या दिवसी म्हणजेच ' दहिहंडीच्या' दिवशी परिंचे येथील तरुण मित्रांनी दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



त्यासाठी मोठी बक्षिसे ठेवण्यात आली होती. तसेच प्रथमताच डि .जे . साऊंड सिस्टीम हा प्रकार पाहण्यास मिळणार होता. कार्यक्रमाची जाहिरात मोठया प्रमाणात झाल्याने स्टँडचा परिसर तरुणाईने भरून गेला होता.



विविध गावची मंडळे ही  हंडी फोडण्यासाठी आली होती. मित्रांच्या बरोबर मी देखील हा जल्लोष पाहण्यासाठी गेलो होतो. थराथरक चढाओढीत " हरणी ' येथील तरुण मंडळाने ही हंडी फोडली होती. त्यानंतर बक्षीस वाटपाचा कार्यक्रम पार पडणार होता . 


व्यासपीठावर गावातील आयोजक तरुण व गाव पुढाऱ्यांच्या मधोमध एक व्यक्ती बसली होती .. पांढरा शुभ्र खादीचा हाफ शर्ट .. शुभ्र पांढरी पॅन्ट .. प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, भारदस्त व्यक्तीमत्वाचा माणुस माझ्यासह सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता.



मी आमच्या मित्रांबरोबर पाठीमाघे एका कोपऱ्यात इतर चेष्टा मस्करीचे विषय काढुन उभा होतो. प्रास्ताविक व गावातील इतरांची भाषणे झाल्यावर ही भारदस्त व्यक्ती बोलण्यासाठी उभी राहिली ... उजव्या हातात माईक पकडुन आपणा सर्वांना विजय सोपानराव शिवतारेचा नमस्कार .. असे भारदस्त आवाजातील शब्द निघाले आणि मैदानात चालु असलेला गोंधळ क्षणात शांत झाला.




संयोजकांचे कौतुक करुन ह्या साहेबांनी पुरंदरच्या पवित्र मातीचा इतिहास सांगायला सुरूवात केली. हिंदवी स्वराज्याच्या स्थापने नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मोघलांविरुध्दची पहिली लढाई याच मातीतील बेलसर येथे झालेली. धर्मवीर छत्रपतींचा जन्म आपल्याच पुरंदर मध्ये.. थोर समाजसुधारक  महात्मा फुले   येथील खानवडी गावचे .. प्रसिध्द लेखक प्र.के अत्रे ह्याच भुमीतले .. रामायण ज्या वाल्मीक ऋषीनी  लिहिले त्यांची समाधी ह्याच भुमीत .. सोपानकाका , जेजुरीचा खंडोबा , वीरचा म्हस्कोबा .. भूलेश्वर मंदिर येथेच का ? पुरंदरच्या मातीतच का गोड अंजीर व सिताफळ पिकतात ?.. 




असे बरेच दाखले देत  पुणे शहरालगत असुनही पुरंदरचा रखडलेला विकास , दुष्काळी परिस्थिती , औद्योगिक क्षेत्रातील पिछेहाट ..रस्त्यांची अवस्था .. बाजुच्या बारामती तालुक्यात विकास कामांच्या बाबतीत सोन्याचा धुर निघतोय आणि पुरंदर वर अन्याय का ?? मला पुरंदरच्या उज्वल भविष्यासाठी  संघर्ष करायचाय..


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


हक्काचे  "गुंजवणीचे" पाणी पुरंदरच्या शिवारात फिरवायचे आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे ... असे सर्वांना आव्हान केले.




