नवी दिल्ली, दि. 29 : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून २०२२ च्या जाहीर झालेल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांनी बाजी मारून, महाराष्ट्राचे नाव उंचवले आहे.
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दैनंदिन अध्यापन नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने न करता त्यामध्ये तंत्रज्ञानयुक्त, नावीन्यपूर्ण बदल केल्यास हे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासावृद्धी करणारे ठरेल, तसेच या तंत्रज्ञानाला संगीत आणि संस्कृती शिक्षणाची सांगड घातल्यास त्याद्वारे आनंददायी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी व्यक्तिमत्व चतुरस्त्र होण्यास सहाय्यभूत ठरेल यासाठी शिक्षक कलावंत शशिकांत कुलथे यांनी विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत.
शशिकांत कुलथे हे सहशिक्षक म्हणून सर्वप्रथम केंद्रीय प्राथमिक शाळा, परभणी येथे रुजू झाले. त्यानंतर पारगाव शिरस केंद्र अंतर्गत प्रा. शा. केतुरा व प्रा. शा. बहिरवाडी येथेही ते कार्यरत होते. तर सध्या ते गेवराई तालुक्यातील पाचेगाव केंद्रांतर्गत जि. प. प्रा. शा. दामू नाईक तांडा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
शशिकांत कुलथे यांनी एम. ए. एम. एड. या शैक्षणिक पात्रतेसोबतच संगीत गायन पारंगत, गायन व तबला या विषयात संगीत विशारद, तसेच राष्ट्रभाषा हिंदी पंडित, उर्दू भाषा पदविका, हस्तकला शिक्षक पूर्ण केलेल्या आहेत. याबरोबरच सांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली (सीसीआरटी) चे प्रशिक्षित स्त्रोतव्यक्ती म्हणूनही ते कार्यरत आहेत.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२२ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे.
येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.