पुरंदर, निरा, दि.5 : पुरंदरचे प्रहारचे शिलेदार, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे व महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन कार्तिकी एकादशी दिवशी, महाराष्ट्राचे लोकप्रिय राज्यमंत्री, आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत, उत्साहात पार पडले.
"समाजातील दुर्लक्षित, पीडित, सामान्य घटकांसाठी निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे काम करून प्रहार जनशक्ती पक्षाचा जनसेवेचा वसा प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
29 नोव्हेंबरला कोल्हापूर पासून आमदार बच्चू कडू यांचा नियोजित जनसंपर्क दौरा सकाळी सुरू झाला. 29 नोव्हेंबरला निरा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रात्री 9 वाजता नियोजित होते. हा दौरा कोल्हापूर पासून अनेक ठिकाणी, अनेक भरगच्च कार्यक्रम असल्याने संध्याकाळी 9 वाजताची वेळ रात्री 10.30 वाजता करण्यात आली.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
अचानक सातारा जिल्ह्यातील कराड (पेठ नाका) येथे एका मजूर दाम्पत्याचा अपघात झाला. बच्चू कडू यांनी अपघातातील जखमी व्यक्तींची आस्थेने चौकशी केली. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या आमदार बच्चू कडू यांनी स्वतःच्या गाडीतून त्यांना कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. नियोजित दौरा चालू असतानाही माणुसकी जपत सामान्य लोकांचा विचार करणारा हा नेता असल्यामुळे व या घटनेमुळे साहजिकच इतर ठिकाणच्या सर्व नियोजित कार्यक्रमाची वेळ पुढे ढकलली गेली.
शेवटी पुरंदर तालुक्यातील निरा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रात्री एक नंतर म्हणजेच दिनांक 30 तारखेला, कार्तिकी एकादशीला झाले.
निरा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची वेळ पुढे गेली. तारीख बदलली. परंतु या गावात पक्षाचे कार्य चांगले वाढत आहे. अशा ठिकाणी आमदार बच्चू कडू येणार म्हणून अनेक कार्यकर्ते, दिव्यांग लोक वाट बघत संध्याकाळी 7 पासून बसून होते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
दिव्यांग लोक आमदार बच्चू कडू यांना स्वतःचा देव म्हणजेच विठ्ठल समजतात पण काही कारणाने निरेमध्ये त्यांची आगमन तारीख बदलल्याने 30 नोव्हेंबरच्या पहाटे म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी आगमन होऊन निरा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हे कार्तिकी एकादशीच्या दिवशी झाले हा एक दैवी योग जुळून आल्याची भावना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
"शोषित, पीडित, वंचित, शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगाचे मसीहा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे झुंजार नेते, लोकनेते राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांनी प्रहारच्या माध्यमातून खूप मोठे संघटन उभारले आहे. तसेच बच्चूभाऊ कडू यांचे महाराष्ट्रातील दिव्यांगासाठीचे करत असलेले काम खूप मोठे व सर्वांसाठी प्रेरक आहे." अशी प्रतिक्रिया प्रहारचे शिलेदार मंगेश ढमाळ यांनी दिली.
"नीरा शहरात रात्री १ वाजता राज्यमंत्री नामदार बच्चूकडू साहेब यांनी प्रहार कार्यालयाचे उद्घाटन केले. निश्चितच पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि दिशा देण्याचे काम झाले. प्रहारचे रुग्णसेवक मंगेश ढमाळ यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी व सर्वसामान्य लोकांसाठी नेहमीच चांगले काम केलेले आहे. निरा प्रहारच्या कार्यालयातून नक्कीच गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम केले जाईल. सोबतच गरजू रुग्णाच्या मदत व हक्कासाठी एक प्रामाणिक प्रयत्न करणारी रुग्णसेवकाची फळी काम करताना नागरिकांना पहायला मिळेल."अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक व प्रहारचे राज्य समन्वयक गौरव जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"प्रहारचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांचे सामाजिक बांधिलकीतून, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांसाठीचे प्रामाणिक कार्य निश्चितच तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा समाजहिताचा विचार, निस्वार्थ, प्रामाणिक जनसेवेतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मंगेश ढमाळ करतील अशी खात्री आहे. अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
या उद्घाटन कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री पृथ्वीराज भैय्या काकडे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शेतकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते सतीशभैय्या काकडे, छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संचालक ॲड तात्यासाहेब ढमाळ, प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य समन्वयक गौरव जाधव तसेच
प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बारस्कर महाराज, पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ॲड काळे, पत्रकार व निवेदक विठ्ठल पवार, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, ॲड आदेश गिरमे, प्रहारचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते,सुनील अण्णा पाटोळे, दादा गायकवाड उपस्थित होते.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या कार्यक्रमावेळी आदिराज कोठडीया,सुरेंद्र जेधे, मचींद्र लकडे,अमोल कदम,दीपक डागा,गणेश साळुंखे,अमेय गरुळे,नितीन दगडे, अविनाश थोपटे, राहुल शिंदे,अतुल कदम, रोहित लकडे,सोन्या शिर्के,अनिकेत मदने,दिनेश पवार,अमोल शेडगे,अमोल घुले पाटील,मयूर पवार,पराग काटकर,मयूर काकडे,इरफान सय्यद,सिद्धांत रणदिवे,हृषिकेश पोरे,सहील गोरे तसेच
शुभम गायकवाड, शुभम जावळे,राहुल जाधव,योगेश राऊत,माऊली गायकवाड, सनी दळवी, हरिभाऊ गायकवाड, जगणाथ धायगुडे, आकाश सणस,कुणाल ढमाळ,धैर्यशील काकडे,विशाल होळकर,मंगेश भादेकर,सुभाष मोरे, सौरभ जोशी, विजय महामुनी,जय मोरे,सुनील बारवकर, ओमकार गायकवाड उपस्थित होते.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या कार्यक्रमासाठी निलेश कविटकर, मनोज सरवाड,अनिकेत सुर्यवंशी,शुभम मुळे,वैभव थोपटे,बाबा बागवान,दयानंद चव्हान,अभिषेक भालेराव,विजय शिंदे,अजय भोसले, बापु ढावरे, करण शेवाळे,चेतन खताळ,विक्रम दगडे,अनुप अगरवाल,निखिल गायकवाड,गणेश जगताप, प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस संदीप नवले,केतन चव्हाण,संग्राम घोणे,दीपक ढमाळ, अविनाश निकम, पत्रकार स्वप्नील कांबळे, हृकिकेश कांबळे, कीर्ती व निरेतील ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment