पुरंदर, वीर, दि.7 : - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथे "सवाई सर्जाचं चांगभलं" भक्तिमय जयघोषात, पारंपरिक पद्धतीने घटस्थापना सोहळा शासनाचे सर्व नियम पाळत पार पडला. श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात आज आश्विन शुद्ध प्रतिपदा या मुहूर्तावर घटस्थापना करण्यात आली.
शासकीय आदेशानुसार आज मंदिरे खुले होण्याच्या पार्श्वभूमीवर हा पारंपारिक सोहळा पार पडला. यावेळी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, शासनाचे सर्व नियम पाळून, विधिवतपणे सकाळी साडेअकरा वाजता घटस्थापना करण्यात आली. नंतर धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
Buy Now
तत्पूर्वी नवरात्र उत्सवा संदर्भात झालेल्या बैठकीत छबिना कीर्तन-प्रवचन याचे नियोजन, सोशल डिस्टंसिंग चे पालन करत,शासनाच्या नियमांचे पालन करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे ठरले. मंदिरातील नऊ दिवसाचे वास्तव्य व ये-जा करणे बाबत संबंधित प्रत्येकाला कोरोना तपासणी वेळोवेळी करणे अनिवार्य केले आहे.
आजपासून मंदिर सकाळी सहा वाजता शासनाच्या नियमांचे पालन करून भक्तांसाठी खुले करण्यात आले. मंदिराचा मुख्य दरवाजा उघडताना देवस्थान ट्रस्टचे संपूर्ण विश्वस्थ मंडळ, मानकरी, सालकरी,पुजारी, भक्तमंडळी उस्फूर्तपणे हजर होते.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
Buy Now
शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करण्याबाबत श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट मार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, सॅनिटायझर, मास्क याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
"मंदिरासमोरील सर्व व्यावसायिकांना शासनाचे सर्व नियम पाळूनच दुकाने चालू करणे बाबत सूचित करण्यात आले होते. "असे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन श्री संतोष धुमाळ यांनी सांगितले.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील नवरात्रोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा होत असतो. सर्व भाविक भक्तांनी शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे व कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवहान श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी केले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
Buy Now
"गेले दीड वर्ष संपूर्ण जगासहित आपला महाराष्ट्र हा कोरोनाच्या सावटाखाली होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्र कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले होते. त्यामध्येच पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थान, नवसाला पावणारा श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचेही मंदिर बंद होते."
अनेक भक्त मंदिर उघडण्याची तळमळीने वाट पाहत होते. आणि श्रीनाथ महाराजांनीही भक्तांची तळमळ ऐकली आणि पुन्हा मंदिर उघडले. "देवा तुझा माझा कारे वैराकार" असे इतके दिवस भक्त म्हणणारा आता 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असे म्हणून श्रीनाथांचे दर्शन घेऊन स्वर्गसुखाचा साक्षात्कार अनुभवत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे भक्त व दैनिक पुढारीचे निर्भीड, अभ्यासु पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान "श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर" या ठिकाणी अठरापगड जातीतील लोकांना 'भक्तीच्या धाग्याने' जोडणारी अध्यात्मिक संस्कृती पाहायला मिळते.
No comments:
Post a Comment