लढवय्या-झुंजार बाप्पू..!!
२००९ सालच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालादिवशी पुणे जिल्ह्याचे किंबहुना संपूर्ण राज्याचे लक्ष २०२ - पुरंदर -हवेली मतदारसंघाकडे लागले होते. पहिल्या दोन फेरींमध्ये मनसेच्या कृष्णा लोहकरेंनी आघाडी घेतली होती. परंतू तिसर्या फेरीनंतर शिवसेनेचे विजय शिवतारे लिडवर आले ते विजयी मिरवणूक संपेपर्यंत खाली उतरलेच नाहीत.
२००९ चा विजय शिवतारेंचा विजय हा पुरंदरकरांसाठी काहीसा वेगळा होता. अनेक अर्थांनी वेगळा होता. ही पुणे जिल्ह्यातली पहिलीच अशी निवडणूक होती ज्यामध्ये परीवर्तनाची प्रचंड लाट होती जी फक्त आणि फक्त स्वाभिमानाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली होती.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदरकरांच्या मनामनात स्वाभिमानाचे स्फुल्लींग पेटवण्याचे काम केले होते विजय शिवतारे या पुरंदरच्या ढाण्या वाघाने. परींचेसारख्या डोंगरदर्यांच्या खोर्यात, शेणामातीत खेळलेला, रुद्रगंगेचे पाणी चाखलेला, अनवाणी पायाने दगड-धोंडे, काटेकुटे तुडवलेला विजय शिवतारे पुरंदरच्या मातीच्या कामी आला.
वर्षानुवर्षे आपल्या हक्कांपासून, अधिकारांपासून वंचित ठेवलेल्या पुरंदरला जागे करण्याचे काम बाप्पूंनी केले. मुलाच्या विवाह सोहळ्यानिमीत्त पुरंदरमध्ये शिरलेले बाप्पू कालांतराने पुरंदरचे पालक झाले.
बाप्पूंनी पुरंदरकरांना आणि पुरंदरकरांनी बाप्पूंना भरभरुन प्रेम दिले, आधार दिला, काळजी घेतली. आणि याच प्रेमाचा प्रवास आजही असंख्य अडीअडचणींमधून सावरून संघर्षाने सुरू आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
विजय शिवतारे उर्फ बाप्पूंचा २४ डिसेंबर १९५९ साली यादववाडीत जन्म झाला. अगदी सर्वसामान्य कुटूंबातील हूशार, जिद्दी आणि होतकरू बाप्पू हरगुडेला विष्णू गुरूजी ताकवलेंकडे शिक्षण घेऊ लागले. काही परीसस्पर्श नकळत आयुष्याचे सोने करतात अगदी तशीच जडणघडण विष्णू गुरूंजींकडे बाप्पूंची झाली.
वडील मुंबईत कामानिमीत्त होते, घरातून अंगावरच्या कपड्यांवर रागाने बाहेर पडलेले बाप्पू रेल्वेचे दोन डबे जोडणार्या जागेत बसून मुंबईला गेले. शिक्षण घेतले, नोकरी केली, व्यवसाय केला, संघर्ष केला, यशस्वी झाले. मुंबई कितीही स्वप्नांची नगरी असली तरीही तिथे फारकाळ मन रमले नाही.
मातीच्या ओलाव्यातल्या सुगंधाने बाप्पूंना २००७ साली पुरंदरमध्ये खेचून आणले. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या विचारांचा पगडा बाप्पूंवर होता. बाप्पूंनी काही काळ पुरंदरच्या राष्र्टवादीच्या व्यासपीठांवर घालवला. पण पुरंदरची तत्कालीन परीस्थीती आणि त्याला जबाबदार व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. केवळ बारामती आणि फलटणच्या स्वार्थासाठी पुरंदरच्या तोंडाला पाने पुसली जात होती.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
हा सावळा गोंधळ सहन न झाल्याने बाप्पूंनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या उपस्थीतीत "शिवसेना भवन" दादरला शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला. सातशे गाड्यांमधून सात हजारांपेक्षा जास्त तरूण कार्यकर्ते एका हाकेवर शिवसैनिक झाले. पुरंदरचे राजकारण ढवळून निघाले.
गेली तीन दशके पवारसाहेबांच्या शब्दावर श्रद्धा ठेवणारा पुरंदर बंडाच्या पावित्र्यात निघाला होता. ज्या पुरंदरमध्ये स्टेजवरचे मान्यवर जास्त आणि पुढे बसलेले कार्यकर्ते कमी अशी अवस्था बाकीच्या पक्षांची होती तिथे बाप्पूंनी मोकळ्या स्टेजवरून हजारो कार्यकर्ते तयार केले. गावोगावी, खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर बाप्पूंना ऐकण्यासाठी लोक जमू लागले. यादववाडीचा "लक्ष्मी-सोपान" बंगला ( पूर्वीचा भूतबंगला ) कार्यकर्त्यांनी गजबजून गेला.
