Saturday, March 25, 2023

"पुरंदर तालुक्यातील औषधविक्री क्षेत्रातील २५ वर्षांपासूनचा प्रसिद्ध, विश्वसनीय ब्रँड "माधुरी मेडिकल" चे सर्वेसर्वा नंदकुमार जगताप यांची यशस्वी व्यावसायिक भरारी; पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या हस्ते "माधुरी डिस्ट्रीब्युटर्स" पशु औषधांच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न"



पुरंदर, सासवड, दि.२५ :  पुरंदर तालुक्यातील, सासवड शहरातील औषधविक्री क्षेत्रातील मागील २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष सेवा देणाऱ्या सासवडचे मा.नगरसेवक नंदकुमार विठ्ठलराव जगताप यांच्या "माधुरी मेडिकल" ब्रँडने आता पशु औषध विक्रीच्या व्यवसायातही पदार्पण केले आहे.




पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार  संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथे "माधुरी डिस्ट्रीब्युटर्स" पशु औषधाच्या दुकानाचे उद्घाटन बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत,उत्साहमय वातावरणात, करण्यात आले.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"पशु सेवा हिच ईश्वर सेवा" हे व्रत घेऊन अहोरात्र पशु सेवा करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील  सर्व नामांकित डॉक्टरांचा सत्कार पुरंदर हवेलीचे आमदार  संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.




माधुरी डिस्ट्रीब्युटर्स पशु औषधाच्या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्या निमित्ताने  पशु सेवा करणाऱ्या या नामांकित डॉक्टरांचा हा सन्मान  करण्यात आला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार  संजय जगताप यांनी सासवडचे मा.नगरसेवक नंदकुमार जगताप यांच्या "माधुरी डिस्ट्रीब्युटर्स" पशु औषधाच्या या नवीन व्यावसायास शुभेच्छा देऊन, नंदकुमार जगताप यांच्या औषध विक्रीच्या व्यावसायिक क्षेत्रातील कर्तबगारीचे कौतुक केले.



नंदकुमार जगताप यांनी पुरंदर तालुक्यात माधुरी मेडिकलच्या माध्यमातून मागील २५ वर्ष चांगली सेवा देऊन एक चांगला विश्वास निर्माण केलेला आहेच तसेच फेब्रुवारी महिन्यात "माधुरी डायग्नोस्टिक सेंटरच्या" माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्रात एक नवीन पाऊल देखील टाकलेला आहे.




या उद्घाटन सोहळ्यास पुरंदर तालुक्यातील डॉ मनोज शिंदे (अध्यक्ष पुरंदर तालुका पशु व दुग्ध सेवा संघ), डॉ नंदकुमार निगडे, डॉ. समीर हिवरकर, डॉ संदीप नवले (अध्यक्ष पुणे जिल्हा), डॉ सुनिल कामठे, डॉ बापू गायकवाड, डॉ आण्णासो दरेकर, डॉ मनोज सागडे, डॉ श्रीरंग नझिरकर, डॉ रवि ताकवले, तसेच 




डॉ संतोष होले, डॉ सुजय कुंजीर, डॉ समीर पवार ,डॉ रोहिदास पवार डॉ विकास गाढवे, डॉ प्रशांत बनकर , डॉ बाप्पू भिसे , श्री विलास काका जगताप, मा. नगरसेवक नंदूबापू जगताप , मा उपनगराध्यक्ष श्री अजित जगताप, मा. उपनगराध्यक्ष श्री संजयअण्णा जगताप, मा. नगराध्यक्ष श्री दत्तानाना जगताप तसेच सर्व मान्यवरांच्या  उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 




"कै. श्री गगांधर (आण्णा) जगताप यांच्या आशीर्वादाने गेली 25 वर्षे आरोग्यसेवा माधुरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या औषध विक्री व्यवसायाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये अविरतपणे सुरू आहे. वडिल श्री विठ्ठलराव जगताप आणि चुलते श्री चंद्रकांत ऊर्फ आबा जगताप हे पारंपरिक शेती आणि  दुग्धव्यवसायात असल्यामुळे त्यांच्या प्रेरणेने माधुरी डिस्ट्रीब्युटर्स या नावाने होलसेल पशु औषधालय हा नविन व्यवसाय चैत्र पाडवा दिं 22 मार्च रोजी सुरू केला . "



