"पुरंदर - हवेलीच्या विकासाच्या ध्यासाने कार्यमग्न असणारे, कुटुंबवत्सल आमदार – श्री.संजयजी जगताप"
पुरंदर म्हणजे ऐतिहासिक,शौर्याची,संतांची पवित्र वारसा लाभलेली भूमी आहे.याच भूमीमध्ये अनेक महान व्यक्ती जन्मल्या,वाढल्या,घडल्या, मोठ्या झाल्या आणि आपल्या कर्तुत्वाने त्यांनी या भूमीचे नाव मोठे केले.त्यापैकी सासवड नगरीचे शिल्पकार,शिक्षणप्रेमी,सहकार महर्षी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष स्वर्गीय ना.चंदुकाका जगताप होय.
अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवित असणारे त्यांचेच सुपुत्र पुरंदरमधील युवकांचे आशास्थान, मार्गदर्शक, लहानथोरांचा आदर्श म्हणजे पुरंदर-हवेलीचे आमदार संजयजी चंदुकाका जगताप होय. पुरंदरच्या भूमीला मिळालेले एक अतुलनीय व्यक्तिमत्व आहे.
“पुरंदर-हवेलीचा विकास हाच ध्यास” या ब्रीद वाक्याप्रमाणे आमदार संजयजी जगताप अहोरात्र झटत आहेत. अगदी तळागाळातील माणूस सुद्धा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे अवाक होत आहे.
हा सगळा व्याप सांभाळत असताना आमदार संजयजी जगताप हे आपल्या कुटुंबाप्रती कोणता अन्याय होणार नाही, याची सुद्धा दखल घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना दिसत आहेत.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आपल्या कुटुंबाविषयी सांगताना ते नेहमी सांगतात की, माझी आई सासवड नगरीच्या मा. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा व सौभाग्यवती राजवर्धिनीताई जगताप,चिरंजीव समरादित्य,थोरले बंधू व आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेत कामाने पुरंदरच्या नावाचा लौकिक वाढवणारे डॉ.श्री.राजेंद्र जगताप साहेब यांच्या सुविदय पत्नी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिताताई जगताप व दोन्ही विवाहित बहीण एवढ्यापुरतेच माझे कुटुंब नसून माझ्या सर्व संस्थातील कर्मचारी वर्ग आणि पुरंदर-हवेलीचा प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबातील आहेत.
मी या कुटुंबाचा प्रमुख किंवा घटक म्हणून काम करत असताना मला जरी कोणाच्या सुखातच नव्हे तर दुःखात मात्र मी त्या व्यक्तीच्या मागे नाही तर बरोबर असेल. आणि याच भावनेतून आमदार कुटुंबातील व्यक्तीचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी,निरोगी आरोग्यासाठी सतत कार्यशील असल्याचे जाणवते.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
युवकांना रोजगार मिळावा तसेच जागतिकीकरण आणि संगणक युगात अमुलाग्र बदल होत असताना अशा स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था, शिक्षण संस्था, दुग्धजन्य संस्था काढून त्या टिकवणे, वाढवणे यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारे, क्षमतेला महत्त्व देऊन घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणारे आमदार मा.संजयजी जगताप हे सहकार, शिक्षण व कृषी क्षेत्रातील द्रष्टे युवक आहेत. गुणवत्तेला प्राधान्य देत जे चांगले ते चांगले म्हणणाऱ्या स्पष्ट भूमिकेच्या या युवा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सर्व सहकारी, शैक्षणिक, दुग्ध संस्था प्रगतिपथावर आहेत.
शेतकरी,व्यापारी, बेरोजगार युवक अशा सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन पुण्यनगरीचा आर्थिक विश्वास संपादन करून श्री.संत सोपानकाका सहकारी बँकेची स्थापना केली.आणि आज ५०० कोटी ठेवीचा टप्पा पार करत खऱ्या अर्थाने पुरंदरची व पुणे जिल्ह्याची अर्थवाहिनी झाली.
बँकेच्या माध्यमातून शेकडो तरुणांना नोकरी, बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिला.पुरंदरमधील शेतकरी कष्टाळू आहे,परंतु घाम गाळून तयार केलेल्या शेतमालाला त्यामध्ये फळे,पालेभाजी, फुले यांना बाजारामध्ये मिळणाऱ्या किमतीची अनिश्चितता यासाठी व शेतकरी माल खराब होईल या भितीने कवडीमोल भावाने विक्री करत आहे, हे पाहून संवेदनशील मनाच्या संजयजी जगताप यांनी भव्य असे कोल्ड स्टोअरेज खळद येथे उभे केले आहे, आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची सुरक्षितता मिळवून दिली.
