Thursday, August 11, 2022

पुरंदर तालुक्यातील "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर" या कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला मिळाला पिलाणे कुटुंबीयांकडून मदतीचा हात; पिलाणे गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आदर्श सामाजिक उपक्रम"...

 


पुरंदर, मांडकी, दि.११ : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर " या कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला मांडकी येथील मोतीराम  पिलाणे कुटुंबियांकडून  मदतीचा हात मिळाला.




कै. साधू पिलाणे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त मोतीराम पिलाणे  कुटुंबियांकडून "सॅनिटोरियम  फॉर लेप्रसी वीर" या संस्थेतील रुग्णांना भेटवस्तू देऊन समाजात एक चांगला आदर्श निर्माण केला. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


साधु पिलाणे  गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त मोतीराम पिलाणे,  रेखाताई पिलाणे,  प्रणाली पिलाणे,  विशाल पिलाणे या पिलाणे  कुटुंबीयांकडून या संस्थेतील महिला रुग्णांसाठी  प्रत्येकी तीन साडया  व ब्लाउज पीस  भेटवस्तू देण्यात आल्या. 




या संस्थेतील पुरुष रुग्णांसाठी प्रत्येकी दोन शर्ट पीस (कापड ) व दोन पॅन्ट पीस (कापड ) व प्रत्येकाला एक ब्लॅंकेट, रग या  भेटवस्तू   पिलाणे कुटुंबियांकडून देण्यात आल्या. 




पिलाणे कुटुंबियांकडून "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर "  या संस्थेतील रुग्णांना यावेळी स्नेहभोजनही  देण्यात आले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


संस्थेच्या वतीने यावेळी कै. साधु पिलाणे  गुरुजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या संस्थेचे मानद सचिव व सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक मानसिंग तात्या जगताप यांनी पिलाणे  कुटुंबीयांचे यावेळी  या सामाजिक उपक्रमाबद्दल व  रुग्णांना दिलेल्या भेटवस्तू बद्दल आभार मानले.




यावेळी संस्थेचे मानद सचिव मानसिंग तात्या जगताप, विश्वस्त सतीश जगताप, व्हाईस चेअरमन सुरेश जगताप, विशाल थोपटे, विशाल पिलाणे  मित्र परिवार व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.




"सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर"  या  कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला समाजातील दानशूर व्यक्ती मदत करत असतात. यापुढेही समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोकांनी, दानशूर व्यक्तींनी या संस्थेला मदत करावी." असे आवहान  या संस्थेचे मानद सचिव मानसिंग तात्या जगताप यांनी केले.




पुरंदर तालुक्यातील  कुष्ठरोगी रुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या  "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी वीर "  या संस्थेला तालुक्‍यातील सर्वच लोकप्रतिनिधी, समाजसेवक व सर्व थरातील दानशूर व्यक्तींनी मदत केली पाहिजे.


No comments:

Post a Comment