Saturday, November 27, 2021

"पुण्यातील "या" 'प्रहार रुग्णसेवक समितीच्या' शिलेदारांच्या आंदोलनानंतर रुग्णालयांमधील आरोग्य योजना राबविण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिरवा कंदील; 'आरोग्यदूत' आमदार राहुल कुल धर्मादाय रुग्णालय समिती सदस्य या नात्याने गोरगरीब रुग्णांच्या न्याय हक्कांसाठी पाठपुरावा करणार....

 


पुणे, दि.27 :  महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह, विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गोरगरीब रुग्णांना मिळत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील रुग्णसेवक समितीने थेट मंत्रालयावर धडक देत मुख्यमंत्री कार्यालयाकडे याविषयी तक्रार केली. त्याची दखल घेत सदर रुग्णालयांची माहिती घेऊ तसेच आरोग्य योजनांना भरीव निधी देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे. 




पुणे जिल्ह्यात 'आरोग्यदूत' म्हणून प्रसिद्ध असलेले दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी गोरगरीब रुग्णांच्या, सामान्य रुग्णांच्या न्याय हक्कांसाठी धर्मादाय रुग्णालय समिती सदस्य या नात्याने पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



"धर्मादाय रुग्णालय समितीच्या मुंबई येथील मासिक आढावा बैठकीत  गोर गरीब रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांद्वारे उपचार घेण्यात येत असलेल्या विविध समस्यांबाबत चर्चा झाली. 


"यावेळी धर्मादाय रुग्णालय समितीच्या सदस्यांच्या नावाचे फलक प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात लावावेत, मोफत व सवलतीच्या दरात उपचारासाठी रुग्णांना कागदपत्रांची पूर्तता करताना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो तेव्हा धर्मादाय रुग्णालयांद्वारे गोर गरीब रुग्णांना कागदपत्रे पडताळणी साठी अनावश्यक त्रास देण्यात येऊ नये, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गरीब निर्धन रुग्णांशी सौहार्दाने वागावे, रुग्णाच्या मदतीसाठी धर्मादाय रुग्णालयात पूर्णवेळ जनसंपर्क अधिकारी नेमण्यात यावे, तसेच धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासकीय जनसंपर्क अधिकारी नेमता येऊ शकतो याबाबत देखील शासनाने प्रयत्न करावेत अशा मागण्या केल्या."


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


"सदर मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन धर्मादाय रुग्णालय समिती प्रमुख, माननीय मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. गोरगरीब रुग्णांच्या  न्याय हक्कांसाठी, सर्वसामान्य लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी धर्मादाय रुग्णालय समितीचे  सदस्य या नात्याने पाठपुरावा करणार" अशी प्रतिक्रिया आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




प्रहारच्या पुण्यातील रुग्णसेवक समितीची  गोरगरीब रुग्णांच्या गंभीर प्रश्नासंदर्भात, आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहायक गौरव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव डॉ. सचेन गायकवाड यांच्यासह बैठक पार पडली. 




यावेळी रुग्णसेवक नयन पुजारी, संजय गायखे, उमेश महाडिक, नौशाद शेख, अमोल मानकर, सागर ननावरे, हरीश आवताडे, संतोष साठे, पंकज जगदाळे आदी रुग्णसेवक उपस्थित होते.




सदर बैठकीत रुग्णसेवक नयन पुजारी यांनी महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांकडून शासकीय आरोग्य योजनांसंदर्भात गोरगरीब जनतेची होणारी पिळवणूक व फसवणूक याबाबत मुद्दा उपस्थित केला.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


तसेच सदर सर्व रुग्णालयांच्या नावांची यादीच त्यांनी उपसचिव डॉ. गायकवाड यांच्यासमोर सादर केली. यावेळी रुग्णालयांकडून कशाप्रकारे रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा मानसिक छळ करण्यात येतो याचा पाढाच त्यांच्या समोर वाचला. 



तसेच शासकीय आरोग्य योजनेचा लाभ मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये कशा पळवाटा काढल्या जातात हे देखील निदर्शनास आणून दिले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


यासंदर्भात उपसचिव डॉ. सचेन गायकवाड यांनी रुग्णसेवकांशी सविस्तर चर्चा करून अधिक माहिती घेतली. व ही अतिशय गंभीर बाब असून भविष्यात धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावर प्रशासनाची करडी नजर असेल. आरोग्य योजना न राबविणाऱ्या रुग्णालयांवर कायद्याचा बडगा उचलण्यात येईल. 




तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भरीव निधी उपलब्ध करून त्याचा गोरगरीब रुग्णांना कसा फायदा होईल याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. गायकवाड यांनी प्रहारच्या रुग्णसेवक समितीला दिले.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील, खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादायअंतर्गत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून, विविध सरकारी आरोग्य योजनांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना, सर्वसामान्य लोकांना चांगले उपचार मिळण्यासाठी, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील व  तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.




No comments:

Post a Comment