Friday, October 22, 2021

"महाराष्ट्राचे आदर्श राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील नागरिकांच्या अडचणी, समस्या "जनता दरबारच्या" माध्यमातून प्रहार पक्ष प्रामाणिकपणे सोडवेल; पुणेकरांचे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष एक आशेचा किरण"



पुणे, दि. 22 : - महाराष्ट्राच्या तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी निस्वार्थी, प्रामाणिक, उल्लेखनीय, समाज हितवादी कार्य करून जनसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा व पुणे शहर विभागातील पदाधिकारी, प्रहारचे  शिलेदार जनतेच्या गंभीर प्रश्‍नांसाठी आवाज उठवत असतानाच, रुग्णसेवा व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून जनसामान्यांची मने जिंकत आहेत. 




"महाराष्ट्राचे आदर्श मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांचे वेगवेगळे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, रुग्णसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेकडो, हजारो  लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत." 



"पुणे शहरातील नागरिकांच्या अडचणी व समस्या "जनता दरबारच्या" माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. पुणेकरांचे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष एक आशेचा किरण असेल" अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now 


पुणे शहरातील आंबेगाव पठार येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांच्या हस्ते व सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.



या कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनंत काळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे शहर युवा अध्यक्ष अजिंक्य बारणे व त्यांचे सहकारी तसेच पुणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते व वेगवेगळ्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 




या कार्यक्रमाप्रसंगी प्रहारचे शिलेदार, आदर्श रुग्णसेवक उमेश महाडिक, पत्रकार विठ्ठल पवार, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पुनम तावरे, शिवसेना खडकवासला विभाग प्रमुख अनिल भोसले, पुणे शहर युवा उपाध्यक्ष मिथुन आवारे, पुरंदर युवा तालुकाध्यक्ष आकाश सणस, भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते, पुणे शहर युवा अध्यक्ष मनोज हरकळ, पुणे शहराध्यक्ष सुनील गोरे, पुणे शहर सरचिटणीस संदीप नवले, पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख सुधीर अंकुशे उपस्थित होते. 


या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संतोष खोपकर, पंकज जगदाळे, हरी फडतरे, अमोल मानकर, नितीन पगार, प्रकाश मोरे, संतोष कारले, पतित पावन संघटनेचे विजय क्षीरसागर, चारू पाटोळे, अक्षय पवार, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कोंडे, सचिन बांदल, तसेच योगेश राजगुरू, शंकर लोखंडे, तुषार दळवी, गुरु चव्हाण, यश नलावडे, अजय क्षीरसागर, रोहन जाधव, ओमकार काळे, जयराज शिळीमकर, विशाल देशमुख, भूषण दळवी, राहुल चव्हाण, खंडू कांबळे, शंकर चव्हाण, धनकवडी महिला अध्यक्ष राधा सोनी, दिपाली गायकवाड, नंदिनी कुमकर उपस्थित होते.




"प्रहार जनशक्ती पक्ष तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा पक्ष असून, प्रहार जनशक्ती पक्षाची ध्येयधोरणे, विचार तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे विचार व कार्य समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटनाचा क्षण सर्वांसाठीच आनंदाचा आहे." 

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


"या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पुणे शहरातील नागरिकांच्या अडचणी, समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न सर्वजण करतील याचा आम्हाला विश्वास आहे. संतोष साठे यांचे पुणे शहरातील या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीचे तसेच रुग्णसेवेचे खूप चांगले काम आहे." 



"प्रहार जनशक्ती पक्ष संतोष साठे यांच्या  पाठीशी भक्कमपणे उभा आहे. येणाऱ्या काळात संतोष साठे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन लोकांची सेवा करतील असा आशावाद प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना व्यक्त केला.


"समाजातील सर्वसामान्य व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच झटणारे आमचे प्रहारचे संतोष साठे अहोरात्र रुग्णसेवेचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. आज पर्यंत कोट्यवधी रुपयांची गरीब रुग्णांची हॉस्पिटलची बिले माफ करून घेण्यामध्ये संतोष साठे यांचे सिंहाचे योगदान आहे." 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now




"आंबेगाव पठार परिसरातील रस्त्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, विद्युत रोहित्राचा प्रश्न, तसेच पुणे शहरातील विविध जनसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी संतोष साठे आक्रमकपणे आवाज उठवत आहेत." 


