सातारा,वाई,दि.12, : महाराष्ट्राचा गौरवशाली व प्रेरणादायी महान इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी दुर्गसंवर्धन व ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या महान पराक्रम गाजवणाऱ्या महाराष्ट्रातील शेकडो ऐतिहासिक घराण्यांचा इतिहास, प्रेरणादायी ऐतिहासिक चळवळींच्या माध्यमातून जपण्याची, गौरवशाली इतिहासातुन प्रेरणा घेऊन चांगले कार्य करण्याची नितांत आवश्यकता आहे.
आपल्या पूर्वजांच्या इतिहासातील योगदान नव्या पिढीला समजण्यासाठी गडकोट संवर्धन व समाधी संवर्धनासाठी सहभागी होणे ही काळाची गरज आहे.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"श्रीशिववंदेश्वर प्रतिष्ठानचे दुर्गसंवर्धनातील योगदान शिवप्रेमींना आदर्श घालून देणारे आहे. तसेच वीरपुरुषांचे समाधीस्थळ हे मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत म्हणून समाधी पूजन एक चळवळ झाली पाहिजे." असे मत अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष श्री. रणजीत दादा जगताप यांनी व्यक्त केले.
सासवडच्या ऐतिहासिक जगताप घराण्यातील सरदार गोदाजीराव जगताप यांच्या घराण्यातील किल्ला केजंळगड परिसरातील जगताप घराण्यातील सरदार धनाजीराव जगताप व सरदार संताजीराव जगताप यांच्या समाधी तसेच ओझर्डेकर पिसाळ देशमुख घराण्यातील वीरपुरूषांच्या समाधीवर यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे सदर घराण्यातील वीरपुरूषांची समाधीस्थळ पुजन करण्यात आले.
ऐतिहासिक जगताप घराण्यातील पराक्रमी सरदारांची, वीरपुरुषांची समाधी : -
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महान योद्ध्यांच्या, महान कामगिरीच्या ऐतिहासिक आठवणीला उजाळा देण्याचे काम करण्यात आले.
ओझर्डेकर ऐतिहासिक पिसाळ देशमुख घराण्यातील वीरपुरुषांची समाधी : -
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे या ठिकाणावरील जगताप घाट येथे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत समाधी पुजन करण्यात आले .यावेळी परिसरातील श्री सोमेश्वर मंदिरात शंभुमहादेवाचे दर्शन घेऊन पुजन करण्यात आले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या कार्यक्रमावेळी श्री.रणजीतदादा जगताप (अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य), श्री.करणसिंह मोहिते हंबिरराव(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश संघटक), अध्यक्ष सातारा ज़िल्हा श्री. सचिनराव शिवाजीराव राजेशिर्के(डेरवणकर), श्री. नितीन जगताप ( केजंळकर), श्री. संतोष झिपरे (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष) विक्रमदादा पिसाळ देशमुख (ओझर्डेकर) श्री. सतीशदादा पिसाळ देशमुख (औझर्डकर) ,
श्री. लुहराज दरेकर इनामदार (भोसरीकर) श्री. सुरसिंग जाधवराव इनामदार (भुईजकर) श्री. उदयसिंह पाटील (पश्चिम महाराष्ट्र संघटक अ .भा. मराठा महासंघ )श्री. महेश भोईट इनामदार (तडवळेकर) तसेच श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानचा श्री अक्षय शिंदे (जांब), श्री. गणेश बाबर (किकली) श्री. संदीप पावशे (भेईज), श्री. शंभुसिंह पिसाळ (वैराटेश्वर प्रतिष्ठान किल्ला वैराटगड) श्री. जितेन शिंदे, श्री. प्रविण लेंभे, श्री. आदित्य पिसाळ, विश्वजीत सांळुखे सह आदी शिवप्रेमी उपस्थित होते. अशी माहिती इतिहास अभ्यासक संतोष झिपरे यांनी दिली.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
यावेळी सुत्र संचलन उदयसिंह पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संतोष झिपरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य यांनी केले.
No comments:
Post a Comment