Monday, January 31, 2022

"सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील "या" प्राथमिक आरोग्य केंद्रातील 'कुटुंब नियोजन - मोफत स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात "या" डॉक्टरने घेतली मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीर रक्कम; फलटणचे आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांचे 'लेखी तक्रार' करण्याचे आवाहन"....


फलटण, साखरवाडी, दि.31 : - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत मोफत कुटुंब नियोजन - स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरामध्ये  स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांकडून या शिबिरातील डॉक्टर कदम यांनी भुलीच्या शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीरपणे हजारो रुपयांची रक्कम उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 



मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक जानेवारी रोजी फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कुटुंब नियोजन - स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या साखरवाडी पंचक्रोशीतील महिला रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टर कदम यांनी सिझेरियन प्रसूती झालेल्या महिला रुग्णांच्या स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेसाठी नातेवाइकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये भुलीसाठीचे शुल्क म्हणून बेकायदेशीर रक्कम गोळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.




"फलटण तालुक्यातील साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर  कारवाई करू. तसेच ज्या महिला रुग्णांच्या नातेवाइकांकडून स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीरपणे शुल्क, पैसे घेतलेले असतील त्यांनी लेखी तक्रार सातारा जिल्हा आरोग्य कार्यालयात येऊन द्यावी."  अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकिसन पवार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


"साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुटुंब नियोजन - स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरामध्ये जर डॉक्टरांनी बेकायदेशीरपणे पैसे घेतले असतील तर ते खूप चुकीचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आम्ही करायला लावू आणि  जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर  कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या महिला रुग्णांच्या नातेवाइकांकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीरपणे पैसे घेतले असतील त्यांनी माझ्याकडे तक्रार द्यावी. मी या प्रकरणात विशेष लक्ष घालून पुढील योग्य त्या कारवाईसाठी  प्रयत्न करेन." अशी प्रतिक्रिया फलटणचे लोकप्रिय आमदार दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत मोफत केल्या जाणाऱ्या कुटुंबनियोजन स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीरपणे पैसे घेणे चुकीचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करायला लावून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया फलटण तालुक्यातील प्रसिद्ध युवा नेते, साखरवाडीचे मा. सरपंच विक्रमसिंह भोसले यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन - स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया  सुविधा मोफत उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून  सरकारी रुग्णालयांना, संस्थांना, दरवर्षी लाखो - करोडो रुपयांचे अनुदान मिळत असते. सरकारी रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळणार्‍या मोफत सुविधांसाठी जर नागरिकांना कुठल्याही सरकारी आरोग्य सेवकाकडून  किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर शुल्क आकारले तर त्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे करावी.



केंद्र सरकार, राज्य सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते त्या योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. सरकारी रुग्णालयांमधील नागरिकांसाठी असणाऱ्या मोफत सुविधांसाठी नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर शुल्क दिले नाही पाहिजे.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 



केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्‍ट्रात लोकसंख्‍या वाढीच्‍या नियंञणासाठी राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रम राबविला जातो. सहाय्यक अनुदान योजना ही सदर कुटूंब कल्‍याण कार्यक्रमाचाच एक भाग असून ती योजना सन १९६० मध्‍ये सुरु झालेली आहे.



भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्‍ट्रात लोकसंख्‍या वाढीवर नियंञण ठेवण्‍यासाठी राष्‍ट्रीय कुटुंब कल्‍याण कार्यक्रम राबविण्‍यात येतो. सध्‍या या कार्यक्रमासाठीचे अनुदान राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान अंतर्गत आरसीएच पीआयपीमधून देण्‍यात येते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



महाराष्ट्रात राष्‍ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये, जिल्‍हा रुग्‍णालये, स्‍ञी रुग्‍णालये, सामान्‍य रुग्‍णालये, महानगरपालिका रुग्‍णालये आणि मानांकित खाजगी आरोग्‍य संस्‍था यांचे मार्फत केली जाते. या सर्व केंद्रामध्‍ये उपकेंद्र वगळता बहुतांश इतर सर्व ठिकाणी शस्‍ञक्रियेच्‍या सुविधा उपलब्‍ध आहेत.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत या संस्थांना आर्थिक सहाय्य, सहाय्यक अनुदानाच्या स्वरुपात दिले जाते.


जिल्हयात नसबंदी शस्त्रक्रियागृह असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दरमहा टाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे व निश्‍चित केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करुन आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत योग्य लाभार्थीना प्रवृत्त केले जाते व त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर मोबदला दिला जातो.





No comments:

Post a Comment