"तसेच जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलने केलेली आहेत. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्‍नांसाठी कायमच प्रामाणिकपणे झटणारे आमचे संतोष साठे येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकेत आंबेगाव विभागातून नगरसेवक म्हणून निवडून येतील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे काम मोठ्या ताकतीने पुणे शहरात वाढवतील अशी आम्हाला खात्री आहे." अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



"प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या 4-5 वर्षापासून प्रहारचे आमचे शिलेदार संतोष साठे रुग्णसेवेच्या माध्यमातून तसेच पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी या नात्याने तसेच मा. श्री.राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या विचाराने आपल्या प्रभागातील शोषित, पीडित, दिव्यांग, गोरगरीब नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी  नेहमीच जागरूक असतात."



"सध्याच्या काळात आर्थिक परिस्थीती मुळे सर्व सामान्य माणूस हतबल झाला आहे. आर्थिक परस्थितीमुळे गरीब माणूस औषध उपचाराविना भयंकर आजारांमुळे बळी पडत आहेत. बच्चु कडू यांच्या विचारातून आमचा प्रहार जनशक्ती पक्ष अश्या लोकांना मदतीचा हात देऊन आरोग्य विषयक  सामाजिक कार्य करत आहे."  



"संतोष साठे यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीस  व कार्यास मी मन: पूर्वक शुभेच्छा देतो." अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"कोरोना काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून पुणे शहरात रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, इंजेक्शन उपलब्ध करून देणे तसेच गरजू रुग्णांना मोफत उपचार करून देणे यासाठी आमची संघटना प्रामाणिकपणे अहोरात्र काम करत आहे." 

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


"कोरोना काळात परिसर निर्जंतुकीकरण करणे, गरजू लोकांना अन्नधान्याचे कीट वाटप करणे तसेच गरजू लोकांना जेवण वाटप या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून आम्ही पुणेकरांची सेवा करण्याचा प्रयत्न केला." 

सर्वसामान्य कुटुंबातील असलेले प्रहारचे शिलेदार संतोष साठे यांचे सामाजिक कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे." अशी प्रतिक्रिया प्रहारचे शिलेदार, आदर्श रुग्णसेवक उमेश महाडिक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


पुणे शहरातील नागरिकांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवा संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आशेचा किरण दिसत आहे. पुणे शहरात विविध पक्ष व संघटना असल्या तरी नागरिकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवणाऱ्या पक्षाच्या व संघटनेच्या पाठीमागं पुणेकर नेहमीच भक्कमपणे उभे राहतात.




Sunday, October 17, 2021

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील "ऐतिहासिक शाही दसरा" सोहळा पारंपारिक पद्धतीने,भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न; श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या "या थोर देणगीदार" भक्ताने जिंकली सर्व भक्तगणांची मने; वीर देवस्थान ट्रस्टच्या "या" सामाजिक उपक्रमाचेही कौतुक....



पुरंदर, वीर, दि.17 : - महाराष्ट्रातील महान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे डोळ्यांचे पारणे फेडणारा, ऐतिहासिक 'शाही दसरा' सोहळा पारंपारिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात मंत्रमुग्ध होऊन, उत्साहात संपन्न झाला.




श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक विजयादशमीनिमित्त, श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पालखी व वस्त्र परिधान केलेल्या व फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठया, छबिन्यासह निशाण, छत्री, अब्दागिरी या लवाजम्यासह सायंकाळी पाच वाजता भक्तिमय वातावरणात सीमोल्लंघनासाठी निघाल्या.




या ऐतिहासिक सोहळ्यावेळी सालकरी, मानकरी, दागिनदार, देवस्थानचे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ,भक्त उपस्थित होते.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now 


"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर येथील शाही दसरा सोहळ्याची भक्त मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षीचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा भक्तिमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.


