"33 वर्ष शेतकरीराजाची सेवा करणारे पुरंदरचे शेती उद्योग भांडार ते 26 वर्ष रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देणारे सासवडचे माधुरी मेडिकल ते व्यावसायात यशस्वी भरारी घेणारे सहा भावंडांचे आदर्श जगताप कुटुंब ते कोरोनाकाळात शेकडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणारे कोरोना योद्धे,ध्येयवादी फार्मासिस्ट, कार्यक्षम नगरसेवक,प्रेरणादायी शिलेदार नंदकुमार जगताप"
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाने पावन झालेली ही पुरंदरची महान भूमी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुरंदरची महान भूमी, श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या महान पराक्रमाचा वारसा जपणारी पुरंदरची ही महान भूमी. महान संत सोपानकाका, आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक, थोर समाजसुधारक महात्मा फुले, साहित्यिक,विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारी ही पुरंदरची महान भूमी.
ऐतिहासिक सासवड नगरीचे संस्थापक तीर्थस्वरूप हरजीराजे जगताप यांचे वंशज श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या महान पराक्रमाचा वारसा जोपासणारे श्री बंडोबा भाऊसाहेब जगताप यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून कार्यकाळ गाजवणारे श्री बंडोबा जगताप यांची तीनही मुले गंगाधरअण्णा जगताप, विठ्ठलराव जगताप व चंद्रकांत जगताप यांनी वडिलांचा सामाजिक वारसा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून चांगले कार्य करून समर्थपणे जोपासला.
पुरंदर तालुक्यातील शेतकरी वर्गात लोकप्रिय असणारे कै.गंगाधरअण्णा जगताप हे जगताप कुटुंबीयांचे आधारस्तंभ म्हणून अनेक वर्ष कुटुंबातील सर्व सदस्यांना शेती व व्यवसायासाठी खूप मोठा आधार देऊन, मार्गदर्शन करत होते. "तुम्ही प्रामाणिकपणे,सचोटीने, चिकाटीने व्यावसाय केला तर परमेश्वर तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही" अशी शिकवण गंगाधरअण्णांनी कुटुंबातील व्यवसाय करणाऱ्या सर्वच लोकांना दिलेली होती.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण पिढीने फक्त नोकरीच्या मागे न धावता नवनवीन व्यावसायामध्ये उतरून लोकांना चांगली सेवा देऊन, प्रगती करावी अशी शिकवण गंगाधरअण्णांनी जगताप कुटुंबातील तरुण पिढीला दिलेली होती. यामुळेच गंगाधर अण्णांचे चिरंजीव विलास काका जगताप व विजय जगताप यांनी 1991 ला गंगाधरअण्णांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणेतून सासवड येथे "शेती उद्योग भांडार" या शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देणाऱ्या नवीन व्यवसायाची जिद्दीने सुरुवात केली.
विलास काका जगताप यांचे 1987 ला पुणे विद्यापीठातून एमकॉम पूर्ण झाले होते. त्यानंतर 1988 ला बीपीएड झाले होते. त्या काळामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी या पदासाठी त्यांनी प्रयत्नही केला होता. परंतु तिथे काम न झाल्यामुळे त्यांनी गंगाधर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली कृषी,शेतकरी सेवा क्षेत्रात पदार्पण करायचं ठरवलं. 35000 च्या भांडवलापासून पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सुरू केलेला "शेती उद्योग भांडार" आज पुरंदर,भोर,बारामती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करून, प्रामाणिकपणे सेवा देत आहे.
शेती उद्योग भांडारच्या माध्यमातून आधुनिक शेतीसाठी आवश्यक सर्व बी- बियाणे, कीटकनाशके, तणनाशके, शेतीची अवजारे, कृषी सेवा, शेतकरी राजाच्या प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून अल्पावधीतच "शेती उद्योग भांडारने" पुरंदर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या हृदयात एक विश्वासाचे नातं निर्माण केलं.
"उत्तम व्यवहारे जोडोनिया धन या गंगाधर अण्णांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे विलास काका जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन करून, त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा दिली.
1991 ला पुरंदरमध्ये गणेश डाळिंब गंगाधरअण्णांच्या मार्गदर्शनाखाली शेती उद्योग भंडाराच्या माध्यमातून, पुरंदरमध्ये पहिल्यांदाच गणेश डाळिंबाची लागवड करून त्याचा प्रसार संपूर्ण तालुक्यामध्ये करण्यात यांचे खूप मोठे योगदान आहे. छत्तीसगडचा पेरू पुरंदर तालुक्यात पहिल्यांदा आणण्यामध्ये व त्याची लागवड करून तालुक्यात प्रसार करण्यामध्ये शेती उद्योग भांडारचे महत्वाचे योगदान आहे.
भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी आधुनिक शेती पाहण्यासाठी दौरे करणे तसेच पुरंदर तालुक्यातील शेतकरी वर्गाला कृषीविषयक कार्यशाळांच्या माध्यमातून आधुनिक शेतीसाठी हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे यामुळे शेती उद्योग भांडारने पुणे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा अल्पावधीतच विश्वास संपादन केला.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीताफळ, डाळिंब, सूर्यफूल, ढोबळी मिरची, जांभूळ, चिंच,पेरू,अंजीर यांचे उत्पादन करून त्यांना जगभर पोहोचवण्यामध्ये, उत्तम दर्जाचा शेतमाल जगभरात निर्यात करण्यासाठी शेती उद्योग भांडार प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
"शेतातील नवनव्या कोंबांचे उगमस्थान शेती उद्योग भांडार" हे ब्रीदवाक्य घेऊन शेती उद्योग भांडारने पुरंदर तालुक्यातील पाच हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे सेवा देऊन, तसेच कृषी शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन, कृषी शिबिरे,कार्यशाळा, शेतातील नवनवीन प्रयोग, प्रगतशील शेतकरी यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. पुरंदर तालुक्याचे मा. आमदार, कृषिराज्यमंत्री दादासाहेब जाधवराव व पुरंदरचे लोकप्रिय नेते, सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांचे गंगाधरअण्णा जगताप यांच्या कुटुंबियांना व्यावसायासाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.
गंगाधरअण्णा जगताप यांची दूरदृष्टी, मार्गदर्शन, प्रेरणा यामुळे या जगताप कुटुंबियातील सहा भावंडांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी भरारी घेतली.
एकत्र कुटुंबाची ताकद काय असते. व्यावसायात प्रगती करण्यासाठी सर्व भावंडांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर यशस्वी वाटचाल कशी होऊ शकते. हे गंगाधरअण्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जगताप कुटुंबातील सहा भावंडांनी व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी झेप घेऊन दाखवून दिले.