"हा नविन व्यवसाय करण्यासाठी मोठे भाऊ श्री विलास काका जगताप (शेती उद्योग भंडार सासवड)आणि श्री विजय दादा जगताप (शेती उद्योग भंडार जेजुरी)माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहिले. हा व्यवसाय उभा करत असताना माझे लहान भाऊ श्री कृष्णा जगताप, श्री सचिन जगताप (श्री सद्गुरू सिडस् पुणे)आणि श्री रोशन जगताप  (हॉटेल व्यवसायिक)सतत सर्व प्रकारची मदत करत राहीले. या नविन व्यवसायाची धुरा माझी पत्नी उर्मिला जगताप (माधुरी diagnostic)यांनी घेतली आहे. सर्व व्यवस्थापन ती स्वतः करत आहे. पुरंदर तालुक्यातील दुग्ध व्यवसायिक शेतकरी बांधवांना सर्व प्रकरच्या जनावरांची सर्व औषधे होलसेल दरात उपलब्ध केलेली आहेत." अशी प्रतिक्रिया सासवडचे मा. नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पुरंदर तालुक्यातील औषध विक्री क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड "माधुरी मेडिकलच्या" माध्यमातून नंदकुमार जगताप यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात दिलेल्या प्रामाणिक सेवेमुळेच, त्यांनी केलेली वेगवेगळ्या क्षेत्रातील ही व्यावसायिक भरारी तालुक्यातील युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहे.




श्री नंदूकाका जगताप (मा सभापती निरा कृषि उत्पन्न बाजार समिती), श्री शामराव दादा जगताप, श्री वामन तात्या जगताप (मा उपनगराध्यक्ष सासवड) श्री संतोष गिरमे (मा नगरसेवक) श्री सुहास शिंदे (दुर्गा एंटरप्रसेस)श्री दिपक फडतरे, श्री रणजित शितोळे (CA),
डॉ प्रवीण कारंजकर (अध्यक्ष पुणे जिल्हा पशुचिकिस्ता व्यवसायिक संघटना) आणि डॉ विष्णू ठोंबरेजी (पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी -1 सासवड) यांनी  या व्यवसायास शुभेच्छा दिल्या . 




मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री संदीप जगताप ,शेतकरी श्री कुमार भाऊ जगताप , श्री संजय पवार, श्री सुनील बापू जगताप, श्री विजय बापू जगताप, उद्योजक श्री अनिल बापू जगताप, श्री मोहन आण्णा जगताप, मा सरपंच श्री पिनुषेठ काकडे, श्री धनुभाऊ जगताप , श्री रमेशबापू जगताप, श्री वसंत राजाराम काळे, श्री बंडू काका जगताप , श्री चंद्रशेखर जगताप (व्यवस्थापक संत सोपानकाका बँक ) श्री विश्वजित आनंदे , श्री बाळुकाका जगताप , श्री बाजीराव जगताप, तसेच



श्री दादा भुजबळ, श्री बाबासाहेब शिवराम जगताप, श्री विठ्ठल आबा मोकाशी, श्री संजय चव्हाण (अध्यक्ष व्यापारी असोसिएशन सासवड ), प्रगतशील श्री संतोष कोंडे, श्री नामदेव नेटके, प्रसिद्ध उद्योजक श्री बापू भिंताडे , श्री सुजित बडदे(आयकर अधिकारी), श्री सागर जगताप, श्री शंतनु झगडे, श्री मनोज म्हेत्रे, श्री संतोष जगताप, श्री नितीन भोंगळे, श्री राजेन्द्र जगताप, श्री हेमंत सस्ते, श्री भूषण ताकवले (रुद्र फार्मा) श्री विराज सस्ते (विराज फार्मा), श्री दिपक काळे (सचिव सासवड मेडिकल असोसिएशन), सर्व सन्माननीय सभासद पुरंदर तालुका केमिस्ट - ड्रॅगिस्ट असोसिएशन आणि दुगधव्यवसाय करणारे शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 



काँग्रेस प्रवक्ते श्री सागर दत्तात्रय जगताप यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.