श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने तुकाई देवीची भेट घेऊन पारंपारिक पद्धतीने शाही दसऱ्याचे सीमोल्लंघन करून, गावाच्या वेशीवर विधिवत आपटा पूजन केले.




श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने पारंपारिक पद्धतीने गाव प्रदिक्षणा पूर्ण करून रात्री 8.30 वाजता मंदिरात आल्यानंतर, भक्तिमय वातावरणात छबीना  संपन्न झाला. या ऐतिहासिक शाही दसऱ्याच्या सोहळ्यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तवर्ग खूप आतुरतेने व आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतो.



श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीला फुलांची केलेली आकर्षक सजावट तसेच मंदिरास केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, आनंदमय वातावरणात फटाक्यांची केलेली आतिषबाजी, सुशोभिकरण केलेला पालखी मार्ग, फुलांची उधळण व "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात संपूर्ण भक्तवर्ग आनंदमय व भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाला.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


"पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्र उत्सव व शाही दसरा, ऐतिहासिक वीर गावच्या भक्तिमय संस्कृतीचे दर्शन घडवतो. पारंपारिक नवरात्रोत्सव व शाही दसरा याचे औचित्य साधून वीर देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेल्या "रक्तदान शिबिर" या सामाजिक उपक्रमास पंचक्रोशीतील तरुणांनी उत्तम प्रतिसाद दिला."


"वीर देवस्थान ट्रस्ट सर्व धार्मिक उत्सवांचे उत्तम नियोजन करून, चांगले सामाजिक उपक्रम राबवत असते." अशी प्रतिक्रिया पुरंदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वीर गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप धुमाळ यांनी दिली.




दसऱ्याच्या मुहुर्तावर श्रीनाथ म्हस्कोबा मंदीरातील तसेच श्री  क्षेत्र घोडेउड्डाण या ठिकाणी चालू असणारी कामे आणि भविष्यात करावयाची  कामे या संदर्भात मंदीरात आजी, माजी चेअरमन ,सल्लागार ,विश्वस्त आणि काही  ग्रामस्थ यांनी चर्चा केली.


 

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 



ही महत्त्वांच्या कामांविषयी  चर्चा करत असताना पोलीस शिलेदार बापूसाहेब धुमाळ यांनी घोडेउड्डाण मंदीर परिसरातील स्वच्छतागृह बांधकामाचा विषय काढला असता त्याला लागणाऱ्या खर्चाची चर्चा करत असताना वीर देवस्थानचे सल्लागार श्री रामचंद्र धुमाळ  यांनी वीर गावचे थोर देणगीदार, दानशूर व्यक्तिमत्व श्री विठठ्ल  धुमाळ यांना या कामामध्ये आर्थिक मदत करण्याबाबत विनंती केली असता एका क्षणात विठ्ठल धुमाळ यांनी मदतीसाठी  होकार दिला. 


"श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे भक्त व प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल धुमाळ यांनी देवस्थान ट्रस्टला घोडेउड्डाण मंदिर परिसरातील स्वच्छतागृह बांधकामासाठी  ७०००० रुपये देणगी स्वरूपात दिले. अशा सामाजिक व्यक्तिमत्वाला आमचा सलाम. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट .श्रीनाथ सेवा मंडळ घोडेउड्डान तसेच वीर ग्रामस्थ सर्व नाथभक्त श्री विठ्ठलशेठ धुमाळ यांचे आभारी आहोत." अशी प्रतिक्रिया वीर देवस्थानचे सल्लागार रामचंद्र धुमाळ यांनी दिली.



"वीर गावचा शाही दसरा ही शिवकालीन परंपरा आहे. अश्विन  शु. १ ते अश्विन ९ असा नऊ दिवसाचा कालखंड म्हणजे वीर गावातील छबिना व उपवास  यांची लगबग. छबिना उतरला की एक वेळ फराळ करून नवमीला उपवास सुटल्यावर विजयादशमी दसरा सोहळा म्हणजे वीर मधील दिवाळीच. या दिवशी सर्व काट्या, ढोल, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांची पालखी भक्त कमळाजी यांना भेटून तुकाई टेकडीवर तुकाई देवी मंदिर येथे आल्यावर शाही शत्रपूजन ब्राह्मण व धुमाळ परिवार, पाटील यांचेकडून होते."
 