सहकार महर्षी, स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधरअण्णा जगताप यांनी सासवड येथील प्रसिद्ध काळभैरवनाथ मंदिराच्या जीर्णोदाराच्या कामात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे."गंगाधर अण्णांची दूरदृष्टी, मार्गदर्शन व प्रेरणा तसेच पुरंदरचे माजी आमदार,कृषिराज्यमंत्री दादासाहेब जाधवराव व पुरंदरचे सहकारमहर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळेच आम्हाला शेती उद्योग भांडारच्या माध्यमातून प्रगतशील वाटचाल करता आली." असे विलासकाका जगताप सांगतात.
गंगाधरअण्णा जगताप यांनी त्यांची दोन मुले व चार पुतणे असे जगताप कुटुंबातील सहा भावंडांना योग्य मार्गदर्शन करून, व्यावसायाची दूरदृष्टी देऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळण्यासाठी खूप मोठा आधार दिला.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदर तालुक्यात 26 वर्ष माधुरी मेडिकलच्या माध्यमातून हजारो लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणाऱ्या नंदकुमार जगताप यांचा जन्म ऐतिहासिक सासवडच्या भूमीत सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. नंदूबापु जगताप यांचे वडील विठ्ठल जगताप प्रगतशील शेतकरी आहेत तसेच ते पीएमटी बससेवेमध्ये कार्यरत होते तर त्यांच्या आई गृहिणी म्हणून घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांवरती चांगले संस्कार केले.
बालपणापासूनच नंदकुमार जगताप यांना त्यांच्या आई- वडिलांचे संस्कार व त्यांचे चुलते गंगाधरअण्णा जगताप यांचे मार्गदर्शन व संस्कारांची शिदोरी मिळाल्यामुळे भावी प्रगतशील वाटचालीमध्ये ही सर्व नीतीमूल्य दिशादर्शक ठरली. नंदकुमार जगताप यांचे शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून सासवडमध्येच झाले. गंगाधरअण्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जडणघडण झालेल्या नंदकुमार जगताप यांनी दहावीला विशेष प्राविण्य मिळवून, चांगले गुण मिळवून चमकदार कामगिरी केली.
लहान वयापासूनच व्यावसायिकतेचे धडे मिळत असल्यामुळे दहावीनंतर 1992 ला नंदकुमार जगताप यांनी सासवड येथे डिप्लोमा इन फार्मसीला, औषधनिर्माणशास्त्र पदविका कोर्स साठी सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसीला प्रवेश घेतला. नंदकुमार जगताप यांना दहावीला विशेष प्राविण्यसह चांगले गुण मिळून देखील, डिप्लोमा इन फार्मसीच्या प्रवेशासाठी डोनेशन मागितले होते. त्यामुळे प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. परंतु गंगाधरअण्णा जगताप व विलास काका जगताप यांच्या सहकार्यामुळे त्यांचा डी - फार्मसी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला.
"सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगले मार्क्स असून देखील अनेक महाविद्यालये डोनेशन घेतात यामुळे खरंच खूप खंत वाटते. गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येता कामा नये." असे नंदकुमार जगताप सांगतात. नंदकुमार जगताप सासवड मधील फार्मसी महाविद्यालयात दोन वर्ष शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध झाले.
सासवडमध्ये त्याकाळी पाण्याचा दुष्काळ होता त्यामुळे खूपच बिकट परिस्थिती होती. अशा परिस्थितीत देखील नंदकुमार जगताप यांनी त्यांच्या मित्रांना आधार देऊन, त्यांच्या शेतातून पाणी आणून त्यांची पाण्याची समस्या सोडवली. कॉलेजमध्ये बाहेर गावचे, बाहेरच्या जिल्ह्यातील भरपूर मुले असल्यामुळे त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये, पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तसेच कुठलीही जरी अडचण आली तरी नंदकुमार जगताप मित्रांना मदत करत होते.
तरुण पिढीमध्ये नंदकुमार जगताप लोकप्रिय असण्याचे कारण त्यांच्या कॉलेज जीवनातील जडणघडणीमध्ये दिसून येते. शिक्षण घेत असतानाच मित्रांच्या मदतीला धावून जाणे.
महाविद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे, कॉलेज संपले तरी बत्तीस वर्षानंतरही कॉलेजच्या सर्व मित्र परिवाराच्या संपर्कात राहून, त्यांच्या सुख दुःखामध्ये सामील होणे. यामुळेच नंदकुमार जगताप सर्व मित्र परिवारांमध्ये व तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.
सासवडमध्ये डी- फार्मचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1995 ला नंदकुमार जगताप यांनी पुण्यातील हडपसर येथील प्रसिद्ध रोहित मेडिकलमध्ये दोन वर्ष फार्मासिस्ट या पदावरती प्रामाणिकपणे काम करून अनुभव घेतला. डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स करणे आणि मेडिकल चालवणे यात खूप फरक असतो याची अनुभूती नंदकुमार जगताप यांना तिथे आली. नंदकुमार जगताप यांचे मेडिकल क्षेत्रातील गुरु विजय चंगेडिया यांनी त्या कालावधीमध्ये नंदकुमार जगताप यांना योग्य मार्गदर्शन करून, चांगला फार्मासिस्ट, (औषध विक्रेता) बनण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टींचे ज्ञान दिले.
"एक फार्मासिस्ट म्हणून, औषध विक्रेता म्हणून रुग्णांची सेवा कशी करायची? प्रामाणिक रुग्णसेवेतून फार्मासिस्टला कसे यश मिळते? मेडिकलचा व्यवसाय कसा करायचा? याचे धडे विजय चंगेडिया सरांनी खूप चांगल्या प्रकारे दिल्याने तसेच मेडिकल क्षेत्रातील सर्व अनमोल मार्गदर्शन त्यांनी दिल्यामुळे मला पुढच्या प्रवासात त्याचा खूप फायदा झाला." असे नंदकुमार जगताप सांगतात.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुण्यातील प्रसिद्ध मीरा मेडिकल येथे नंदकुमार जगताप फार्मासिस्ट म्हणून काम करत असताना मेडिकलमधील औषधांचा प्रत्येक कप्पा नी कप्पा साफ करून, प्रत्येक औषधाची वैद्यता, त्यातले घटक, त्याची किंमत या सगळ्या गोष्टी बघून त्यांचा अभ्यास करून रुग्णसेवा चालू होती."सुरुवातीला मेडिकलमधील प्रशिक्षण काळात औषधांचा प्रत्येक कप्पा नी कप्पा साफ करताना वाईट वाटले परंतु एक चांगला फार्मासिस्ट बनण्यासाठी या प्रशिक्षणाच्या काळात तुम्हाला मेडिकलमधील प्रत्येक कप्पा नी कप्पा साफ करून, संपूर्ण दुकान हाताखालून गेले पाहिजे, तिथे असलेली औषधे, त्या औषधातील घटक, कुठल्या औषधांची वैद्यता संपलेली आहे? सर्व औषधांच्या किमती, औषधांचे उपयोग या सर्वांची माहिती व्यवस्थित मिळते व या सर्व प्रक्रियेतून गेल्यामुळेच एका फार्मासिस्टची चांगली जडणघडण होते." असे नंदकुमार जगताप सांगतात.