हे सर्व ऐकत असताना  त्या उभ्या असण्याऱ्या ठिकानीच बरोबरच्या मित्रांना सांगितले "हा शिवतारे बापु पुरंदरचा पुढचा १०० % आमदार असणार आहे .. आणि आपल्याला ह्यांच्या बरोबर जायचे आहे." ... त्यानंतर बरेच दिवस विजय शिवतारे हे व्यक्तीमत्व डोळ्यासमोरुन जात नव्हते.   आणि तेथुन पुढे चालु झाला ह्या वादळाचा झंझावात मुंबईत झालेला शिवसेना पक्षातील  प्रवेश.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


गावोगावची वाडया वस्ती वरील असंख्य दुर्लक्षित परंतु समाजासाठी काही तरी वेगळ करायचं हया ध्येयाने झपाटलेली गरीबाघरची  तरुण पोरं  " शिवसेनेत " सामील होऊ लागली. गावा गावात शाखा उघडू लागल्या. हयाचे फलित २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दिसले. भल्या भल्या राजकिय विश्लेषकांचे अंदाज मोडित काढुन  हा शेंबढ्या पोरांचा नेता महाराष्ट्राच्या  विधानसभेवर आमदार म्हणुन पोहचला होता.




अल्पावधीत आपल्या कामाची झलक , अभ्यासपुर्ण तेवढीच पक्षाला  प्रेरित असलेली आक्रमक भाषणे  सभागृहात  गाजायला लागली आणि पुरंदरच्या जनतेला पहिल्यांदाच आपला माणुस टि .व्ही वरील बातम्यात दिसु लागला.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासु शिलेदार म्हणुन प्रसिद्धी होत गेली. मतदार संघात आता विकास कामांची गंगा वाहु लागली होती. निवडणुकीपुर्वी लोकांना माहिती नसलेले गुंजवणी धरणाचे बंद काम चालु करण्यासाठी,  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  सासवडला झालेले आमरण उपोषण, पुणे शहरात गेलेली जल दिंडी .. मुंबई येथील मोर्चा  .. हया गोष्टीने तालुका ढवळुन निघाला. परंतु त्या काळच्या  सरकारला मात्र हयाचा काही परिणाम झाला नाही.


परंतु नियतीच्या मनात वेगळच होतं. त्याच काळात संपुर्ण हिंदुस्थानात राजकीय बदलाचे वारे वाहु लागले होते. आणि त्याचा प्रत्यय आगामी २०१४  ला दिसला  देशात व महाराष्ट्रात " शिवशाही " चे सरकार आले होते .व महाराष्ट्राच्या सरकार मध्ये पुरंदरच्या " विजय बाप्पु शिवतारे या सरदाराचा " मंत्री म्हणुन राज्यभिषेक झाला होता... आणि खाते होते " जल संपदा व जलसंधारण "   





आता ख- या अर्थाने पुरंदरचा कित्येक वर्षाचा दुष्काळ हटायला सुरुवात झाली होती. ओढ्या नाल्यावर शेकडो सिमेंट बंधारे तयार होऊ लागले होते. हजारो विक्रमी  शेततळी तयार होऊ लागली.


ज्या खरबडीत रस्त्यामुळे पुरंदर मध्ये गाडी आल्याची जाणीव होत होती ते सर्व रस्ते आता गुळगुळीत व भले मोठे झाले होते. ज्या वाडी वस्ती वर कधी तरी ३ , ४ लाख रुपये आमदार फंड देऊन बोळवण केली जात होती त्या गावातील पाणी योजना, रस्ते , व्यायामशाळा इ . विकास कामांसाठी करोडो  रुपये येऊ लागले. पुरंदर मधील सर्व प्रसिध्द तिर्थक्षेत्रांना शासनाचा दर्जा मिळवुन देऊन अपुर्ण कामे चालु झाली होती.




दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार मात्र नाही .. ही प्रतिज्ञा पुर्ण होत होती .. जगाच्या नकाशावर पुरंदर तालुक्याचे नाव पोहचण्यासाठी "महत्वकांक्षी " आंतरराष्ट्रीय  विमानतळ मंजुरी  मिळवली होती.



