"तरुणाईचे प्रेरणास्थान, एक आधारवड, लोकप्रिय आमदार संजयजी चंदुकाका जगताप"...
ज्या पायांना आधीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत थकत नाहीत. गेल्या चार दशकांपासून सासवड आणि चंदुकाका जगताप एक समीकरण झाले आहे. सासवडचा माणूस राज्यात कुठेही गेला आणि सांगितले की मी सासवडचा आहे तर समोरील जाणकार मनूष्य चंदुकाकांच्या गावचा का? असे लगेच म्हणतो.
काकांचे व्यक्तिमत्त्वही तसेच त्यांच्या नावाला शोभणारे व नावही असे की त्यातच एक आदरयुक्त दबदबा त्यांनी स्वकर्तृत्वाने,जनतेसाठी केलेल्या प्रामाणिक कार्यातून निर्माण केलेली विकासपुरुष, लोकनेत्याची प्रतिमा.
सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणे, त्यांना वेळोवेळी हरप्रकारे मदत करणे, वडीलकिच्या नात्याने लक्ष ठेवणे अशी अनेक स्वभाव वैशिष्टये त्यांच्या अंगी दिसत होती . बाहेरगावच्या लोकांच्या मनात काकांविषयी एवढी आपुलकी होती तर सासवडकरांसह पुरंदर मधील असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काका सर्वसामान्य लोकांसाठी एक आधारवडच होते. आमदार संजय जगताप यांना संघर्षाचे बाळकडू वडिलांकडून व संस्काराची शिदोरी आईकडून मिळाली.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत ... काकांच्या मागे आता संजय सरच सर्वसामान्य नागरिकांना साठी आधारवड ठरत आहेत. मा.राजेंद्रबापू जगताप, IAS अधिकारी, वडिलांनंतर मोठ्या भावासारखा दुसरा बापमाणूस जगात शोधूनही सापडणार नाही. सहाजिकच या नात्याची नाळ देवानेच जोडलेली असल्यामुळे भावाभावाचे नाते नेहमीच अतूट असते. सासवडच्या विकासामध्ये त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभते.
सासवड शहराच्या जडणघडणीत काकांचा फार मोठा वाटा आहे, त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या म्हणजे १९८५ ते १९९२ आणि २००२ ते २००७ या काळात त्यांनी सासवडचा नियोजनबद्ध विकास केला त्यामुळेच सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून नावारूपास आले. शहराचा सर्वांगीण विकास करताना मात्र काकांनी सासवडचे गावपण देखिल अलगद जपले हे विशेष आहे. सासवडसाठी वीर धरणातून केलेली महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेची, तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दखल घेतली गेली.
आताही काकांच्या शिकवणी प्रमाणे आणि गटनेत्या आनंदीकाकी जगताप व आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपालिका गावपण जपत विकासकामे करीत आहे. काकांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपरिषदेने राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात सातत्याने राज्यात प्रथम क्रमांक ठेवला.
आताही आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेत केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ मध्येही सासवड नगरपालिका देशात अव्वल राहिली आहे आणि यातून शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवित आहे. याप्रमाणेच जेजुरी नगरपालिकाही संजय सरांच्या मार्गदर्शनाखाली देशात नावलौकिक प्राप्त करीत आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
ज्याप्रमाणे काकांचा सर्वत्र एक आदरयुक्त दरारा पहायला मिळायचा, त्याचप्रमाणे संजयसरांचाही आदरयुक्त दरारा पहायला मिळतो. आपल्या आयुष्यात कोणतेही कठीण काम करण्यासाठी आपल्या सर्वांनाच काही प्रोत्साहनाची आवश्यकता असते. असे बर्याचदा घडते जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कठीण वाटते तेव्हा आपण ते काम करू शकत नाही असे आपल्याला वाटते.
अशा परिस्थितीत आमदार नेहमी सगळ्यांना प्रेरणा व विचारांना प्रोत्साहन देतात. सरांच्या नजरेतून कोणतीही चुक सहसा सुटत नाही हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पालिकेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेणे, शासनाच्या योजनांची माहिती, त्यासाठी लागणारे प्रस्ताव दिले आहेत का, त्यात काही त्रुटी आहेत का, त्यांची पुर्तता केली आहे का आदिंची विचारपूस करतात. आमदार फंडातूनही शहराच्या विकासासाठी सरांची भरीव मदत होते.
विविध योजना राबविताना त्याबाबत संबंधित विभागाचे वरीष्ठ अधिकारी, गरज पडल्यास त्या विभागाच्या मंत्रीमहोदयांची स्वतः जाऊन भेट घेणे, पाठपुरावा करून शासनाचा निधी मंजूर करून घेऊन हा पैसा शहराच्या विकासासाठी वापरणे अशी काकां प्रमाणेच संजय सरांच्या कामाची पद्धत आहे. नागरिकांवर कराचा अतिरिक्त बोजा न देता अशाप्रकारे शासनाच्या प्रत्येक योजनेतून ते सासवडसाठी निधी मिळवित आहेत.