पुण्यातील प्रसिद्ध मेडिकलमध्ये फार्मासिस्ट या पदावरती तीन-चार वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर नंदकुमार जगताप यांनी गंगाधरअण्णा जगताप यांच्या प्रेरणेने, सहकार्याने व मार्गदर्शनाखाली सासवड येथे 1998 ला माधुरी मेडिकलच्या माध्यमातून नवीन व्यावसायाची सुरुवात केली.
नंदकुमार जगताप यांचे चुलते व मार्गदर्शक गंगाधरअण्णा जगताप यांनी माधुरी मेडिकल सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांची भांडवलासाठी मदत व एक लाख रुपयाची फर्निचर साठी मदत त्याकाळी केली. नंदकुमार जगताप यांचे थोरले बंधू विजय जगताप यांनी त्याकाळी त्यांच्या स्वतःच्या मालकीचे दुकान(गाळा) माधुरी मेडिकल साठी उपलब्ध करून दिले हे योगदान ही खूप महत्त्वाचे आहे.
त्याकाळी जगताप कुटुंबासाठी आधारस्तंभ असणाऱ्या गंगाधरअण्णा जगताप यांनी त्यांच्या कुटुंबातील सर्वच मुलांना, पुतण्यांना व्यावसायासाठी मदत करून, मार्गदर्शन करून, कुटुंबाची एकजूटता व्यावसायिक प्रगतीसाठी किती महत्त्वाची आहे हे कृतीतून दाखवून दिले. ही खरंच सर्वांसाठीच प्रेरणादायी गोष्ट आहे.
1998 ला सासवड येथे माधुरी मेडिकलचे उद्घाटन त्याकाळातील पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध, नामांकित डॉक्टर वाघोलीकर, डॉक्टर रावळ, डॉक्टर खळदकर, डॉक्टर वसाळे, डॉक्टर खाडे यांच्या हस्ते झाले.तसेच नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांच्या उपस्थितीत, आनंददायी वातावरणात हा माधुरी मेडिकलचा उद्घाटन सोहळा पार पडला. सासवड शहरात त्याकाळी आठ मेडिकल्स होते. सासवड मधील जगताप परिवारांमधील माधुरी मेडिकल हे नंदकुमार जगताप यांनी सुरू केलेले त्याकाळचे पहिले मेडिकल होते.
व्यवसाय काय असतो? व्यवसाय कसा करायचा? व्यवसायातला प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा? याचे धडे गंगाधरअण्णा जगताप यांनी नंदकुमार जगताप यांना दिल्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे, सचोटीने, माधुरी मेडिकलच्या माध्यमातून सासवडमध्ये, पुरंदर तालुक्यातील रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करण्यास सुरुवात केली. त्याकाळी माधुरी मेडिकलच्या परिसरात कोणतेही मोठे हॉस्पिटल नसताना देखील, माधुरी मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडे फक्त ग्राहक म्हणून न पाहता, आपल्या कुटुंबातील व्यक्ती,सदस्य म्हणून, प्रामाणिकपणे रुग्णसेवा करण्याच्या, योग्य मार्गदर्शन करण्याच्या नंदकुमार जगताप यांच्या कार्यशैलीमुळे, स्वभावामुळे अल्पावधीतच माधुरी मेडिकल सासवड मधील लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले.
गंगाधर अण्णा जगताप यांचे माधुरी मेडिकलमध्ये विशेष लक्ष असायचे. जगताप कुटुंबियांचा आधारस्तंभ असणाऱ्या गंगाधरअण्णा जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे, सहकार्यामुळे माधुरी मेडिकलची प्रगतशील वाटचाल सुकर झाली.
गंगाधरअण्णा जगताप यांचा जनसंपर्क व मार्गदर्शन, शेती उद्योग भंडाराचे विश्वासू ग्राहक, जगताप कुटुंबाची एकजूटता, सर्व भावंडांचे सहकार्य व नंदकुमार जगताप यांची प्रामाणिक कार्यशैली,जिद्द,चिकाटी यामुळे माधुरी मेडिकल अल्पावधीतच संपूर्ण पुरंदर तालुक्यात हजारो लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले. सासवड शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सात-आठ वर्ष नंदकुमार जगताप यांनी खूप प्रभावशाली काम केलेले आहे. औषध विक्रेत्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून तसेच औषध विक्रेत्यांना सर्व प्रकारचा पाठिंबा, अडचणीच्या काळात मदत करून नंदकुमार जगताप यांनी औषध विक्रेत्यांच्या संघटनेच्या कार्यामध्ये देखील आपला ठसा उमटवलेला आहे.
ऑनलाइन फार्मसी तसेच भरमसाठ सवलती देऊन औषध विक्री करणाऱ्या मोठ्या कंपन्या यांच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध, सामान्य औषध विक्रेत्यांच्या हिताच्या दृष्टीने नंदकुमार जगताप यांनी पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून तसेच सासवड शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार जगताप यांनी सामान्य औषध विक्रेत्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक वेळा आवाज उठवलेला आहे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून जी चुकीच्या पद्धतीने औषध विक्री केली जाते त्याचे खूप भयानक दुष्परिणाम आहेत. ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून काही रुग्णांना बनावट औषध विक्री केली जाऊन त्यांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम झालेल्या घटना घडलेल्या आहेत. यामुळेच ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेळा मेडिकल व्यवसायीकांनी तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून भारत बंद करून या गंभीर समस्येवरती लक्ष वेधायला लावून, सरकारला कडक कारवाई करण्यास भाग पाडले.
रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांची माहिती ही डॉक्टरांना व औषध विक्री करणाऱ्या फार्मासिस्टला खूप चांगली अवगत असते. फार्मासिस्ट (औषध विक्रेता) त्या रुग्णाला, त्या आजारावरील औषध कशा पद्धतीने घ्यायचे, या औषधांचा नक्की उपयोग काय? परिणाम काय? औषधे घेताना काय काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती देत असतो. औषध विक्रेता ज्या प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करतो,मार्गदर्शन करतो तसे ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून घडताना दिसत नाही." असे नंदकुमार जगताप सांगतात.
"ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून गर्भपाताच्या गोळ्याही कुठल्याही निर्बंधाविना विक्री केल्यामुळे याचा समाजात खूप गंभीर परिणाम झालेला आहे. या गंभीर विषयासंदर्भातही ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून कडक भूमिका घेऊन सरकारला बेकायदेशीर औषध विक्री व्यवस्थे विरोधात कारवाई करायला भाग पाडले आहे. ऑनलाइन औषध विक्रीमध्ये आता कडक निर्बंध आणले गेलेले आहेत. यासाठी आमच्या औषध विक्रेता संघटनेच्या कार्याचे खूप मोठे योगदान आहे" असे नंदकुमार जगताप सांगतात.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदर तालुक्यातील हजारो कुटुंबांना नंदकुमार जगताप यांनी माधुरी मेडिकलच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सेवा दिलेली आहे. औषधे कशी घ्यायची इथपासून ते गंभीर आजार रुग्णांना होऊ नये तसेच आजारातून लवकर मुक्त होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? याची माहिती देऊन निरोगी स्वास्थ्य कशाप्रकारे जपले पाहिजे? याचे मार्गदर्शन नंदकुमार जगताप सर्व रुग्णांना करतात. यामुळेच पुरंदर तालुक्यात माधुरी मेडिकलने 26 वर्ष रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देऊन, हजारो लोकांच्या हृदयात विश्वासाचे व आदराचे स्थान निर्माण केलेले आहे.
"सासवड शहरात तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारे नंदकुमार जगताप कधी "आपल्या हक्काचा माणूस नंदूबापू" म्हणून प्रसिद्ध झाले झाले हे कळले सुद्धा नाही. सासवड शहर, पुरंदर तालुका, पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण पिढी नंदकुमार जगताप यांच्या ध्येयवादी विचारांशी आणि सामाजिक कार्याशी जोडली गेलेली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाचे गंभीर प्रश्न,आरक्षणाचा प्रश्न, गोरगरीब तरुणांचे गंभीर प्रश्न पोटतिडकेने व अभ्यासपूर्ण मांडणारा प्रामाणिक,सच्चा कार्यकर्ता म्हणून नंदकुमार जगताप यांची ओळख फक्त पुणे जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा चळवळीतील तरुणांपर्यंत पोहोचली."
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नासाठी जेवढी - जेवढी आंदोलने झाली पुरंदर तालुक्यात, सासवड शहरात तसेच पुणे जिल्ह्यात त्या प्रत्येक आंदोलनामध्ये नंदकुमार जगताप यांनी समाजाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांचे प्रामाणिक योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गरीब मराठा तरुणाईला न्याय मिळण्यासाठी कितीही आंदोलने करावी लागली, कितीही वेळा लढा द्यावा लागला तरी या लढ्यात निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे सहभागी होऊन न्याय मिळण्यासाठी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे काम करणे ही नंदकुमार जगताप यांचे खासियत तरुण पिढीला भिडते.
अठरापगड जातीतील सर्व तरुणांना कुठल्याही गंभीर प्रश्नासाठी तसेच मोठ्या अडचणीच्या वेळेस मदत करण्यासाठी नंदकुमार जगताप नेहमीच निस्वार्थ वृत्तीने धावून येत असतात. सासवड शहरातील तसेच पुरंदर तालुक्यातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये नंदकुमार जगताप यांचा सक्रिय सहभाग असतो.
महागाई, बेरोजगारी तसेच जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठीच्या आंदोलनातही नंदकुमार जगताप यांचा सक्रिय सहभाग असतो तसेच लोकांच्या हिताच्या विषयासाठी ते आपली परखड भूमिका मांडतात.
नंदकुमार जगताप यांचे प्रामाणिक सामाजिक कार्य तसेच समाजातील सर्व घटकांशी असणारा संपर्क, समाजातील वेगवेगळ्या घटकांना प्रामाणिक मदत करण्याची भावना यामुळेच कोरोना काळात 2020 ला नंदकुमार जगताप यांना सासवड नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळाली.
पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी नंदकुमार जगताप यांच्यामधील निस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, अभ्यासू, ध्येयवादी कार्यकर्ता, समाजासाठी तळमळीने कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता पाहून नंदकुमार जगताप यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देऊन सासवड मधील नागरिकांची सेवा करायची संधी दिली.
कोरोना काळात संपूर्ण जग बंद असताना फार्मासिस्ट, औषध विक्रेत्यांनी जी हजारो - लाखो रुग्णांची प्रामाणिक सेवा केली ते योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. नंदकुमार जगताप यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकाळात कोरोनाचा महाभयंकर काळ चालू असताना पुणे जिल्ह्यातील शेकडो - हजारो रुग्णांना हॉस्पिटलला कोरोनावरील उपचारांसाठी भरती करणे, ऑक्सीजन बेड मिळवुन देणे, कोविड सेंटरमध्ये बेड मिळवुन देणे, रुग्णांना धीर देऊन, आधार देऊन औषध पुरवठा करून हॉस्पिटलला भरती करणे यासाठी प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने, खूप मोठे काम केलेले आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
कोरोनाच्या भयंकर काळात पुरंदर तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल्स, सरकारी दवाखाने तसेच कोविड सेंटरला औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा औषध निरीक्षक व आमदार संजय जगताप यांच्या टीममध्ये नंदकुमार जगताप यांनीही महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.
"कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शन तसेच इतर अनेक औषधांचा तुटवडा असताना, पुरंदर तालुक्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा औषध निरीक्षक व पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्याबरोबर पुरंदर तालुक्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल, सरकारी दवाखाने व कोविड सेंटरला सुरळीतपणे औषध पुरवठा करण्याच्या कामामध्ये तसेच ऑक्सिजन सिलेंडरचा हॉस्पिटल्स व कोविड सेंटर्सना सुरळीतपणे पुरवठा होण्याच्या कामांमध्ये मला मदत करता आली याचे खूप समाधान आहे. कोविड खूप दृष्ट होता, वाईट होता परंतु प्रामाणिक रुग्ण सेवा करणे हे आमचे व्रत असल्यामुळे कधीच मला मृत्यूची भीती वाटली नाही." असे नंदकुमार जगताप सांगतात.
"छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा पाठीशी असल्यामुळे कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णसेवा करताना कधीच भीती वाटली नाही. समाजातील विविध घटकांची सेवा करण्याची संधी मला या कोरोनाकाळात मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो." असे नंदकुमार जगताप सांगतात.