"यानंतर पुढे सर्व पालख्या भक्तभेट घेऊन दसरा टेकडी म्हणजे सरदार लखोजीराजे धुमाळ व सरदार नाथाजी धुमाळ यांची समाधी असणाऱ्या टेकडीवर येतात. दसरा टेकडीवर शिवकालीन  असणाऱ्या समाधी ठिकाणी धुमाळ परिवाराकडील शस्त्र पूजन होते. तेथे पालखी विसावा आहे. तेथे सर्व गाव, मानकरी,सालकरी,भक्त या ठिकाणी सोने लुटून दोन्ही पालखी व समाधीचे दर्शन घेऊन फटाक्यांची आतिषबाजी केली जाते." 



"यानंतर पालखी ग्रामप्रदक्षिणा करून पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ होते मंदिरात नेहमी प्रमाणे विधिवत आरती होऊन पालखी विसावते नंतर सर्व दागिनदार , व भक्त यांना देवाचा प्रसाद म्हणजे पगार दिला जातो. हा सोहळा याची डोळा याची देही पाहिले शिवाय समजत नाही, मग सर्वांना आतुरता राहते ती माघ पौर्णिमाची." अशी प्रतिक्रिया वीर गावचे इतिहास अभ्यासक  बापूसाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"प्रत्येक वर्षी सर्व भक्तगण या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याची भक्तिभावाने वाट पाहत असतो. यावर्षी पारंपारिक पद्धतीने, उत्साहाच्या वातावरणात,खुप आनंदाने शाही दसरा सोहळा पार पडला." अशी प्रतिक्रिया वीर देवस्थानचे पुजारी गौरव क्षीरसागर यांनी दिली.




"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील "ऐतिहासिक शाही दसरा सोहळा" अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकत्र जोडणारा व ऐतिहासिक वीर गावच्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसऱ्याची वैभवशाली परंपरा सर्व भक्तगण अभिमानाने व भक्तिभावाने जोपासत असतात.अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा प्रत्येक वर्षी भक्तांसाठी आनंदमय वातावरणात, भक्तिमय संस्कृतीने समृद्ध करणारा असतो.





Tuesday, October 12, 2021

"जगातील प्रतिष्ठित 'नोबेल शांतता पुरस्कार' फिलिपिन्सच्या 'या' डिजिटल मीडियाच्या निर्भीड पत्रकार व रशियाच्या 'या' प्रभावशाली पत्रकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संघर्षासाठी जाहीर"; प्रामाणिक पत्रकारिता व डिजिटल मीडिया पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा तुरा"....



ओस्लो, दि.12 : - जगाचे लक्ष वेधून घेणारा, जगभरात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार, अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी,जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून लढा देऊन, आदर्श मूल्यांसाठी प्रभावशाली योगदान देणाऱ्या फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा आणि रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव्ह  यांना जाहीर झालेला आहे. जगभरातील निर्भीड, प्रामाणिक, समाजहितवादी पत्रकारिता करणाऱ्या सर्वांसाठीच हा पुरस्कार प्रेरणादायी व ऊर्जा देणारा आहे.




मारिया रेसा या फिलीपिन्स येथील "रॅपलर" या वृत्त संकेतस्थळाच्या सहसंस्थापिक आहेत. आधुनिक काळातील डिजिटल मिडिया पत्रकारितेच्या माध्यमातून मारिया रेसा यांनी निर्भीडपणे समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम केलेले आहे.

 
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

फिलिपिन्समधील सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही, अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे काम मारिया रेसा यांनी प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून केले.




रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रशियामध्ये आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करून अभिव्यक्तिस्वातंत्र्य बाबत आवाज उठवण्याचे प्रभावशाली कार्य केलेले आहे. 




दिमित्री मुरातोव्ह "नोवाया गॅझेटा"  वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणावर कडक टीका करण्याचे काम या वृत्तपत्राकडून केले जाते. रशियातील दुर्लक्षित विषय मांडणे. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now 

सत्य आणि वास्तवावर आधारित पत्रकारिता करून लोकांच्या समस्येवर प्रकाश टाकणे यासाठी हे वृत्तपत्र ओळखले जाते.


