पुरंदर, वीर, दि.16 : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा मानकरी, सालकरी, पाटील, पुरोहित यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहात, कोरोनाच्या नियमांचे पालन करून, पारंपारिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला महाउत्सव आहे.
सोमवारी पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले. यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
क्षेत्र कोडीतची काठी - पालखी घेऊन मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी आठ वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटा भेट होऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले. यानंतर मानाची काठी, पालखी स्थळावर स्थानापन्न झाली. रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे आल्या.
यावेळी मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटा भेट होऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्री 2 वाजून ३५ मिनिटांनी श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. रात्री २:४५ ला लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, लग्न सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित संतोष थिटे यांनी पौराहित्य केले. यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.
वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांचा शाही विवाह सोहळा महाराष्ट्रातील हजारो भाविकांना ऑनलाईन यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता आला.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत कोरोना नियमांचे पालन करून या लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदर पंचायत समिती, सासवड प्राथमिक आरोग्य केंद्र, तहसीलदार कार्यालय, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन व वीर ग्रामपंचायत यांच्याकडूनही या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा शाही विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने, कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी केले.
"पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान श्री क्षेत्र वीर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वीर गावची ऐतिहासिक यात्रा पुरंदर तालुक्याची भक्तिमय संस्कृती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अजूनही काहीशी कोरोना सदृश्य परिस्थिती आहे यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्राकाळात सर्व भाविकांनी शासनाच्या सर्व नियमांचे, कोरोना नियमांचे पालन करावे." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर हे पुणे जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे संपलेला नाहीये यामुळे सर्व भाविक भक्तांनी शासनाच्या सर्व नियमांचे व कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग संपुष्टात यावा व सर्व भावीक भक्तांची भरभराट व्हावी ही मी प्रार्थना करतो." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचा शाही विवाह सोहळा सालाबादप्रमाणे यावर्षी यात्रा होणार का? दर्शन मिळणार का? सेवा करण्याचा आनंद नाथ महाराज देणार का? हे सगळे प्रश्न असताना नेहमीप्रमाणे प्रशासन व देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या प्रयत्नातुन नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडला. याची देही याची डोळा अखंड सेवा व दर्शन झाले असाच हा सोहळा श्वासात श्वास असे पर्यंत पाहण्याचा व अलौकिक अनुभूती घेऊन, निरंतर सेवा करण्याचा योग सदैव मिळावा हीच श्रीनाथ महाराज चरणी प्रार्थना." अशी प्रतिक्रिया वीर गावचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक बापूसाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा अठरापगड जातीतील लोकांना एकत्र आणून, भक्तीच्या धाग्यात जोडून, माणुसकी समृद्ध करणारा हा उत्सव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांनी शासनाचे सर्व आदेश, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे." असे आवाहन महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी केले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी व भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.
No comments:
Post a Comment