पुरंदर,निरा, दि. 29 : कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे, जनसामान्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलन करणारे, पुणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरंदरचे शिलेदार, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांना कोरोना काळातील प्रामाणिक, उत्कृष्ट कामगिरीसाठी माँ भवानी अर्बन मल्टीस्टेट निधी संकलन संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, पुरंदर-हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील,पुरंदर तालुक्यातील नीरा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे व महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन 29 नोव्हेंबरला सायंकाळी होणार आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये तसेच पुरंदर तालुक्यामध्ये मंगेश ढमाळ यांनी मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तसेच जनसामान्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी केलेल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.
कोरोना काळात मंगेश ढमाळ यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, प्रामाणिक कार्यामुळे, पुणे जिल्ह्यातील तरुणाईमध्ये मंगेश ढमाळ चांगलेच लोकप्रिय झालेले आहेत.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही जनता कर्फ्यु पासून ड्रायव्हर लोकांना जेवणाचे डबे दिले,कोल्हापूर वरून चालत जाणाऱ्या युवकांना अन्नदान, रक्तदान शिबीर तसेच आरोग्य कर्मचारी,पोलिस कर्मचारी, ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी,रस्त्यांवरील भिकारी,गरजवंत तसेच जे जे कोविड काळात रस्तावर काम करत होते अश्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना, नागरिकांना अनेक वेळा अन्नदान केले." अशी प्रतिक्रिया मंगेश ढमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"जिल्हा सीमेवर माणुसकीच्या भावनेतून, सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामधील पोलिस कर्मचारी यांना 90 दिवस चहा दिला. संपुर्ण नीरा शहरामध्ये कोविड काळात घरोघरी जाऊन sanitizer फवारणी केली,पोलिस कर्मचारी यांना वाहतूक नियंत्रणासाठी सलग 10 दिवस पोलिस मित्र बनून नीरा गावात मदत केली." अशी माहिती मंगेश ढमाळ यांनी दिली.
"महाराष्ट्रातील आदर्श आमदार,राज्यमंत्री सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रहार जनशक्ती पक्ष समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करत असतो. कोविड काळात आम्ही 1500 रुग्णांना बेड मिळून देण्यात मदत केली."अशी माहिती मंगेश ढमाळ यांनी दिली.
"150 पेक्षा जास्त प्लाजमा उपलब्ध करून दिले. 370 रुग्णांना ब्लड दिले. कोविड रूग्णांना रेमडिसिवर इंजेक्शन संपुर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना उपलब्ध करून दिले. त्यासाठी पुणे कलेक्टर ऑफिस वर आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना 32000 इंजेक्शन 2 दिवसात मिळाली. 4 हजार नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. तसेच कोल्हापूर,सांगली मधील पूरग्रस्त 550 कुटुंबांना गरजेचे साहित्य पोहोच केले."अशी माहिती मंगेश ढमाळ यांनी दिली.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"प्रहारच्या माध्यमातून शोषित, पीडित नागरिकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आवाज उठवत जिल्यातील प्रत्येक ऑफिस मध्ये जाऊन न्याय मिळवून देण्यातही आमचीआग्रही भूमिका असते." अशी प्रतिक्रिया मंगेश ढमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
गरीब रुग्णांना रुग्णालयातील उपचारांचा कितीही मोठा खर्च असला तरी हक्काचा माणूस म्हणून पुणे जिल्ह्यात मंगेश ढमाळ यांच्याकडे बघितले जाते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांचे निस्वार्थी, प्रामाणिक समाजकार्य प्रहार जनशक्ती पक्षातील सर्वच तरुण पदाधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. रुग्णसेवक म्हणून मंगेश ढमाळ यांचे कार्य मोठे आहेच, त्याचबरोबर समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्यासाठी अग्रेसर राहण्याचे काम मंगेश ढमाळ करत असतात." अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुणे जिल्हा ग्रामीण भागातील अनेक तरुण सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थी, प्रामाणिक, प्रभावशाली सामाजिक कार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
No comments:
Post a Comment