हया विकासकामाबरोबरच शेकडो गरीबाच्या लेकींचे हात पिवळे करण्याचे पवित्र कार्य बापूंच्या माध्यमातुन होत आहे. जनतेच्या सुख दुखाच्या प्रसंगी उभे राहुन आधार देणे असो .. अथवा काळ्या रात्रीस एखादयाला मदत असो सर्वांना बापूंचा चेहारा आठवतो. राजकीय बेरजेच्या वजाबाकीच्या खेळात भले बापु हारले असतील. परंतु लाखो लोकांच्या मनात मात्र  आज ही तेच " राजा " म्हणुन आहेत. 




आजही बांधावर बसलेला सामान्य शेतकरी गेलेली  लाईट चालु करण्यासाठी वायरमनच्या अगोदर बापुना हक्काने  फोन लावतो. तर माझ्या मुलीला सासरचे लोक त्रास देतायत म्हणुन गरीब मायमाऊली पोलीसांच्या अगोदर आपल्या बापुला निरोप देते. २००७ ला कोठे तरी कोपऱ्यात  बसणारी  माझ्या सारखी शेकडो साधी पोरं आज रस्त्याने येता जाता  प्रत्येकाचा नमस्कार स्विकारत आहे. आज समाजात स्वताची वेगळी ओळख निर्माण करून नेतृत्व करीत आहे. ह्या माघे फक्त हया माझ्या " विजयबापु " नावाच्या दैवताचे आर्शिवाद... आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना पांडुरंग त्यांना  उदंड आयुष्य देवोत....


लेखक : - पुरंदर मधील निष्ठावंत शिवसैनिक, माजी सरपंच परिंचे, शिवसेना पदाधिकारी सोपान राऊत.





"पुरंदरचे लोकनेते, विकासपुरुष विजयबापू शिवतारे; पुरंदरचा अमृतवेल" - पुरंदरचे प्रसिद्ध लेखक अजित काका जाधव यांचा 'माजी राज्यमंत्री,पुरंदरचे लोकप्रिय नेते विजयबापू शिवतारे' यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख...


"पुरंदरचे लोकनेते, विकासपुरुष विजयबापू शिवतारे; पुरंदरचा अमृतवेल"....


पुरंदरचे लोकनेते, विकासपुरुष विजयबापू तुम्ही बारा-तेरा वर्षांपूर्वी  पुरंदरला आलातं आणि निस्तेज पडलेल्या पुरंदरच्या राजकारणात खऱ्या अर्थाने चैतन्य आलं. तेव्हापासूनचं, पुरंदरच्या “गावपुढारी केंद्रीत” राजकारणाचं  “विकेंद्रीकरण” सुरु झालं. खरंतर, तुमच्या खमक्या स्वाभिमानी बाण्यामुळेचं, प्रस्थापित गावपुढाऱ्यांसमोर खाली झुकणारी सर्वसामान्य डोकी, आजही ताठ मानेने चालतं आहेत. 





राजकारण कशाशी खातात हे आम्हाला माहितं नव्हतं, पणं पुरंदरला आपल्या ताकदीची जाणीव तुम्ही करून दिली, आणि निस्तेज पडलेली वाडी वस्तीवरची पोरं-सोरंसुद्धा, समाजकारण व राजकारणात उतरली गेली. हे सगळं शक्य झालं, ते केवळ तुमच्यामुळेचं. 





आम्हाला हिणवलं गेलं, आमच्या आई बापांवर दबावाचं राजकारण खेळलं गेलं, पणं पुरंदरच्या गोरगरीब जनतेच्या आशिर्वादाने, हीच सर्वसामान्य घरची पोरं पुढे उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती व जिल्हा परिषद सदस्य झाली. गोरगरीबा घरची लेकरं समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आणि गावगाड्याचा निर्णयसुद्धा घेऊ लागली. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



