"पुरंदरचे लोकनेते, विकासपुरुष विजयबापू शिवतारे; पुरंदरचा अमृतवेल"....
पुरंदरचे लोकनेते, विकासपुरुष विजयबापू तुम्ही बारा-तेरा वर्षांपूर्वी पुरंदरला आलातं आणि निस्तेज पडलेल्या पुरंदरच्या राजकारणात खऱ्या अर्थाने चैतन्य आलं. तेव्हापासूनचं, पुरंदरच्या “गावपुढारी केंद्रीत” राजकारणाचं “विकेंद्रीकरण” सुरु झालं. खरंतर, तुमच्या खमक्या स्वाभिमानी बाण्यामुळेचं, प्रस्थापित गावपुढाऱ्यांसमोर खाली झुकणारी सर्वसामान्य डोकी, आजही ताठ मानेने चालतं आहेत.
राजकारण कशाशी खातात हे आम्हाला माहितं नव्हतं, पणं पुरंदरला आपल्या ताकदीची जाणीव तुम्ही करून दिली, आणि निस्तेज पडलेली वाडी वस्तीवरची पोरं-सोरंसुद्धा, समाजकारण व राजकारणात उतरली गेली. हे सगळं शक्य झालं, ते केवळ तुमच्यामुळेचं.
आम्हाला हिणवलं गेलं, आमच्या आई बापांवर दबावाचं राजकारण खेळलं गेलं, पणं पुरंदरच्या गोरगरीब जनतेच्या आशिर्वादाने, हीच सर्वसामान्य घरची पोरं पुढे उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती व जिल्हा परिषद सदस्य झाली. गोरगरीबा घरची लेकरं समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आणि गावगाड्याचा निर्णयसुद्धा घेऊ लागली.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
बापु, पुरंदरबद्दलची तुमची तळमळ,धडपड आणि निष्ठा आम्ही उघड्या डोळ्यांनी बघीतली आहे. तुम्ही गुंजवणीसाठी केलेला संघर्ष आणि त्यागं आम्ही कधीचं विसरणार नाही. प्रशस्त जेजुरी ग्रामीण रुग्णालय, जेजुरीचा चार पदरी रस्ता, कैक बंधारे, हजार शेततळी, शेकडो किलोमीटरचे रस्ते, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय विमानतळ , देवस्थानांना वरिष्ठ दर्जा, जेजुरी देवस्थान विकास आराखडा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तालुक्यात भयमुक्त वातावरण, सामाजिक सलोखा, शेकडो गरीब मुलींचं ”कन्यादान”, क्रिडा संकुल, बाजार समिती अशी असंख्य कामं तुमच्याच हातुन झाली. आणि खरा घात इथंच झाला…!!
प्रस्थापित गावपुढाऱ्यांच्या डोळ्यांत तुम्ही कुसळाप्रमाणे टोचु लागला. बापु अजुन पाच वर्षे जर आमदार राहिला तरं, आपल्याला मुदतपूर्व राजकीय संन्यास घ्यावा लागतो की काय ? या चिंतेने अनेकजण ग्रासले गेले. एकमेकांचे पाय ओढण्यात माहीर असलेल्या गावपुढाऱ्यांपुढे एकचं पर्याय शिल्लक होता. तो म्हणजे, "सुदाम्याचे पोहे मिळुन खाऊ, नाहीतरं आपणं सगळेचं घरी जाऊ".
कटकारस्थान शिजलं आणि सुरू झाली, गोरगरीब आणि सर्वसामान्य पुरंदरच्या जनतेच्या डोळ्यांत, धुळफेक टाकण्याची चढाओढ सुरू झाली. अगोदर, "विमानतळ हटवणारं" हे बनावट रॉकेट, विमानतळ बाधीत गावांमधुन हवेत सोडलं गेलं. तर नंतर, "बाराशे कोटींचा" मेड इन चायना बार तालुक्यात उडविला गेला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
कळसं म्हणजे, एका वर्षात गुंजवणीचं पाणी आणू म्हणतं, आश्वासनांचे फवारे असे काही उडवले गेले, की त्या फवाऱ्यांमध्ये शेजारचं "अशोकाचं" झाडं ओलं चिंब होऊन गेले. आणि पुढे काय झाले ते जगजाहीर आहेचं.
एका वर्षात आमच्या नशीबात आली ती फक्त, क्रिडासंकुलात मारलेली चुन्याची फक्की, आणि जेजुरीपर्यंत तिकीट काढावं लागणारी पीएमटी….!! बस्सं…!!! त्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, "हाताने" ओढावलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, आमच्या आम्हालाचं "हातभर" शुभेच्छा…!!!
पुरंदरचा ….."अमृतवेल"
जग जिंकणं सोपं आहे परंतु समाजाचं मनं जिंकणे हे तितकंच अवघडं आहे. आजपर्यंत राष्ट्र आणि महाराष्ट्रात, कैक जणांनी कैक वेळा निवडणुका लढविल्या, आणि जिंकल्याही. परंतु, समाजमनाच्या पटलावर, आपल्या कार्यकर्तृत्वाचा आणि विश्वासाचा ठसा मात्र, मोजकेचं उमटवू शकले. हे ढळढळीत सत्य असले तरी, आपल्या लोकशाहीची ही मोठी शोकांतिका आहे.