"माधुरी डिस्ट्रीब्युटर्स" पशु औषधाच्या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक आणि शेतकरी बंधूचे नंदकुमार जगताप यांनी मनःपूर्वक जाहीर आभार मानले .

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


Tuesday, March 21, 2023

"अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य; बोगस आदिवासी उमेदवारांनी जागा बळकवण्याच्या "या" लक्षवेधी सुचनेवर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभा अधिवेशनात दिली "ही" सविस्तर माहिती....



मुंबई, दि. २१ : आतापर्यंत फक्त व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होते, येणाऱ्या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


विधानसभा सदस्य डॉ. किरण लहामटे, नाना पटोले, संजय सावकारे, धर्मराव बाबा आत्राम यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासी उमेदवार यांनी जागा बळकावणे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.




आदीवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले की, जात प्रमाणपत्र निर्गमित करणे आणि त्याची पडताळणी करणे याबाबतची काही नियमावली आहे. त्यानुसारच राज्यातील मागास प्रवर्गातील जाती आणि जमातींना प्रमाणपत्र देण्यात येते तसेच या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येते. सामाईक प्रवेश परीक्षेमार्फत होणाऱ्या प्रवेशांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. 


येणाऱ्या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जात वैधता समित्यांची संख्या सातने वाढविण्यात आली असून आता राज्यात १५ जात वैधता समित्या आहेत. येणाऱ्या काळात जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्रासंदर्भातील कार्यवाही सुटसुटीत होण्यासाठी नवीन प्रणाली आणण्याचा अभ्यास करण्यात येईल.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करणार"


शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागणाऱ्यांना संबंधित उमेदवारांना जातीचे दाखले आवश्यक असतात. हे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.


विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम, डॉ. किरण लहामटे, अशोक पवार, नाना पटोले, सुनील भुसारा, डॉ. देवराव होळी यांनी आदिम जनजाती समाज शासनाच्या सेवांपासून वंचित राहण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.




मंत्री डॉ. गावीत म्हणाले की, राज्यातील तीन आदिम जमातींसाठी मुंबई विद्यापीठाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. गावांगावांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ग्रामसखीची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामसखीमार्फत कागदपत्रे देताना त्या त्या कागदपत्रातील त्रुटी दूर करुन काम करण्यात येत आहे. 




पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात महाराजस्व अभियानाअंतर्गत 1 जानेवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2023 या काळात 35 ठिकाणी शिबीरे घेण्यात आली. यावेळी आदिम जमातीच्या लाभार्थींना विविध दाखले देण्यात आले. यामध्ये आधार कार्ड 539, जॉब कार्ड 74, उत्पन्न प्रमाणपत्र 74,रेशनकार्ड 112, जात प्रमाणपत्र 108 असे एकूण 907 दाखले आणि प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आदिवासी समुदायांच्या रहिवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी शबरी घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जमीन घेण्यासाठी 50 हजार रुपये देण्यात येतात, यामध्ये आवश्यक असल्यास अधिक पैसे वाढवून देण्यात येतील.

 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


आदिम जमातीविषयक सन 2018 ते 2020 या काळात मुंबई विद्यापीठाच्या मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्थामार्फत प्रथम रेषा सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कातकरी जमातीचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आदिम जमाती विकास धोरण तयार करण्यासाठी संशोधन आणि गरजा यावर आधारित अभ्यास करण्यात आला आहे. तसेच आदिम जमाती विकास धोरण निश्चित करण्यात येत असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.

