पुणे, दि.१५ : पुणे शहरातील प्रियदर्शनी विद्यामंदिर या दक्षिण उपनगरातील प्रसिद्ध शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात व देशभक्तीमय,आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून आणि दुःखद परिस्थितीतून सावरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पुण्यातील धनकवडी येथील प्रियदर्शन विद्या मंदिर प्रशालेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सकाळपासूनच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग या सर्वांच्यामध्येच उत्साह दिसत होता.
"प्रियदर्शनी विद्यामंदिर या विद्यालयात दहावी मध्ये पहिला क्रमांक आलेल्या नेहा देसले या विद्यार्थिनीच्या पालकांच्या हस्ते सकाळी सात वाजता शाळेच्या मैदानावर, देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण झाले." शाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, बॅचेस बनवणे, मेहंदी स्पर्धा घेऊन, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मैदानावरती विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन अमृतमहोत्सवी ७५ आकडा साकारला."
या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहावीमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या नेहा देसले या विद्यार्थिनीचे पालक संतोष देसले व सौ देसले यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संतोष देसले यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांच्या योगदानाबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
Snapdeal Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजश्री निंगुणे, मांडवकर कुमुदिनी व मुक्ता ढुमे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्यामंदिर या प्रशालेतील दहावी मधील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करणे हा शाळेचा खूपच कौतुकास्पद उपक्रम आहे.
संपूर्ण देश भरात, संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment