पुरंदर, सासवड,दि.12 : युगपुरूष छत्रपती शिवाजीराजे यांचे महान प्रेरणास्थान, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती कोरोनाचे नियम पाळून, अखिल भारतीय मराठा महासंघ युवक शाखा पुरंदर यांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून, सासवड येथील शिवतीर्थावर उत्साहात पार पडली.
यावेळी डॉ. वृषाली जगताप यांच्या हस्ते वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तहसीलदार पदी नवीन नियुक्ती झालेल्या सौ पूनम शिंदे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2021 मध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल सौ. सायली जगताप यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
शिक्षक संघटनेच्या सभापती सौ. वैजंता कुंजीर आणि फडतरे मॅडम यांचा सन्मानही या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"शहाजी राजांची स्वराज्याची संकल्पना उराशी बाळगून स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, ज्यांनी स्वराज्याचे रक्षण केले अशा छत्रपती संभाजी महाराजांवर संस्कार केले. अशा थोर जिजाऊसाहेबांना विनम्र अभिवादन करते. राजे पुन्हा या.. म्हणणे सोपे आहे. परंतु त्यासाठी आधी जिजाऊंना जन्म घ्यावा लागेल." असे मनोगत पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डाॅ.वृषाली जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.
"छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या महान इतिहासातून आमच्यासारख्या खेळाडूंना खूप प्रेरणा मिळते तसेच धाडसीपणा, साहसी वृत्ती वाढते, चांगली कामगिरी करण्यासाठी बळ मिळते." अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक पटकावणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू सायली जगताप यांनी दिली.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ चे तालुका अध्यक्ष गणेशजी मुळीक, उपाध्यक्ष रामभाऊ बोरकर ,तालुका सचिव संजय पापळ ,युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल गायकवाड ,उपाध्यक्ष विवेक तळेकर, सासवड शहर अध्यक्ष संदीप जगताप, सामाजिक कार्यकर्ते नंदुबापू जगताप, उपाध्यक्ष दिपक आप्पा जगताप, चिन्मय कुंजीर, सलील महाराज व कार्यकर्ते उपस्थित होते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
No comments:
Post a Comment