Monday, March 13, 2023

"लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्वात मोठी बावधनची ऐतिहासिक बगाड यात्रा उत्साहात संपन्न; बावधनकरांचा नादच खुळा, उत्कृष्ट नियोजनामुळे ऐतिहासिक बगाड यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न; ३५० वर्षांची परंपरा असलेल्या बावधनच्या "या" ऐतिहासिक बगाड यात्रेची माहिती वाचा सविस्तर"...




वाई, बावधन, दि.१३ : महाराष्ट्रातील सर्वात मोठे बगाड, सातारा जिल्ह्यातील, वाई तालुक्यातील, ३५० वर्षांची परंपरा असलेले बावधनचे ऐतिहासिक बगाड. रविवारी बावधनची ऐतिहासिक बगाड मिरवणूक लाखो भाविकांच्या उपस्थितीत,बावधनकरांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे उत्साहात संपन्न झाली. बावधनकर ग्रामस्थांची एकजूट, भैरवनाथ देवस्थान कमिटी व बावधनचे ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ऐतिहासिक बगाड यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.




वाई तालुक्यातील, बावधन येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक, काशीनाथाचं चांगभलंच्या गजरात, भक्तिमय वातावरणात, रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी लाखो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


राज्यातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून ओळखली जाणारी सातारा जिल्ह्यातील ही बावधनची बगाड यात्रा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेते.




महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले बावधन येथील  भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर याठिकाणी रविवारी सकाळी आठच्या सुमारास पोहोचले.






बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


त्यापूर्वी बगाड्या दिलीप शंकर दाभाडे यांना नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाड्याला झोपाळ्यावर बसविण्यात आले.




यावेळी भाविकांनी नोटा व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. 




या रथावर सुमारे तीस-चाळीस फूट उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान दिलीप शंकर दाभाडे यांना मिळाला.




या बगाड्याला घेऊन हे 20 फूट उंच बगाड गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीने ओढण्यात आले. ठिकठिकाणी विसावा घेऊन बगाड ओढणाऱ्या बैलजोड्या बदलण्यात आल्या.




साडे तीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते. बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभीत करून ठेवण्यात आली होती. या पालख्यांचे भाविकांनी दर्शन घेतले.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


बगाड वाई - पाचवड रस्त्यावर बावधन फाट्यावर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पोहचले. सातारा जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला.




काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत आली. बगाड गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या.




 "काशीनाथाचं चांगभलं"च्या गजरात रात्री आठ वाजता बगाड मिरवणूक,वाद्यांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात बावधन गावात पोहचली.




"आमच्या बावधनची बगाड यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ३५० वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या बावधनच्या बगाड यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविकांची उपस्थिती असते. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरवात होते.रंगपंचमी दिवशी बगाडाचा उत्सव असतो.भैरवनाथ देवस्थान कमिटी बावधन व बावधन ग्रामस्थ यांच्या एकजुटीने व अत्यंत चांगल्या नियोजनामुळे बगाड यात्रा उत्सव  व्यवस्थित पार पडतो." अशी प्रतिक्रिया बावधन गावचे ग्रामस्थ, भक्त धनाजी दाभाडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने घट्ट बांधणाऱ्या ऐतिहासिक बगाड यात्रेमुळे भक्तीची संस्कृती समृद्ध होते.


बावधनच्या या ऐतिहासिक बगाड यात्रेसाठी सातारा जिल्हाधिकारी प्रशासन, वाई तालुका प्रशासन, सातारा जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महावितरण विभाग तसेच सरकारी विभागांचे सहकार्य मिळाले.



बावधनच्या बगाड यात्रेची "अशी" असते महान परंपरा : 


सातारा  जिल्ह्यातील, वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधन गावं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि याच गावाची यात्रा म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा.




सुमारे चार लाखांपेक्षा जास्त लोक या यात्रेत सहभागी झालेले असतात आणि या बगाडातील एक खास वैशिष्ट्य मानलं जातं म्हणजे, या बगाडाला जुंपली जाणारी शेकडो धष्ट पुष्ट खिलार जातींची बैल. या उत्सवाला सुरवात होते ती नव्याच्या पौर्णिमेपासून. बगाडाच्या शिडाचे कळक तोडले जातात. 




