Thursday, June 13, 2024

"१९ वर्षानंतर रंगला मैत्रीचा सुखद अनुभव देणारा, शिक्षक - गुरुजनांचा आशीर्वाद लाभलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा; वीर येथे 2005 मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा "हा" सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात संपन्न, देशसेवा करणाऱ्या "या" शिलेदार मित्रांचाही स्नेह मेळाव्यात ऑनलाइन सहभाग"...


पुरंदर,वीर,दि.१३ : भारतीय संस्कृतीत गुरु - शिष्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते श्रेष्ठ मानले जाते. शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थी व शिक्षकांसाठी खूप संस्मरणीय असतात.पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर येथे दहावीच्या 2005 मधील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह मेळावा उत्साहात व पुन्हा एकदा मैत्रीचा सुखद अनुभव देणाऱ्या आनंददायी वातावरणात संपन्न झाला.


"आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते."

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

ज्या शाळेत आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत.


रविवारी 9 जून रोजी  रविंद्रनाथ टागोर विद्यालय वीर  येथे २००४-२००५ मध्‍ये दहावीत असलेले माजी विद्यार्थी एकत्र येऊन, पुन्हा एकदा शाळा भरली. आणि शाळेतील त्या जुन्या आठवणींना, सोनेरी दिवसांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणींची खूप मोठया कालावधीनंतर भेट झाली. 


या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा भरवत, सर्व मुले-मुली वर्गामध्ये ओळीत दाखल झाले. सर्व शिक्षकांचे - गुरुजनांचे स्वागत, औक्षण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश समगीर आणि अश्विनी धसाडे यांनी केले तसेच प्रास्ताविक दिनेश जाधव यांनी केले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या विद्यालयाचे माजी विद्यार्थी ए.पी.आय.विकास शिंदे, महेश चवरे, महेश समीर, स्वप्नील वाघ, श्रीकांत वचकल,दिनेश जाधव, अश्विनी धसाडे, शितल वचकल,  यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते. 


अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनी या कार्यक्रमानिमित्त  १९ वर्षांनंतर एकमेकांना भेटले.त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपल्या शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.


शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ. बापुजी साळुंखे व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते होऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

आजमितीला हयात नसलेल्या मित्रांना व शिक्षकांना अत्यंत भावपुर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहून कार्यक्रम पुढे सुरु झाला.


"या माजी विद्यार्थी - शिक्षक स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांची प्रगतशील वाटचाल व भेट ही सर्वांसाठीच संस्मरणीय असेल. अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील" अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना धुमाळ सर, एन बी राऊत सर, गावडे सर, भोसले सर, पाटील सर, भिसे सर व भिसे मॅडम, धुमाळ मॅडम, शिंदे मॅडम, दुर्गाडे मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले. आजच्या सोशल मीडियाच्या, टेक्नॉलॉजीच्या जमान्यात 19 वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन या सोहळ्याच्या निमित्त एकमेकांना भेटून संवाद साधत होते.

प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, आपल्या शाळेचे बदललेले रूप व मनाला आनंद देणाऱ्या मित्रांच्या भेटी डोळ्यांमध्ये साठवून घेत होता.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक पी. एल कुंभार सर यांनीही शुभेच्छा दिल्या. रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या प्रशालेच्या प्रगतशील वाटचालीमध्ये कुंभार सर यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"देशाची सेवा करत असताना देखील आपल्या मित्रांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. देशासाठी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना देखील  दत्ता साळुंखे(फौजी), उमेश वचकल (SSB सशस्त्र सीमा बल जवान), योगेश कदम(फौजी) या देश सेवा करणाऱ्या शिलेदार मित्रांनी  ऑनलाईन या वीर येथील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याला हजेरी लावुन आपले मनोगत व्यक्त केले. यामुळे सर्व मित्र परिवाराला एक सुखद अनुभव मिळाला.


या शाळेच्या सर्व शिक्षकांनी या स्नेह मेळाव्याला उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन, भावी आयुष्यातील प्रगतशील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून, शुभेच्छा दिल्या.


या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी  शिक्षक वर्ग, विद्यालयाचा कर्मचारी वर्ग, या विद्यालयाचे कर्मचारी हिरामण जाधव आवर्जून उपस्थित होते. "आम्ही तुमच्यामुळेच घडलो हे भाव मनी जपत, आपोआप कित्येक जणांचे हात त्या गुरुजन वर्गाच्या पायापर्यंत जात होते, नतमस्तक होत होते. वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.


या कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षकांचा, मान्यवरांचा शाल, श्रीफळ , आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.  


या माजी विद्यार्थ्यां स्नेह मेळावा  कार्यक्रमासाठी सर्व विवाहित मुलींनी आपल्या घरातुन  दिलेला प्रतिसाद आणि त्यांची राहीलेली उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी होती. 

या कार्यक्रमानंतर सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला व शिक्षक - विद्यार्थी भेटीची भविष्यातील आठवण रहावी म्हणून रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर येथील प्रांगणामध्ये वृक्षारोपण करून एक चांगला सामाजिक उपक्रम राबविण्यात  आला.


यानंतर संगीत खुर्ची, रस्सीखेच यांसारखे मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले व हसत खेळत या कार्यक्रमाची सांगता झाली.


या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी रविंद्रनाथ टागोर विद्यालय वीर,श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर, वन परिक्षेत्र अधिकारी सासवड, अस्तित्व प्रतिष्ठान वीर यांचे  सहकार्य लाभले असे दिनेश जाधव यांनी सांगितले.


"१९ वर्षानंतर रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर येथे 1999-2005 बॅचचे  आमचे वर्गमित्र- मैत्रिणी हे  शिक्षकांसह  पुन्हा एकत्र आले आणि पुन्हा एकदा शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आमच्या सर्वांच्या जडणघडणीमध्ये शाळेचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.आम्ही पुन्हा  एकत्र येऊन आमच्या वीर गावच्या शाळेमध्ये अजून कसे चांगले गुणवत्तापूर्ण आणि वैविध्यपूर्ण शिक्षण मिळेल.यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहणार आहोत." अशी प्रतिक्रिया सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


आजच्या धकाधकीच्या, व्यस्त जीवनामध्ये 19 वर्षानंतर या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, वीर येथे स्नेह मेळावा आयोजित करून, सर्व गुरुजनांचे - शिक्षकांचे आशीर्वाद घेऊन, वृक्षारोपणाचा एक चांगला उपक्रम राबवून, समाजात एक चांगला संदेश दिला. निस्वार्थ, प्रेमळ मैत्रीतला आनंद हा सर्वांनाच ऊर्जा देणार असतो.


रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या प्रशालेने अनेक कर्तुत्ववान विद्यार्थी घडवलेले आहेत.

No comments:

Post a Comment