Saturday, August 20, 2022

"पुरंदर तालुक्यातील "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर" या कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला 'भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त' व "या" दानशूर व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त मिळाला मदतीचा हात"


पुरंदर, मांडकी, दि.२० : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर" या कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दानशूर व्यक्तींकडून व मांडकी गावचे मा.उपसरपंच विजय साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त  मदतीचा हात मिळाला.




भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त तसेच पुरंदर तालुक्यातील संजय गांधी नियोजन योजनेचे सदस्य व मांडकी गावचे मा.उपसरपंच विजय  साळुंखे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर" या  मांडकी येथील कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेतील सर्व लोकांना खाऊ वाटप करण्यात आले. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


तसेच या संस्थेतील सर्व महिला व पुरुष रुग्णांना आवश्यक कपड्यांचे वाटप करण्यात आले.




या संस्थेचे माजी चेअरमन कै. सुभेदार गेनुजी जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्रीकांत जगताप व सुनबाई वैशाली जगताप यांनी संस्थेच्या महिला रुग्णांना  प्रत्येकी एक साडी व एक ब्लाउज पीस व पुरुष रुग्णांना  प्रत्येकी एक शर्ट पीस व पॅन्ट पीस याचे वाटप करण्यात आले.




कै. सुधाकर हिरामण डोंगरे राहणार वाई यांच्या स्मरणार्थ श्रीमती पारूबाई डोंगरे व मुलगा सुजित डोंगरे या डोंगरे कुटुंबीयांनी देखील  महिला रुग्णांसाठी प्रत्येकी एक साडी व एक ब्लाउज पीस व  पुरुष रुग्णांसाठी प्रत्येकी एक  पॅंट पीस व  शर्ट पीस याचे वाटप  मान्यवरांच्या उपस्थितीत, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त करण्यात आले.



कै. जनाबाई गुलाब कुमठेकर  राहणार वाल्हे  यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुलाबराव कुमठेकर कुटुंबीयांनी बारा रुग्णांना प्रत्येकी एक याप्रमाणे 12 ब्लँकेटचे वाटप  करून सर्व रुग्णांना स्नेहभोजन दिले.  गुलाबराव देवकर यांनी  या संस्थेस दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात पुढे केलेला आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

 

या संस्थेचे मानद सचिव मानसिंग तात्या जगताप यांनी सर्व थोर देणगीदारांचे आभार मानले.


याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक व या संस्थेचे सचिव मानसिंगतात्या जगताप, चेअरमन संतोष जगताप, व्हा.चेअरमन सुरेश जगताप, आबा  हरिहर,  मा.सरपंच सतीश नाना जगताप.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मा.उपसरपंच विजय बापू साळुंखे, सतिश गणपत जगताप, आबा हरिहर, अनिल साळुंखे, रणजीत जगताप, महेंद्र काशीद, अनिल गावडे, तेजस जगताप, आशिष मांडके व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 



"सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर"  या  कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला समाजातील दानशूर व्यक्ती मदत करत असतात. यापुढेही समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोकांनी, दानशूर व्यक्तींनी या संस्थेला मदत करावी." असे आवहान  या संस्थेचे मानद सचिव मानसिंगतात्या जगताप यांनी केले.





पुरंदर तालुक्यातील  कुष्ठरोगी रुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या  "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर "  या संस्थेला तालुक्‍यातील सर्वच लोकप्रतिनिधी, समाजसेवक व सर्व थरातील दानशूर व्यक्तींनी मदत केली पाहिजे.





Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


No comments:

Post a Comment