कोरोनाच्या महाभयंकर लाटेत नंदकुमार जगताप यांनी कोवीड योद्धा म्हणून केलेले प्रामाणिक, सेवाभावी वृत्तीने केलेले रुग्णसेवेचे कार्य पुरंदर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील शेकडो - हजारो रुग्ण कधीच विसरू शकणार नाही. कोरोना काळात शेकडो - हजारो लोकांचा मृत्यू झालेला काळ फार भयानक होता. अशा काळात नंदकुमार जगताप पुणे जिल्ह्यातील,पुरंदर तालुक्यातील, सासवड शहरातील कोरोना रुग्णांना धीर देऊन, आधार देऊन त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करणे, सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करणे तसेच कोविड सेंटरला जाऊन भरती करणे, कोविड सेंटरला स्वतः जाऊन औषधांचा पुरवठा करणे हे जिकीरीचे काम सर्व प्रकारचा धोका पत्करून, प्रामाणिकपणे व आपली सर्व माणसं लवकरात लवकर बरी झाली पाहिजेत या भावनेने त्यांनी मनापासून कार्य केले.
नंदकुमार जगताप यांच्या मित्र परिवारातील एका मित्राच्या वडिलांना कोरोना झाल्यानंतर नंदकुमार जगताप यांनी सासवड येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या त्यांची पुतणी डॉक्टर माधुरी जगताप यांच्या सहकार्याने बेडची व्यवस्था केली. परंतु ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे त्यावेळेस नंदकुमार जगताप यांनी आमदार संजय जगताप यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करून, पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मित्राच्या वडिलांना कोरोना उपचारासाठी बेड मिळवून दिला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मित्राची कोरोना चाचणी केल्यानंतर तेही कोरोना पॉझिटिव्ह आले तसेच त्यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, त्यांची मुले कोरोना चाचणी केल्यानंतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे ते कुटुंब प्रचंड घाबरले होते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
खूप भयभीत झाले होते अशा परिस्थितीत नंदकुमार जगताप यांनी त्यांच्या मित्राच्या संपूर्ण परिवाराला आधार देऊन,धीर देऊन त्यांच्या मित्राला पुन्हा पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले व त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सासवडमधील हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारांसाठी भरती केले. काही दिवसानंतर सासवड येथील कोविड सेंटर मध्ये सर्व लोकांना भरती करून ते कुटुंब पूर्णपणे कोरोना मुक्त झाले. या महाभयंकर संकटाच्या काळातही लोकांचा जीव वाचवण्यासाठीचा ध्यास,त्यासाठी केलेली प्रामाणिक रुग्णसेवा कुठलेच कुटुंब आयुष्यभर विसरत नसते. अशा प्रकारच्या शेकडो कुटुंबांना नंदकुमार जगताप यांनी कोरोना काळात प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने मदत केलेली आहे.
"कोरोनाच्या महाभयंकर लाटेत संपूर्ण जग बंद असताना फार्मासिस्ट, (औषध विक्रेता) यांनी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे रुग्णसेवा करून अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावलेले आहे. डॉक्टर,आरोग्य कर्मचारी यांचे योगदान हे महत्त्वाचे आहेच परंतु फार्मासिस्टला, (औषध विक्रेत्याला) कोरोना रुग्ण आल्यानंतर त्याला सामोरे जाऊन, त्याच्याशी संवाद साधून, त्याला धीर देऊन त्याला योग्य औषध देऊन, पुढच्या उपचारासाठी मार्गदर्शन करणे व मदत करणे हे आव्हानात्मक काम देशातील सर्वच फार्मासिस्ट समूहाने प्रामाणिकपणे केलेले आहे. कोरोना काळातील फार्मासिस्टचा संघर्ष दुर्लक्षित राहिला असला तरी फार्मसिस्टचे या काळातील योगदान खूप महत्त्वाचे होते." असे नंदकुमार जगताप सांगतात.
कोरोना काळात काही रुग्ण तर नंदकुमार जगताप कोविड सेंटरला भरती करायला स्वतः येत असतील तरच कोविड सेंटरला उपचार घेण्यासाठी भरती होतो असे सांगत होते. अशा रुग्णांनाही नंदकुमार जगताप यांनी प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने सेवा दिलेली आहे.
कोरोना रुग्णांच्या घरचे नातेवाईक कोविड सेंटरला घरातील रुग्णाला घेऊन जायला घाबरायचे परंतु नंदकुमार जगताप सर्वच कोविड रुग्णांना कोविड सेंटरमध्ये निर्भीडपणे घेऊन जाऊन, तिथे कोरोना उपचारांसाठी त्या रुग्णांना भरती करून, त्यांना लागणारा औषध पुरवठा, त्यांना लागणारे जेवणाचे डबे तसेच सर्व प्रकारची मदत माणुसकीच्या भावनेने करायचे.
कोरोना काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी, पांढरपेशावर्ग, श्रीमंत वर्ग, अनेक लोकप्रतिनिधी,राजकीय नेते कोरोनाची भीती मनात घेऊन घरी बसलेले असताना नंदकुमार जगताप यांच्यासारखे कार्यक्षम नगरसेवक शेकडो - हजारो कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी रस्त्यावरती उतरून निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने मदत करत होते, लोकांचा जीव वाचवत होते. हे कोरोना काळातील त्यांचे माणुसकीच्या भावनेने केलेले महत्वपूर्ण योगदान कोणही विसरू शकणार नाही.
2005 ला सासवडच्या ऐतिहासिक भूमीत स्वर्गीय सहकारमहर्षी चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, जगताप परिवारातील ज्येष्ठ मंडळी व तरुण मंडळी यांच्या प्रयत्नातून महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे प्रतिष्ठानचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभरात मोठे होण्यासाठी जगताप परिवारातील अनेक शिलेदारांचे त्यात योगदान आहे. त्यामध्ये नंदकुमार जगताप यांनीही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगताप परिवारातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांना एकत्र जोडून, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे.
या प्रतिष्ठानतर्फे वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य शिबिरे तसेच कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत.
(महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांचा कोल्हापूर येथे तयार करून घेतलेला पुतळा)
स्वराज्याच्या ऐतिहासिक पहिल्या लढाईत सरदार गोदाजीराजे जगताप यांनी आदिलशाही सरदार मुसेखानाचा वध (खंद्यापासून कमरेपर्यंत उभा चिरला) करून या लढाईत महापराक्रम केला होता, या विजयी दिनाची आठवण म्हणून महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सासवड येथे शौर्य दिन साजरा केला जातो.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच संपूर्ण भारतभरातील व जगभरातील जगताप परिवारातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तिमत्व डॉक्टर, फार्मासिस्ट, इंजिनीयर, मॅनेजर, प्रगतशील शेतकरी, प्रगतशील उद्योजक,पत्रकार, आमदार,खासदार, मंत्री, शास्त्रज्ञ,कलाकार, खेळाडू यासारखी वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व कर्तुत्वान व्यक्तिमत्व या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र आणून, समाज हिताचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून करत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुरंदर तालुका सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे सासवडच्या ऐतिहासिक भूमीतील, शिवतीर्थावर सलग शंभर दिवस झालेले मराठा समाजाचे ऐतिहासिक ठिय्या आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. या ऐतिहासिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही नंदकुमार जगताप यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून हे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी त्यांच्या सहकारी बांधवांच्या बरोबरीने महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. पुरंदरच्या या ऐतिहासिक आंदोलनाने मराठा आरक्षणाची ज्योत पेटती ठेवली व संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला एक चांगली दिशा दिली. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पुरंदरच्या या ऐतिहासिक आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा देऊन, कौतुक केलेले आहे.
"महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजातील लाखो - करोडो तरुणांना न्याय मिळण्यासाठी शिक्षणात व नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळणे खूप गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने प्रामाणिक नेता मिळालेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे मराठा आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रातील करोडोच्या संख्येने असणारा मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी अनेक वर्षांपासून लढणारे सर्वसामान्य लाखो मराठा कार्यकर्ते, एकजुटीने मराठा आरक्षणाची ही लढाई नक्कीच जिंकतील." असे नंदकुमार जगताप सांगतात.
सासवड नगरपालिकेच्या शाळेतील मुलांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी नंदकुमार जगताप यांनी स्वखर्चाने वॉटर फिल्टरही शाळांना भेटवस्तू म्हणून दिलेले आहेत. गणेश विसर्जन काळातील नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून राबवलेल्या मूर्तीदान उपक्रमातही नंदकुमार जगताप यांनी गणेश मंडळांचे प्रबोधन करून, उत्साहाने सहभाग नोंदवलेला आहे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदर तालुक्याचा दुष्काळी भाग मागील अनेक वर्षांपासून पाण्याच्या टंचाईच्या समस्येशी झगडत आहे. जगताप कुटुंबियांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ गंगाधरअण्णा जगताप 2004 सालापासून पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चातून टँकरद्वारे पिण्याचे पाणी लोकांची तहान भागवण्यासाठी देऊन, सत्कार्य करत आहेत. 2004 साली गंगाधरअण्णा जगताप यांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील एखतपुर, मुंजवडी या गावात दोन - तीन महिने रोज पिण्याच्या पाण्याचे टँकर देऊन त्या गावातील लोकांची तहान भागवण्यासाठी, माणुसकीच्या भावनेतून, प्रयत्न केलेले आहेत. शेती उद्योग भंडारचे संचालक विलासकाका जगताप यांनी हा सामाजिक वारसा जपलेला आहे. विलास काका जगताप यांनी 2024 च्या या दुष्काळी परिस्थितीत पुरंदर तालुक्यातील पिंपळे व सोनवडी या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केलेला आहे.
आपण ज्या समाजात लहानाचे मोठे होतो, प्रगती करतो, त्या समाजाच्या प्रति आपली प्रामाणिक जबाबदारी म्हणून समाजासाठी चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही गंगाधर अण्णांची शिकवण जगताप कुटुंबियातील प्रत्येक सदस्याने कृतीतून दाखवलेली आहे. नंदकुमार जगताप सासवडमध्ये माधुरी मेडिकलच्या माध्यमातून 26 वर्ष व्यावसायिक जबाबदारी पार पडत असताना सामाजिक उपक्रमातही मोलाची भूमिका बजावण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात.
नंदकुमार जगताप यांनी 2023 ला रुग्णांना चांगल्या प्रकारच्या, दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सासवड येथे माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटर चालू केले. माधुरी मेडिकलच्या माध्यमातून पंचवीस वर्ष नंदकुमार जगताप यांनी पुरंदरमधील हजारो रुग्णांची प्रामाणिक सेवा केलेली आहेच परंतु रुग्णांना गंभीर आजार झाल्यानंतर त्यांच्या तपासण्या व निदान खूप महत्त्वाचं असतं यामुळेच अपोलो सारखा देशातील प्रख्यात ब्रँड त्यांनी सासवड येथे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आणला ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.
माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरला दर्जेदार आरोग्यसेवा, अचूक तपासणी, अचूक निदान यामुळे पुरंदर तालुक्यातील हजारो रुग्णांनी अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद दिला.
नंदकुमार जगताप यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील हजारो रुग्णांनी, माधुरी डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून, आरोग्य शिबिरातून मोफत आरोग्य तपासणी करून लाभ घेतलेला आहे. माधुरी डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून रुग्णांच्या घरी जाऊन ही रक्ताचे सॅम्पल आरोग्य तपासणीसाठी घेतले जाते. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवारी माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सवलतीच्या दरात रुग्णांची आरोग्य तपासणी केली जाते.
पॅथॉलॉजी लॅब ही नंदकुमार जगताप यांनी फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून न चालवता सामाजिक दृष्टिकोनातूनही हजारो रुग्णांना वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी करून निरोगी आरोग्यासाठी प्रेरित केलेले आहे. माधुरी मेडिकल, माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सेवा घेणाऱ्या हजारो रुग्णांसाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल, सवलतीच्या दरात रुग्णांची आरोग्य तपासणी कशी करता येईल. रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी जास्तीत जास्त कशी उत्तम सेवा देता येईल? यासाठी नंदकुमार जगताप नेहमीच धडपडत असतात. प्रत्येक रुग्णाला आपल्या कुटुंबातील सदस्य मानून त्याची प्रामाणिकपणे, माणुसकीच्या भावनेतून सेवा करण्याचा प्रयत्न नंदकुमार जगताप करत असतात.
"पुण्यातील दर्जेदार आरोग्य सेवा, आरोग्य सुविधा, माझ्या पुरंदर तालुक्यात, माझ्या सासवडमध्ये आमच्या हजारो रुग्णांना देण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातूनही अजून खूप मोठे काम करायचे आहे. आमच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या हजारो रुग्णांना एकाच ठिकाणी दर्जेदार आरोग्यसेवा, दर्जेदार औषधे, दर्जेदार आरोग्य तपासणी, योग्य निदान व योग्य उपचारांसाठी भविष्यामध्ये काम करणार आहे" असे नंदकुमार जगताप सांगतात.