हे कळक तोडण्यासाठी आख्खं गाव जमा होतं. कळकांच्या बेटाजवळ गेल्यानंतर सर्वात मोठं कळक याठिकाणी शोधलं जातं आणि ते कापून वाजत गाजत गावात आणलं जातं. त्यानंतर गावाकरी आपला मोर्चा बाभळीच्या झाडाकडे वळवतात. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


लाकडातील चिवट लाकूड म्हणून बाभळीच्या झाडाकडे पाहिलं जातं. या बगाडासाठी खास बाभळीची लाकडं तोडून तीही वाजत गाजत गावात आणली जातात. आणि ही बाभळीची लाकडं आणण्यासाठी गावातील एकोप्यातील जल्लोष पहायला मिळतो. 




फाल्गुन शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण गावातील भक्त मंडळींकडून गावचं मंदिर साफसफाई आणि धुण्याचं काम सुरु होतं. यालाच पाकळणी असं म्हणतात. माघाची पौर्णिमा म्हणजे, भक्तांचा उत्सव आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचं कौतुक. या दिवशी नाथांच्या भगीनी भवानी आई आणि जननी आई यांच्या मंदिरापासून काठ्या निघतात. 




बावधनची यात्रा म्हणजे, देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यातील महत्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ. नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या दोन्ही भगीनिंना आणलं जातं, अशी या भक्तांची भावना आहे. या दिवशी नाभिक समाजाला खास महत्व दिलं जातं.




मानाचं पान लाभलेला नाभिक समाज दिवटीचं टोक मनगटावर टोचून वाद्यांच्या गजरात काट्या नाचवत या दोन्ही भगिनींना मंदिरात आणतात. मंदिरात आल्यानंतर हे दिवटीच टोक बाहेर काढलं गेलं आणि बोंब ठोकून देवाच्या नावानं जयघोष केला गेला. आणि नंतर सुरु होतो तो हळदीचा कार्यक्रम. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पंचक्रोषीत बारा बलुतेदार आणि मानाच्या महिला या हळदीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. हळदीच्या कार्यक्रमात देवाला हळद लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडतो.



प्रत्येक वर्षी गावातील लोहाराला एक वेगळा मान असतो आणि यांच्या हातून मानाचा नाल या मंदिराला ठोकला जातो. 




सध्या या मंदिरावर असलेल्या नालांची संख्या सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त आहे. म्हणजे तीनशे पेक्षा जास्त वर्ष या बगाडाचा उत्सव सुरु असल्याचं सांगितलं जातं. हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि याच दिवसापासून या बगाडाच्या यात्रेची सुरुवात होते.

Saturday, March 11, 2023

"पुण्यातील "या" प्रसिद्ध मराठी प्रशालेचा २०० पटसंख्या ते २००० विद्यार्थ्यांची आदर्श शाळा; राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी या प्रेरणादायी प्रवासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदर्श मुख्याध्यापिका राजश्री दिघे यांचा महिला दिन विशेष सप्ताह निमित्त विशेष लेख "तिचा' प्रेरणादायी, संघर्षमय प्रवास" - तुम्ही मुलांचे मालक नाही तर एक सुजाण पालक आहे.... वाचा आदर्श मुख्याध्यापिकेंच्या शब्दात विशेष लेख...



"तिचा प्रेरणादायी, संघर्षमय प्रवास"


लहान असताना सर्वजण शाळा - शाळा हा खेळ खेळतात. मी ही अतिशय आवडीने हा खेळ खेळायचे. पण पुढे जाऊन हाच खेळ माझ्या आयुष्याचे स्वप्न बनला. आणि मग सुरू झाली त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा.