पुरंदर परिसरातील शेतकऱ्यांचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून मा.संजयजी जगताप यांनी पुरंदर मिल्क अँन्ड ॲग्रोची स्थापना केली, आणि शेतकऱ्यांची संस्था स्थापनेपूर्वी दुग्ध व्यवसायामध्ये होणारी फसवणुकीपासून सुटका केली.
आज जवळपास ७० च्या आसपास दूध संकलन केंद्र निर्माण करून बेरोजगार युवकांना नोकरीची संधी निर्माण करून शेतकऱ्यांसाठी धवलक्रांती घडविली.
शेतकऱ्यांचा गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध व्हावे, स्पर्धेच्या युगात त्यांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने स्व.नामदार चंदुकाका जगताप यांनी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची स्थापना केली.
आज त्या संस्थेच्या सचिवपदाची धुरा संजय सर अतिशय लिलया पेलताना दिसतात. “ शील घडविते तेच खरे शिक्षण ” या संस्थेच्या बोध वाक्याप्रमाणे आचार-विचार सुसंस्काराने प्रत्येक विद्यार्थी हा परिपूर्ण असला पाहिजे या उदात्त हेतूने ग्रामीण भागात, डोंगरी दुर्गम परिसरात विद्येचे नंदनवन फुलविले. आज संस्थेच्या अनेक विद्यालयाचे निकाल १०० टक्के लागत आहेत.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदरचे वैभव असलेले परंतु अलीकडच्या काळात लोप पावत चाललेल्या कुस्ती या मर्दानी खेळास पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, आजची पिढी निरोगी, निर्व्यसनी, बलवान व्हावी यासाठी शिवाजी व्यायाम मंदिराची स्थापना करून अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती करून या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी पुरंदर कुस्ती, पुरंदर केसरी अशा विविध स्पर्धा आयोजित करून या खेळास सन्मान प्राप्त करून दिला.
पुरंदरमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, साहित्यिक वारसा जतन व्हावा त्याची महती व माहिती तरुण पिढीला समजावी, लोप पावत चाललेल्या दुर्मिळ कलाकृतींचे, ऐतिहासिक वस्तूंचे जतन व्हावे यासाठी सासवड सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली.
सामाजिक कार्य व व्यवसाय करत असताना संजय सरांनी अध्यात्म आणि समाजसेवा यांचा सुंदर मेळ घालत समाजातील गोरगरीब लोकांना मग तो कोणत्याही धर्मातील असो पुरुष, महिला त्यांना कावड यात्रा, अजमेर यात्रा या माध्यमातून बारा ज्योतिर्लिंग यात्रा केल्या, व पुरंदरच्या जनतेच्या मनात श्रावण बाळ म्हणून स्थान मिळविले.या सर्व परिपक्व गुणामुळे त्यांना राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना लहान वयात पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्षपद दिले.
सासवड नगरपालिकेला मार्गदर्शन करून देशात स्वच्छतेच्या बाबतीत नावलौकिक मिळवून दिला.संपूर्ण जग कोरोना काळात भयग्रस्त असताना ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून या पती-पत्नी यांनी तालुक्यातीलच नव्हे तर येणारा प्रत्येक कोरोना ग्रस्त रुग्ण यांना आधार देत खळद येथे उभारलेल्या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करण्याचे काम केले.
तालुक्यातील बहिरवाडी सारख्या गावाचे १०० टक्के लसीकरण करून देशात पहिला क्रमांक मिळविला.अशा सगळ्या व्यस्त व्यापातून आपल्या कुटुंबासमवेत वाढदिवस असो, दसरा-दिवाळी, गणेशोत्सव असे पारंपारिक सण साजरे करत आपली संस्कृती जपण्याचे काम आनंदाने करताना दिसतात.
“ जे आहे ते समाजाचे नि जे करायचे ते समाजासाठीच ” या समर्पित भावनेने आपल्या पित्याप्रमाणे या युवा नेतृत्वाने मार्गक्रमण केले आहे. त्यांच्या सर्व कार्यात त्यांच्या मातोश्री आनंदीकाकी, ज्येष्ठ बंधू श्री.राजेंद्रजी जगताप (भा.प्र.से.), सुविद्य पत्नी सौ.राजवर्धिनीताई जगताप हे खंबीरपणे पाठीशी उभे आहेत.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
वर्तमानाकडून भविष्याकडे झेपावणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला सर्वगुणसंपन्न,आधुनिकतेचे भान असणाऱ्या व आपल्या कर्तृत्वामुळे तालुक्याच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या युवक नेत्यास दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना.
लेखक : - पुरंदरचे काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार, पुणे जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते विजय कदम.
No comments:
Post a Comment