सर्वात महत्वाचे म्हणजे पदरात तोंड लपवून भिंतींआडून बैठका पाहणार्या माता-भगिनींना बाप्पूंनी आत्मविश्वासाने समाजात बसण्यासाठी मानाचे स्थान मिळवून दिले. हा बदल पुरंदरसाठी नविन आणि आश्वासक होता. हा बदल पुरंदरकरांनी स्विकारला. हा बदल बदलाची नांदी ठरला. ज्या पुरंदरमध्ये शिवसेनेचे ६०-७० मतदान नव्हते तिथे बाप्पूंनी ६८,५०० मतांनी पुरंदरवर भगवा फडकवला..!!
पुरंदरवर भगवा फडकला या बातमीने पुणे जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. बारामती लोकसभा मतदारसंघाची गणिते विस्कळीत झाली. पवारांच्या तख्ताला मोठी धडक बसली. बाळासाहेबांनी "मातोश्रीवर" आमंत्रण दिले, आणि स्वागतालाच "माझा पुरंदरचा ढाण्या वाघ आला" म्हणत पाठीवर शाब्बासकीची थाप टाकली.
पुरंदरच्या नसानसांत, कड्याकपार्यांत शहारे फुटले. स्वतः उद्धव ठाकरेंच्या समोर बाळासाहेबांनी शब्द घेतला, "जेव्हा केव्हा माझे सेनेचे सरकार येईल तेव्हा मंत्रीमंडळाच्या पहिल्या यादीत मला विजय शिवतारेचे नाव पाहीजे." बाळासाहेबांच्या माघारी उद्धवजींनी शब्द खरा केला, गेल्या युतीच्या सरकारमध्ये बाप्पूंना पहिल्या यादीत राज्यमंत्रीपदी विराजमान केले आणि पुरंदरच्या स्वाभिमानाची पोहच पावती दिली.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
यापाठीमागे पुण्याई होती पुरंदरच्या हक्काच्या गुंजवणी धरणातील २.०२ टीएमसी पाण्याची. पुरंदरकरांच्या जे कपाळावर लिहले होते, ते त्यांना डोळ्यांनी वाचता येत नव्हते. बाप्पूंनी प्रत्येक पुरंदरकराचा तिसरा डोळा उघडला आणि गुंजवणी प्रकल्प मेंदूत उतरवला. सत्तेत नसताना सासवडच्या पालखीतळावर उपोषण केले. आठ दिवस अन्न-पाण्याशिवाय संघर्ष केला.
शरीराचे नुकसान झाले, एक किडणी निकामी झाली. बाप्पूंना व्याधींनी कवटाळले. २०१३ साली कावीळ पोटात उतरली होती. कालांतराने बायपास, डायलेसीस आणि आजारपणांनी शारीरीक मर्यादा निर्माण झाल्या. बाप्पू ऐन आजारपणात मंत्रीपदावर होते. अफाट प्रवास केलाय या माणसाने, दर महिण्याला नविन ड्रायव्हर लागत होता पण बाप्पु थांबायचे नाव घेत नव्हते. शरीराची हेळसांड झाली आणि शेवटी मृत्युशी झूंज देत कणखरपणे पुन्हा बाप्पू पुरंदरच्या मातीत खेळू लागलेत.
बाप्पूंनी आयुष्यात खूप संघर्ष केला. जन्मापासून, शिक्षणापासून, व्यवसायापासून, राजकारणापासून, जगण्या-मरण्यापासून ते कुटूंबापर्यंत हा संघर्ष अजूनही सुरू आहे. हा माणूस हाडामांसापेक्षा वेगळ्या काहीतरी रसायनांनी बनला आहे. त्यांची आत्मशक्ती प्रचंड मोठी आहे, सकारात्मक आहे.
आंगची बुद्धी आणि अभ्यासूपणा आहे. माणसांचा अनुभव आहे आणि उत्तम संघटनकौशल्य आहे. मदतीची भावना नैसर्गीक आहे. लढवय्या बाणा आहे त्यामुळे एकाही कार्यकर्त्याला वैयक्तीक जिवनातसुद्धा खचू दिले नाही. गोरगरीबांप्रती ममत्व भाव आहे, बाप्पूंच्या दारातून मोकळ्या हातांनी कोणीही माघारी गेला नाही.
बाप्पू कालही पुरंदरच्या मातीत होते, आजही पुरंदरच्याच मातीत आहेत आणि उद्याही पुरंदरच्याच मातीत राहतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पुरंदरच्या मातीला, पुरंदरच्या मनाला बाप्पूंची नितांत गरज आहे. काळ वाईट असला तरीही पुरंदरकरांच्या हक्कासाठी बाप्पू स्वस्थ बसणार नाहीत. पुरंदरकरांच्या या ढाण्या वाघाला सदृढ, निरोगी, दिर्घायुष्य लाभो हीच खंडेरायाचरणी प्रार्थना करतो..!!
वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा बाप्पू..!! 💐💐
लेखक : - पुरंदरचे युवा लेखक, स्तंभलेखक निखीलआण्णा घाडगे.
No comments:
Post a Comment