बापु, पुरंदरबद्दलची तुमची तळमळ,धडपड आणि निष्ठा आम्ही उघड्या डोळ्यांनी बघीतली आहे. तुम्ही गुंजवणीसाठी केलेला संघर्ष आणि त्यागं आम्ही कधीचं विसरणार नाही. प्रशस्त जेजुरी ग्रामीण रुग्णालय, जेजुरीचा चार पदरी रस्ता, कैक  बंधारे, हजार शेततळी, शेकडो किलोमीटरचे रस्ते, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय विमानतळ , देवस्थानांना वरिष्ठ दर्जा, जेजुरी देवस्थान विकास आराखडा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तालुक्यात भयमुक्त वातावरण, सामाजिक सलोखा, शेकडो गरीब मुलींचं ”कन्यादान”, क्रिडा संकुल, बाजार समिती अशी असंख्य कामं तुमच्याच हातुन झाली. आणि खरा घात इथंच झाला…!!





प्रस्थापित गावपुढाऱ्यांच्या डोळ्यांत तुम्ही कुसळाप्रमाणे टोचु लागला. बापु अजुन पाच वर्षे जर आमदार राहिला तरं, आपल्याला मुदतपूर्व राजकीय संन्यास घ्यावा लागतो की काय ? या चिंतेने अनेकजण ग्रासले गेले. एकमेकांचे पाय ओढण्यात माहीर असलेल्या  गावपुढाऱ्यांपुढे एकचं पर्याय शिल्लक होता. तो म्हणजे, "सुदाम्याचे पोहे मिळुन खाऊ, नाहीतरं आपणं सगळेचं घरी जाऊ". 





कटकारस्थान शिजलं आणि सुरू झाली, गोरगरीब आणि सर्वसामान्य पुरंदरच्या जनतेच्या डोळ्यांत, धुळफेक टाकण्याची चढाओढ सुरू झाली. अगोदर, "विमानतळ हटवणारं" हे बनावट रॉकेट, विमानतळ बाधीत गावांमधुन हवेत सोडलं गेलं. तर नंतर, "बाराशे कोटींचा" मेड इन चायना बार तालुक्यात उडविला गेला. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



कळसं म्हणजे, एका वर्षात गुंजवणीचं पाणी आणू म्हणतं, आश्वासनांचे फवारे असे काही उडवले गेले, की त्या फवाऱ्यांमध्ये  शेजारचं "अशोकाचं" झाडं ओलं चिंब होऊन गेले. आणि पुढे काय झाले ते जगजाहीर आहेचं.




एका वर्षात आमच्या नशीबात आली ती फक्त, क्रिडासंकुलात मारलेली चुन्याची फक्की, आणि जेजुरीपर्यंत तिकीट काढावं लागणारी पीएमटी….!! बस्सं…!!! त्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, "हाताने" ओढावलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, आमच्या आम्हालाचं "हातभर" शुभेच्छा…!!!



                 पुरंदरचा ….."अमृतवेल"


जग जिंकणं सोपं आहे परंतु समाजाचं मनं जिंकणे हे तितकंच अवघडं आहे. आजपर्यंत राष्ट्र आणि महाराष्ट्रात, कैक जणांनी कैक वेळा निवडणुका लढविल्या, आणि जिंकल्याही. परंतु, समाजमनाच्या पटलावर, आपल्या कार्यकर्तृत्वाचा आणि विश्वासाचा ठसा मात्र, मोजकेचं उमटवू शकले. हे ढळढळीत सत्य असले तरी, आपल्या लोकशाहीची ही मोठी शोकांतिका आहे. 



अन्यायाविरुद्ध कोणी आवाज उठविला की त्याला, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न होतो. हे समाजासाठी तितकेचं घातक आहे. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


गाढवाचा नांगर फिरवला म्हणून इर्षेला पेटुन, त्याचं मातीत चक्क "सोन्याचा नांगर" फिरवणाऱ्यांचे, आम्ही वारसदार..!! साडेतीनशे वर्षांनंतरही, आम्ही हे जगाला छातीठोकपणे सांगतो. परंतु, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही, पुरंदरमधील आमचा बाप पाण्यावाचून तडफडतो. आणि याचा जाब विचारायला आम्ही मात्र, सत्ताधीशांपुढे चळचळ कापतो..!! कारण काय? तरं आम्ही लोकांचे नाही तरं पक्षाचे निष्ठावंत आहोत. 





