Monday, December 6, 2021

"महाराष्ट्राच्या पुरोगामी रणरागिणी; राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्नुषा 'इंदुमती राणीसाहेब' यांची जयंती व भारतीय संविधानाचे शिल्पकार 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सासवड नगरपरिषदेत अभिवादन कार्यक्रम संपन्न...."



पुरंदर, सासवड, दि.6 : आजचा पुरोगामी, प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेक संत, महापुरुष, समाजसुधारक,ध्येयवादी नेते, विचारवंत, क्रांतिकारक अश्या शेकडो कर्तुत्वान मराठी व्यक्तिमत्वांचे मोठे योगदान आहे. 





महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरंदरच्या सासवड भूमीतील महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्या  कुळातील सासवडचे शंकरराव पांडुरंग जगताप यांच्या वीरकन्या, महाराष्ट्रातील ऐतिहासिक कोल्हापूरच्या भूमीत स्त्री शिक्षणासाठी व महिला सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी कार्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरोगामी रणरागिनी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्नुषा इंदुमतीदेवी राणीसाहेब यांच्या जयंतीनिमित्त व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सासवड नगरपरिषदेत पुरंदर-हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय  जगताप व सासवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या पुरोगामी रणरागिनी इंदुमती राणीसाहेब व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, मान्यवरांच्या उपस्थितीत, अभिवादन करण्यात आले. 





सासवड नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षी सहा डिसेंबर रोजी इंदुमती राणीसाहेब कोल्हापूर संस्थान यांची जयंती साजरी करण्याचे आश्वासन पुरंदर-हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये सासवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी दिले.





या कार्यक्रमासाठी सासवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष सारिका हिवरकर, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगरसेवक मनोहर जगताप, विजय वढणे, प्रवीण भोंडे, संदीप जगताप, अजित जगताप, सुहास लांडगे, संजय ग जगताप, सचिन भोंगळे, दीपक टकले, संतोष खोपडे, मनोज म्हेत्रे, सागर जगताप, संदीप राऊत, नगरसेविका माया जगताप, पुष्पा जगताप, निर्मला जगताप, वसुधा आनंदे, विद्या टिळेकर, सीमा भोंगळे, मंगल म्हेत्रे, अस्मिता रणपिसे, माजी नगराध्यक्ष यशवंत काका जगताप, वामन तात्या जगताप, नंदूबापू जगताप, तसेच

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


महाराष्ट्र शासनाचे चित्रपट अनुदान समितीचे सदस्य भूषण जगताप, डॉक्टर वृषाली जगताप, प्रा. प्रज्ञा जगताप, सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक आप्पा जगताप, महेश जगताप, अनिल जगताप, बाळासाहेब पायगुडे, बळवंत गरुड, ॲड. सौरभ वढणे, भूषण मचाले, सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व इंदुमती राणीसाहेब महिला विचार मंच सासवडचे सर्व सदस्य व सासवड नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



स्वराज्याच्या पहिल्या लढाईत ऐतिहासिक कामगिरी गाजवणाऱ्या सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्यासारख्या पराक्रमी शिलेदारांचा वारसा असणाऱ्या जगताप घराण्यातील इंदुमती राणीसाहेब यांचा विवाह 6 जून 1917 रोजी  राजर्षी शाहू महाराजांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांच्याशी झाला. 



लग्नानंतर एका वर्षानी शिकार करत असताना प्रिन्स शिवाजी महाराज यांचा अपघाती मृत्यू झाला. हे वेदनादायी दुःख पचवून राजर्षी शाहू महाराजांनी इंदुमती राणी साहेबांना मुलीप्रमाणे वाढवले. चांगले शिक्षण दिले, योग्य मार्गदर्शन करून एक सुसंस्कृत, कणखर, आदर्श स्त्री व्यक्तिमत्व इंदुमती राणी साहेबांच्या रूपात घडवले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



राजर्षी शाहू महाराजांनी इंदुमतीदेवींना सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे त्यांना आधार दिला, उर्वरीत आयुष्य शैक्षणिक,सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यावे म्हणून प्रोत्साहन दिले.




"इंदुमती राणी साहेबांचे रूप जसे विलक्षण होते, तशीच  बुद्धीमत्ताही  अतिशय विलक्षण होती, दैव जिथे रुपाची खैरात करते तिथे बुद्धीची देणगी द्यायला कंजुषपणा दाखवते परंतु नियमाला अपवाद असतो ना त्याप्रमाणे इंदुमती राणी साहेबांना सौंदर्य, बुद्धी यांचे दान परमेश्वराने मुक्तहस्ते केल्याचे दिसून येते. अभिजात लावण्य व अभिजात बुद्धी यांचे वरदान लाभलेली ही लावण्यवती महाराष्ट्राच्या भाग्यविधाते छत्रपती घराण्यात कुलवधू म्हणून प्रवेश करती झाली.  छत्रपती शाहूमहाराज करते समाज सुधारक होते. 'आधी केले आणि मग सांगितले 'या बाण्याचे. त्याप्रमाणे त्यांनी  अतिशय बुद्धिमान  आणि  रूपवान अशी सून आपल्या घरात आणली व त्यांच्या  माध्यमातून समाज सुधारणा केली.जिथे जिथे इंदुमती राणीसाहेब जात तेथे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव पडत होता.त्यांच्या सौंदर्याचा, आदबशिरतेचा, चतुराईचा आणि जिव्हाळ्याचा सौरभ कोल्हापूरपासून गवाल्हेरपर्यंत सर्व मराठामंडळात पसरला होता.अशीही सासवडच्या जगतापकरांची वीरकन्या, लेक तमाम मराठा समाजाची आवडती राणी झाली." अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉक्टर सुवर्णा निंबाळकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




इंदुमती राणीसाहेब या 1925 मध्ये मॅट्रिक पास झालेल्या त्यावेळेच्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. कोल्हापुरात इंदुमती राणी साहेबांनी 1954 ला ललित विहार संस्था स्थापन करून स्त्री शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.  "महाराणी शांतादेवी गायकवाड प्रशिक्षण संस्था, महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय, महिला वसतिगृह, मॉडन हायस्कूल फॉर गर्ल्स"  या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य स्त्री वर्गाला  शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम इंदुमती राणीसाहेबांनी केले.




महाराष्ट्रातील पहिले औद्योगिक कलाभवन सुरू करून इंदुमती देवी राणी साहेबांनी महाराष्ट्रातील महिलावर्गाला सुशिक्षित व सक्षम बनवण्यासाठी मोठी चळवळ उभी केली.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now



डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इंदुमती राणीसाहेब यांचा जीवन प्रवास तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे.




No comments:

Post a Comment