Monday, December 20, 2021

"पुरंदरच्या शिवप्रेमींकडून कर्नाटक मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध; सासवड येथील शिवतीर्थ परिसरात संतप्त शिवप्रेमींनी जाळले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र"....



पुरंदर, सासवड, दि. 20 : - कर्नाटक मधील बंगळुरू येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून विटंबना करणारी संतापजनक घटना नुकतीच घडली.या घटनेनंतर देशभरात,महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध मोर्चे,आंदोलने, करण्यात येत आहेत. 




महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरंदर तालुक्यातही या संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद उमटले. सासवड येथील शिवतिर्थावर   सर्व शिवप्रेमींनी जोरदार घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 




सासवड येथील शिवतीर्थावरील शिवप्रेमींच्या संतप्त भावना, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे छायाचित्र जाळून तीव्र निषेध केलेला व्हिडिओ : -





कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल , कर्नाटकचे मुख्यमंत्री व कर्नाटक सरकारचा देखील जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र पायदळी तुडवून जाळण्यात आले.





मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीने अखंड भारताची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करणे ही बाब गंभीर आहे, त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली. कर्नाटकच्या  मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा शिवप्रेमींकडून देण्यात आला. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



"संपूर्ण भारताची अस्मिता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटकमध्ये समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेच्या घटनेचा तीव्र निषेध आहे. विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कडक कारवाई करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह, देशातील जनतेची माफी मागावी." अशी प्रतिक्रिया पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी दिली.




यावेळी सासवड येथील शिवतिर्थावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी व मराठा महासंघाचे पदाधिकारी तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी,शिवप्रेमी उपस्थित होते.





यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजाभाऊ जगताप, गणेश मुळीक, रामभाऊ बोरकर, संदीप जगताप, काँग्रेसचे नंदकुमार जगताप, सागर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, ज्येष्ठ नेते विजय कोलते, बंडू काका जगताप, नगरसेविका मंगल म्हेत्रे, शिवसेना शहराध्यक्ष अभिजित जगताप, युवा नेते सुरज जगताप, संतोष जगताप, बाळासाहेब भिंताडे, राहुल गिरमे, भाजपचे सलील जगताप, आनंद जगताप, तसेच स्वप्निल गायकवाड, नंदकुमार कड व शिवप्रेमी उपस्थित होते.





यावेळी, सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांना शिवप्रेमींकडून निवेदन देऊन समाजकंटकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



कर्नाटकमधील बंगलोर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या  संतापजनक घटनेमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील शिवप्रेमी संतप्त झालेले असून, दोषी समाजकंटकांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून  शिवप्रेमींकडून केली जात आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


महापुरुषांची बदनामी करणाऱ्या, विटंबना करणाऱ्या समाजातील विकृत समाजकंटकांवर  कठोर कायदेशीर कारवाई होणे खूप गरजेचे आहे.






No comments:

Post a Comment