Tuesday, February 1, 2022

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथे 'वीर - हडपसर(पुणे)' पीएमपीएमएल बस सेवेचा लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; श्रीनाथ भक्तांच्या, वीर देवस्थान ट्रस्टच्या, मागणीला आले यश, "हे" आहे वीर - हडपसर, वीर - सासवड पीएमपीएमएल बस सेवेचे वेळापत्रक"....

 


पुरंदर, वीर,दि.1 : - महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर पंचक्रोशीतील श्रीनाथ भक्तांच्या अनेक दिवसापासूनच्या वीर - पुणे पीएमपीएमल बस सेवेच्या मागणीला श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या विशेष प्रयत्नातून, सर्व श्रीनाथ भक्तांच्या मागणीमुळे व  लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने यश आले.




पुरंदर तालुक्यातील क्षेत्र वीर येथे वीर ते हडपसर(पुणे), वीर - सासवड, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) बस सेवेचा लोकार्पण सोहळा पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक श्री दत्तात्रेय झेंडे यांच्या हस्ते व वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, वीर गावचे सरपंच, वीर गावचे ग्रामस्थ, पीएमपीएलचे पदाधिकारी, सर्व मानकरी,सालकरी,पुजारी, सर्व मान्यवर व पुणे जिल्ह्यातील श्रीनाथ भक्तांच्या उपस्थितीत, उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.



महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे दरवर्षी हजारो -  लाखो भाविक भक्त यात्रेनिमित्ताने, देव दर्शनासाठी येत असतात. पुणे शहरातून वीरला श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या दर्शनासाठी दर अमावस्येला व रविवारी येणारे शेकडो-हजारो भाविक भक्त आहेत.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील वीर - सासवड या मार्गावरील शेकडो नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग विविध कामानिमित्त पुण्याला येत असतो. या सर्वांसाठी खूप चांगला दिलासा मिळाला आहे.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


"श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर पंचक्रोशीतील श्रीनाथ भक्तांसाठी वीर - हडपसर(पुणे) पीएमपीएमएल बससेवेचा लोकार्पण सोहळा, भक्तिमय वातावरणात संपन्न होणे हा सर्वांसाठीच आनंदाचा दिवस आहे. पुणे पीएमपीएमएलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि व्यवस्थापकांचे मनापासून आभारी आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीरचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.




वीर ते हडपसर (पुणे) व वीर ते सासवड पीएमपीएमएल बस सेवेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे : -









1 comment:

  1. खूपच छान ....सवई सर्जाचं चांगभलं

    ReplyDelete