सन २००२ मध्ये चंदुकाका जनतेतून थेट आणि विक्रमी मतांनी निवडून येऊन नगराध्यक्ष झाले. २००२ ते २००७ याकाळात वीरची पाणी पुरवठा योजना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, साळी आळीतिल शॉपिंग सेंटर, शिवसृष्टी, पालखी तळ परिसर विकास, संत सोपानकाका मंदिर परिसर विकास, रस्ते, दुभाजक या आणि यासारखी अनेक महत्वाची कामे या काळात झाली.
ही कामे होत असताना काकांचा फार मोठा पाठपुरावा आणि लक्ष होते. काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द व विचारांवर असणारा विश्वास त्यांना घडवत गेला. आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भूयारी गटार योजना, घरगुती गॅस लाईन, अतिरिक्त पाणी साठवण टाक्या, अंतर्गत डांबरी रस्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात सुरू असलेले अभ्यासिकेचे काम आदी अनेक कामांना संजय सरांकडून आधुनिकतेची जोड मिळत असल्याचे पहायला मिळाले.
संकटं हि त्या व्यक्तीमधील शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.आमदार झाल्यानंतर काही दिवसातच कोरोना महामारीचे संकट उभे राहिले. संपूर्ण जगाला या अदृष्य विषाणूने वेठीस धरले.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
परंतु पुरंदरच्या मातीत जन्मलेल्या या सुपुत्राने महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्या शौर्याचा वारसा जपत आधुनिक लढाई उभी केली. दोन वर्षे कोविड 19 या महामारीत पुरंदर हवेलीच्या जनतेसोबत कणखरपणे उभे राहून सर्वसामान्य जनतेसाठी मोफत कोविड सेन्टर उभे केले .
पुरंदर हवेलीच्या महिलांसाठी मोफत जनधन आरोग्य कार्ड सुविधेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत औषध उपचार उपलब्ध करून दिला .कोरोना महामारीमुळे लोकांची कामधंदे, उद्योग, व्यवसाय बंद झाले .काही दिवसातच आर्थिक दृष्ट्या स्थिर स्थावर मंडळीही अडचणीत येऊ लागली तर सर्व सामान्य आणि हातावर पोट असणाऱ्या मजूर , लहान व्यवसायिक लोकांवर तर उपासमारीची वेळ आली .
या संकटसमयी पुरंदर - हवेली हे आपले जणू कुटुंबच त्याप्रमाणे आमदार संजयजी जगताप धावून आले .आपले कुटूंब अडचणीत पाहून संजय सरांच्या सुविद्य पत्नी सौ राजवर्धिनीताई मागे राहतील कश्या ? राजवर्धिनीताईंच्या सेवाभावी ग्रामीण संस्थे मार्फत संपूर्ण तालुक्यात कोणीही उपाशी राहू नये यासाठी आनंदी थाळी सुरू केली .
आनंदी थाळी मार्फत पुरंदर हवेलीतील हजारो कुटूंबाला मोफत दोन वेळचे सकस जेवण आणि दूध घरपोच दिले. तसेच हजारो कुटूंबाला किराणा किट त्याच बरोबर वैद्यकीय मदत म्हणून मास्क , सॅनिटीझर , आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्या घरपोच पुरविल्या .
पुरंदर तालुक्यातील माजी राजकारणी विषाणूजन्य दिवसात घरात बसून राहिली परंतु आमदार संजय जगताप संपूर्ण तालुका , गाव, वस्ती अगदी प्रत्येकाची काळजी घेत. सर्वांसाठी सदैव उभे राहिले.
स्वखर्चाने लसीकरण सुविधा उपलब्ध केली. पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम बहिरवाडी या गावाचे संपूर्ण लसीकरण आमदार संजय सर आणि सौ राजवर्धिनी जगताप यांनी स्वतः प्रत्यक्षात जाऊन 100 % लसीकरण करून घेतले .
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
मला अभिमान वाटतो की माझ्या नेत्याने देशात पहिले बहिरवाडी गाव 100% लसीकरण केलं . आमदारांनी नुकतेच महाराष्टातील पहिले वाहिले सहकारी तत्त्वावरील आनंदी मल्टीस्पेशालिटी को-ऑप.हॉस्पिटलची स्थापना केली.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी लवकरच चांगल्या प्रतीच्या आरोग्य सुविधा वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत.
असे अनेक लोकहिताचे निर्णय आणि त्यासोबत लोकहिताची कामे संजय सर सतत करत आहेत .
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील तरूणांना विविध ठिकाणी काम करण्यासाठी आमदार संजय सरांकडून संधी मिळते.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे. त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप विश्वासू आणि एकनिष्ठ माणसं मिळाली व ती त्यांनी जपली. अशा हा कल्पक, कार्यकुशल, अभ्यासू, निगर्वी नेत्याकडे सासवडकर नागरिक एक आधारवड म्हणून पाहत आहे. आणि तेवढे स्थान काकांप्रमाणे आमदार संजय जगताप यांनी निर्माण केले आहे....!
आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली, तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं, प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा, उंच उंच भरारी घेऊ दे.
अशा या आम्हा तरूणांचे आशास्थान, प्रेरणास्थान असणाऱ्या पुरंदर हवेलीच्या लोकप्रिय आमदार साहेबांना दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा
लेखक : - मा. नगरसेवक सासवड नगरपरिषद, अध्यक्ष - सासवड शहर केमिस्ट-ड्रॅगिस्ट असोसिएशन, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जगताप.
No comments:
Post a Comment