शेतकरी राजाची सेवा करणे हे जगताप कुटुंबियांचे व्रत असल्यामुळेच नंदकुमार जगताप यांनी 2023 ला माधुरी डिस्ट्रीब्युटर्स या नावाने पशुऔषधालय चालू केले. पुरंदर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना स्वस्त दरात जनावरांची औषधे मिळावीत या उद्देशाने चालू केलेल्या माधुरी डिस्ट्रीब्युटर्सलाही हजारो शेतकऱ्यांनी अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद दिला. माधुरी मेडिकलच्या माध्यमातून मोफत घरपोच दर्जेदार औषधे देण्याच्या सेवेमुळे माधुरी डिस्ट्रीब्युटर्सलाही पुरंदर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नोकरीच्या मागे धावणाऱ्या मराठी तरुणांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून व्यावसायिक प्रगती कशी केली पाहिजे? हे नंदकुमार जगताप यांनी त्यांच्या व्यावसायाच्या प्रगतशील वाटचालीतून सर्वांनाच दाखवून दिलेले आहे. पुरंदर तालुक्यात तरुण पिढीमध्ये लोकप्रिय असणारे नंदूबापू जगताप त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तरुणाला अडचणीच्या काळात मदत करतातच परंतु वेगवेगळ्या व्यावसायामध्ये यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे? हा देखील सल्ला, मार्गदर्शन खूप आत्मीयतेने आणि आपुलकीने करत असतात.
"आजच्या काळात मराठी तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी भरपूर संधी आहेत. कृषी प्रक्रिया, कृषी पर्यटन, हॉटेल, दर्जेदार कृषी मालाची निर्यात यासारखी अनेक क्षेत्र तरुणांसाठी काम करण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रामाणिकपणा, सचोटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठल्याही क्षेत्रात तरुण मोठे ध्येय ठेवून, योग्य मार्गाने प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतो." असे नंदकुमार जगताप सांगतात.
"कोरोना काळात शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मला काम करण्याची संधी मिळाली. यामुळे मला एक फार्मासिस्ट, एक औषध विक्रेता म्हणून खूप अभिमान आहे. रुग्णांना दर्जेदार व प्रामाणिक सेवा देण्याचा जो आनंद आहे तो अनमोल आहे." असे नंदकुमार जगताप सांगतात.
ऐतिहासिक सासवड भूमीत जन्म झाल्याचा नंदकुमार जगताप यांना फक्त अभिमानच नाहीतर पुरंदरचा, सासवडचा ऐतिहासिक वारसा जपत सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी यशस्वी भरारी घेतलेली आहे."केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड शहर देशात नंबर वन आलेले आहे याचा आम्हाला सासवडकर म्हणून खूप अभिमान आहे. यासाठी सासवडचे सर्व नागरिक, सासवड नगरपरिषद व पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असते.पालखी ज्यावेळेस सासवड मधून पंढरपूरला जाण्यासाठी निघते त्यानंतर चार तासात संपूर्ण सासवड शहर स्वच्छ झालेले असते." असे नंदकुमार जगताप सांगतात.
सासवड शहराबद्दलचे प्रेम, आपुलकी,ओढ व इतिहास, वारसा जपणारे नंदकुमार जगताप वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून सासवडची संस्कृती जगत असतात. पुरंदर तालुक्याचे लोकनेते सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी चंदुकाका जगताप यांचे सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रभावशाली कार्य तसेच सहकार क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील लोकहिताचे केलेले प्रभावशाली कार्य देखील नंदकुमार जगताप यांच्या मनाला खूप भिडते व प्रेरणा देते."लोकनेते, सहकारमहर्षी चंदुकाका जगताप यांचे मार्गदर्शन सासवड मधील सर्व तरुण पिढीला असायचे. माझ्या सामाजिक व व्यावसायिक वाटचालीमध्ये काकांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले हे माझे भाग्य आहे. पुरंदर तालुक्यातील आपल्या माणसांनी कष्ट, मेहनत करून खूप प्रगती करावी. यासाठी काकांचा नेहमीच पाठिंबा व मार्गदर्शन सर्वांनाच असते." असे नंदकुमार जगताप सांगतात.
"पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांचा देखील तरुण पिढीला सामाजिक उपक्रमांसाठी तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी खूप पाठिंबा व मार्गदर्शन असते. आपल्या हक्काचा माणूस आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे ही भावना खूप ऊर्जा देते." असे नंदकुमार जगताप सांगतात.
माधुरी मेडिकल, माधुरी डिस्ट्रीब्युटर्स, माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटर यांच्या माध्यमातून नंदकुमार जगताप हजारो रुग्णांना सेवा देत असताना त्यांचा उत्तम कर्मचारी वर्ग ही महत्वपूर्ण कामगिरी बजावत असतो. या कर्मचारी वर्गाला शिस्त, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा व रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे यासाठी नंदकुमार जगताप नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत फार्मासिस्टचे,औषध विक्रेत्यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. बऱ्याच वेळा अनेक रुग्ण डॉक्टरकडे जाण्याऐवजी, विश्वासू मेडिकलमध्ये जाऊन त्यांच्या आजारांवरचे औषध घेत असतात. परंतु मागील 26 वर्षांपासून माधुरी मेडिकलचे माध्यमातून हजारो रुग्णांना प्रामाणिक सेवा देणारे नंदकुमार जगताप हजारो रुग्णांना चांगल्या डॉक्टरांकडून चांगले उपचार मिळण्यासाठी तसेच त्यांना दर्जेदार औषधे देऊन रुग्ण लवकर बरा होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात.
जगताप कुटुंबियांचे आधारस्तंभ असणाऱ्या गंगाधरअण्णा जगताप यांनी 2007 ला कुटुंबातील संपत्तीची समान वाटणी केली. परंतु त्या अगोदर या जगताप कुटुंबातील सर्व सहा भावंडांना आर्थिक सक्षम करून, त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करून,मोठा पाठिंबा देऊन, योग्य मार्गदर्शन केले.
2008 ला जगताप कुटुंबातील विजय जगताप यांनी जेजुरी येथे शेती उद्योग भांडार शेतकऱ्यांच्या सेवेसाठी चालू केले. सासवड येथील शेती उद्योग भांडारचा एक मोठा वारसा आणि अनुभव असल्यामुळे या जेजुरीतील शेती उद्योग भांडारलाही अल्पावधीतच शेतकरी वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विजय जगताप यांनी आई-वडिलांच्या नावाने शिक्षण संस्था स्थापन करून, सुशील गंगा या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जेजुरी येथे शिक्षण क्षेत्रात खूप चांगले पाऊल टाकलेले आहे. या शिक्षण संस्थेला जेजुरी शहरातून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विजय जगताप यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत. डॉक्टर माधुरी जगताप एमएस इन सर्जन (MS - Surgon)आहेत. डॉक्टर मनाली जॉर्जिया येथे एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
या ध्येयवादी जगताप कुटुंबातील कृष्णा जगताप व सचिन जगताप यांनी 2011 ला सुरू केलेल्या श्री सद्गुरु सीड्स या व्यवसायालाही शेतकरी वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आधुनिक बी - बियाणे, औषधे, कीटकनाशके व शेतकरी वर्गाची प्रामाणिक सेवा यामुळे श्री सद्गुरु सीड्स या ब्रॅंडने अल्पावधीतच पुणे शहर व जिल्ह्यात चांगला नावलौकिक मिळवला.