नॉर्वेजियन नोबल समितीने या शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला तब्बल 10 मिलियन स्वीडिश क्रोना म्हणजेच सुमारे आठ कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.


"सत्ताधार्‍यांचे अत्याचार, असत्य आणि युद्धखोर प्रचारापासून समाजाला वाचवण्यासाठी मुक्त, स्वतंत्र,  आणि सत्यावर आधारित पत्रकारिता सेवा करीत असते. असे नोबेल समितीने पुरस्कारांची घोषणा करताना म्हटले आहे.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now 


जगभरातल्या अनेक देशांमध्ये, अनेक राज्यांमध्ये, निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे समाजाचे गंभीर प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा आहे.


Friday, October 8, 2021

"सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रगतशील वाटचालीत आमच्या नेत्यांचे मार्गदर्शन,शेतकरी सभासद,कामगार,मजूर सर्वांचेच महत्वाचे योगदान;कुटुंब म्हणून काम करत असल्यामुळे मिळाले यश" - पुरुषोत्तम जगताप

 


बारामती, दि.8 : - महाराष्ट्रात उसाला उच्चांकी दर देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील वाटचाल करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागील अनेक वर्षांपासून सोमेश्वर सहकारी कारखान्यावर वर्चस्व आहे.




"सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रगतशील वाटचालीत आमच्या नेत्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहेच. त्याच बरोबर आमचे शेतकरी सभासद, कामगार, मजूर, ऊसतोड कामगार, ऊसतोड कॉन्ट्रॅक्टर,संचालक मंडळ, सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांचेच महत्त्वाचे योगदान आहे. आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून एकजुटीने काम करत असल्यामुळे आम्हाला चांगले यश मिळाले." अशी प्रतिक्रिया सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या "जनतेचा आवाज" या विशेष कार्यक्रमात संवाद साधताना दिली.



सोमेश्वर सहकारी साखर  कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 37,500 एकर उसाच्या क्षेत्राची नोंदणी झाली आहे. सोमेश्वर साखर कारखान्याला एकरी सरासरी 40 टन प्रमाणे 13 लाख 80 हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून, बिगर नोंदीचा दोन लाख टनांच्या आसपास ऊस उपलब्ध आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


अतिरिक्त ऊस संपवण्यासाठी सोमेश्वर कारखाना प्रशासन खबरदारी घेऊन आवश्यक प्रयत्न करत असते. सोमेश्वर कारखाना प्रशासनाने यासाठी माळेगाव, छत्रपती, दौंड शुगर, शरयू ॲग्रो, श्री दत्त शुगर, बारामती ॲग्रो या कारखान्यांना पत्रव्यवहार केल्याची माहिती सोमेश्वर कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली.




सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील नदीकाठच्या पट्ट्यात 0265 ऊसाच्या जातीचे उत्पादन शेतकरी घेत असल्यामुळे उसाचे उत्पादन चांगले वाढले. उसाच्या या जाती मुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now 


"ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे सवलतीच्या दरात कारखान्याच्या माध्यमातून दिली जातात. सभासदांना नारळ, चिकू आंब्याची झाडे दिली जातात." अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.



"ऊस उत्पादक सभासदांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगल्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. केजी टू पीजी पर्यंत चे शिक्षण, अनेक सुविधा व  सवलती देऊन  सभासदांच्या मुलांना दिले जाते."


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


"ऊस उत्पादक सभासदांसाठी दोन लाखाचा अपघात विमा ही सुविधा देण्यात आलेली आहे. सभासदांचा अपघात विमा उतरवलेला आहे तसेच सभासदांसाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा कारखान्याच्या वतीने दिलेली आहे. अशी माहिती पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now 


सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रगतशील वाटचालीत साखर विभागाबरोबरच, इथेनॉल प्रकल्प, विद्युत निर्मिती प्रकल्प यामुळे साखर कारखान्याच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. सोमेश्वर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांच्या ऊसाला चांगला उच्चांकी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.