Monday, February 14, 2022

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथे 2022 यात्राकाळात "या" कालावधीत पुरंदर - दौंड उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार 144 कलम लागू; "हे" कडक निर्बंध लागू होणार"....


पुरंदर, वीर, दि.14 : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध  श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथील 2022 ची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाचे  नियम पाळून, सालकरी, मानकरी दागिनदार, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचे  आदेश नुकतेच काही दिवसांपूर्वी पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी काढलेले आहेत. 


पुरंदर - दौंडचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी श्री क्षेत्र वीर येथे यात्रा उत्सव कालावधीमध्ये 15 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान 144 कलम लागू केलेले असून, कडक निर्बंध लागू केल्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


पुरंदर - दौंडचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी काढलेल्या आदेशानुसार यात्रा कालावधीमध्ये 15 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान श्री क्षेत्र वीरच्या हद्दीमध्ये  बाहेर गावच्या भाविकांना येण्यास  मनाई करण्यात आलेली आहे. देवाचे धार्मिक विधी पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या मोजक्याच मानकरी, पुजारी यांच्या उपस्थितीत होणार आहेत.




पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रवेशिका व कोविडचे दोन डोस पूर्ण झालेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे .15 ते 25 फेब्रुवारी  दरम्यान वीर येथे सार्वजनिक वाहतूकीने  संचार, विनाकारण फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे आदींना मनाई करण्यात आली  असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी आदेश दिले आहेत. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


वीर देवस्थान ट्रस्टनेही कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे व शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे सर्व भक्तांना आवाहन केलेले आहे.




कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सर्व भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करणे तसेच शासनाच्या सर्व आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


पुरंदर - दौंडचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी लागू केलेल्या कलम 144  नुसार कडक निर्बंध, खालील प्रमाणे : - खालील आदेशाच्या पानांवर क्लिक करून वाचा संपूर्ण निर्बंध.








महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथे सर्व भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.






No comments:

Post a Comment