Thursday, November 11, 2021

मुले हिंसक का बनत आहेत? अल्पवयीन शालेय मुले हिंसक व रागीट का बनत आहेत? यात दोष कुणाचा? पालकांचा की मुलांचा? शिक्षणव्यवस्थेचा की समाजाचा? : - प्रसिद्ध लेखक, आदर्श शिक्षक लक्ष्मण जगताप यांचा विशेष लेख...

 


              मुले हिंसक का बनत आहेत?

 

सीआयडी मालिका पाहून तेरा व चौदा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांनी चोरीची योजना आखली. चोरी करताना प्रतिकार केला म्हणून एकट्या राहणाऱ्या वृद्ध आजीचा खून केला. ही पुण्यातील अगदी ताजी घटना. दुसरी  घटना बीडच्या परळीतील. पोटच्या मुलाकडून बापाचा गळा आवळून खून. कारण काय तर बापाचे माझ्यावर प्रेम नाही. तिसरी घटना मुंबईतील,अभ्यास करत नाही म्हणून आई मुलीला रागवते. मायलेकीचे भांडण लागते. या भांडणात अवघ्या पंधरा वर्षाची मुलगी रागाच्या भरात आपल्या आईचा गळा आवळून खून करते. डॉक्टर होण्याकरीता आई  अभ्यासासाठी सतत मागे लागते हे त्यामागील कारण. या झाल्या प्रातिनिधीक  तीन घटना.  खून,चोरी,मारामारी,अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात. यामधील  मुले ही अल्पवयीन असल्याचे आपणास आढळून येते.




अल्पवयीन शालेय मुले हिंसक व रागीट का बनत आहेत? यात दोष कुणाचा. पालकांचा की मुलांचा? शिक्षण व्यवस्थेचा की  समाजाचा?  यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


कोरोना महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.  शाळा बंदच्या काळात  आॕनलाइन शिक्षण सुरू झाले.  मोबाईल, लॕपटॉप, टिव्ही, टॕब इ. साधनांचा प्रचंड प्रमाणात वापर वाढला. 


विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर क्राईम मालिका दाखविल्या जातात. अनेक चित्रपटात खून,मारामारी, बलात्कार आणि अश्लिल दृश्यांचा भडिमार केला जातो.अशी दृश्ये सतत बघितल्याने या वयोगटातील मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.आपणही असे करुन बघावे असा विचार त्यांच्या  मनात येतो.मग त्याविषयी नियोजन केले जाते.अशी कृत्ये करणे वाईट आहे.यात धोके असतात. याची जाणीव मुलांना होत नाही.




चित्रपटातील नायकाला  आदर्श मानण्यात मुलांना आनंद वाटतो.नायकाप्रमाणे आपणही खून,मारामारी करायला मुलांचे मन उद्युक्त होते. परंतु मालिका,चित्रपट हे मनोरंजनासाठी असतात .त्यातील खून, मारामारी किंवा भडक दृश्ये कथानकाला आवश्यक म्हणून खोटीच चित्रित केलेली असतात.हे मुलांच्या लक्षात येत नाही.अनुकरण करण्याकडे मुलांचा कल असतो.मग नको त्या घटना मुलांच्या हातून घडून जातात.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


मुले  कोणते कार्यक्रम   पाहतात? किती वेळ पाहतात? टिव्ही, मोबाईल व यु-ट्युबवर  काय पाहतात?  खरंच मुलांना असे  कार्यक्रम पाहणे गरजेचे असते का? वाईट गोष्टीचे अनुकरण करण्यास मुले आघाडीवर असतात.म्हणून मुलांना या वयात खूप जपायला हवे.



पालकांचा मुलांशी संवाद असला पाहिजे.दूरचित्रवाणी वाहिन्यांवर  काय पाहावे?  काय पाहू नये? हे मुलांना समजावून सांगायला हवे.अशा गोष्टी केवळ मनोरंजनासाठी असतात.यापलीकडे त्याकडे पाहू नये.हे त्यांच्या निदर्शनास आणून देणे पालक म्हणून आपली जबाबदारी  आहे.मुलांच्या डोळ्यांना चांगले पाहायला मिळावे ,चांगले ऐकायला मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत.


