बारामती, दि.7 : - महाराष्ट्रात ऊसाला उच्चांक दर देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील, दुष्काळी पट्ट्यातील, वाकी गावातील शेतकरी सभासदांची अनेक वर्षांपासूनची "उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्यामुळे,दुष्काळी पट्ट्यातील भाग असल्यामुळे वाकी गावचा "ऊस तोडणी कार्यक्रम पाच नंबर गटाच्या माध्यमातून" जलद व्हावा या मागणीला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सकारत्मक प्रतिसाद देऊन शेतकरी हिताचा निर्णय घेतलेला असून दुष्काळी पट्ट्यामधील गावातील ऊस तोडणी कार्यक्रमासारखीच वाकी गावातील ऊस तोडणी कार्यक्रम राबवणार आहोत. अशी प्रतिक्रिया सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"आमचे वाकी गाव दुष्काळी पट्ट्यातील असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असते. त्यामुळे ऊस तोडणी लवकर होणे आवश्यक असते. दुष्काळी पट्ट्यातील गावांसाठीचा "गट नंबर पाचच्या" माध्यमातून आमच्या शेतकरी सभासदांची ऊस तोडणी व्हावी ही मागणी अनेक वर्षापासून साखर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ यांच्याकडे आम्ही करत आहोत. पाठीमागे मतदानासाठी आमचे वाकी गाव पाच नंबर गटांमध्ये होते. परंतु ऊस तोडणीचा कार्यक्रम गट नंबर 3 च्या माध्यमातून राबवला जातो. कॅनल जवळच्या गावांना पाणी मुबलक असते पण आमच्या दुष्काळी भागात पाण्याची समस्या असते."
"दुष्काळी पट्ट्यामधील गावासाठीचा "गट नंबर 5 च्या" माध्यमातून वाकी गावचा ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात यावा अशी आमच्या सर्व शेतकरी सभासदांची मागणी आहे." अशी प्रतिक्रिया वाकी गावातील प्रगतशील शेतकरी,सोमेश्वर कारखान्याचे सभासद सुभाष जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
Flipkart...Best Offer... BIG BILLION DAYS... Upto 80% Off Across Categories.. Limited Time Deal! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"दुष्काळी पट्ट्यातील आमचे वाकी गाव असल्यामुळे पावसाच्या पाण्यावरच आमच्या 90 टक्के शेतीचे क्षेत्र अवलंबून असते. दुष्काळी पट्ट्यातील गावांसाठीचा "गट नंबर पाचच्या" माध्यमातून आमच्या शेतकरी सभासदांची ऊस तोडणी कार्यक्रम राबवण्यात यावा ही मागणी 20 वर्षापासून आम्ही शेतकरी, सभासद, साखर कारखान्याकडे करत आहोत."
"सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांनी, अध्यक्षांनी हा विषय गांभीर्याने घेऊन वाकी गावचा ऊस तोडणी कार्यक्रम दुष्काळी पट्ट्यातील गावांसाठीच्या "गट नंबर पाचच्या" माध्यमातून राबविण्यात यावा. यामुळे आमच्या भागातील शेतकरी वर्गाला चांगला दिलासा मिळेल. आमच्या सोमेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना,सभासदांना उसाचा चांगला दर दिलेला आहे ही समाधानाची गोष्ट आहे." अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी,कारखान्याचे सभासद हनुमंत खामकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
वाकी गावचे ज्येष्ठ नेते,उपसरपंच हनुमंत मानसिंग जगताप व सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडे व माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत जगताप यांनीदेखील "ऊस उत्पादक शेतकऱ्यांची योग्य मागणी असून ती लवकर पूर्ण व्हावी. यामुळे आमच्या दुष्काळी पट्ट्यातील वाकी गावातील शेतकरी सभासदांना दिलासा मिळेल." असे मत व्यक्त केले.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"सोमेश्वर साखर कारखान्याने गट नंबर तीनची दोन भागात विभागणी केलेली आहे. बागायती क्षेत्राचा अ विभाग, दुष्काळी पट्ट्यातील भागाचा ब विभाग, दुष्काळी पट्ट्यातील भागातील शेतकऱ्यांचा ऊस तोडणी कार्यक्रम लवकर, प्राधान्यक्रमाने होण्याची व्यवस्था केलेली असते. शेतकरी हिताचे निर्णय आम्ही नेहमीच प्राधान्याने घेत असतो. दुष्काळी पट्ट्यामधील गावातील ऊस तोडणी कार्यक्रमा सारखाच वाकी गावातील ऊस तोडणी कार्यक्रम राबवणार आहोत." अशी प्रतिक्रिया सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल चालू आहे. दुष्काळी पट्ट्यातील वाकी गावातील शेतकरी सभासदांची 'गट नंबर पाचच्या माध्यमातून ऊस तोडणी कार्यक्रमाची मागणी' पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर साखर कारखान्याचे व्यवस्थापन नक्कीच प्रयत्न करतील. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
शेतकरी, सभासदांच्या हिताचा विचार करून उसाला राज्यात उच्चांकी, चांगला दर देणारे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन नक्कीच सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्याची योग्य अंमलबजावणी करून शेतकरी वर्गाला चांगला न्याय देतील अशी अपेक्षा आहे.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
No comments:
Post a Comment