"भारतीय समाजात शैक्षणिक व सामाजिक क्रांती करणारे महामानव - महात्मा फुले"
विद्दे विना मती गेली | मती विना नीती गेली |
नीती विना गती गेली | गती विना वित्त गेले |
वित्ता विना शूद्र खचले | एवढे सारे अनर्थ, एका अविद्देने केले ||
समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगणारे,स्त्रीयांना शिक्षणाची कवाडे खुली करणारे थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी.त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांनी दिलेल्या विचारांचा स्मरण करण्याचा दिवस.
महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला.त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते.जोतिबा लहान असताना म्हणजे रांगत होते त्यावेळी त्यांच्या आईचे निधन झाले.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
त्यांच्या वडिलांचा शेती आणि फुलाचा व्यवसाय होता.त्यामुळे घरची परिस्थिती चांगल्या स्वरुपाची होती.जोतिबा हुशार आणि बुद्धिमान असल्याने त्यांना सातव्या वर्षी पहिल्या वर्गात घातले.हुशार असल्यामुळे अक्षर ओळख होताच त्यांचा शिक्षणातील आनंद आणि हुरुप वाढू लागला.
परंतु त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीमुळे वडिलांनी त्यांची शाळा बंद केली आणि त्यांना शेतीच्या कामात गुंतविले.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत जोतिबांनी चांगल्या प्रकारे शेती व्यवसाय सांभाळला.गफार बेग मुन्शी आणि लिजिट या विद्वान गृहस्थांनी जोतिबांची बुद्धिमत्ता पाहून गोविंदरावांची भेट घेऊन त्यांना शाळेत घालण्याचा सल्ला दिला.आणि पुन्हा १८४१ मध्ये त्यांना शाळेत घालण्यात आले.
जोतिबांनी अनेक ग्रथांचे वाचन केले.त्याचबरोबर सामाजिक,धार्मिक आर्थिक क्षेत्राशी संबंधित विविध पुस्तकांचे वाचन केले .त्यांचा अभ्यास केला.चिंतन तसेच मनन केले.त्यामुळे त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली.जोतिबांना मराठी ,इंग्रजी ,संस्कृत ,हिंदी,मोडी ,उर्दू, या भाषा बोलता लिहिता ,वाचता येत होत्या.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
शालेय शिक्षण संपल्यानंतर जोतिबांच्या जीवनात एक वाईट प्रसंग घडला.या प्रसंगाने त्यांच्या मनावर खोलवर आघात झाला.त्यांनी धर्मग्रंथ ,शास्त्र ,पुराणांचा खूप अभ्यास केला.या सर्व अभ्यासातून सामाजिक विषमतेचे मूळ त्यांच्या लक्षात आले.
अज्ञान ,अंधश्रद्धा ,रुढी परंपरा ,चाली रिती या सर्वांचा नायनाट करण्यासाठी केवळ शिक्षण हाच उपाय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मान सन्मानाने जगता यावे यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्यांना समजले.समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीची घोषणा केली.त्याची फळे आज आपणांस चाखण्यास मिळत आहेत.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
चूल आणि मूल यात अडकलेल्या स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे खूप मोठे काम जोतिबांनी केले.अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी हे काम जोमाने केले.अनेक संकटे आली. परंतु स्त्री शिक्षणाचा वसा त्यांनी सोडला नाही. म्हणून त्यांना स्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते.१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा काढण्याचा मान जोतिबांनी मिळविला.
मुलगी शिकली तर घरादाराचा उद्धार होतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता.त्यामुळे त्यांनी यात स्वतः ला झोकून दिले. त्यांच्या या कामात हिरीरीने भाग घेऊन पत्नी सावित्रीबाई यांनी दिलेली अत्यंत मोलाची साथ इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली आहे. फुले दाम्पत्यांनी ख-या अर्थाने स्त्रीयांना सक्षम बनविले.
महात्मा फुले हे भविष्याचा वेध घेणारे महामानव होते.शिक्षण हेच माणसाच्या उन्नतीचे साधन आहे.म्हणून त्यांनी सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला.हंटर कमिशन समोर त्यांनी हे धोरण कसे असावे हे मांडले.समाजाची आणि देशाची प्रगती करायची असेल तर शंभर टक्के साक्षरता गरजेची असल्याचे त्यांना सांगितले.
बंधूभाव समता ही मूल्ये रुजवायची असतील तर माणसाला मानवतावाद शिकविणे आवश्यक आहे हे त्यांनी पटवून दिले आणि आपल्या शाळेतून अशा मूल्ये शिक्षणाची सोय केली.
अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृती करण्याचे महान कार्य केले.
महात्मा फुल्यांनी ब्राम्हणाचे कसब ,गुलामगिरी ,शेतकऱ्यांचा आसूड ,इशारा ,सत्सार १ व २ ,अखंडादी रचना ,सार्वजनिक सत्यधर्म अशा मौलिक ग्रंथांचे लेखन केले.लेखक ,संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आज अभ्यासण्यासारखी आहे.एक कृतिशील क्रांतिकारक म्हणून जोतिबांची ओळख आहे.
समाजातील वाईट प्रथा चालीरितीवर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला.त्यांच्यावर अनेक वेळा संकटे आली परंतु न डगमगता हाती घेतलेले कार्य जोतिबांनी तडीस नेले.समाजातील दीन दुबळे गरीब यांच्याबद्दल जोतिबांना कणव होती.गोरगरिबांच्या हक्कासाठी ते सतत लढत राहिले.
महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षण ,समाजसुधारणा ,शेती आणि एकंदरीत सर्वच क्षेत्रांत दिलेले योगदान आणि केलेले कार्य सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत राहिल इतके ते महान आहे.
२८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचा मृत्यू झाला असला तरी आजही त्यांच्या विचारांची ज्योत अखंड तेवत आहे.
लेखक : - शिक्षक, प्रसिद्ध लेखक, लक्ष्मण जगताप
खूप सुंदर लेख
ReplyDelete