बारावी नंतर मला डी.एड.ला भोर येथील अध्यापक विद्यालयात प्रवेश मिळाला. प्रथमच घरापासून आपल्या मायेच्या प्रेमाच्या लोकांपासून दूर वस्तीगृहात राहावे लागले. त्यासाठी उपयोगी पडली ती आई-वडिलांकडून मिळालेली संस्कारांची शिदोरी. या शिदोरीच्या जोरावर मी अनेक समस्यांना तोंड देत इ. सन 1997 साली डीएड पूर्ण केले व शिक्षिका झाले.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"मी जेव्हा प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, तेव्हा शाळेची पटसंख्या 200 च्या आसपास होती. इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाच्या या छोट्याशा रोपट्याचे आज 2023 साली मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले पाहून संस्थेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी योग्य प्रकारे न्याय देऊ शकले याचे समाधान वाटते. परंतु हा यशाचा मार्ग काही सोपा नव्हता."




तसे पाहता खूप लवकर माझ्यावर मुख्याध्यापिका पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्याच वयाच्या इतर सहकाऱ्यांना सांभाळून घेताना, पालक - विद्यार्थी, प्रशासकीय कामकाज या सगळ्याची जबाबदारी पेलताना अनेक समस्या निर्माण होत होत्या. 




परंतु त्यावर मात करताना मला माझ्या कुटुंबियांनी व  सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री आप्पासाहेब रेणुसे व माननीय श्री दत्तात्रय धनकवडे यांनी मला जी खंबीर साथ दिली व माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला त्याच्या बळावर मी मुख्याध्यापिका पदाची जबाबदारी पार पाडण्यास सज्ज झाले.




"आज प्रशालेमध्ये सुमारे 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व 60 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशालेमध्ये अध्यापक वर्ग हा प्रामुख्याने महिलावर्गच आहे. सर्वजणी एकमेकींना समजून घेतात त्यामुळे आपसातील भांडणे - तंटे या गोष्टी होत नाहीत. व शाळेतील वातावरण चांगले राहते. एवढ्या महिला एकत्र काम करताना मला तरी काही अडचणी जाणवत नाहीत."


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


कारण मी ही एक महिलाच आहे. त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांच्या अडी - अडचणींची मला कल्पना आहे. त्यामुळे अशा समस्या आम्ही एकमेकांच्या सहकार्याने, सामंजस्याने सोडवून टाकतो. त्यामुळे सर्वांमध्ये मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले आहेत. जे शाळेच्या प्रगतीसाठी, निकोप वातावरण तयार करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरते.




"प्रशालेचा आजवरचा प्रगतीचा आलेख हा कायम चढताच राहिला आहे. मला सांगण्यास अभिमान वाटतो की आमच्या प्रशालेमध्ये अगदी सामान्य कुटुंबातून आलेले विद्यार्थी आहेत. घरी शैक्षणिक पार्श्वभूमी नसली तरी शिक्षकांच्या प्रयत्नातून हे विद्यार्थी कुठेही कमी पडले नाहीत."




आज प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सातत्याने वीस वर्षे इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याची आमच्या प्रशालेची परंपरा अखंडीतपणे चालू आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यांसारख्या क्षेत्रांमध्ये शाळेचा दबदबा निर्माण केला आहे. 




यंदाच्या वर्षी प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांनी टेनिस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे.




"प्रशालेतील अनेक माजी विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरी पासून वैद्यकीय, अभियांत्रिकेपर्यंत व एअर होस्टेस पासून आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकापर्यंत सर्वच क्षेत्रात बाजी मारली आहे. आणि या सर्वांमध्ये मुलींचे प्रमाण कायम आघाडीवर असते हे मी अभिमानाने सांगते."




"अश्या या माझ्या प्रशालेमध्ये विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक उल्लेख मी आवर्जून करेल तो उपक्रम म्हणजे इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेत प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान दिला जातो.त्यांच्या हस्ते ध्वज फडकविला जातो."




हा सन्मान आपल्या पालकांना मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागते व याचा परिणाम म्हणजे इयत्ता दहावीला 85% च्या पुढे अनेक विद्यार्थी गुण मिळवतात व त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग थोडा सुकर होतो.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


'ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे पालकांसाठी ही "ग्रंथालय सुविधा" उपलब्ध करून दिली जाते. काही चर्चासत्रेही आयोजित केली जातात व त्याचबरोबर पालकांना आपल्या मुलांचा अभ्यास घेताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी खास पालकांसाठी "अभ्यास कसा घ्यावा?" यासारख्या कार्यशाळा ही शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित केल्या जातात.'




