ओस्लो, दि.12 : - जगाचे लक्ष वेधून घेणारा, जगभरात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार, अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी,जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून लढा देऊन, आदर्श मूल्यांसाठी प्रभावशाली योगदान देणाऱ्या फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा आणि रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांना जाहीर झालेला आहे. जगभरातील निर्भीड, प्रामाणिक, समाजहितवादी पत्रकारिता करणाऱ्या सर्वांसाठीच हा पुरस्कार प्रेरणादायी व ऊर्जा देणारा आहे.
मारिया रेसा या फिलीपिन्स येथील "रॅपलर" या वृत्त संकेतस्थळाच्या सहसंस्थापिक आहेत. आधुनिक काळातील डिजिटल मिडिया पत्रकारितेच्या माध्यमातून मारिया रेसा यांनी निर्भीडपणे समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम केलेले आहे.
Buy Now
फिलिपिन्समधील सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही, अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे काम मारिया रेसा यांनी प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून केले.
रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रशियामध्ये आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करून अभिव्यक्तिस्वातंत्र्य बाबत आवाज उठवण्याचे प्रभावशाली कार्य केलेले आहे.
दिमित्री मुरातोव्ह "नोवाया गॅझेटा" वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणावर कडक टीका करण्याचे काम या वृत्तपत्राकडून केले जाते. रशियातील दुर्लक्षित विषय मांडणे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
Buy Now
सत्य आणि वास्तवावर आधारित पत्रकारिता करून लोकांच्या समस्येवर प्रकाश टाकणे यासाठी हे वृत्तपत्र ओळखले जाते.
नॉर्वेजियन नोबल समितीने या शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला तब्बल 10 मिलियन स्वीडिश क्रोना म्हणजेच सुमारे आठ कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
"सत्ताधार्यांचे अत्याचार, असत्य आणि युद्धखोर प्रचारापासून समाजाला वाचवण्यासाठी मुक्त, स्वतंत्र, आणि सत्यावर आधारित पत्रकारिता सेवा करीत असते. असे नोबेल समितीने पुरस्कारांची घोषणा करताना म्हटले आहे.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
जगभरातल्या अनेक देशांमध्ये, अनेक राज्यांमध्ये, निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे समाजाचे गंभीर प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा आहे.
No comments:
Post a Comment