कृषी क्षेत्रातील 35 मोठ्या कंपन्यांचे जिल्हा पातळीवरचे श्री सद्गुरु सीड्स वितरक आहेत. 2020 ला पुण्यातील फुरसुंगीला मोठे गोडाऊन घेऊन तेथूनच संपूर्ण महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील बी - बियाणे,औषधे, कीटकनाशके होलसेल माल वितरित होत असतो.
या ध्येयवादी जगताप कुटुंबातील रोशन जगताप यांनी सासवड येथे आपल्या शेतात,पुरंदर तालुक्यातील ग्राहकांच्या व खवय्यांच्या सेवेसाठी हॉटेल आस्वाद चालू केलेले आहे .
या हॉटेल आस्वादलाही चविष्ट व स्वादिष्ट भोजनामुळे तसेच ग्राहकांना दिलेल्या उत्तम सेवेमुळे अल्पावधीतच सासवड शहर व पुरंदर तालुक्यातील ग्राहकांची पसंती मिळाली.
या ध्येयवादी जगताप कुटुंबातील सहा भावंडांना त्यांच्या आवडीच्या व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गंगाधरअण्णा जगताप यांचे सहकार्य व मार्गदर्शन खूप महत्त्वाचे होते. कुठल्याही कुटुंबाचा एक मोठा आधारस्तंभ येणाऱ्या सर्व प्रगतशील पिढ्या घडवत असतो.
कुठल्याही व्यावसायात प्रगती साधण्यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याची व मदतीची खूप आवश्यकता असते. नंदकुमार जगताप यांनी 1998 ला सुरू केलेले माधुरी मेडिकल मागील 26 वर्षांमध्ये हजारो रुग्णांना दिलेल्या प्रामाणिक व दर्जेदार आरोग्य सेवेमुळे, पुरंदर तालुक्यातच नाही तर पुणे जिल्ह्यात एक ब्रँड झालेले आहे. या माधुरी मेडिकलच्या प्रगतशील वाटचालीमध्ये नंदकुमार जगताप यांच्या पत्नी उर्मिला जगताप यांचेही खूप महत्त्वाचे योगदान आहे. उर्मिला जगताप यांनी फार्मसीचे उच्च शिक्षण घेतल्यामुळे, माधुरी मेडिकलच्या व्यवस्थापनात नंदकुमार जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून त्या साथ देत आहेत. नंदकुमार जगताप वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये व्यस्त असताना उर्मिला जगताप माधुरी मेडिकल खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात.
गंगाधर अण्णा जगताप यांनी त्या काळात त्यांच्या सुनेला मेडिकलच्या व्यावसायिक क्षेत्रात काम करण्यासाठी पाठिंबा व प्रेरणा दिली. त्या संधीचे उर्मिला जगताप यांनी सोने करून दाखवले.
नंदकुमार जगताप यांची मुलगी अनुजा जगताप फॅशन डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. अनुजा जगताप या लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट या क्षेत्रातील उच्च शिक्षण इटलीमध्ये घेत आहे तसेच मुलगा अर्जुन जगताप शिक्षण घेत आहे.
आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टर, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे."सरकारी हॉस्पिटल्स, सरकारी दवाखाने, वेगवेगळ्या सरकारी संस्था येथे उच्चशिक्षित फार्मासिस्टची नेमणूक केली तर आरोग्य व्यवस्था भक्कम होण्यासाठी याची खूप मदत होईल. चांगला,अनुभवी फार्मासिस्ट सरकारी नियंत्रणातील आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी चांगले योगदान देऊ शकतो." असे नंदकुमार जगताप सांगतात.
"आजच्या काळात मेडिकल क्षेत्रात कितीही स्पर्धा वाढलेली असली तरी तुमचा प्रामाणिकपणा, मेहनत, सचोटी, विश्वास व रुग्णांना दिली जाणारी प्रामाणिक सेवा तुमच्या व्यावसायात तुम्हाला मोठे यश देते. रुग्णांना नेहमी दर्जेदार औषध देऊन, निरोगी स्वास्थ राहण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे." असे नंदकुमार जगताप सांगतात.
ऐतिहासिक सासवड भूमीचा इतिहास, पुरंदरचा इतिहास व महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे नंदकुमार जगताप सांगतात "सासवड येथे साजरी केली जाणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक जयंती महाराष्ट्रातील दोन नंबरची मोठी शिवजयंती आहे. शिवजयंती हा सोहळा, सण आमच्या शिवभक्तांना प्रेरणा व ऊर्जा देणार असतो."
1952 ला सासवड येथे श्री छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळ स्थापन झाले. सासवडचे माजी नगराध्यक्ष श्री दत्तानाना जगताप यांनी ही शिवजयंती महाराष्ट्रात दोन नंबरची मोठी, एवढी भव्य दिव्य साजरी केली. तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा पवार या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवात अवश्य भेट देऊन, उपस्थित राहत होते.
"एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला तरुण पुरंदर तालुक्यात 26 वर्ष माधुरी मेडिकलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना प्रामाणिकपणे, दर्जेदार आरोग्य सेवा देतो. कोरोना काळात शेकडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरून कोरोना महामारीशी संघर्ष करणारा सामाजिक कार्यकर्ता. कोरोना काळात लोकांचा जीव वाचवण्याचा ध्यास घेऊन झपाटून, निर्भीडपणे, माणुसकीच्या भावनेतून काम करणारा कोवीड योद्धा. गरीब मराठा समाजातील लाखो - करोडो तरुणांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा सच्चा,प्रामाणिक कार्यकर्ता. कोरोना काळात पुरंदर तालुक्यात तसेच सासवडमध्ये नागरिकांच्या मदतीला धावून येणारा, नागरिकांच्या समस्या सोडवणारा हक्काचा माणूस स्वीकृत नगरसेवक. माधुरी मेडिकल, माधुरी डिस्ट्रीब्युटर्स, माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना प्रामाणिक सेवा देणारा ध्येयवादी,प्रेरणादायी योद्धा नंदकुमार जगताप यांचा हा हृदयस्पर्शी प्रवास, "जगताप कुटुंबियांचा" हा प्रगतशील प्रवास महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी ऊर्जा देणारा व प्रेरणादायी आहे.
पुणे जिल्ह्यात,पुरंदर तालुक्यात तरुणांमध्ये लोकप्रिय असणारे यशस्वी व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, मा. स्वीकृत नगरसेवक नंदकुमार जगताप यांच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...
लेखक : - अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.
No comments:
Post a Comment