ही अल्पवयीन मुले गुन्हेगारी कृत्यांकडे वळणार नाहीत याकडे आपले लक्ष असणे महत्त्वाचे आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


महामारीच्या काळात  घरात बंदिस्त राहावे लागल्याने मुलांच्या मन स्वास्थ्यावर   परिणाम झाला आहे. मुक्तपणे वावरणे, फिरणे,खेळणे, भटकणे, मित्रमैत्रिणींना भेटणे अशा अनेक गोष्टीवर आपोआप मर्यादा आल्या. मानसिक स्वास्थ  बिघडविणा-या अशा अवघड  परिस्थितीला मुलांना तोंड द्यावे लागले. 


अशा वातावरणात मुलांचे संगोपन करणं ,त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणं हे महत्त्वाचे आहे. नैराश्याच्या, भीतीच्या,दडपणाच्या  वातावरणात राहिल्याने मुलांचा  एकलकोंडेपणा वाढतो.मित्रांशी  संवाद न झाल्याने व्यक्त होता येत नाही.मनातील भावनांचा निचरा होत नाही.अशा अनेक गोष्टींचा मुलांच्या मनावर  नकारात्मक परिणाम होत असतो.त्यामुळे मुलांचा चिडचिडपणा व रागीटपणा वाढतो.


भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे? रागाला आवर कसा घालावा? संयम कसा ठेवावा? हे सगळ्याच मुलांना जमत नाही.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


अनेकांच्या कौटुंबिक समस्या आणि अडचणी वेगवेगळ्या  आहेत.अशा परिस्थितीत माझ्या पाल्याने  उत्तम शिक्षण घेतले पाहिजे.त्याने  शिक्षण घेऊन डॉक्टर ,इंजिनियर तसेच विविध क्षेत्रात करिअर करावे  यासाठी  पालक प्रयत्न करत असतात. साहजिकच कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा मुलांकडून ठेवली जाते.मुलांच्या मनाचा फारसा विचार केला जात नाही.त्याचा कल, त्याची आवड याकडे दुर्लक्ष केले जाते. 


किशोरवयीन मुलांच्या शरीरात  हार्मोन्समुळे अनेक बदल घडून येतात. या वयात मुले रागीट व चिडखोर बनतात.मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल असतो.


अशा वेळी  मुलांशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे त्यांना समजून घेतले पाहिजे.प्रत्येक वेळी रागवून, चिडून उपयोग होत नसतो. त्यांना ताण येईल,दडपण येईल असे वातावरण घरात असता  कामा नये. आनंददायी आणि भयमुक्त वातावरणात मुलांची मानसिकता चांगली राहते. संयम ठेवून  अडचणीच्या प्रसंगावर कशी मात करावी हे मुलांना शिकविणे आवश्यक आहे. यासाठी ध्यान,प्राणायाम  यांचा चांगला उपयोग होतो. 


Ajio Diwali Loot is LIVE!. Best Offer.. Get 3 Shoes @ Rs 345 each only on Ajio... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                               Buy Now


आज शिक्षणात कमालीची  जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे.माझ्या पाल्याला प्रवेश कुठे मिळेल? त्याच्या करिअरचे काय होईल?असे  असंख्य प्रश्न  पालकांच्या मनाला सतावत असतात. मुलांनी सतत अभ्यास करावा अशी पालकांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यास टाळाटाळ झाली की पालक मुलांना ओरडतात.रागवतात. याचा मुलांना राग येतो. मुलांना  हाताळताना त्यांच्या भावना, त्यांची मते यांचाही विचार केला पाहिजे. 


मुलांची बुद्धिमत्ता,क्षमता आणि कुवत पाहूनच आपण त्याला पुढे जाण्यास मार्गदर्शन करायला हवे.तरच पाल्य आणि पालक यांच्यामधील नाते मैत्रीचे,मायेचे राहू शकेल.



लेखक : - आदर्श शिक्षक, प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जगताप, बारामती.








3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. खुपच भावनिक आणि मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनातील गोष्टी आपण या लेखाद्वारे खुप सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत, मुलांना नैराश्यातून बाहेर कसं पडावं यावर थोडं अजून लिखाण आम्हाला वाचायला मिळालं तर दुग्धशर्करा योग आम्हा वाचकांसाठी असेल,धन्यवाद

    ReplyDelete
  3. संजय शिंदे वीर मुलांना मिळणारा रिकामा वेळ चांगल्या गोष्टीसाठी वापरला नाही तर त्याचे वाईट परिणाम होतात. मुलांचे मित्र,मुलं काय पाहतात याकडे लक्ष न दिल्यास असे घडणार. काही प्रमाणात धाकही हवा. श्री जगताप यांनी वास्तव लिखाण केले आहे. त्यांचे अनेक लेख मी पुणे सकाळ मध्ये वाचले आहेत.

    ReplyDelete