Friday, October 8, 2021

"सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रगतशील वाटचालीत आमच्या नेत्यांचे मार्गदर्शन,शेतकरी सभासद,कामगार,मजूर सर्वांचेच महत्वाचे योगदान;कुटुंब म्हणून काम करत असल्यामुळे मिळाले यश" - पुरुषोत्तम जगताप

 


बारामती, दि.8 : - महाराष्ट्रात उसाला उच्चांकी दर देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील वाटचाल करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागील अनेक वर्षांपासून सोमेश्वर सहकारी कारखान्यावर वर्चस्व आहे.




"सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रगतशील वाटचालीत आमच्या नेत्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहेच. त्याच बरोबर आमचे शेतकरी सभासद, कामगार, मजूर, ऊसतोड कामगार, ऊसतोड कॉन्ट्रॅक्टर,संचालक मंडळ, सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांचेच महत्त्वाचे योगदान आहे. आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून एकजुटीने काम करत असल्यामुळे आम्हाला चांगले यश मिळाले." अशी प्रतिक्रिया सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या "जनतेचा आवाज" या विशेष कार्यक्रमात संवाद साधताना दिली.



सोमेश्वर सहकारी साखर  कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 37,500 एकर उसाच्या क्षेत्राची नोंदणी झाली आहे. सोमेश्वर साखर कारखान्याला एकरी सरासरी 40 टन प्रमाणे 13 लाख 80 हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून, बिगर नोंदीचा दोन लाख टनांच्या आसपास ऊस उपलब्ध आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


अतिरिक्त ऊस संपवण्यासाठी सोमेश्वर कारखाना प्रशासन खबरदारी घेऊन आवश्यक प्रयत्न करत असते. सोमेश्वर कारखाना प्रशासनाने यासाठी माळेगाव, छत्रपती, दौंड शुगर, शरयू ॲग्रो, श्री दत्त शुगर, बारामती ॲग्रो या कारखान्यांना पत्रव्यवहार केल्याची माहिती सोमेश्वर कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली.




सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील नदीकाठच्या पट्ट्यात 0265 ऊसाच्या जातीचे उत्पादन शेतकरी घेत असल्यामुळे उसाचे उत्पादन चांगले वाढले. उसाच्या या जाती मुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now 


"ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे सवलतीच्या दरात कारखान्याच्या माध्यमातून दिली जातात. सभासदांना नारळ, चिकू आंब्याची झाडे दिली जातात." अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.



"ऊस उत्पादक सभासदांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगल्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. केजी टू पीजी पर्यंत चे शिक्षण, अनेक सुविधा व  सवलती देऊन  सभासदांच्या मुलांना दिले जाते."


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


"ऊस उत्पादक सभासदांसाठी दोन लाखाचा अपघात विमा ही सुविधा देण्यात आलेली आहे. सभासदांचा अपघात विमा उतरवलेला आहे तसेच सभासदांसाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा कारखान्याच्या वतीने दिलेली आहे. अशी माहिती पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now 


सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रगतशील वाटचालीत साखर विभागाबरोबरच, इथेनॉल प्रकल्प, विद्युत निर्मिती प्रकल्प यामुळे साखर कारखान्याच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. सोमेश्वर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांच्या ऊसाला चांगला उच्चांकी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



No comments:

Post a Comment