पुरंदरच्या मातीसाठी त्याने मात्र हा गुन्हा केला. ….तो सत्ताधीशांना घाबरला नाही, की गावपुढाऱ्यांपुढे कचरला नाही. अन्यायाच्या विरोधात त्याने, सरळ शड्डूचं ठोकला. आणि स्वामीनिष्ठा विरूद्ध भुमीनिष्ठेचा मुकाबला, पुरंदरच्या मातीत चांगलाच रंगला…!! होय, "लढ बाप्पुचा" एकचं नारा, पुरंदरच्या घरा घरात घुमला.





नावातचं विजय असलेल्या शिवतारेंनी, मगं पुरंदरच्या विकासासाठी स्वत:ला झोकुन दिलं. कामं करण्याचा झपाटा व कल्पक बुद्धीने शेकडो कोटींची कामे पुरंदरमध्ये खेचून आणली. 


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


पुरंदरचा स्वाभिमान पुन्हा एकदा असा काही बुलंद झाला की, मायबाप जनतेने बापुला मंत्रीमंडळातचं धाडला…!! बापुसुद्धा याचं मातीतला होता, पुरंदरच्या गोरगरीब जनतेसाठी, तो तरं स्वत:च्या जीवावरचं खेळला…!!




टाकलेला विश्वास आणि मिळालेल्या आशिर्वादाने, बापुंनी पुरंदरसाठी काय केले, आणि बापुंच्या पश्चात पुरंदरचे काय झाले ? ते जनतेसमोर पाण्यासारखे स्वच्छ आहेचं..!! आता गरज आहे ती फक्त, निःपक्षपातीपणे फरक करण्याची. 


शेकडो कोटींच्या कामाची उद्घाटने पाहणारा पुरंदर, हल्ली मात्र "चष्म्याच्या शिबीरांचं" उद्घाटन बघतं आहे..!! आणि "हाताने" वाटोळं केलं म्हणतं, डोक्याला "पंजा" लावतं आहे..!! मंत्र्यांबरोबर फोटो काढून कोणं "दमदार" होतं नाही, की "अमृततुल्यांचे" उद्घाटन करुन कोणी, "कामदार" होतं नाही…त्यासाठी गरज असते ती डोक्याला कफन बांधून, रात्रंदिवस जनतेसाठी राबण्याची…! खरंतर, "नांव" कमावण्यासाठी काही गुणं हे, आंगचेच लागतात. कारण वारशाने मिळालेली नावं तर फक्त, सातबाऱ्यालाचं लागतात..!! पुरंदरच्या रानमाळावर आता, "काँग्रेसचं तणं" माजलं आहे, कारणं "पुरंदरचा अमृतवेल", .... आम्ही आमच्याचं "हाताने" खोडला आहे.





आदरणीय बापु…
पुरंदरच्या उजाड रानाचं नंदनवन करण्याचं स्वप्नं आपणं पाहिलं, आणि ते फुलवण्यासाठी व सत्यसृष्टीत उतरविण्यासाठी, जीवाचं रानंही केलं. दुर्दैवं कोणाचं हे नियतीलाचं माहीत आहे, परंतु पुरंदरचे ते स्वप्नं आता भंग पावले आहे. तरीसुद्धा त्या भंगलेल्या स्वप्नांच्या टोकदार तुकड्यांवरून, रक्ताळलेल्या पायांनी आपणं आजही धावत आहातं…!! धन्य आहे ती माऊली, जिच्या पोटी आपणं, जन्म घेतला आहातं…!! 

बापु आपणांस वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा..!
आई जगदंब आपणास निरोगी व दिर्घायुष्य देवो…!



लेखक : -  सामाजिक, राजकीय विषयांवरील दर्जेदार लेखन करणारे पुरंदरचे प्रसिद्ध लेखक अजितकाका जाधव.