अन्यायाविरुद्ध कोणी आवाज उठविला की त्याला, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न होतो. हे समाजासाठी तितकेचं घातक आहे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
गाढवाचा नांगर फिरवला म्हणून इर्षेला पेटुन, त्याचं मातीत चक्क "सोन्याचा नांगर" फिरवणाऱ्यांचे, आम्ही वारसदार..!! साडेतीनशे वर्षांनंतरही, आम्ही हे जगाला छातीठोकपणे सांगतो. परंतु, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही, पुरंदरमधील आमचा बाप पाण्यावाचून तडफडतो. आणि याचा जाब विचारायला आम्ही मात्र, सत्ताधीशांपुढे चळचळ कापतो..!! कारण काय? तरं आम्ही लोकांचे नाही तरं पक्षाचे निष्ठावंत आहोत.
पुरंदरच्या मातीसाठी त्याने मात्र हा गुन्हा केला. ….तो सत्ताधीशांना घाबरला नाही, की गावपुढाऱ्यांपुढे कचरला नाही. अन्यायाच्या विरोधात त्याने, सरळ शड्डूचं ठोकला. आणि स्वामीनिष्ठा विरूद्ध भुमीनिष्ठेचा मुकाबला, पुरंदरच्या मातीत चांगलाच रंगला…!! होय, "लढ बाप्पुचा" एकचं नारा, पुरंदरच्या घरा घरात घुमला.
नावातचं विजय असलेल्या शिवतारेंनी, मगं पुरंदरच्या विकासासाठी स्वत:ला झोकुन दिलं. कामं करण्याचा झपाटा व कल्पक बुद्धीने शेकडो कोटींची कामे पुरंदरमध्ये खेचून आणली.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदरचा स्वाभिमान पुन्हा एकदा असा काही बुलंद झाला की, मायबाप जनतेने बापुला मंत्रीमंडळातचं धाडला…!! बापुसुद्धा याचं मातीतला होता, पुरंदरच्या गोरगरीब जनतेसाठी, तो तरं स्वत:च्या जीवावरचं खेळला…!!
टाकलेला विश्वास आणि मिळालेल्या आशिर्वादाने, बापुंनी पुरंदरसाठी काय केले, आणि बापुंच्या पश्चात पुरंदरचे काय झाले ? ते जनतेसमोर पाण्यासारखे स्वच्छ आहेचं..!! आता गरज आहे ती फक्त, निःपक्षपातीपणे फरक करण्याची.
शेकडो कोटींच्या कामाची उद्घाटने पाहणारा पुरंदर, हल्ली मात्र "चष्म्याच्या शिबीरांचं" उद्घाटन बघतं आहे..!! आणि "हाताने" वाटोळं केलं म्हणतं, डोक्याला "पंजा" लावतं आहे..!! मंत्र्यांबरोबर फोटो काढून कोणं "दमदार" होतं नाही, की "अमृततुल्यांचे" उद्घाटन करुन कोणी, "कामदार" होतं नाही…त्यासाठी गरज असते ती डोक्याला कफन बांधून, रात्रंदिवस जनतेसाठी राबण्याची…! खरंतर, "नांव" कमावण्यासाठी काही गुणं हे, आंगचेच लागतात. कारण वारशाने मिळालेली नावं तर फक्त, सातबाऱ्यालाचं लागतात..!! पुरंदरच्या रानमाळावर आता, "काँग्रेसचं तणं" माजलं आहे, कारणं "पुरंदरचा अमृतवेल", .... आम्ही आमच्याचं "हाताने" खोडला आहे.
आदरणीय बापु…
पुरंदरच्या उजाड रानाचं नंदनवन करण्याचं स्वप्नं आपणं पाहिलं, आणि ते फुलवण्यासाठी व सत्यसृष्टीत उतरविण्यासाठी, जीवाचं रानंही केलं. दुर्दैवं कोणाचं हे नियतीलाचं माहीत आहे, परंतु पुरंदरचे ते स्वप्नं आता भंग पावले आहे. तरीसुद्धा त्या भंगलेल्या स्वप्नांच्या टोकदार तुकड्यांवरून, रक्ताळलेल्या पायांनी आपणं आजही धावत आहातं…!! धन्य आहे ती माऊली, जिच्या पोटी आपणं, जन्म घेतला आहातं…!!
बापु आपणांस वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा..!
आई जगदंब आपणास निरोगी व दिर्घायुष्य देवो…!
लेखक : - सामाजिक, राजकीय विषयांवरील दर्जेदार लेखन करणारे पुरंदरचे प्रसिद्ध लेखक अजितकाका जाधव.
पुरंदरास असा नेता होणे नाही, मा. बापुसं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐 जय महाराष्ट्र🚩🚩🚩
ReplyDelete