प्रशालेमध्ये ज्यावेळी पालक सभा आयोजित केल्या जातात त्यावेळी प्रत्यक्ष पालकांची चर्चा होते त्यावेळी विशेषतः महिला पालकांच्या अनेक समस्या निदर्शनास येतात. त्या समस्या सोडवण्याची ताकद ही तिच्यामध्ये असते परंतु तिला आवश्यकता असते ती कुटुंबाच्या पाठिंब्याची.


जर प्रत्येक कुटुंबातून असा पाठिंबा महिलांना मिळाला तर त्या नोकरी, व्यवसाय, मुले, कुटुंब यांच्या प्रती सर्व जबाबदाऱ्या हसत हसत पार पाडतील.




मलाही माझे पती श्री संजय व मुलगा चिरंजीव पारस यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच तर मी माझ्या शाळेप्रती असलेल्या व कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडण्यात यशस्वी झाली आहे.




"आज शाळेने एवढी उंची नक्कीच गाठली आहे की पूर्वी बरेच पालक नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी रांग लावत होते, ते आता आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असतात हे पाहून आजवर घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे जाणवते."




कोरोना नंतर लॉकडाऊन संपल्यावर जेव्हा विद्यार्थी आमच्या समोर आले तेव्हा त्यांच्या वर्तनामध्ये लक्षणीय बदल झालेला जाणवतो. अभ्यास नकोसा वाटणे, मन स्थिर नसणे, इतरांना समजावून घेणे, समायोजन साधणे या गोष्टींचा अभाव दिसून येतो.


त्यामुळे शिक्षकांनाही विद्यार्थ्यांसाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. अगदी वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही पायाभूत संकल्पना समजावून सांगाव्या लागत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपली मुले नियमित शाळेत पाठवली व त्यांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष देऊन सहकार्य करावे ही आमची माफक अपेक्षा आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या संदर्भात मी पालकांना एवढेच सांगेल की आपल्या पाल्याच्या समस्या जाणून घ्या. यासाठी वेळ काढून मुख्याध्यापक - शिक्षक यांच्याशी चर्चा करा. व मुले आपल्या समस्या मोकळेपणाने सांगू शकतील असे कौटुंबिक वातावरण तयार करा.


"आपण आपल्या मुलांचे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून संगोपन करा व तुम्ही मुलांचे मालक नाही तर एक सुजाण पालक आहे ही भावना सदैव मनामध्ये ठेवा.यातून नक्कीच विद्यार्थ्यांच्या विकासास मदत मिळणार आहे. "




"शाळेमध्ये आज जेव्हा माजी विद्यार्थी आपले नातेवाईक, स्वतःच्या मुलांना आमच्या शाळेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांनी आमच्यावर पिढ्यान पिढ्या टाकलेल्या विश्वासाने मन कृतार्थ होते."


माझ्या या 22 वर्षांच्या कार्यकाळातील शाळेचा प्रगतीचा आलेख  सदैव चढता ठेवण्यात मला यश आले ते केवळ माझे सहकारी, पालक, संस्थेचे पदाधिकारी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच. यात शंकाच नाही.




शेवटी मी एवढेच सांगेल की  माझी शाळा, माझे विद्यार्थी, माझे सहकारी व माझे पालक या सर्वांचा मिळून जो एक सुंदर कौटुंबिक वटवृक्ष तयार झाला आहे तो सदैव बहरत ठेवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील. माझ्या सर्व महिला - भगिनी मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



लेखिका - पुण्यातील धनकवडी येथील प्रसिद्ध प्रशाला प्रियदर्शनी विद्यामंदिरच्या आदर्श मुख्याध्यापिका, आदर्श शिक्षिका राजश्री दिघे - निंगुणे.