सासवड, दि.10 : महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुरंदरच्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा ३७४ वा शौर्यदिन हा वीर बाजी पासलकर यांच्या समाधी स्थळी अभिवादन करून व महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून ३७४ वा शौर्यदिन उत्साहात साजरा केला.
युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी अनेक शिलेदारांनी, पराक्रमी सरदारांनी, मावळ्यांनी गौरवशाली कामगिरी करून प्रामाणिकपणे व निष्ठावंतपणे साथ दिली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पुरंदर किल्ल्यावरील १० ऑगस्ट १६४८ रोजी झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईत महापराक्रमी सरदार वीर गोदाजीराजे जगताप यांनी अतुलनीय पराक्रम दाखवून आदिलशहाचा सरदार फत्तेखानाच्या फौजेचा पराभव करून फत्तेखानाच्या फौजेतील प्रमुख सरदार मुसेखानाला ठार केले.
स्वराज्याच्या या पहिल्या लढाईत वीर सेनापती बाजी पासलकर, सरदार सुभानराव शिळीमकर, वीर यलजी गोते यांनी मोठा पराक्रम दाखवून स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले.
३७४ व्या शौर्यदिना निमित्त सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष श्री दीपक जगताप, सचिव श्री सागर जगताप, श्री प्रवीण जगताप, लेखक श्री अजयकुमार जगताप , श्री दिलीप जगताप , श्री राजाभाऊ जगताप, श्री अनिल जगताप, श्री विजयबापू जगताप, श्री तुळशीराम जगताप ,श्री नंदकुमार जगताप.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
श्री नितीन जगताप, श्री चंद्रकांत जगताप,श्री बाबाराजे जगताप, श्री प्रशांत जगताप, श्री उत्कर्ष जगताप, श्री विकास जगताप,मा. उपनगराध्यक्ष श्री उमेश जगताप, मा. नगरसेवक नंदूबापू जगताप यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सासवड येथील सरदार गोदाजीराजे जगताप स्मारक येथे यंदाचा ३७४ वा शौर्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वीर बाजी पासलकर स्मारक स्थळी वीर बाजी पासलकर यांना अभिवादन करण्यात आले.
"स्वराज्याच्या या पहिल्या ऐतिहासिक लढाईतील विजयाने दूरगामी परिणाम झाले. स्वराज्यातील रयतेचा व सैन्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवाजीराजेंना स्वराज्य स्थापनेसाठी पाठिंबा वाढला व स्वराज्यस्थापनेची वाट सुकर झाली. आजच्या तरुणपिढीने या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजासाठी चांगले कार्य केले पाहिजे." अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक अजय कुमार जगताप यांनी दिली.
Snapdeal Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
युगपुरुष शिवाजीराजे यांचे महान स्वराज्य कार्य, गौरवशाली महान इतिहास व स्वराज्याच्या शिलेदारांचा महान इतिहास महाराष्ट्रासाठी तसेच भारत देशासाठीही खूप प्रेरणादायी आहे.
No comments:
Post a Comment