"जगाला कल्याणकारी अहिंसेचा विचार देणारे महापुरुष महात्मा गांधीजी"
महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी हे नाव भारतापुरते मर्यादित न राहता जगाच्या कानाकोप-यात पोहचले ते दया, क्षमा, शांती, सेवा, अहिंसा आणि परोपकार या सर्वोच्च मानवी मूल्यांची शिकवण देणारे जागतिक कीर्तीचे एक महान विचारवंत म्हणून.
३० जानेवारी हा त्यांचा स्मृतीदिन.या निमित्ताने बापूंच्या विचारांना आणि स्मृतीना उजाळा देऊयात.
अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी बापूंनी आपले आयुष्य समर्पित केले.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून इतिहासाने बापूंची नोंद घेतली आहे.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
ब्रिटिशांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला.भारतीय जनमत संघटित करुन सामान्य माणसांचा लढा उभारला.
बापूंच्या आयुष्यात अशा अनेक घटना आणि प्रसंग घडले ज्यांनी बापूंच्या मनावर खोलवर परिणाम झाला.अशाच एका प्रसंगातून बापूंचा प्रामाणिकपणा आपणांस पहावयास मिळतो.
लहानपणी एका भावाला कर्जातून सोडविण्यासाठी दुसऱ्या भावाच्या कड्यातून सोन्याच्या तुकड्याची चोरी छोट्या मोहनदासने केली अवश्य.पण नंतर त्याला आपली चूक समजली.मोहनदासला चैन पडेना.
काय करावे ते समजेना.बराच वेळ विचार केल्यावर मोहनदासने आपल्या वडीलांना एक पत्र लिहिले.त्यात त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले.आणि पुन्हा चोरी करणार नाही असे वचन दिले.आणि पुढे असेही लिहिले की वडीलांनी कितीही कडक शिक्षा दिली तरी वाईट वाटून घेणार नाही व ती शिक्षा आनंदाने सहन करेल.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
मोहनदास अर्थात गांधीजी यांचे वडील आजारी असल्याने अंथरुणात झोपून असत.गांधीजी आपल्या वडीलांकडे पत्र घेऊन गेले.त्यांच्या हातात पत्र ठेवले.आणि त्यांच्या जवळच पलंगावर गुपचूप बसले.
गांधीजींचे वडील उठून बसले आणि त्यांनी ते पत्र वाचले.पत्र वाचताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्या अश्रूंचा असा परिणाम झाला की त्यांचे जीवन बदलले.मोहनदास पूर्वीपेक्षा कितीतरी चांगला मुलगा झाला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आपल्या मुलाचे धैर्य आणि खरेपणा पाहून गांधीजींच्या वडीलांचे हदय भरुन आले.त्यांनी गांधीजींनी न मारताच स्वतः दुःखी होऊन मोहनदासवर जो परिणाम घडवून आणला तो मारुन घडला नसता.
मारापेक्षा प्रेमाचा मोहनदासवर खोल परिणाम झाला.प्रसंग साधा आणि छोटा परंतु गांधीजींच्या जीवनाला कलाटणी आणि वळण देणारा ठरला.
गांधीजींच्या जीवनातील हा अहिंसेचा पहिला धडा होता.मोठे झाल्यावर याच अहिसेंच्या जोरावर त्यांनी इंग्रजांशी न लढताच त्यांना आपल्या देशातून जायला भाग पाडले.
गांधीजींचे काम ,त्यांचा खरेपणा, प्रामाणिकपणा आणि त्याग पाहून रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना 'महात्मा ' म्हणायली सुरूवात केली.नंतर सगळा देश त्यांना ' महात्मा ' या नावानेच ओळखू लागला.
स्वच्छता,स्वावलंबन,अहिंसा आणि सेवा ही मूल्ये स्वतःच्या जीवनात आचरणात आणून बापूंनी लोकांना सदवर्तनाचा धडा दिला.
माणूस गरीब असो वा श्रीमंत त्याचा माणूस म्हणून सन्मान झाला पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
देशसेवा करत असताना गोरगरीब जनतेच्या हिताला प्राधान्य दिले.
त्यांनी भारतीयांच्या मनात द्वेषाऐवजी प्रेमाची ज्योत पेटवली म्हणूनच शांती आणि अहिंसेचे प्रतीक असणारे गांधीजी सगळ्या जगाला हवेहवेसे वाटतात.
लेखक : - शिक्षक, स्तंभ लेखक, आत्मप्रेरणा पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मण जगताप
No comments:
Post a Comment